Get Mystery Box with random crypto!

विदर्भात पूर्वमोसमीचा जोर राहणार @krushikappkvk सौजन्य : अॅग | कृषिक अँप Krushik app

विदर्भात पूर्वमोसमीचा जोर राहणार
@krushikappkvk
सौजन्य : अॅग्रोवन
दिनांक : 15-Apr-21
पुणे : राज्यातील अनेक भागांत पूर्वमोसमी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आजपासून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पूर्वमोसमी पावसाचा जोर कमी होणार आहे. मात्र काही अंशी ढगाळ वातावरण राहणार आहे. विदर्भातील बहुतांशी भागात सोमवारपर्यंत (ता. १९) मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.
गेल्या आठवड्यापासून हिमालय, पश्‍चिम बंगाल आणि सिक्किम ते दक्षिण छत्तीसगड व झारखंड आणि ओडिशाचा परिसर या दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर आहे. पुढील काही दिवस ही स्थिती कायम राहील. दक्षिण केरळची किनारपट्टी ते दक्षिण कोकण व कर्नाटकाची किनारपट्टी या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. मात्र या क्षेत्राचा प्रभाव कमी होऊ लागला आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागांत वातावरण काही प्रमाणात कोरडे राहणार आहे. उत्तर कर्नाटक व परिसर आणि कोमोरीन परिसर व मध्य प्रदेशच्या वायव्य भागात चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे विदर्भाच्या दिशेने खेचले जाण्याची शक्यता असल्याने विदर्भात तीन ते चार दिवस ढगाळ वातावरण राहील.
राज्यात आठवडाभर ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात चढउतार झाले आहे. काही ठिकाणी कमाल तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. त्यामुळे कमाल व किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. बुधवारी (ता. १४) सकाळी चोवीस तसांत विदर्भातील अकोला येथे सर्वाधिक ४२.१ अंश सेल्सिअस तापमान, तर महाबळेश्‍वर येथे १५.४ सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
येथे अवकाळी ���ावसाची शक्यता :
गुरुवार : परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, बुलडाणा, वर्धा, वाशीम, यवतमाळ
शुक्रवार : अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, गडचिरोली, वर्धा, वाशीम, यवतमाळ
शनिवार : अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, गडचिरोली, वर्धा, वाशीम, यवतमाळ
रविवार : अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, गडचिरोली, वर्धा, वाशीम, यवतमाळ
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true