Get Mystery Box with random crypto!

हवामान विभागाचा अंदाज चुकणार? मान्सूनचा खोळंबा; पावसाला विलंब | कृषिक अँप Krushik app

हवामान विभागाचा अंदाज चुकणार? मान्सूनचा खोळंबा; पावसाला विलंब

सौजन्य : सकाळ
दिनांक : 24-May-22
मान्सून देशात दाखल होण्यास आता विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण मान्सून श्रीलंकेच्या वेशीवरच खोळंबला आहे. त्यामुळे २७ मेपर्यंत मान्सून केरळात दाखल होणार, हा हवामान विभागाचा अंदाज हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मान्सून अजूनही श्रीलंकेच्या वेशीवरच असल्याने मान्सून उशीरा भारतात पोहोचणार आहे.
आज सकाळी आणि पहाटे मुंबईच्या काही भागात पावसाच्या काही सरी बरसल्या. पण याला मान्सून म्हणता येणार नाही, तो मान्सूनपूर्व पाऊसच होता. कारण मान्सून गेल्या तीन दिवसांपासून श्रीलंकेच्या किनारपट्टीसह परिसरात अडकला आहे. त्यामुळे मान्सून २७ मे रोजी भारतात दाखल होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज (Weather Updates) चुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आता जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून केरळमध्ये दाखल होईल. त्यानंतर कोकणमार्गे महाराष्ट्र आणि मुंबई परिसरात पोहोचेल. पण तरीही यंदाचा मान्सून सकारात्मक राहणार आहे. ज्या अर्थी मान्सून वेळेच्या आधीच देशात दाखल होणार आहे, त्या अर्थी यंदा पाऊस चांगला राहणार आहे.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en