Get Mystery Box with random crypto!

*आजचा कृषी सल्ला* *आडसाली ऊस* ऊसाचे अधिक उत्पादन, पाण्याचा व | कृषिक अँप Krushik app

*आजचा कृषी सल्ला*
*आडसाली ऊस*
ऊसाचे अधिक उत्पादन, पाण्याचा व खतांचा कार्यक्षम वापर आणि अधिक आर्थिक फायद्यासाठी शिफारशीत खतमात्रेच्या ८० टक्के विद्राव्य खते दर आठवड्यातून एकदा या प्रमाणे २६ हप्त्यांमध्ये विभागून ठिबक सिंचनातून द्यावीत.
आडसाली ऊस पिकास ठिबक सिंचनातून विद्राव्य खते देण्याचे वेळापत्रक (प्रति आठवडा प्रति एकर)
१ ते ४ आठवडे - युरिया १०.५ किलो, १२:६१:०० २.२५ किलो, एम.ओ.पी. २.२५ किलो
५ ते ९ आठवडे - युरिया १९.५ किलो, १२:६१:०० ६.२५ किलो, एम.ओ.पी. २.७५ किलो
१० ते २० आठवडे - युरिया १२.५ किलो, १२:६१:०० ४.५ किलो, एम.ओ.पी. ३ किलो
२१ ते २६ आठवडे - एम.ओ.पी. ६ किलो
*सुरु ऊस*
कीड नियंत्रण
पायरीला
पाठीमागे चिमट्यासारख्या दोन शेपट्या असणारी पिल्ले तसेच तपकिरी रंगाच्या प्रौढावस्था पानावर दिसतात. या किडीच्या प्रादुर्भावामुळे पाने पिवळी पडतात. अधिक प्रादुर्भावात पानावर काळी बुरशी वाढते. उसाच्या वजनात व साखर उताऱ्यात घट येते.
नियंत्रण
इपिरीनिया मेल्यॅनोल्युका या मित्र किटकाचे एकरी २,००० कोष अथवा २ लाख अंडी सोडावीत.
ऑगस्ट महिन्यानंतर उसाची खालची पाने काढावीत.
पाकोळीची अंडी गोळा करून त्यांचा नाश करावा.
तीन ते पाच पिल्ले किंवा प्रौढ अथवा एक अंडीपुंज प्रति पान दिसून आल्यास, क्लोरपायरीफॉस (२० ईसी) २ मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
पांढरी माशी
निचरा नसलेल्या जमिनी, दलदलीच्या क्षेत्रात प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो. पिल्ले व प्रौढ पानांच्या मागील बाजूने रसशोषण करतात. पाने पिवळसर गुलाबी दिसतात. जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने वाळतात. पिल्ले पानावर मधासारखा चिकट पदार्थ सोडतात. त्यामुळे काळी बुरशी वाढते. प्रकाश संश्‍लेषण क्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो. वाढ खुंटते, साखर उतारा कमी होतो.
नियंत्रण
पाणी साचत असल्यास चर काढून निचरा करावा. पिकाला ताण पडल्यास पाणी द्यावे.
रासायनिक खतांची मात्रा शिफारशीनुसार व योग्यवेळी विभागून द्यावी.
प्रादुर्भावग्रस्त पाने काढून नष्ट करावीत.
व्हर्टिसिलीअम लेकॅनी १ किलो आणि १ लिटर दूध प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून १० ते १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.
जास्त प्रादुर्भाव असल्यास, डायमेथोएट (३० ईसी) २.५ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
*अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.*
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en