Get Mystery Box with random crypto!

कृषिक अँप Krushik app

टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
चैनल का पता: @krushikappkvk
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.05K
चैनल से विवरण

Krushik app

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 61

2021-05-10 17:04:24 आजचा कृषी सल्ला
भुईमुग

पाणी व्यवस्थापन भुईमूग झाडाच्या तळाचा पृष्ठभाग सतत वाफसा स्थितीप्रमाणे ओलसर ठेवणे आवश्यक असते. यामुळे झाडाची वाढ सतत चांगली होते, फुलांचे प्रमाण वाढते. फुल कळीतून सुटलेल्या आऱ्या जमिनीमध्ये सुलभ व जलद घुसतात. शेंगांचे पोषण चांगले होऊन दर्जेदार उत्पन्न मिळते. उन्हाळी भुईमुगासाठी ७० ते ८० सें.मी. पाणी लागते. उन्हाळी हंगामात जमिनीच्या मगदुरानुसार ८ ते १० दिवसांच्या अंतराने १२ ते १४ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. फांद्या फुटण्याची अवस्था, आऱ्या सुटण्याची अवस्था, शेंगा पोसण्याच्या काल���वधीत पाण्याचा ताण पडू देऊ नये. भुईमुगाची लागवड रुंद वाफा सरी (इक्रीसॅट) पद्धतीने केली असता, पिकाला पाण्याचा ताण बसत नाही. अतिरिक्त पाण्याचा सरीतून निचरा करता येतो. तुषार सिंचन पद्धतीने पाणी देणे सोयीस्कर होते. या पद्धतीत पाटानेदेखील पाणी देता येते. वेगळी रानबांधणी करावी लागत नाही. तुषार सिंचन पद्धत व प्लॅस्टिक आच्छादन तंत्र भुईमुगासाठी अत्यंत उपयुक्त आहे. तुषार सिंचनामुळे पाण्याची बचत होऊन पिकाभोवती सूक्ष्म वातावरण निर्मिती होते, ज्यामुळे पिकाची वाढ जोमाने होते. तसेच तुषार सिंचनाने समान पद्धतीने पाणी देता येते. प्लॅस्टिक आच्छादन तंत्र वापरल्यास ४० ते ५० टक्के पाण्याची बचत होते.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
72 views14:04
ओपन / कमेंट
2021-05-10 09:15:17 चालू वर्षातही कृषी क्षेत्राची वाढ राहणार कायम, खरिपासाठी खतांची मागणी वाढण्याची शक्यता

सौजन्य : लोकमत
दिनांक : 10-May-21
नवी दिल्ली : कोरोना साथीतही भारताच्या कृषी क्षेत्राचा लक्षणीय वृद्धीदर २०२१-२२ मध्ये कायम राहणार आहे. तथापि, सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) वृद्धीला सावरण्यासाठी तो पुरेसा नसेल, असे विश्लेषकांनी म्हटले आहे.
भारतीय हवामान खात्याने १६ एप्रिल रोजी जारी केलेल्या अंदाजानुसार यंदा जून ते सप्टेंबर या काळात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. सरासरी ९८ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मागील दोन दशकांच्या इतिहासात सलग तीन वर्षे मान्सून सामान्य राहाण्याची घटना फक्त दोन वेळा घडली आहे. ९४ ते १०६ टक्के मान्सून सामान्य गणला जातो.
२०२० मध्ये कोविड-१९ साथीमुळे कठोर लॉकडाऊन लावण्यात आले होते. तरीही, कृषीक्षेत्राने चांगली कामगिरी केली. जून २०२० च्या तिमाहीत इतर क्षेत्रे २४.४ टक्क्यांनी घसरलेली असताना कृषीक्षेत्र ३.४ टक्क्यांनी वाढले होते.
कृषी व्यवसाय संस्था कॉमट्रेडचे संचालक अभिषेक अग्रवाल यांनी सांगितले की, कृषीक्षेत्राची कामगिरी चांगली राहील, याचे संकेत सर्व घटकांद्वारे मिळत आहेत. कृषी मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, यंदा खरीप हंगामात खतांची मागणी १० टक्क्यांनी वाढून ३२ दशलक्ष टनांवरून ३५ दशलक्ष टनांवर जाईल.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
176 views06:15
ओपन / कमेंट
2021-05-10 07:13:32 * एक लाख हेक्टरवर फळबागांचे उद्दिष्ट*

