Get Mystery Box with random crypto!

आजचा कृषी सल्ला सोयाबीन बियाणे प्रमाण पेरणीसाठी एकरी २६ किलो | कृषिक अँप Krushik app

आजचा कृषी सल्ला
सोयाबीन
बियाणे प्रमाण
पेरणीसाठी एकरी २६ किलो बियाणे वापरावे. एकरी झाडांची संख्या १.७६ ते १.८० लाख ठेवावी. घरचे बियाणे असेल व बियाण्याची उगवणक्षमता ७० टक्क्यांपेक्षा कमी असेल, तर त्यानुसार बियाण्याचे प्रमाण वाढवावे.
बीजप्रक्रिया
सोयाबीनवर येणाऱ्या विविध रोगांसाठी रोग आल्यानंतर बुरशीनाशकांची फवारणी घेण्यापेक्षा पेरणीपूर्वीच बीजप्रक्रिया केल्यास सुरुवातीच्या टप्प्यामध्ये रोगांचे व्यवस्थापन चांगले होते. पेरणीपूर्वी कार्बोक्झीन (३७.५%) + थायरम (३७.५% डीएस) ३ ग्रॅम प्रति किलो बीजप्रक्रिया केल्यास कॉलर रॉट, चारकोल रॉट व रोपावस्थेतील अन्य रोगांपासून पिकाचे संरक्षण होते. अलीकडील काही वर्षांत सुरुवातीच्या अवस्थेत काही भागांत खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. तसेच गतवर्षी शेतकर्‍यांनी उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतल्यामुळे या खरीपातही खोडमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. म्हणून वरील बुरशीनाशकासोबत थायमिथोक्झाम (३०% एफएस) १० मि.लि. प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. या बीजप्रक्रियेमुळे खोडमाशीसोबतच रसशोषक किडींच्या नियंत्रणासही मदत होते. या प्रक्रियेनंतर ब्रेडी रायझोबिअम अधिक स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धन प्रत्येकी २५० ग्रॅम प्रति दहा किलो बियाणे अशी प्रक्रिया करावी. बियाणे प्रक्रियेनंतर सावलीमध्ये वाळवून शक्य तेवढ्या लवकर पेरणी करावी. ब्रेडी रायझोबिअम या जिवाणू संवर्धनाची पेरणीवेळी बीजप्रक्रिया केल्यास सहजीवी जिवाणूंच्या गाठींची संख्या वाढते. हे जिवाणू हवेतील नत्र शोषून घेऊन जमिनीमध्ये नत्राचे स्थिरीकरण करतात. हे नत्र पिकास उपलब्ध होते. स्फुरद विरघळणारे जिवाणू ‘स्फुरद’ हे अन्नद्रव्य पिकास वाढीच्या काळात उपलब्ध करून देतात.
*भात*
रोपवाटिकेतील एकात्मिक रोग व्यवस्थापन
- रोगप्रतिकारक जातींचा वापर करावा.
- निरोगी शेतातील रोगमुक्‍त किंवा प्रमाणित बियाण्यांचा वापर करावा. बुरशीनाशक आणि अणुजीवनाशकांची बीजप्रक्रिया करावी.
- रासायनिक खतांचा वापर शिफारशीत मात्रेप्रमाणेच करावा. नत्रयुक्‍त खते प्रमाणापेक्षा जास्त टाकू नयेत. तसे केल्यास करपा रोगांचे प्रमाण खूपच वाढते.
- करपा आणि पर्ण करपा या दोन्ही रोगांच्या नियंत्रणासाठी, कार्बेन्डाझिम किंवा क्‍युन्टाल किंवा हेक्‍झाकोनाझोल १ ग्रॅम/ मि.लि. किंवा इप्रोबेनफ��स २ मि.लि. अधिक स्टिकर (चिकट द्राव) १ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारावे. या व्यतिरिक्‍त करपा (ब्लास्ट) रोगाच्या उत्कृष्ट नियंत्रणासाठी, ट्रायसायक्‍लाझोल किंवा कासुगामायसीन किंवा एडिफेनफॉस किंवा आयसोप्रोथिओलेन १ ते १.५ ग्रॅम/ मि.लि. अधिक स्टिकर १ मि.लि. प्रति लिटर पाणी यांची फवारणी करावी.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en