Get Mystery Box with random crypto!

कृषिक अँप Krushik app

टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
चैनल का पता: @krushikappkvk
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.05K
चैनल से विवरण

Krushik app

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 5

2022-06-13 09:26:48 सस्नेह नमस्कार,
अग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्र,बारामती, कृषिक ऍप व इस्त्राईल केमिकल्स लिमिटेड (ICL) यांच्या संयुक्त विद्यमाने
“मृगबहार केळीचे खत व्यवस्थापन ” फेसबुक लाइव्ह Facebook Live* च्या माध्यमातून
*लाईव्ह ऑन*
https://www.facebook.com/krushikapp
*मार्गदर्शक* -
श्री.संजय बिरादार,
वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ,
इस्त्राईल केमिकल्स लिमिटेड (ICL)*
*तारीख* - १३/०६/२०२२
*वार*- सोमवार
*वेळ* - दुपारी ४ ते ५
*नाव नोंदणी पुढे दिलेल्या लिंकवरुन करणे आवश्यक*
https://forms.gle/VzWzAJuqEPcK2Pez8
*विनित*
*कृषिक ऍप, कृषी विज्ञान केंद्र, बारामती*
ICL Fertilizers India
297 views06:26
ओपन / कमेंट
2022-06-13 08:17:31 कोकणात आज जोरदार पावसाचा अंदाज

