Get Mystery Box with random crypto!

आजचा कृषी सल्ला गहू कीड नियंत्रण खोडमाशी उशिरा पेरणी झा | कृषिक अँप Krushik app

आजचा कृषी सल्ला
गहू
कीड नियंत्रण
खोडमाशी
उशिरा पेरणी झालेल्या गव्हामध्ये किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने आढळतो. ढगाळ हवामान किडीस पोषक असते. किडीची अळी दवबिंदूतील ओलाव्याच्या मदतीने पोंग्यात शिरून गाभा खाते. त्यामुळे रोपमर, तसेच फुटवे मर दिसून येते. पूर्ण वाढ झालेली अळी ८ ते १० मि.मी. लांब असून पिवळसर रंगाची असते. मृत पोंगा ओढल्यास तळाशी खोडमाशीची अळी दिसून येते.
नियंत्रण
पोंगेमर किंवा फुटवे मर १० टक्के दिसून आल्यास, ५ टक्के निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस (२५ ईसी) १.५ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून १ ते २ फवारण्या कराव्यात.
मावा
पिले व प्रौढ पानांच्या पाठीमागच्या बाजूस, कोवळे शेंडे तसेच खोडावर समूहाने एकवटलेले दिसून येतात व त्यातील पेशीरस शोषून घेतात. त्यामुळे पाने पिवळसर रोगट होतात. मधाप्रमाणे चिकट द्रव विष्ठेवाटे पांनांवर, खोडावर व गव्हाच्या कोवळ्या शेंड्यांवर टाकते, त्यावर काळी बुरशी वाढुन पानाची प्रकाश संश्‍लेषण क्रिया बंद होते, परिणामी रोपे मरतात आणि पीक उत्पादनात मोठी घट येते.
नियंत्रण
शेतामध्ये पिवळ्या चिकट कार्डचा वापर एकरी १० ते १२ या प्रमाणात (सर्वेक्षण व नियंत्रणासाठी) करावा. जैविक उपायांमध्ये लेकॅनिसिलीयम लेकॅनी किंवा मेटाऱ्हायझियम ॲनिसोप्ली ४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून १० ते १५ दिवसांच्या अंतराने दोनवेळा फवारावे. जैविक उपाययोजना करूनही कीड नियंत्रित होत नसल्यास, थायमिथोक्‍झाम ०.१ ग्रॅम किंवा ॲसिटामिप्रीड ०.४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून १० ते १५ दिवसांच्या अंतराने दोनवेळा फवारावे.
*हरभरा*
*घाटे अळी*
ही हरभऱ्यावरील मुख्य किड आहे. घाटे अळी ही कीड हरभऱ्याव्यतिरिक्त तूर, मका, सूर्यफुल, टोमॅटो, भेंडी, करडई, कापूस, ज्वारी, वाटाणा इ. पिकांवर उपजीविका करत असल्यामुळे या किडीचे वास्तव्य शेतात वर्षभर राहते. म्हणून जमिनीची निवड करताना खरीप हंगामात यापैकी पिके घेतली असल्यास अशा जमिनीत हरभऱ्याचे पीक घेऊ नये. पिकांच्या फेरपालटीकरिता तृणधान्य अथवा गळीतधान्याची पिके घ्यावीत, जमिनीची खोल नांगरट करावी. एकरी ४ ते ६ कामगंध सापळे लावावेत. यामध्ये मोठया प्रमाणावर पतंग अडकले जाऊन पुढील प्रजननास आळा बसतो. पक्ष्यांना बसण्यासाठी दर १५-२० मीटर अंतरावर काठया रोवाव्यात किंवा मचान बांधावीत. म्हणजे कोळसा पक्षी, चिमण्या, साळुंकी, बगळे इ. पक्षी पिकावरील अळया पकडून खातात. हरभरा पिकास फुलकळी येऊ लागताच ५ टक्के निंबोळी अर्काची पहिली फवारणी करावी. पहिल्या फवारणीनंतर १० ते १५ दिवसांनी एच.ए.एन.पी.व्ही. विषाणूजन्य कीटकनाशक ५०० मि.लि. ५०० लिटर पाण्यातून प्रति हेक्टरला फवारावे. तरीही किडीचा प्रादुर्भाव कमी न झाल्यास, क्लोरअँट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.२५ मि.लि. किंवा फ्ल्युबेन्डॅमाईड (४८ एससी) ०.२५ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true