Get Mystery Box with random crypto!

कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता सौजन्य : अॅग्राेवन | कृषिक अँप Krushik app

कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता

सौजन्य : अॅग्राेवन
दिनांक : 22-Aug-22
पुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणाली पश्‍चिमेकडे सरकत असून, त्याच्या प्रभावामुळे आज (ता. २२) कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाचा तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे पश्‍चिमेकडील टोक हिमालय पर्वताच्या पायथ्याकडे कायम आहे. तर पूर्व टोक बरेली, कानपूर, तीव्र कमी दाबाचे क्षेत्र, मध्य प्रदेश, दिघा ते आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत कायम आहे. त्यामुळे मध्य भारतात ढगांची दाटी असून, पाऊस सुरू आहे.
घाटमाथ्यावर पावसाची संततधार सुरूच असून, पूर्व विदर्भात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. उर्वरित राज्यात पावसाने उघडीप दिली असून, ऊन सावल्यांच्या खेळात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडल्या. आज (ता. २२) कोकणासह नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
कमी दाब क्षेत्राची तीव्रता ओसरली : वायव्य झारखंड आणि आग्नेय मध्य प्रदेशात असलेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता कमी होत आहे. वायव्येकडे सरकणाऱ्या या प्रणालीचे आज (ता. २२) ठळक कमी दाब क्षेत्रात रूपांतर होणार आहे. आग्नेय पाकिस्तान आणि परिसरावरही कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे.
जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा
रविवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) : कोकण : लांजा ४०, माथेरान, खालापूर, कर्जत, रामेश्‍वर प्रत्येकी ३०
मध्य महाराष्ट्र : लोणावळा, राधानगरी, महाबळेश्‍वर प्रत्येकी ४०
विदर्भ : अर्जुनी मोरगाव ६०, भंडारा, मोहाडी प्रत्येकी ५०, कुरखेडा, सावळी प्रत्येकी ४०, लाखणी, अरमोरी, मोदा प्रत्येकी ३०
घाटमाथा : कोयना ९०, अंबोणे ८०, दावडी, डुंगुरवाडी, ताम्हिणी प्रत्येकी ७०, शिरगाव ६०
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en