Get Mystery Box with random crypto!

आजचा कृषी सल्ला भुईमुग भुईमूग पेरणीवेळी व आऱ्या सुटताना प्रत् | कृषिक अँप Krushik app

आजचा कृषी सल्ला
भुईमुग
भुईमूग पेरणीवेळी व आऱ्या सुटताना प्रत्येकी ८० किलो जिप्सम हे सल्फर व कॅल्शिअमची उपलब्धता करण्यासाठी जमिनीतून द्यावे. जेणेकरून शेंगा लागण्याचे प्रमाण वाढते व एकूणच उत्पादन वाढते. भुईमूग पिकामध्ये प्रामुख्याने लोह, जस्त आणि बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येते. लोहाची कमतरता दिसून आल्यास, फेरस सल्फेटची १ किलो प्रति एकरी या प्रमाणात फवारणी करावी. जस्ताची कमतरता दिसून आल्यास, झिंक सल्फेट १ किलो प्रति एकरी फवारणीद्वारे द्यावे. बोरॉनची कमतरता असल्यास, बोरॉन ०.१ टक्के (१ ग्रॅम प्रति लिटर पाणी) द्रावणाची फवारणी करावी.
सुर्यफुल
पूरक परागीकरण हे पीक पर परागसिंचित आहे. परागकण जड असल्यामुळे वाऱ्यापासून परपरागीकरण अतिशय कमी प्रमाणात होते. मधमाश्यां द्वारे सर्वात जास्त परागीकरण होते. परंतु जर नैसर्गिक मधमाश्यात कमी आढळल्यास कृत्रिमरीत्या परागीकरण घडवून आणल्यास उत्पादनात २० ते ४० टक्के वाढ होते.
मधमाश्यार परागीकरण - मधमाश्यान मध गोळा करीत असताना त्यांचे पाय, अंगाला परागकण चिकटून एका फुलावरून दुसऱ्या फुलावर टाकले जाते. त्यामुळे परागीकरणास मदत होऊन बीजधारणा प्रमाण वाढते. प्रतिहेक्टारी किमान पाच मधमाश्यांरच्या पेट्या पुरेशा ठरतात.
हस्त परागीकरण - ज्या ठिकाणी मधमाश्यां चे प्रमाण कमी असते, तसेच मधमाश्याा पाळणे शक्यट नसते, अशा ठिकाणी हस्त परागीकरण करावे. हाताला तलम व मऊ कापड गुंडाळून फुलांवरून हलकासा हात फिरवावा. यामुळे एका फुलावरील परागकण दुसऱ्या फुलावर पडून परागीकरण होते. पीक फुलोऱ्यात असताना सकाळी ८ ते ११ या वेळेत एका आड एक दिवशी हस्त परागीकरण करावे.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true