Get Mystery Box with random crypto!

कृषिक अँप Krushik app

टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
चैनल का पता: @krushikappkvk
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.05K
चैनल से विवरण

Krushik app

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 57

2021-05-24 15:58:20 अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलीत कृषि विज्ञान केंद्र, बारामती व
प्रकल्प संचालक, आत्मा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फेसबुक लाईव्ह

विषय: मुरघास व अॅझोला निर्मिती तंत्रज्ञान

दिनांक: २५ मे २०२१
वेळ: दु. ४ ते ५

प्रमुख मार्गदर्शक :
डॉ. रतन जाधव
प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ,
कृषि विज्ञान केंद्र, बारामती

*चर्चासत्रात सहभागी होणेसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
https://www.facebook.com/krushikapp
अधिक माहितीसाठी संपर्क
कृषि विज्ञान केंद्र, बारामती
मो. 9420723218
108 views12:58
ओपन / कमेंट
2021-05-24 15:56:23
110 views12:56
ओपन / कमेंट
2021-05-23 08:12:46


*आपले काही प्रश्न असल्यास कृपया कमेंट करा. अथवा* https://api.whatsapp.com/send?phone=917796622387 *ह्या लिंक वर क्लिक करून विचारावेत व्हाटसअप करा.*
182 views05:12
ओपन / कमेंट
2021-05-22 12:35:18 https://www.facebook.com/Krushikapp/videos/224152539168428/
170 views09:35
ओपन / कमेंट
2021-05-21 18:16:02
770 views15:16
ओपन / कमेंट
2021-05-21 16:51:12 आजचा कृषी सल्ला
हळद
प्रवाही पाणी देण्यासाठी सरी-वरंबा पद्धत, तर यांत्रिकीकरण व ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीसाठी गादीवाफ्यावर लागवड कर
सरी-वरंबा पद्धत : ७५-९० सें.मी. अंतरावर सऱ्या पाडून घ्याव्यात. सऱ्या पाडण्यापूर्वी एकरी १२ टन कुजलेले शेणखत, ३०० किलो दाणेदार एसएसपी आणि ७५ किलो एमओपी जमिनीत मिसळून द्यावे. जमिनीच्या उतारानुसार ६-७ सरी-वरंब्याचे एक वाकुरे याप्रमाणे वाकुरी बांधून घ्यावीत. वाकुऱ्याची लांबी ५-६ मीटर ठेवावी. वरंब्याच्या दोन्ही बाजूंनी ३० सें.मी. अंतरावर कंदाची लागवड करावी. कंदावर ३-४ इंच माती येईल अशाप्रकारे कंद लावावेत. एकरी २८-२९,००० कंद लागतात.
गादीवाफा पद्धत : या पद्धतीत ४-५ फूट अंतर ठेवून सऱ्या पाडाव्यात. वरंबे सपाट करून १ फूट उंचीचे आणि ६० सें.मी. सपाट माथा असलेले गादीवाफे बनवावेत. गादीवाफ्याच्या मध्यभागी लॅटरल अंथरून लॅटरलच्या दोन्ही बाजूंना १५ सें.मी. अंतरावर कंद उभे/ आडवे लावावेत. म्हणजे दोन ओळींमधील अंतर ३० सें.मी. राहते. दोन कंदामधील अंतरही ३० सें.मी. ठेवावे. एकरी साधारणतः २२-२३,००० कंद लागतात. तुषार सिंचन पद्धतीचा वापर करण्यासाठी दोन सऱ्यांमधील अंतर ६ फूट ठेवावे. गादीवाफ्याची उंची १ फूट व रुंदी ४ फूट ठेवावी. दोन्ही बाजूंना १५ सें.मी. अंतर ठेवून दोन ओळींमधील अंतर ३० सें.मी. ठेवावे. एका गादीवाफ्यावर कंदांच्या चार ओळी लावाव्यात. दोन कंदांमध्ये ३० सें.मी. अंतर ठेवावे. लागवडीवेळी कंदाची निमुळती बाजू खाली जाणार नाही, याची काळजी घ्यावी. गादीवाफे पूर्ण भिजवूनच लागवड करावी.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
170 views13:51
ओपन / कमेंट
2021-05-21 12:04:13
212 views09:04
ओपन / कमेंट
2021-05-21 12:04:07 स्नेह नमस्कार,

अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्र,बारामती, कृषिक ऍप व इस्त्राईल केमिकल्स लिमिटेड (ICL) यांच्या संयुक्त विद्यमाने

*“द्राक्ष वेली मध्ये सूक्ष्म घड निर्मिती” फेसबुक लाइव्ह Facebook Live* च्या माध्यमातून
*लाईव्ह ऑन*
https://www.facebook.com/krushikapp

*मार्गदर्शक* -
श्री.संजय बिरादार,
वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ,
इस्त्राईल केमिकल्स लिमिटेड (ICL)*
*तारीख* - २२/०५/२०२१
*वार*- शनिवार
*वेळ* - दुपारी ३ ते ४

*नाव नोंदणी पुढे दिलेल्या लिंकवरुन व्हाट्सद्वारे करणे आवश्यक*
https://api.whatsapp.com/send?phone=917796622387

*विनित*
*कृषिक ऍप, कृषी विज्ञान केंद्र, बारामती*

*सदरची लिंक सर्व शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी मित्र यांच्यापर्यंत पोहचवावी ही विनंती*
ICL Fertilizers-India Krushik app
#krushikapp_Facebook_Live
#krushikapp
224 views09:04
ओपन / कमेंट
2021-05-20 16:44:52 आजचा कृषी सल्ला
सोयाबीन
उगवणशक्ती तपासण्याची घरगुती पद्धत
घरच्या सोयाबीनच्या प्रत्येक पोत्यात खोलवर हात घालून मूठभर धान्य बाहेर काढावे. सर्व पोत्यातील काढलेले धान्य एकत्र करून घ्या. गोणपाटाचे ६ चौकोनी तुकडे करून स्वच्छ धुऊन घ्यावेत. एक तुकडा जमिनीवर पसरावा.
पोत्यामधून काढलेल्या धान्यातून सरसकट शंभर दाणे, १.५ ते २ सें.मी. अंतरावर (बोटाचे एक कांड) दहा-दहाच्या रांगेत गोणपाटाच्या एका तुकड्यावर ओळीत ठेवा. अशा प्रकारे शंभर दाण्यांचे तीन नमुने तयार करावेत.
गोणपाटावर चांगले पाणी शिंपडून ओले करावे. बियाण्यावर दुसरा गोणपाटाचा तुकडा अंथरूण पुन्हा चांगले पाणी शिंपडावे. गोणपाटाच्या तुकड्याची बियाण्यासकट गोल गुंडाळी करून थंड ठिकाणी सावलीत ठेवा. त्यावर अधून-मधून पाणी शिंपडून ओले ठेवावे.
सहा ते सात दिवसांनंतर ही गुंडाळी जमिनीवर पसरवून उघडा. चांगले कोंब आलेले दाणे वेगळे करा व मोजा. तिन्ही गुंडाळ्यांची सरासरी काढून शंभर दाण्यापैकी ७० किंवा त्यापेक्षा जास्त दाणे जर चांगले कोंब आलेले असतील, तर आपले बियाणे बाजारातील बियाण्यासारखेच गुणवत्तेचे आहे असे समजावे. शिफारशीप्रमाणे ते आपल्याला पेरणीसाठी वापरता येते. जर उगवण झालेल्या बियाण्याची सरासरी संख्या तुलनेने ७० पेक्षा कमी म्हणजेच ६० पर्यंत असेल, तर बियाण्याचे प्रमाण थोडे वाढवून पेरणी करा. मात्र, साठ टक्क्यांपेक्षा उगवणक्षमता कमी असल्यास ते बियाणे पेरणीसाठी वापरू नका.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
722 views13:44
ओपन / कमेंट
2021-05-20 08:27:14 राज्यात बियाणे उद्योगास वैभव प्राप्त करुन देण्यासाठी बियाणे धोरण तत्काळ तयार करण्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

