Get Mystery Box with random crypto!

राज्यात पावसाचा अंदाज सौजन्य : अॅग्रोवन दिनांक : 01-Jun-2 | कृषिक अँप Krushik app

राज्यात पावसाचा अंदाज

सौजन्य : अॅग्रोवन
दिनांक : 01-Jun-21
पुणे : जून महिना सुरू झाल्याने राज्यातील बहुतांशी भागात बदल झाले आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यात अंशतः ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह व वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. पुढील तीन ते चार दिवस राज्याच्या दक्षिण भागांत पावसाच्या हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
राज्यातील बहुतांशी भागात पावसासाठी पोषक वातावरण झाले होते. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला असला तरी तापमानात जवळपास चढउतार राहिले होते. मात्र, मागील दोन ते तीन दिवसांत विदर्भासह राज्यातील काही भागांत उन्हाचा कडाक्याचे ऊन पडल्याने उकाडा वाढला होता. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढला होता.
तर शनिवार (ता.२९) हा हॉट दिवस ठरला असून चंद्रपुरात सर्वाधिक ४६.२ अंश सेल्सिअस एवढे कमाल तापमान नोंदविले गेले. त्यानंतर पारा काहीसा कमी झाला आहे.
राज्यात या जिल्ह्यांमध्ये होणार पूर्वमोसमी पाऊस
मंगळवार ः कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा
बुधवार ः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ
गुरुवार ः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ
शुक्रवार ः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ
सोमवारी (ता.३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : मुंबई (सांताक्रुझ) ३३.९, अलिबाग ३४.५, रत्नागिरी ३३.०, डहाणू ३४.१, पुणे ३४.१, जळगाव ३४.०, कोल्हापूर ३४.१, महाबळेश्वर २५.४, नाशिक ३४.४, सांगली ३५.३, सातारा ३४.६, सोलापूर ३८.२, उस्मानाबाद ३४.६, औरंगाबाद ३५.०, परभणी ३५.९, अकोला ४१.०, अमरावती ४०.८, बुलडाणा ३५.०, ब्रम्हपुरी ४३.८, चंद्रपूर ४१.६, गोंदिया ४२.२, नागपूर ४२.३ वर्धा ४१.५
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true