सौजन्य : अॅग्रोवन
दिनांक : 10-May-21
कोविड १९ च्या साथीची स्थिती राज्यभर असली तरी फलोत्पादन अभियानावर परिणाम होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यंदा एक लाख हेक्टरवर नव्या बागा उभारण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे, अशी माहिती कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.
कोविड स्थितीला गेल्या दोन वर्षांपासून कृषी खात्याचे कर्मचारी सामोरे जात आहेत. गेल्या हंगामात मार्चपासून साथीचा फैलाव व लॉकडाउनचे संकट उभे राहिले. या स्थितीत देखील ३७ हजार ५०० हेक्टरपर्यंत राज्यात नवी लागवड झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना १२१ कोटी ६४ लाख रुपये अनुदान वाटण्यात आले. यंदा लागवडदेखील मोठी आणि अनुदानवाटप देखील गेल्या हंगामाच्या तुलनेत जादा वाटप होण्यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.
राज्यात यंदा जिल्ह्यानिहाय होणाऱ्या नव्या फळबाग लागवडीचे नियोजन असे (आकडे हेक्टरमध्ये) : ठाणे १६२०, पालघर २७००, रायगड ४१४०, रत्नागिरी ५०४०, सिंधुदुर्ग ५०४०, नाशिक ५०४०, धुळे १९२०, नंदूरबार २२८०, जळगाव २१७०, नगर ५०७०, पुणे ४४४०, सोलापूर ५०४०, सातारा ३८००, सांगली २८१०, कोल्हापूर २९५०, औरंगाबाद ३५८०, जालना २५२०, बीड ३०६०, लातूर २६००, उस्मानाबाद २४२०, नांदेड ३३८०, परभणी २६४०, हिंगोली १३९०, बुलडाणा ३२३०, अकोला २०८०, वाशीम १७२०, अमरावती ४०८०, यवतमाळ ३६१०, वर्धा २०४०, नागपूर २६४०, भंडारा १४४०, गोंदिया १२३०, चंद्रपूर २२४०, गडचिरोली १६००
फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती करणे आणि त्यांच्यापर्यंत योजनेची वैशिष्ट्ये पोहोचविण्याची जबाबदारी कृषी सहायकांवर देण्यात आली आहे. कोकण विभागातील ११२८ कृषी सहायकांना प्रत्येकी १५ हेक्टरपर्यंत नवी लागवड होण्यासाठी उद्दिष्ट देण्यात आले आहे. राज्याच्या इतर भागांतील ८३०२ सहायकांना प्रत्येकी १० हेक्टरवर लागवड करण्याबाबत कामे करावी लागतील, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
राज्यातील फळबाग लागवड (हेक्टर) आणि अनुदानावरील खर्च (कोटींत)
वर्ष लागवड खर्च
२०१८-१९ १२१८३ ८०
२०१९-२० १७३११ ८३
२०२०-२१ ३७५०० १२१.६४
*महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.*
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
187 views04:13
ओपन / कमेंट
2021-05-09 17:54:03
167 views14:54
ओपन / कमेंट
2021-05-09 17:50:55 आजचा कृषी सल्ला
शेळी पालन :-

शेळ्यांना पिण्याचे पाणी २४ तास उपलब्ध करून द्यावे. पाणी स्वच्छ, थंड व पिण्यायोग्य असावे. शेळ्यांना रात्रीपेक्षा दिवसा चारपट अधिक पाणी लागते; त्यामुळे स्वच्छ भांड्यात किंवा हौदात पाणी उपलब्ध करून द्यावे. कडक उन्हात शेळ्यांच्या मानेवर, पाठीवर व पायावर पाणी शिंपडावे. पाण्याचे हौद किंवा बकेट असतील तर त्यांची जागा व संख्या वाढवावी. पाण्याचे हौद स्वच्छ व धुतलेले असावेत. पिण्याच्या पाण्याचे हौद, चाऱ्याच्या गव्हाणीला महिन्यातून एकवेळा चुना लावावा. पाण्यात पोटॅशियम परमॅग्नेट (०.०१ टक्के) टाकून निर्जंतूकरण करून घ्यावे
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
172 views14:50
ओपन / कमेंट
2021-05-08 17:39:23 आजचा कृषी सल्ला
पशु संवर्धन :-

