Get Mystery Box with random crypto!

आजचा कृषी सल्ला कांदा-लसूण खरीप कांदा रोपवाटिका व्यवस्थापन ख | कृषिक अँप Krushik app

आजचा कृषी सल्ला
कांदा-लसूण
खरीप कांदा रोपवाटिका व्यवस्थापन खरीप हंगामात एक एकर क्षेत्रावर लागवडीसाठी रोपांच्या उपलब्धतेसाठी सुमारे २ गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका तयार करावी. त्यासाठी २-२.८ किलो बियाणे लागते. रोपवाटिकेसाठी जमीन तयार करताना प्रथम खोल नांगरट करावी. त्यामुळे कीटकांचे कोष व तणांच्या बिया सूर्यप्रकाशात उघड्या पडून नष्ट होतात. वाफे तयार करण्यापूर्वी पूर्वीच्या पिकाची धसकटे, काडीकचरा, तण आणि दगड काढून टाकावे. दोन क्विंटल चांगले कुजलेले शेणखत घालावे. मर रोगाचे नियंत्रण करून निरोगी रोपे मिळवण्यासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी ५०० ग्रॅम प्रति २ क्विंटल कुजलेल्या शेणखतात मिसळून वापर करावा. गादीवाफे १० ते १५ सें.मी. उंच, १ मीटर रुंद आणि सोयीनुसार लांब तयार करावेत. तणांच्या बंदोबस्तासाठी पेंडीमिथॅलीन २ मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारावे. मातीतून पसरणाऱ्या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी पेरणीपूर्वी कार्बेन्डाझिम २ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. पेरणीपूर्वी नत्र १.६ किलो, स्फुरद ४०० किलो, पालाश ४०० ग्रॅम प्रति २०० वर्ग मीटर क्षेत्र या प्रमाणात खतमात्रा द्यावी. बियाण्याची लागवड ओळींमध्ये ५० ते ७५ मि.मी. अंतर ठेवून करावी. पेरणीनंतर चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खताने बियाणे झाकावे. त्यानंतर थोडे पाणी द्यावे. सिंचनाकरिता ठिबक अथवा तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करणे फायद्याचे ठरते.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true