Get Mystery Box with random crypto!

डॉ. रामचंद्र साबळे यांच्याकडून पावसाचा अंदाज जाहीर; जून महिन्य | कृषिक अँप Krushik app

डॉ. रामचंद्र साबळे यांच्याकडून पावसाचा अंदाज जाहीर; जून महिन्यात खंडाची शक्यता

सौजन्य : अॅग्राेवन
दिनांक : 02-Jun-22
पुणे : राज्यात जून ते सप्टेंबर या कालावधीचा दीर्घकालीन पावसाचा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ व कृषी हवामान फोरम साउथ आशियाचे संस्थापक सदस्य डॉ. रामचंद्र साबळे यांनी जाहीर बुधवारी (ता. १) केला. यंदा राज्यात सरासरीच्या १०१ टक्के पाऊस (Rain) होण्याची शक्यता वर्तविली आहे. यामध्ये पाच टक्के कमीअधिक तफावत आढळून येण्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रासाठी २०२२ वर्षासाठी जून ते सप्टेंबर मॉन्सून पावसाचा अंदाज वर्तविला आहे. हा अंदाज कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषावर आधारित आहे. या वर्षी वाऱ्याचा वेग कमी आढळल्याने जून महिन्यात येथे खंड राहण्याची शक्यता आहे. जुलैच्या दुसऱ्या पंधरवाड्यापासून ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले राहील. तर कमी दिवसांत अधिक पाऊस आणि काही काळ पावसात मोठे खंड हवामानात राहतील.
यंदा पूर्व विदर्भ विभागात सर्वाधिक १०३ टक्के पावसाचा अंदाज वर्तविला आहे. यामध्ये शिंदेवाही (चंद्रपूर) येथे सरासरीच्या ११९१ मिलिमीटरपैकी १२२७ मिलिमीटर म्हणजेच १०३ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मध्य विदर्भ विभागात १०१ टक्के अंदाज व्यक्त केला असून, यवतमाळ केंद्राच्या परिसरात सरासरीच्या ८८२ मिलिमीटरपैकी ९०० मिलिमीटर म्हणजेच १०२ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये पाच टक्के कमीअधिक तफावत आढळून येईल. पश्‍चिम विदर्भ विभागात १०० टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये अकोला केंद्राचा समावेश येतो. पश्‍चिम, मध्य महाराष्ट्रात १००.३ टक्के पावसाची शक्यता असून, यामध्ये कोल्हापूर, कराड, पाडेगाव, सोलापूर, राहुरी, पुणे केंद्रांचा समावेश होतो. पाडेगाव, कोल्हापूर, कराड, राहुरी -सोनई, पुणे केंद्राच्या परिसरात शंभर टक्के पाऊस पडेल. तर सोलापूर केंद्राच्या परिसरात सर्वाधिक पाऊस पडेल. उत्तर महाराष्ट्रात, कोकण व मराठवाडा विभागातही १०० टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात निफाड, धुळे, जळगाव, कोकण विभागात दापोली, मराठवाडा विभागांत परभणी केंद्राचा समावेश होतो.
राज्यातील केंद्रनिहाय जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणारा पावसाचा अंदाज, टक्केवारीमध्ये :
विभाग --- सरासरी पाऊस, मिमी ------पावसाचा अंदाज -- सरासरीची टक्केवारी (± ५ %)
अकोला -- ६८३ --- ६८३ -- १००
नागपूर -- ९५८ --- ९५८ --- १००
यवतमाळ -- ८८२ --- ९०० -- १०२
शिंदेवाही (चंद्रपूर) -- ११९१ --- १२२७ ---१०३
परभणी, जालना --- ८१५ -- ८१५ --- १००
दापोली --- ३३३९ -- ३३३९ -- १००
निफाड --- ४३२ -- ४२३ --- १००
धुळे --- ४८१ --- ४९१ --- १०२
जळगाव -- ६४० -- ६४० --- १००
कोल्हापूर, शिरोळ --- ७०६ -- ७०६ -- १००
कराड, कृष्णा --- ६५० -- ६५० --१००
पाडेगाव, लाटे -- ३६० -- ३५० -- १००
सोलापूर --- ५४३ -- ५५४ -- १०२
राहुरी, सोनई --- ४०६ --- ४०६ -- १००
पुणे --- ५६६ --- ५६६ -- १००
यंदाच्या पावसाळ्यात राज्यात १०१ टक्के पावसाचा अंदाज आहे. यामध्ये सर्वच विभागांत शंभर टक्के पाऊस पडण्याची शक्यता असून, यवतमाळ, शिंदेवाही, धुळे, सोलापूर परिसरात सर्वाधिक पाऊस पडेल. खरिपात शेतकऱ्यांनी ६५ मिलिमीटर पाऊस व पुरेसा ओलावा झाल्याशिवाय पेरणी करू नये. याशिवाय धूळवाफ पेरणी करू नये. - डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ व संस्थापक सदस्य, कृषी हवामान फोरम साऊथ आशिया
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en