जनावरांना सुका चारा खाल्यावर, दूध दिल्यावर आणि तहान लागेल तेव्हा पाण्याची गरज असते. सर्वसाधारणपणे पशुपालक दोन किंवा तीनवेळा जनावरांना पाणी पाजतात. त्यामुळे जनावराला तहान लागेल तेव्हा पाणी उपलब्ध होत नाही. तसेच अनेकवेळा जनावरे गरज नसताना सुद्धा सवय म्हणून मालकाने पाणी ठेवल्यावर अधिक पाणी पितात. या दोन्ही गोष्टींचा परिणाम चाऱ्याच्या पचनावर होतो, त्यामुळे दूध उत्पादन मोठ्या प्रमाणावर घट येते. यावर उपाय म्हणजे जनावराला तहान लागेल तेव्हा स्वच्छ व थंड पाणी पिण्यास उपलब्ध असावे. मुक्त संचार गोठा पद्धतीत जनावरे मुक्त असल्याने तहान लागल्यावर पाणी पिवू शकतात. याचा फायदा एक ते दीड लिटर प्रति जनावर दूध उत्पादन वाढीवर झालेला पहावयास मिळतो. ज्यांच्याकडे मुक्त संचार गोठा नाही ते पशुपालक बादलीला फ्लोट वॉल्व्ह बसवून कमी खर्चात, बांधलेल्या जनावरांनासुद्धा २४ तास पाणी उपलब्ध करून देऊ शकतात किंवा सकाळी व संध्याकाळी चारा खाऊन झाल्यावर गव्हाणी स्वच्छ करून त्यात पाणी भरून ठेवून सुद्धा जनावरांना तहान लागेल तेव्हा पाणी पिण्यास उपलब्ध करून देता येईल.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
137 views14:39
ओपन / कमेंट
2021-05-08 08:34:33 *खरीप हंगामात बियाणे, खते, किटकनाशके यांची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी – उपमुख्यमंत्री अजित पवार*

सौजन्य : महासंवाद
दिनांक : 08-May-21
पुणे, दि.7 : खरीप हंगामामध्ये बी बियाणे, खते, किटकनाशके यांची कमतरता भासणार नाही, याची दक्षता घ्यावी, शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध करुन द्यावे, एकही पात्र शेतकरी पिक कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज खरीप हंगामासाठी लागणारे बी बियाणे, खते, किटकनाशकांची उपलब्धता तसेच पीक कर्ज वाटपाबाबत आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार अशोक पवार, आमदार अतुल बेनके, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.शितलकुमार मुकणे, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक आनंद बेडेकर, महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार, चंद्रशेखर पाटील आदींसह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, पुणे जिल्ह्यात 2 लाख 19 हजार 700 हेक्टर क्षेत्राचे खरीप हंगामासाठी नियोजन करण्यात आले आहे यामध्ये, भात, ज्वारी, बाजरी, भुईमुग, मका, सोयाबीन यांचा समावेश आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे बियाणे, खते, कृषी निविष्टा यांची कमतरता भासणार नाही, तसेच कृषी विभागाने बियाणे उपलब्धतेबाबत व बियाणांच्या गुणवत्तेबाबत अत्यंत काटेकोरपणे नियोजन करावे. तसेच खत���ंच्या व बियाणांच्या संदर्भात कोणत्याही शेतकऱ्याची तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
ऊस पाचट अभियानाची अंमलबजावणी, भात पिकांमध्ये युरिया ब्रिकेटचा वापर, हुमणी नियंत्रण, यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड, आदि नाविण्यपूर्ण उपक्रमांना गती द्यावी असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जास्तीत जास्त क्षेत्रात फळबाग लागवड करावी, आंबा लागवडीसाठी मागणीप्रमाणे शेतकऱ्यांना कलमे उपलब्ध करून द्यावीत, तसेच बाजारपेठेत मागणी असलेल्या पिकांच्या उत्पादन आराखड्याची अंमलबजावणी तत्परतेने करावी, असेही त्यांनी सांगितले.
*महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.*
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी पुणे जिल्हा खरीप हंगाम 2021 च्या नियोजनाबाबत माहिती दिली.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे म्हणाले, दोन लाख 19 हजार 700 हेक्टर क्षेत्रावर खरिप हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. या क्षेत्रासाठी 26 हजार क्विंटल बियाण्यांची गरज आहे. त्यापैकी आजपर्यंत 4 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. आवश्यकतेप्रमाणे पुरवठा सुरूच आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाण्याबाबत घरच्या बियाण्यांची उगवण क्षमता तपासून वापर करावा. खतांमध्ये एक लाख 85 हजार मेट्रिक टनाची मंजूर असून मागील हंगामातील 90 हजार मेट्रिक टन साठा शिल्लक आहे. चालू वर्षी 25 हजार मेट्रिक टन खतांचा पुरवठा झाला असून एकूण एक लाख 15 हजार मेट्रिक टन खतांची उपलब्ध्ता आहे. तथापी शेतकऱ्यांनी माती परिक्षणानुसार दिलेल्या शिफारसीप्रमाणे खताचा वापर करावा. खरिपाचा गावनिहाय आराखडा तयार करण्याचे काम गतीने सुरू आहे.
खत व मागणी पुरवठा, कृषी निविष्टा विक्रेत्यांची संख्या खरीप हंगाम क्षेत्र, कृषी निविष्टा व गुण नियंत्रण, पिक कर्ज वाटप, सिंचन नियोजन, शेती पंपाना विज पुरवठा, टंचाई नियोजन, आपत्ती व्यवस्थापन, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, कृषी विस्तार कार्यक्रम, क्रॉपसॅप प्रकल्प, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, आदींसह कृषी विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांबाबत सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली. यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
२ लाख १९ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर खरिपाचे नियोजन
आज अखेर ४ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध, आवश्यकतेप्रमाणे पुरवठा सुरु
१ लाख १५ हजार मॅट्रिक टन खताची उपलब्धता
खरिपाचा गावनिहाय आराखडा तयार करण्याचे काम गतीने सुरु
227 views05:34
ओपन / कमेंट
2021-05-08 08:04:24 कृषी शिक्षणाच्या नवीन धोरण निश्चितीसाठी समिती

