Get Mystery Box with random crypto!

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता सौज | कृषिक अँप Krushik app

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

सौजन्य : अॅग्रोवन
दिनांक : 06-Jun-22
पुणे : उष्ण लाटेने विदर्भ अक्षरशः भाजून निघत असल्याने उन्हाचा चटका असह्य होत आहे. राज्यातही कमाल तापमानात वाढ झाली आहे. आज (ता. ६) विदर्भात उष्ण लाटेचा इशारा असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
रविवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये गोंदिया येथे राज्यातील उच्चांकी ४५.��� अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर वर्धा, नागपूर येथे ४५ अंशांपेक्षा अधिक, ब्रह्मपुरी, अकोला येथे ४४ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. राज्यातही उन्हाचा चटका आणि उकाडा चांगलाच वाढला आहे.
पूर्व उत्तर प्रदेश आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांपासून दक्षिण छत्तीसगड पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती असून, त्यापासून श्रीलंकेपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
आज (ता. ६) राज्यात उन्हाचा चटका राहणार असून, विदर्भात उष्ण लाट कायम राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान झाल्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.
रविवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३६.७, धुळे ४०.०, जळगाव ४१.४, कोल्हापूर ३३.९, महाबळेश्वर २९.०, नाशिक ३६.१, निफाड ३७.४, सांगली ३५.५, सातारा ३७.६, सोलापूर ३९.६, सांताक्रूझ ३४.०, डहाणू ३४.१, रत्नागिरी ३४.५, औरंगाबाद ४०.२, परभणी ४२.७, नांदेड ४०.८, अकोला ४४.२, अमरावती ४३.८, बुलडाणा ४०.४, ब्रह्मपुरी ४४.५, चंद्रपूर ४३.२, गोंदिया ४५.६, नागपूर ४५.३, वाशीम ४१.५, वर्धा ४५.५, यवतमाळ ४२.५
मॉन्सून आगमन लांबले : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) कर्नाटक किनारपट्टीचा बहुतांश भाग व्यापून गोव्याच्या उंबरठ्यापर्यंत मजल मारल्याने कोकणात मॉन्सून लवकर दाखल होण्याची स्थिती होती. मात्र मॉन्सूनचे प्रवाह मंदावल्याने अरबी समुद्रावरून प्रगती थांबल्याने महाराष्ट्रातील आगमनही लांबले आहे. संपूर्ण ईशान्य भारतासह सिक्कीम आणि पश्चिम बंगाल राज्याच्या हिमालयाकडील भागात मॉन्सून दाखल झाला.
उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) :
विदर्भ : वर्धा, चंद्रपूर, गोंदिया.
वादळी पावसाचा इशारा :
मध्य महाराष्ट्र : नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर
मराठवाडा : बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en