Get Mystery Box with random crypto!

*कृषीपंप थकबाकी भरण्यास एक महिन्याची मुदत* सौजन्य : सकाळ दिना | कृषिक अँप Krushik app

*कृषीपंप थकबाकी भरण्यास एक महिन्याची मुदत*

सौजन्य : सकाळ
दिनांक : 28-Feb-22

पुणे, ता. २७ : कृषिपंप वीजजोडणी धोरणानुसार कृषिपंपाच्या थकीत असलेल्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त होण्यासाठी आता केवळ एक महिन्यांची मुदत राहिली आहे. त्यामुळे या मुदतीत थकबाकीच्या ५० टक्के रक्कम व पूर्ण चालू वीजबिल येत्या ३१ मार्चपर्यंत भरल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकीची रक्कम देखील माफ करण्यात येणार आहे.
कृषिपंपाच्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त होण्यासाठी राज्यातील ४४ लाख ५० हजार शेतकऱ्यांच्या मूळ थकबाकीमधील व्याज व विलंब आकारातील सूट तसेच महावितरणकडून निर्लेखनाचे एकूण १५ हजार ९७ कोटी रुपये माफ केले आहेत. तर आतापर्यंत वीजबिलांच्या दुरुस्तीमधून ३०० कोटी २४ लाख रुपयांचे समायोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांकडे वीजबिलापोटी ३० हजार ७०५ कोटी रुपयांची सुधारित थकबाकी आहे. त्यापैकी ५० टक्के थकबाकीचा (ता. ३१) मार्चपर्यंत भरणा केल्यास उर्वरित ५० टक्के म्हणजे तब्बल १५ हजार ३५२ कोटी ५० लाख रुपयांची माफी शेतकऱ्यांना मिळणार आहे, असे महावितरणने कळविले आहे.
आतापर्यंत २१ लाख ७९ हजार ८१६ शेतकऱ्यांनी चालू वीजबिल व थकबाकीची काही रक्कम भरून योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांना आतापर्यंत व्याज व दंड भरलेल्या रकमेएवढीच एकूण सहा हजार ७६९ कोटी ५० लाख रुपयांची सवलत मिळाली आहे. या शेतकऱ्यांनी सुधारित थकबाकीच्या ५० टक्के रकमेमधील शिल्लक रक्कम येत्या ३१ मार्चपर्यंत भरल्यास त्यांचीही उर्वरित ५० टक्के थकबाकी संपूर्ण माफ होणार आहे. त्याप्रमाणे आतापर्यंत सुधारित थकबाकीची एकूण ५० टक्के रक्कम व चालू वीजबिल भरून राज्यातील तीन लाख ९७ हजार १९९ शेतकऱ्यांनी वीजबिल संपूर्णपणे कोरे केले आहे. त्यांना उर्वरित ५० टक्के थकबाकीची ५७१ कोटी ८८ लाख रुपयांची सवलत मिळाली आहे. तर या योजनेत पुणे प्रादेशिक विभागामध्ये सात लाख २७ हजार ६३७ शेतकरी सहभागी झाले असून त्यातील दोन लाख नऊ हजार ६३८ शेतकरी थकबाकीमुक्त झाले आहेत. त्यामुळे ३१ मार्चपर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, थकबाकीमुक्त योजनेचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

*महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.*
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true