Get Mystery Box with random crypto!

आजचा कृषी सल्ला भुईमुग भुईमुगाचा पाला उत्तम चारा म्हणून गणला | कृषिक अँप Krushik app

आजचा कृषी सल्ला
भुईमुग
भुईमुगाचा पाला उत्तम चारा म्हणून गणला जातो. भुईमुगाच्या पाल्याची पाचकता जवळजवळ ५३ टक्के इतकी आहे. तर त्यातील क्रूड प्रथिने ८८ टक्के इतकी असतात. १ किलो पूर्ण वाळलेल्या चाऱ्यापासून २३२७ कॅलरी उष्मा मिळते. शेंगा तोडून झालेला पाल्याचे छोटे-छोटे भेले वळले जातात. असा वाळलेला पाला उन्हात वाळवून त्याची चाऱ्यासाठी साठवण केली जाते. भुईमुगाचा पाला पावसात ओला झाल्यास त्यावर बुरशी वाढते. तो जनावरांना खाण्यासाठी अयोग्य होतो. म्हणून काढणीनंतर वाळलेला पाला त्वरित कोरड्या जागी शेडमध्ये हलवावा.
सुर्यफुल
बुंधा, पाने, फुलांच्या भुशाचा उपयोग -
सूर्यफूल झाडापासून मूरघास तयार करता येते. हा मूरघास जनावरे अत्यंत चवीने खातात.
वाळलेली बोंडे व झाडे जनावरे चवीने खातात.
झाडाचा बुंधा, पाने, फुलांच्या भुश्‍श्‍यापासून कंपोस्ट खत तयार करून पिकांना दिले तर नत्र, स्फुरद, पालाश इत्यादी अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. जमिनीचा पोत सुधारतो.
झाडाचा बुंधा, पानांच्या लगद्यापासून कागद तयार करतात.
बुंध्यातील गराचा उपयोग पार्सलचे खोके, शोभेचे छप्पर, बाटलीची बुचे इत्यादी उपयुक्त वस्तू बनविण्यासाठी केला जातो.
फुलांचा भुसा पशू व पक्ष्यांसाठी खाद्य म्हणून वापरतात.
खोड व भुशापासून मिळणाऱ्या पेक्‍टिनमध्ये मिथॉक्‍सीलचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याला फळांपासून मिळणाऱ्या पेक्‍टिनपेक्षा जास्त मागणी असते.
इतर उपयोग -
औषधी वनस्पती म्हणून उपयोग
गराचा उपयोग बेंड, पुळीवर लेप देण्यासाठी करतात.
अंग मॉलिशसाठी सूर्यफूल तेलाचा वापर होतो.
सूर्यफुलामधील रसामुळे उंदरांना विषबाधा होते. त्यामुळे उंदीर नियंत्रणाकरिता याचा वापर होतो.
मधमाशी पालनासाठी उपयुक्त
तेलाचा उपयोग रंग, वॉर्निश, प्लॅस्टिक वस्तू निर्मितीमध्ये होतो.
डिझेलबरोबर योग्य प्रमाणात सूर्यफुलातील अल्कोहोल व फरफ्युरलचे मिश्रण करून इंधन म्हणून उपयुक्तता तपासली जात आहे.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en