Get Mystery Box with random crypto!

आजचा कृषी सल्ला आले द्विहंगामी पीक (खोडवा) उत्तम निचऱ्याची जमी | कृषिक अँप Krushik app

आजचा कृषी सल्ला
आले
द्विहंगामी पीक (खोडवा) उत्तम निचऱ्याची जमीन असेल, तर आले १४ ते १६ महिने जमिनीमध्ये ठेवून द्विहंगामी पीक (खोडवा) घेता येते. याचे उत्पादन पहिल्या वर्षीपेक्षा दीडपट ते दुप्पट मिळते. या पिकास कंद सुकू नयेत, म्हणून पाणी देणे गरजे असते. सर्वसाधारण परिस्थितीमध्ये देत असलेल्या पाण्याच्या ५० टक्के पाणी या काळात देणे जरुरीचे असते. सावलीसाठी सेंद्रिय पदार्थ जसे की उसाचे पाचट, आल्याचा पाला यांचे आच्छादन केल्यास ते फायदेशीर ठरते. कलिंगड, काकडी यांसारख्या वेलवर्गीय पिकांची लागवड केल्यास, त्यांचे वेल गादी वाफ्यावर वाढवावेत. त्यामुळे आल्यास या वेलींच्या पानाचे आच्छादन होते आणि कंद गाभाळण्याचे प्रमाण कमी राहते. तसेच जमिनीलगतच्या कंदांना इजा होत नाही. साधारणतः अकराव्या महिन्यानंतर आले पिकाच्या कंदास नवीन अंकुर फुटण्यास सुरवात होते, तोपर्यंत या वेलवर्गीय पिकांची काढणी करावी. खोडवा ठेवल्यानंतर एकदा कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० डब्ल्यूपी) ४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून या द्रावणाची आळवणी करावी. जेणेकरून कंदकुजीचा प्रादुर्भाव होणार नाही. नवीन अंकुर फुटण्यास सुरवात होताच, सेंद्रिय खते वापरून हलकी भरणी करून घ्यावी.
हळद
हळद कायलीत शिजविणे या पद्धतीने हळद शिजविताना साधारणपणे २०० ते १००० किलो क्षमतेच्या लोखंडी १६ गेज पत्र्यापासून बनविलेल्या कायलीमध्ये हळद शिजवली जाते. अशा पद्धतीच्या कायलीचा तळाचा व्यास ४ ते ५ फूट असतो. उंची २.५ ते ३ फूट असते. वरचा भाग तळाकडील भागापेक्षा अर्धा फुटाने रूंद असतो, त्यामुळे हळद बाहेर काढणे सोपे जाते. या पद्धतीमध्ये हळद शिजविताना कायलीमध्ये हळद भरल्यानंतर वरती २.५ ते ३ इंच पाणी राहील इतकीच हळद भरावी. त्यानंतर त्याच्यावर हळदीचा पाला, जास्तीत जास्त गोणपाट वापरून पाण्याची वाफ आत कोंडली जाईल, याची दक्षता घ्यावी. मात्र चिखलमातीने वरून लिंपणे या प्रकाराचा अवलंब करू नये. साधारणपणे अडीच ते तीन तासांमध्ये हळद शिजली जाते. हळद शिजल्यानंतर विशिष्ट वास आजूबाजूच्या वातावरणात पसरतो. शिजलेली हळद अंगठा आणि तर्जनीमध्ये धरून दाबल्यास चिरडली जाते. शिजलेली हळद पाहण्याच्या दुसर्‍या पद्धतीमध्ये काडीपेटीमधील काडी हळकुंडामध्ये घुसवल्यास काडी सहज आरपार जाते. या पद्धतीमध्ये असणार्‍या त्रुटी म्हणजे शिजविलेली हळद कायलीमधून बाहेर काढताना हळकुंडे फुटली जातात. आतील हळद बाहेर काढण्यासाठी किमान अर्धे पाणी बाहेर सोडावे लागते. कायलीच्या तळाशी बसलेला मातीचा थर संपूर्ण पाणी बाहेर काढल्याशिवाय काढता येत नाही, त्यामुळे श्रम वाढतात. काही प्रमाणात हळकुंडांचे नुकसान होते. त्यामुळे मालाची प्रतही खराब होते.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true