Get Mystery Box with random crypto!

उष्णतेची लाट ओसरली सौजन्य : अॅग्रोवन दिनांक : 25-May-22 पुण | कृषिक अँप Krushik app

उष्णतेची लाट ओसरली

सौजन्य : अॅग्रोवन
दिनांक : 25-May-22
पुणे : यंदा मार्च महिन्यापासून उन्हाच्या (Heat) तडाख्याने हैराण झाल्यानंतर मे महिन्यातही राज्यात उष्ण लाट (Heat Wave) कायम होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून उष्ण लाट ओसरली असून, अद्यापही अनेक भागांत उन्हाचा चटका कायम असल्याचे चित्र आहे. आज (ता. २५) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची (Rain) शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असून पश्‍चिमेकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे राज्यात उन्हाचा चटका कमी झाला आहे. मंगळवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित सर्वच ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४२ अंशांच्या खाली घसरला आहे. कोकणात कमाल तापमान ३२ ते ३६ अंश, मध्य महाराष्ट्रात २७ ते ३८ अंश, मराठवाड्यात ३७ ते ३९ अंश आणि विदर्भात ३९ ते ४२ अंशांच्या दरम्यान आहे.
राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून आग्नेय अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात ढगाळ हवामान होत असून, अनेक भागांत वाऱ्याचा वेग वाढला आहे. आज (ता. २५) विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला असून, कोकण, मध्य महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.मंगळवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३४.७, धुळे ४१, जळगाव ४१, कोल्हापूर ३३.१, महाबळेश्‍वर २७.१, नाशिक ३४.७, सांगली ३४.४, सातारा ३३.३, सोलापूर ३८.०, सांताक्रूझ ३४.६, डहाणू ३५.५, रत्नागिरी ३२.८, औरंगाबाद ३७.३, परभणी ३८.६, अकोला ४१, अमरावती ४०.४, बुलडाणा ३९, ब्रह्मपुरी ४२.२, गोंदिया ४०.८, नागपूर ४१.५, वर्धा ४१.२, यवतमाळ ४०.५.
मॉन्सूनच्या प्रगतीस पोषक हवामान
नैॡत्य मो��मी वाऱ्यांची (मॉन्सून) मंदावलेली वाटचाल पुन्हा सुरू होणार आहे. गुरुवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांत मॉन्सूनची प्रगती शक्य आहे. अरबी समुद्रात मालदीव आणि कोमोरीन भागासह, बंगालच्या उपसागराच्या आणखा काही भागांत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en