Get Mystery Box with random crypto!

आजचा कृषी सल्ला टोमॅटो पिनवर्म (टुटा अबसोलुटा) उन्हाळी हंगामा | कृषिक अँप Krushik app

आजचा कृषी सल्ला
टोमॅटो
पिनवर्म (टुटा अबसोलुटा) उन्हाळी हंगामात या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. या किडीमुळे टोमॅटो पिकाचे ४०-१०० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. या किडीचा प्रादुर्भाव टोमॅटो पिकाच्या पाने, फळे आणि खोडावर आढळून येतो. किडीची अळी प्रथम पानांच्या दोन्ही पापुद्रांमधील हरितद्रव्य खाते. पानांवर वेडेवाकडे, पोकळ पांढरट पापुद्रे तयार होतात. पाने फाटतात, वाळतात व गळून पडतात. नंतर अळी कोवळे शेंडे, खोड व फळे पोखरून खायला सुरवात करते. हिरव्या आणि पिकलेल्या फळांच्या सालीमध्ये अळी छिद्र करून खाते. झाडाची वाढ खुंटल्याने उत्पादनात घट होते.
एकात्मिक व्यवस्थापन
पुनर्लागवडीपूर्वी रोपांची मुळे इमिडाक्लोचप्रिड ०.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी या द्रावणात १० मिनिटे बुडवावीत.
पानांवर किडीचा प्रादुर्भाव दिसताच, ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
प्रादुर्भावग्रस्त पाने, फळे किडीच्या अवस्थांसह गोळा करून नष्ट करावीत.
शेतात एकरी दोन कामगंध सापळे लावावेत.
काळ्या रंगाच्या चिकट सापळ्यांचा वापर करावा.
शेतात परोपजीवी मित्र किटकांचे (ट्रायकोग्रामा अॅची, नेसिडोकोरस, नेबीस, मॅक्रोलोफस, नेक्रीमस) संवर्धन करावे.
बॅसिलस/मेटारायझीअम/बिव्हेरिया या जैविक कीडनाशकांची २ ग्रॅम प्रतिलिटरप्रमाणे फवारणी करावी.
किडीची कोषावस्था जमिनीवर आणि मल्चिंग पेपरवर आढळून येते. यासाठी जमिनीवर, मल्चिंग पेपरवर मेटारायझीअमची फवारणी करावी.
कोषावस्थेत जाणाऱ्या अळ्यांचे प्रमाण जास्त आढळल्यास, झाडाच्या बुंध्याजवळ रिंग/स्पॉट पद्धतीने फिप्रोनिल १ मि.लि. किंवा क्लोडरपायरीफॉस २ मि.लि. प्रतिलिटरप्रमाणे आळवणी करावी.
आवश्यकतेनुसार रासायनिक कीटकनाशक क्लो.रअँट्रॅनिलीप्रोल ०.३ मि.लि. किंवा इंडोक्झाकार्ब ०.७५ मि.लि. किंवा स्पिनोसॅड ०.३ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true