सौजन्य : अॅग्रोवन
दिनांक : 13-Jun-22
पुणे : कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात मॉन्सूनच्या पावसाने हजेरी लावली आहे. राज्याच्या कमाल तापमानातही घट होऊ लागली आहे. आज (ता. १३) कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
उत्तर प्रदेशपासून आसामपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. दक्षिण गुजरात किनाऱ्यापासून उत्तर केरळपर्यंत पश्‍चिम किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण गुजरातपासून अग्नेय अरबी समुद्रापर्यंत हवेचा आणखी एक कमी दाबाचा पट्टा समुद्रसपाटीपासून ३.१ ते ४.५ किलोमीटरपर्यंत विस्तारला आहे. यामुळे पश्‍चिम किनारपट्टीवर ढगांची दाटी झाली आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात मॉन्सून दाखल झाला आहे. उर्वरित राज्यात पूर्वमोसमीच्या ढगांची छाया असल्याने कमाल तापमानात घट होऊ लागली आहे. रविवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये गोंदिया येथे राज्यातील उच्चांकी ४१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भाच्या बहुतांश भागात अद्यापही तापमान चाळिशीपार आहे.
रविवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.५, नगर ३८.२, धुळे ४०, जळगाव ३९.८, कोल्हापूर २७.६, महाबळेश्‍वर २०.७, नाशिक ३२.२, निफाड ३६.६, सांगली ३०.९, सातारा २९.९, सोलापूर ३४.९, सांताक्रूझ ३३.२, डहाणू ३२, रत्नागिरी २८.५, औरंगाबाद ३४.३, परभणी ४०.१, नांदेड ३४.२, अकोला ४०.१, अमरावती ३७, बुलडाणा २२.९, ब्रह्मपुरी ४१, चंद्रपूर ३७.८, गोंदिया ४१.६, नागपूर ४१, वर्धा ४१.५, यवतमाळ ३९.५
मॉन्सूनच्या प्रगतीस पोषक हवामान : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बहुतांश कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग व्यापला आहे. मॉन्सूनच्या प्रगतीस पोषक वातावरण असल्याने आज (ता. १३) संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्राचा बहुतांशी भाग, कर्नाटक, तमिळनाडूचा उर्���रित भाग, तेलंगणा, आंध्र प्रदेशच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
विजा, मेघगर्जना, जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
कोकण : ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
मध्य महाराष्ट्र : नाशिक, नगर, पुणे
मराठवाडा : उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड
विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली
रविवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) : कोकण : कुडाळ, मालवण प्रत्येकी ७०, देवगड, सावंतवाडी प्रत्येकी ६०, अलिबाग ५०, दापोली, पालघर, कुलाबा प्रत्येकी ४०, कणकवली, लांजा, गुहागर, रामेश्वर, मुरूड, डहाणू, राजापूर प्रत्येकी ३०
मध्य महाराष्ट्र : पाथर्डी, अक्कलकुवा प्रत्येकी ६०, दिंडोरी, धुळे, पन्हाळा प्रत्येकी ५०, सिन्नर ४०, चंदगड, जुन्नर, नांदगाव प्रत्येकी ३०
मराठवाडा : अहमदपूर, देगलूर, पूर्णा प्रत्येकी ५०, पैठण, मानवत प्रत्येकी ४०, कळमनुरी, लोहा, पाथरी, किनवट, उमरी प्रत्येकी ३०
विदर्भ : मेहकर, डिग्रस प्रत्येकी ४०, लोणार, अकोला प्रत्येकी ३०, करंजलाड, मनोरा, सिंदखेड राजा, रिसोड, बुलडाणा, तेल्हारा प्रत्येकी २०
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
278 views05:17
ओपन / कमेंट
2022-06-10 15:04:00 आजचा कृषी सल्ला
सोयाबीन
बियाणे प्रमाण
पेरणीसाठी एकरी २६ किलो बियाणे वापरावे. एकरी झाडांची संख्या १.७६ ते १.८० लाख ठेवावी. घरचे बियाणे असेल व बियाण्याची उगवणक्षमता ७० टक्क्यांपेक्षा कमी असेल, तर त्यानुसार बियाण्याचे प्रमाण वाढवावे.
बीजप्रक्रिया
सोयाबीनवर येणाऱ्या विविध रोगांसाठी रोग आल्यानंतर बुरशीनाशकांची फवारणी घेण्यापेक्षा पेरणीपूर्वीच बीजप्रक्रिया केल्यास सुरुवातीच्या टप्प्यामध्ये रोगांचे व्यवस्थापन चांगले होते. पेरणीपूर्वी कार्बोक्झीन (३७.५%) + थायरम (३७.५% डीएस) ३ ग्रॅम प्रति किलो बीजप्रक्रिया केल्यास कॉलर रॉट, चारकोल रॉट व रोपावस्थेतील अन्य रोगांपासून पिकाचे संरक्षण होते. अलीकडील काही वर्षांत सुरुवातीच्या अवस्थेत काही भागांत खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. तसेच गतवर्षी शेतकर्‍यांनी उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतल्यामुळे या खरीपातही खोडमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. म्हणून वरील बुरशीनाशकासोबत थायमिथोक्झाम (३०% एफएस) १० मि.लि. प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. या बीजप्रक्रियेमुळे खोडमाशीसोबतच रसशोषक किडींच्या नियंत्रणासही मदत होते. या प्रक्रियेनंतर ब्रेडी रायझोबिअम अधिक स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धन प्रत्येकी २५० ग्रॅम प्रति दहा किलो बियाणे अशी प्रक्रिया करावी. बियाणे प्रक्रियेनंतर सावलीमध्ये वाळवून शक्य तेवढ्या लवकर पेरणी करावी. ब्रेडी रायझोबिअम या जिवाणू संवर्धनाची पेरणीवेळी बीजप्रक्रिया केल्यास सहजीवी जिवाणूंच्या गाठींची संख्या वाढते. हे जिवाणू हवेतील नत्र शोषून घेऊन जमिनीमध्ये नत्राचे स्थिरीकरण करतात. हे नत्र पिकास उपलब्ध होते. स्फुरद विरघळणारे जिवाणू ‘स्फुरद’ हे अन्नद्रव्य पिकास वाढीच्या काळात उपलब्ध करून देतात.
*भात*
रोपवाटिकेतील एकात्मिक रोग व्यवस्थापन
- रोगप्रतिकारक जातींचा वापर करावा.
- निरोगी शेतातील रोगमुक्‍त किंवा प्रमाणित बियाण्यांचा वापर करावा. बुरशीनाशक आणि अणुजीवनाशकांची बीजप्रक्रिया करावी.
- रासायनिक खतांचा वापर शिफारशीत मात्रेप्रमाणेच करावा. नत्रयुक्‍त खते प्रमाणापेक्षा जास्त टाकू नयेत. तसे केल्यास करपा रोगांचे प्रमाण खूपच वाढते.
- करपा आणि पर्ण करपा या दोन्ही रोगांच्या नियंत्रणासाठी, कार्बेन्डाझिम किंवा क्‍युन्टाल किंवा हेक्‍झाकोनाझोल १ ग्रॅम/ मि.लि. किंवा इप्रोबेनफ��स २ मि.लि. अधिक स्टिकर (चिकट द्राव) १ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारावे. या व्यतिरिक्‍त करपा (ब्लास्ट) रोगाच्या उत्कृष्ट नियंत्रणासाठी, ट्रायसायक्‍लाझोल किंवा कासुगामायसीन किंवा एडिफेनफॉस किंवा आयसोप्रोथिओलेन १ ते १.५ ग्रॅम/ मि.लि. अधिक स्टिकर १ मि.लि. प्रति लिटर पाणी यांची फवारणी करावी.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
301 views12:04
ओपन / कमेंट
2022-06-10 13:38:20 खरीप पिकांसाठी सेंद्रिय बीजोपचार अॅक्टोसोल सीड कोट फेसबुक लाइव्ह मध्ये सहभागी व्हा
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1076098133011196&id=1832292603705174
297 views10:38
ओपन / कमेंट
2022-06-09 08:21:59 कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस वाढणार

