Get Mystery Box with random crypto!

पीक विम्यासाठी नुकसानीची पूर्वसूचना कशी द्याल? सौजन्य : ॲग् | कृषिक अँप Krushik app

पीक विम्यासाठी नुकसानीची पूर्वसूचना कशी द्याल?

सौजन्य : ॲग्रोवन
दिनांक : 30-Dec-21

२७ आणि २८ डिसेंबरला राज्यात काही ठिकाणी गारपीट आणि अवेळी पाऊस झाला. त्याने प्रभावित झालेल्या महसूल मंडळातील नुकसानग्रस्त विमाधारक शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत आपल्या पिकाच्या नुकसानीची पूर्वसूचना आपल्या संबंधित विमा कंपनीकडे सादर करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
जिथे पिकांचे नुकसान झाले, अशा अधिसूचित महसूल मंडळांमधील विमाधारक शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपनीला घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत नुकसानीबाबत सूचना देणे आवश्यक असते. याबाबतची पूर्वसूचना आपल्या संबंधित विमा कंपनीला देण्यासाठी पुढील पर्यायांचा वापर करता येईल -
१. क्रॉप इन्शुरन्स ॲप
२. विमा कंपनी टोल फ्री क्रमांक
३. विमा कंपनीचा ई-मेल
४. विमा कंपनीचे तालुकास्तरीय कार्यालय
५. कृषी विभागाचे मंडल कृषी अधिकारी कार्यालय
६. ज्या बँकेत विमा जमा केला ती बँक शाखा
२७ व २८ डिसेंबर २०२१ रोजी राज्यात काही ठिकाणी गारपीट, अवेळी पावसामुळे शेतात उभ्या असलेल्या तूर आणि कापूस पिकांचे नुकसान झाले. तर काही प्रमाणात काढणी झालेल्या तुरीचेही नुकसान झाले. त्याचबरोबर गहू, हरभरा, रब्बी ज्वारी यासारख्या पिकांच्या नुकसानीच्या बातम्या समोर येत आहेत. - कृषी विभाग, महाराष्ट्र शासन
आजच आपली “कृषिक प्रदर्शन २०२२” साठी नाव नोंदणी करण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en