Get Mystery Box with random crypto!

आजचा कृषी सल्ला खोडवा ऊस ठिबक सिंचनाची सोय असल्यास, ठिबक सिं | कृषिक अँप Krushik app

आजचा कृषी सल्ला
खोडवा ऊस
ठिबक सिंचनाची सोय असल्यास, ठिबक सिंचनाची सोय असल्यास, ठिबक सिंचन संचातून ऊसासाठी पाण्याबरोबर शिफारशीत खत मात्रेच्या ८० टक्के विद्राव्य खते (८०:४०:४० नत्र, स्फुरद, पालाश किलो/ एकर) खोडवा ठेवल्यापासून प्रत्येक आठवड्यातून एकदा याप्रमाणे २६ हप्त्यांत दिल्याने ऊस उत्पादनात २८ टक्क्यांनी वाढ होऊन २० टक्के खतांच्या मात्रेत बचत होते.
खोडवा पिकासाठी ठिबक सिंचनातून देण्यासाठी विद्राव्य खतांचे वेळापत्रक (किलो/ एकर/ हप्ता)
आठवडे - युरिया - १२:६१:०० - एम.ओ.पी.
१ ते ४ आठवडे - ०६ - ०२ - १.५
५ ते ९ आठवडे - १० - ०६ - ०२
१० ते २० आठवडे - ६.५ - ४.५ - ०२
२१ ते २६ आठवडे - ०० - ०० - ०४
सुरु ऊस
उसाचे अधिक उत्पादन, पाण्याचा व खतांचा कार्यक्षम वापर आणि अधिक आर्थिक फायद्यासाठी शिफारशीत खतमात्रेच्या ८० टक्के विद्राव्य खते दर आठवड्यातून एकदा या प्रमाणे २६ हप्त्यांमध्ये ठिबक सिंचनातून द्यावीत.
सुरू ऊस पिकास ठिबक सिंचनातून विद्राव्य खते देण्याचे वेळापत्रक (प्रति आठवडा प्रति एकर)
१ ते ४ आठवडे - युरिया ६.५ किलो, १२:६१:०० १.५ किलो, एम.ओ.पी. १.५ किलो
५ ते ९ आठवडे - युरिया १२.२५ किलो, १२:६१:०० ४.२५ किलो, एम.ओ.पी. २ किलो
१० ते २० आठवडे - युरिया ८ किलो, १२:६१:०० ३ किलो, एम.ओ.पी. २ किलो
२१ ते २६ आठवडे - एम.ओ.पी. ४ किलो
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en