सौजन्य : सकाळ
दिनांक : 09-Jun-22
पुणे - मॉन्सूनचे आगमन लांबले असले तरी राज्यात पूर्वमोसमी पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे. आजपासून (ता. ९) कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस वाढणार असून, उद्यापासून (ता. १०) कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
पूर्व उत्तर प्रदेश आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांपासून छत्तीसगड, सीमांध्र, रायलसीमापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापासून तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. दक्षिण भारतात परस्पर विरोधी वाऱ्यांची स्थिती असून, राज्यात पावसाला पोषक हवामान आहे.
विदर्भात उष्ण लाट कायम असून, चंद्रपूर गोंदिया, वर्धा, नागपूर, ब्रह्मपुरी येथे कमाल तापमानाचा पारा ४५ अंशांच्या आसपास आहे. बुधवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर, गोंदिया येथे राज्यातील उच्चांकी ४५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात ढगाळ हवामान होत असून, आज (ता. ९) कोकण, मध्य महाराष्ट्र काही ठिकाणी तर मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज आहे. मॉन्सून ‘जैसे थे’
नैॡत्य मोसमी वाऱ्याच्या (मॉन्सून) बंगालच्या उपसागरातील शाखेने पुढे चाल करत मंगळवारी (ता. ७) तमिळनाडूच्या काही भागातही प्रगती केली आहे. मात्र, अरबी समुद्रातून गोव्याच्या उंबरठ्यापर्यंत मजल मारणाऱ्या मॉन्सून वाटचाल ‘जैसे थै’ आहे. वादळी पावसाचा इशारा
•कोकण - ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
•मध्य महाराष्ट्र - नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर.
•मराठवाडा - औरंगाबाद, जालना, बीड, परभणी. •विदर्भ - बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
26 views05:21
ओपन / कमेंट
2022-06-09 07:28:22

