Get Mystery Box with random crypto!

आजचा कृषी सल्ला डाळिंब मृग बहार (बागेची विश्रांती अवस्था/ ताण | कृषिक अँप Krushik app

आजचा कृषी सल्ला
डाळिंब

मृग बहार (बागेची विश्रांती अवस्था/ ताण अवस्थेचा शेवट/ मे महिन्याच्या शेवटी बहार धरणे)
मशागत जर नेहमीपेक्ष्या लवकर मृग बहार घ्यायचे नियोजन असेल तर बाग ताणावर असताना, मे महिन्याच्या शेवटी इथेफोन (३९ एसएल) फवारणी करून पानगळ करून घ्यावी व नंतर हलकी छाटणी करावी. छाटणी करताना पेन्सिल आकाराच्या काड्या शोंडयाकडून १०-१५ सें.मी.पर्यंत छाटाव्यात. काटे, वाळलेल्या फांद्या छाटाव्यात. जमिनीवर पडलेला पालापाचोळा, काड्या, गोळा करून नष्ट करावा.
अन्नद्रव्य व्यवस्थापन
कुजलेले शेणखत २५-३० किलो किंवा शेणखत १५-२० किलो अधिक गांडूळ खत २ किलो अधिक निंबोळी पेंड २ किलो किंवा कुजलेले कोंबडी खत ७.५ किलो अधिक निंबोळी पेंड ७.५ किलो प्रतिझाड याप्रमाणे द्यावे.
प्रत्येक झाडाला जिप्सम २.५ किलो आणि मॅग्नेशिअम सल्फेट ८०० ग्रॅम मुळाजवळ मातीत मिसळा.
रासायनिक खतांमध्ये २०५ ग्रॅम नत्र, ५० ग्रॅम स्फुरद आणि १५२ ग्रॅम पालाशसाठी प्रतिझाड द्यावे. खत दिल्यानंतर लगेच हलके पाणी द्यावे.
जैव फॉर्म्युलेशन जसे अॅझोस्पिरिलम स्पेसीज, अॅ स्परजिलस नायजर, ट्रायकोडर्मा व्हिरीडी आणि पेनिसिलिअम पिनोफायलम हे चांगल्या कुजलेल्या शेणखतासोबत मिसळावे. ६० टक्के ओलावा ठेवून सावलीत १५ दिवस नियमितपणे उलथापालथ करत राहावे. त्यानंतर ते १०-२० ग्रॅम प्रतिझाड द्यावे. अर्बुस्कूलर मायकोरायझा बुरशी १०-१५ ग्रॅम प्रतिझाड द्यावे.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true