सौजन्य : सकाळ
दिनांक : 08-May-21
राहुरी विद्यापीठ : राज्यातील कृषी प्रवेश प्रक्रिया व कृषी शिक्षणाचे नवीन धोरण निश्चित करण्यासाठी उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील कृषी प्रवेश प्रक्रिया व आगामी कृषी शिक्षण धोरणासंदर्भात नुकतीच बैठक झाली.
या बैठकीमध्ये कृषी शिक्षणाचे धोरण निश्चित करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. ��ुभाष पुरी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील विविध पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी व आचार्य पदवी या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात व कृषी शिक्षणाचे धोरण निश्चित करण्यासाठी शासनास अहवाल सादर केला होता.
या समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष पुरी समवेत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शंकरराव मगर, माजी अधिष्ठाता (अकोला) डॉ. दामोदर साळे, अधिष्ठाता (दापोली) डॉ. सतीश नारखेडे यांचा या समितीमध्ये समावेश आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे हे सदस्य सचिवपदी असणार आहेत.
चारही विद्यापीठाचे मनुष्यबळ वापरून तसेच महसुली उत्पन्नातून समसमान खर्च विभागून या समितीला येत्या दोन महिन्यांमध्ये कृषी शिक्षण व कृषी प्रवेश प्रक्रियेबद्दल अहवाल शासनास सादर करावयाचा आहे.
राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये असलेली रिक्त पदे, प्राध्यापकांची कमी संख्या, कंत्राटी प्राध्यापक भरती या अनुषंगाने विद्यापीठांची कामगिरी सुमार दर्जाची बनली आहे. राज्यातील खाजगी कृषी महाविद्यालयांमध्ये देखील विद्यार्थ्यांना भारतीय कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या निर्देशानुसार शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र सुधारणा करणे गरजेचे आहे. या ठिकाणी अनेक सोयीसुविधांचा अभाव दिसून येत आहे, कृषी विद्यापीठाच्या यंत्रणेवर या खाजगी कृषी महाविद्यालयांचे ओझे डोईजड झालेले आहे. या अनुषंगाने खाजगी कृषी महाविद्यालय त्यांचे प्रवेश प्रक्रिया तसेच कृषी शिक्षणाचे धोरण नवीन खाण्यासाठी शासनाचे पाऊल स्वागतार्ह आहे. डॉ. सुभाष पुरी यांच्या नेतृत्वाखाली ही समिती गठीत झाल्यामुळे कृषी विद्यार्थ्यांना न्याय मिळेल ही आशा आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
210 views05:04
ओपन / कमेंट
2021-05-07 16:58:33 आजचा कृषी सल्ला
हळद
लागवड पद्धती
सरी-वरंबा पद्धत : ७५ ते ९० सेंमी अंतरावर सऱ्या पाडून घ्याव्यात. जमिनीच्या उतारानुसार ६ ते ७ सरी-वरंब्याचे एक वाकुरे याप्रमाणे वाकुरी बांधून घ्यावीत. वाकुऱ्याची लांबी ५ ते ६ मीटर ठेवावी. वरंब्याच्या दोन्ही बाजूंनी ३० सेंमी अंतरावर कंदाची लागवड करावी. कंदावर ३ ते ४ इंच माती येईल, या पद्धतीने कंद लावावेत. एकरी २८ ते २९,००० कंद लागतात.
रुंद वरंबा/ गादीवाफा पद्धत : यांत्रिकीकरण व ठिबक किंवा तुषार सिंचनासाठी ही लागवड पद्धत उपयुक्त ठरते. या पद्धतीद्वारे विद्राव्य खते देता येतात व उत्पादनात वाढ मिळते. या पद्धतीत ४ ते ५ फूट अंतर ठेवून सऱ्या पाडाव्यात. वरंबे सपाट करून १ फूट उंचीचे आणि ६० सेंमी सपाट माथा असलेले गादीवाफे बनवावेत. जास्त पावसाच्या प्रदेशात गादीवाफ्याची उंची १.५ फूट ठेवावी. गादीवाफ्याच्या मध्यभागी लॅटरल अंथरून, दोन्ही बाजूंना १५ सेंमी अंतरावर कंद उभे किंवा आडवे लावावेत. म्हणजे दोन ओळींमधील अंतर ३० सेंमी राहते. दोन कंदामधील अंतरही ३० सेंमी ठेवावे. एकरी साधारणतः २२ ते २३,००० कंद लागतात. तुषार सिंचन पद्धतीचा वापर करण्यासाठी दोन सऱ्यांमधील अंतर ६ फूट ठेवावे. गादी वाफ्याची उंची १ फूट व रुंदी ४ फूट ठेवावी. दोन्ही बाजूंना १५ सेंमी अंतर ठेवून दोन ओळींमधील व दोन कंदांमध्ये अंतर ३० सेंमी अंतर ठेवावे. एका गादीवाफ्यावर कंदांच्या चार ओळी लावाव्यात.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
263 views13:58
ओपन / कमेंट
2021-05-07 07:14:21 यंदा मान्सून वेळेवर लावणार हजेरी, १ जूनला केरळमध्ये होणार दाखल