सौजन्य : महासंवाद
दिनांक : 20-May-21
मुंबई, दि. 19 : राज्यात बियाणे उद्योगास गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी राज्याचे बियाणे धोरण तत्काळ तयार करण्याच्या सूचना कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी कृषी विभागाला दिल्या.
मंत्री श्री. भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बियाणे धोरणाबाबत राज्यस्तरीय बैठक मंत्रालयात झाली. यावेळी कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले, आयुक्त धिरज कुमार, महाबिजचे व्यवस्थापकीय संचालक राहुल रेखावार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रंगा नायक, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख हे उपस्थित होते.
पश्चिम महाराष्ट्रात सोयाबिन पिकाची उत्पादकता जास्त असून महाबिजने येत्या खरीप हंगामात विदर्भ व मराठवाडा याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रात देखील बिजोत्पादन कार्यक्रमाचे आयोजन करावे. त्याकरिता राज्यातील तज्‍ज्ञ व्यक्ती, कृषि विभाग, कृषि विद्यापिठे व महाबिज यांनी समन्वयाने शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी करावी जेणेकरून राज्यात भेसळमुक्त व गुणवत्तापुर्ण बियाणे निर्मिती होईल याबाबत आतापासून नियोजन केले तर येणाऱ्या वर्षभरात सकारात्मक बदल दिसून येईल, असेही कृषीमंत्र्यांनी सांगितले.
कृषीमंत्री श्री.भुसे म्हणाले की, महाराष्ट्र हे बिजोत्पादनासाठी राष्ट्रीय पातळीवर अग्रेसर म्हणून गणले जात होते तथापी अलिकडच्या काळात पिक पेरणीनुसार विशेषत: सोयाबिन, कापूस यासारख्या पिकांचे बियाणे परराज्यातून आणावे लागत आहे. राज्यातील बियाणे उद्योगास गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी व बियाणे उद्योगाकरिता आश्वासक वातावरण निर्मिती करण्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
बियाणे उद्योगात आघाडी मिळवण्यासाठी राज्याची प्रत्येक पिकातील बियाणे गरज नजरेसमोर ठेवून बियाणे साखळी विकसीत करावी. यामध्ये पैदासकार व मुलभूत बिजोत्पादनाचे काटेकोर नियोजन करावे. ज्या कृषि विद्यापीठाने पिकनिहाय वाण विकसीत केला आहे ते बियाणे कृषी विद��यापीठाने मागणी प्रमाणे उपलब्ध होण्यासाठी नियाजन करावे. याबाबत सर्वस्वी जबाबदारी त्या संबधित कृषि विद्यापीठाची राहील, असे कृषीमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
पैदासकार बियाणे हा बिजोत्पादन कार्यक्रमाचा पाया असल्याने त्यावर विशेष लक्ष केंद्रीत करावे. कृषि विद्यापिठाचे प्रक्षेत्र हे पैदासकार बियाणाच्या उत्पादनासाठी प्राधान्याने वापरावे. कृषि विभागाकडील तालुका बिजगुणन केंद्र, फळ रोपवाटीका यांचा देखील महाबिजने पुढाकार घेऊन बिजोत्पादनासाठी वापर करण्याच्या सूचना श्री.भुसे यांनी यावेळी दिल्या. राज्यात सीड हब उभारणीसाठी येणाऱ्या अडचणी, जागेची उपलब्धता, बिजपरिक्षण प्रयोगशाळा उभारणी, सामूहिक प्रक्रिया व सिड पॅकींग केंद्र याबाबतचा कृषीमंत्र्यांनी आढावा घेतला.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
205 views05:27
ओपन / कमेंट