Get Mystery Box with random crypto!

आजचा कृषी सल्ला डाळिंब कोळी या किडीचा प्रादुर्भाव उष्ण आणि कोर | कृषिक अँप Krushik app

आजचा कृषी सल्ला
डाळिंब
कोळी या किडीचा प्रादुर्भाव उष्ण आणि कोरड्या हवामानात जास्त प्रमाणात होतो. कोळीच्या लाल आणि पिवळ्या रंगाच्या दोन प्रजाती डाळिंबावर निदर्शनास येतात. या किडीची पिल्ले आणि प्रौढ पानांच्या खालच्या भागावर राहून पानांतील रस शोषून घेतात. परिणामी, पानांच्या वरील बाजूचा रंग चंदेरी पांढरा दिसू लागतो. कालांतराने पूर्ण पाने विटकरी रंगाची होऊन वाळू लागतात आणि नंतर गळून पडतात. फळांवर देखील प्रादुर्भाव होऊन त्यांचा दर्जा खालावतो. कोळी किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, नियंत्रणासाठी सल्फर (८० डब्ल्यूडीजी) २ ग्रॅम किंवा डायकोफॉल (१८.५ इसी) २ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. ताण दिलेल्या किंवा विश्रांतीच्या अवस्थ्येमध्ये बागेकडे दुर्लक्ष करू नये. या काळात झाडे एकदम सुकणार नाहीत याची काळजी घ्यावी व झाडांना जगण्याइतपत सिंचन देत राहावे.
केळी
सिंचनाच्या पाण्यातून खत व्यवस्थापन अधिक उत्पादनासाठी व खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्रति झाड १५० ग्रॅम नत्र आणि १५० ग्रॅम पालाश व ६० ग्रॅम स्फुरद ठिबक सिंचनातून द्यावे.
ठिबक सिंचनातून खत व्यवस्थापन (खतांची मात्रा किलोमध्ये प्रति हजार झाडांसाठी प्रति आठवडा) खतमात्रा देण्याची वेळ युरिया १२:६१:०० एम.ओ.पी. १ ते १६ आठवडे ४.५ ६.५ ३ १७ ते २८ आठवडे १३.५ ०० ८.५ २९ ते ४० आठवडे ५.५ ०० ७ ४१ ते ४४ आठवडे ०० ०० ५
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true