सौजन्य : महाराष्ट्र टाइम्स
दिनांक : 07-May-21
मुंबई : मे महिन्यात एकीकडे कोरोनामुळे चिंतेत असताना दुसरीकडे उन्हाचा तडाखा आणि अवकाळी पावसामुळे नागरिक त्रस्त आहेत. पण या सगळ्यात बळीराजासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. इतकंच नाहीतर चार महिन्यांत म्हणजेच जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मान्सून विभागाच्या म्हणण्यानुसार, 10 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल तर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र मान्सून हजेरी लावेल. यंदा नैऋत्य मॉन्सून सामान्यच्या 98 टक्के राहील, असा अंदाज आहे तर 15 मे रोजी भारतीय हवामान विभाग पावसाचा पुढचा अंदाज सांगणार आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : पावसाळ्याआधी शेतीची अनेक काम सुरू झाली आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी धान्याची पेरणी करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा वेळेवर दाखल होणार मान्सून हा शेतकऱ्यांसाठीदेखील लाभदायक असणार आहे. भारतातील सुमारे 200 दशलक्ष शेतकरी धान्य, ऊस, मका, कापूस आणि सोयाबीन यासा���ख्या अनेक पिके पेरण्यासाठी मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा करतात.
यामागील सर्वात मोठं कारण म्हणजे देशातील जवळपास ५० टक्के शेतीयोग्य जमिनीत सिंचनाची सुविधा नाही. यामुळे, कृषी उत्पादन भारताच्या अर्थव्यवस्थेच्या फक्त १४ टक्के आहे. खरंतर, या क्षेत्रात देशातील 65 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या आहेत. भारताची लोकसंख्या सुमारे १३० कोटी आहे, म्हणजेच ५० टक्के लोकांना शेती व शेतकर्‍यांमध्ये रोजगार मिळाला आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
155 views04:14
ओपन / कमेंट