Get Mystery Box with random crypto!

आजचा कृषी सल्ला कापूस पाण्याचा निचरा होणाऱ्या व जलधारणशक्ती उत | कृषिक अँप Krushik app

आजचा कृषी सल्ला
कापूस
पाण्याचा निचरा होणाऱ्या व जलधारणशक्ती उत्तम असणाऱ्या मध्यम ते भारी जमिनीवर लागवड करावी. जमिनीचा सामू ६ ते ८.५ पर्यंत असावा. उथळ/ कमी खोली असणाऱ्या व हलक्या जमिनीवर कपाशीची लागवड करू नये. पाणी धरून ठेवणारी व पाणथळ जमीनही कपाशीला हानिकारक ठरते. कोरडवाहू लागवडीसाठी भारी व काळ्या जमिनीमध्ये दोन-तीन वर्षांनी एकवेळा खोल नांगरणी करावी. नांगरणीनंतर मोगडणी करून घेतल्याने मातीची ढेकळे फुटतात. मोगडणीनंतर दोन-तीन वखराच्या पाळ्या देऊन ३० सें.मी. रुंदीच्या सऱ्या पाडाव्यात. शेवटची वखरणीपूर्वी कोरडवाहू कपाशीसाठी २ टन (४-५ गाड्या) व बागायती लागवडीसाठी ४ टन (८-१० गाड्या) चांगले कुजलेले शेणखत/ कंपोस्ट खत शेतात मिसळून द्यावे. परिणामी मॅग्नेशिअम, झिंक इ. सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढते.
मका
मका पिकासाठी रेतीयुक्त, मध्यम ते भारी, खोल, उत्तम निचऱ्याची, अधिक सेंद्रिय पदार्थ आणि जलधारणक्षमता असणारी जमीन निवडावी. विशेषतः नदीकाठच्या गाळाच्या जमिनीत हे पिक फार चांगले येते. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ दरम्यान असावा. जमिनीची खोल नांगरट (१५ ते २० सें.मी.) करावी. कुळवाच्या २ ते ३ पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवाच्या पाळीबरोबर एकरी ४ ते ५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे. हिरवळीचे खत जमिनीत गाडले असल्यास शेणखताची आवश्यकता भासत नाही.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true