64 views04:28
ओपन / कमेंट
2022-06-08 15:44:53 आजचा कृषी सल्ला
आले
जमीन भुसभुशीत राहण्यासाठी आडवी-उभी नांगरट करून घ्यावी. दोन नांगरटींमध्ये पंधरा दिवसांचे अंतर ठेवावे. त्यानंतर मागील पिकाची धसकटे वेचून कच्चे गादीवाफे तयार करून घ्यावेत. कच्या गादीवाफ्यावर शेणखत एकरी १२ ते १५ टन, निंबोळी पेंड ४०० किलो, सिंगल सुपर फॉस्फेट २०० किलो, म्युरेट ऑफ पोटॅश ५० किलो टाकून घ्यावा. त्यानंतर रोटाव्हेटर मारून खते मिसळून घ्यावीत. पक्के गादीवाफे तयार करावेत. दोन गादीवाफ्यांमधील अंतर ४ ते ५ फूट ठेवावे. गादीवाफ्यावर दोन ओळी लावल्या असतील, तर ठिबक सिंचनाचा वापर करावा. गादीवाफ्याची वरची रुंदी ५० ते ६० सें.मी., तर उंची ३० सें.मी. ठेवावी. दोन ओळींतील अंतर ३० सें.मी. ठेऊन, दोन कंदांमधील अंतर २२.५ सें.मी. ठेवावे. गादीवाफ्यावर तीन किंवा त्यापेक्षा जास्त ओळी लावायच्या असतील तर तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. त्यासाठी ओळीप्रमाणे दोन सरींतील अंतर ठेवून गादीवाफ्यावरील दोन ओळींमध्ये आणि रोपांमध्ये २२.५ सें.मी. अंतर ठेवावे. आले लागवडीपूर्वी गादीवाफे पूर्णपणे भिजवून घेऊन वाफसा आल्यानंतर आल्याची लागवड करावी आणि लगेच पाणी द्यावे. लागवड करताना कंदावरील डोळा वरती आणि बाहेरच्या बाजूला असावा, त्यामुळे निपजणारा कोंब मजबूत असतो आणि त्याची वाढ चांगली होते. कंद ४ ते ५ सें.मी. खोल लावावेत. लागवडीच्या वेळी कंद पूर्णपणे झाकले जातील, याची दक्षता घ्यावी. एकरी ३० ते ३५,००० रोपांची संख्या किंवा कंदांची संख्या ठेवावी.
*हळद*
प्रवाही पाणी देण्यासाठी सरी-वरंबा पद्धत, तर यांत्रिकीकरण आणि ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीसाठी गादीवाफ्यावर लागवड करावी.
सरी-वरंबा पद्धत: ७५-९० सें.मी. अंतरावर सऱ्या पाडून घ्याव्यात. सऱ्या पाडण्यापूर्वी एकरी १२ टन कुजलेले शेणखत, ३०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ७५ किलो पोटॅश जमिनीत मिसळून द्यावे. जमिनीच्या उतारानुसार ६-७ सरी-वरंब्याचे एक वाकुरे याप्रमाणे वाकुरी बांधून घ्यावीत. वाकुऱ्याची लांबी ५-६ मीटर ठेवावी. वरंब्याच्या दोन्ही बाजूंस ३० सें.मी. अंतरावर गड्डे कुदळीने आगाऱ्या घेऊन लावावे किंवा वाकुरी पाण्याने भरल्यानंतर गड्डे पाण्यामध्ये वरंब्यात ३ व ५ सें.मी. खोल दाबून घ्यावेत.
गादीवाफा पद्धत: या पद्धतीत ४-५ फूट अंतर ठेवून सऱ्या पाडाव्यात. वरंबे सपाट करून १ फूट उंचीचे आणि ६० सें.मी. सपाट माथा असलेले गादीवाफे बनवावेत. गादीवाफ्याच्या मध्यभागी लॅटरल अंथरून लॅटरलच्या दोन्ही बाजूंना १५ सें.मी. अंतरावर कंद उभे/ आडवे लावावेत. म्हणजे दोन ओळींमधील अंतर ३० सें.मी. राहते. दोन कंदामधील अंतरही ३० सें.मी. ठेवावे. एकरी साधारणतः २२-२३,००० कंद लागतात. तुषार सिंचन पद्धतीचा वापर करण्यासाठी दोन सऱ्यांमधील अंतर ६ फूट ठेवावे. गादीवाफ्याची उंची १ फूट व रुंदी ४ फूट ठेवावी. दोन्ही बाजूंना १५ सें.मी. अंतर ठेवून दोन ओळींमधील अंतर ३० सें.मी. ठेवावे. एका गादीवाफ्यावर कंदांच्या चार ओळी लावाव्यात. दोन कंदांमध्ये ३० सें.मी. अंतर ठेवावे. लागवडीवेळी कंदाची निमुळती बाजू खाली जाणार नाही, याची काळजी घ्यावी. गादीवाफे पूर्ण भिजवूनच लागवड करावी.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
248 views12:44
ओपन / कमेंट
2022-06-08 14:08:36 सोयाबीन लागवड तंत्रज्ञान फेसबुक लाइव्ह मध्ये सहभागी व्हा
https://m.facebook.com/story.php?story_fbid=413605904009638&id=1832292603705174
245 views11:08
ओपन / कमेंट
2022-06-08 09:12:03 सस्नेह नमस्कार,
अग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र,बारामती
कृषिक अॅप, यांच्या तर्फे आयोजित
“ सोयाबीन लागवड तंत्रज्ञान” * या विषयावर परिसंवाद "फेसबुक लाइव Facebook Live* च्या माध्यमातून
*लाईव्ह ऑन*
https://www.facebook.com/krushikapp
मार्गदर्शक- श्री. महेश जाधव
फार्म मॅनेजर
(अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट
ट्रस्ट, बारामती)
*तारीख* - ०८/०६/२०२२
*वार*- बुधवार
*वेळ* - दुपारी ४ ते ५
विनित,
कृषिक ऍप, कृषी विज्ञान केंद्र, बारामती
सदरची लिंक सर्व शेतकरी,शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी मित्र यांच्यापर्यंत पोहचवावी ही विनंती
303 views06:12
ओपन / कमेंट
2022-06-08 09:12:02
278 views06:12
ओपन / कमेंट