Get Mystery Box with random crypto!

आजचा कृषी सल्ला आले आल्याचे कंद चांगले पोसण्यासाठी सात महिन्या | कृषिक अँप Krushik app

आजचा कृषी सल्ला
आले
आल्याचे कंद चांगले पोसण्यासाठी सात महिन्यांपर्यंत ०-०-५० हे विद्राव्य खत ठिबकमधून सुरू ठेवावे. आल्याचे कोवळे गड्डे सूर्यप्रकाशात उघडे दिसत असल्यास, त्यांच्यामध्ये हरितद्रव्य तयार झाल्यामुळे ती हिरवी पडून त्यांची वाढ थांबते. तसेच पूर्ण वाढ झालेल्या गड्ड्याच्या टोकाकडील भागातून पान बाहेर पडते व त्याची जाडी कमी होते. पर्यायाने उत्पादनात घट येते. हे टाळण्यासाठी उघड्या पडलेल्या गड्ड्यांवर माती टाकून ते झाकून घ्यावेत.
हळद
वाढीच्या दुसऱ्या अवस्थेनंतर म्हणजेच लागवडीपासून पाच ते साडे पाच महिन्यांनंतर हळदीची उंची वाढत नाही. या टप्प्यात नत्रयुक्त खतांचा वापर कमी करावा. साडेपाच फुटांपेक्षा हळदीची उंची अधिक असल्यास क्‍लोरमेक्वाट क्‍लोराईड सारख्या वाढ नियंत्रकाचा वापर तज्ञांच्या सल्ल्याने करावा. त्यामुळे हळद काडावरती जाण्याचा धोका टळतो. वाढीची तिसरी अवस्था पाच ते सात महिने या दरम्यान असते. या अवस्थेमध्ये ०-०-५० या विद्राव्य खताचा वापर करावा.
ओली हळकुंडे सूर्यप्रकाशात उघडी दिसत असल्यास हळकुंडे हिरवी पडून वाढ थांबते. तसेच पूर्ण वाढ झालेल्या हळकुंडाच्या टोकाकडील भागातून पान बाहेर पडते व त्याची जाडी कमी होते, पर्यायाने उतारा कमी मिळतो. हे टाळण्यासाठी उघड्या पडलेल्या हळकुंडावर माती टाकावी.
आजच आपली “कृषिक प्रदर्शन २०२२” साठी नाव नोंदणी करण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en