Get Mystery Box with random crypto!

उत्तर भारतातील शीत वाऱ्यांमुळे महाराष्ट्र गारठला सौजन्य : अ | कृषिक अँप Krushik app

उत्तर भारतातील शीत वाऱ्यांमुळे महाराष्ट्र गारठला

सौजन्य : अॅग्रोवन
दिनांक : 28-Jan-22

पुणे : उत्तर भारतातील शीत वाऱ्यांमुळे महाराष्ट्र गारठला आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागांत थंडीची लाट कायम आहे. तापमानाचा पारा आणखी घसरल्याने धुळे येथील कृषी महाविद्यालयात हंगामातील नीचांकी २.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अनेक ठिकाणी किमान तापमान १० अंश किंवा त्यापेक्षाही खाली आले आहे. आज (ता. २८) विदर्भात थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
राज्याच्या किमान तापमानात सातत्याने घसरण असून, कमाल तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. गुरुवारीही (ता. २७) राज्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यामध्ये थंडीची लाटही कायम होती. धुळे कृषी महाविद्यालयात पारा २.८ अंशांपर्यंत खाली आला आहे. यापूर्वी २९ डिसेंबर २०१८ रोजी तेथे सर्वांत कमी २.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
वायव्य आणि मध्य भारतातील राज्यामध्ये थंडीची तीव्र लाट कायम असून, गुरुवारी (ता. २७) राजस्थानातील सिकार येथे देशाच्या सपाट भुभागावरील नीचांकी १.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. २८) मध्य प्रदेश, पंजाब, हरियाना, चंडीगड, राजस्थान, छत्तीसगड, बिहार, ओडिशा आणि विदर्भात थंडीची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
गुरुवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २६.५ (९.८), नगर - (९), धुळे २४.५ (२.८), जळगाव २६.४ (८.५), कोल्हापूर २७.९ (१६.३), महाबळेश्‍वर २३ (१०.४), मालेगाव - (८.८), नाशिक २४.४ (१०.४), निफाड २३.१ (४.६), सांगली ३० (१५.३), सातारा २८.२(१४.७), सोलापूर ३०.२ (१४.०), सांताक्रूझ ३०.१(१७.२), अलिबाग - (१६.६), डहाणू २५.७ (१४.५), रत्नागिरी २८.९ (१७.९), औरंगाबाद २६.३ (८.८), नांदेड २७.२ (११.८), उस्मानाबाद - (११.४), परभणी २५.६ (१०), अकोला २६.३ (९.३), अमरावती २४.२ (१०), बुलडाणा २३.८ (८.८), ब्रह्मपुरी २५ (९.८), चंद्रपूर - (११.४), गडचिरोली २५ (११), गोंदिया २३.८ (८.८), नागपूर २४.७ (८.३), वर्धा २५.८ (९.४), यवतमाळ २९.५ (१०)
थंडीच्या लाटेचा इशारा (येलो अलर्ट) : विदर्भ : अकोला, बुलडाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ
१० अंशांपेक्षा कमी किमान तापमान असलेली ठिकाणे : धुळे २.८, निफाड ४.६, नागपूर ८.३, जळगाव ८.५, मालेगाव ८.८, औरंगाबाद ८.८, बुलडाणा ८.८, गोंदिया ८.८, नगर ९, अकोला ९.३, वर्धा ९.४, पुणे ९.८, ब्रह्मपुरी ९.८
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true