Get Mystery Box with random crypto!

मराठी बातम्या | Marathi News

टेलीग्राम चैनल का लोगो emarathinews — मराठी बातम्या | Marathi News
टेलीग्राम चैनल का लोगो emarathinews — मराठी बातम्या | Marathi News
चैनल का पता: @emarathinews
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 5.95K
चैनल से विवरण

महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील नवीनतम मराठी बातम्या मिळवा.
आजच्या बातम्या, मनोरंजन, राजकारण आणि इतर गोष्टींवरील बातम्यांचे वृत्त प्रदान करते.
@eMarathiNews

Ratings & Reviews

1.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

2


नवीनतम संदेश 3

2022-06-11 05:38:37
सहाव्या जागेवर पराभूत, शिवसेनेची शोभा झाली, मनसेने एकच ट्विट केलं पण जखमेवर मीठ चोळणारं!

शिवसेनेला त्यांच्या गणितांवर पूर्ण विश्वास होता, उमेदवार निवडणूक आणण्यासाठी त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट, अपक्षांची जुळवाजुळव, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मतांची जोड अशी कुठलीही कमी ठेवली नाही. मात्र, त्यावर फडणवीसांची खेळी मास्टर स्ट्रोक ठरली आणि धनंजय महाडिक हे ८ मतांनी विजयी झाले. फडणवीस हे अपक्ष आमदारांची मतं भाजपकडे वळवण्यात यशस्वी झाले आणि भाजपचे तीनही उमेदवार जिंकून आले.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
108 views02:38
ओपन / कमेंट
2022-06-11 05:27:17
आमच्या धनंजय महाडिकांनीही राऊतांपेक्षा जास्त मतं घेतलेत, फडणवीसांनी जखमेवर मीठ चोळलं

Rajyasabha Election 2022 | राज्यसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी पहाटे चार वाजता जाहीर झाला. देवेंद्र फडणवीस राज्यसभा निवडणुकीचं मतदान सुरु असताना काल दिवसभरात एकही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, आज पहाटे निकाल जाहीर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विधिमंडळाच्या परिसरात प्रसारमाध्यमांना सामोरे गेले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी (Mahaviaks Aghadi) सरकारवर टीकास्त्र सोडले.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
138 views02:27
ओपन / कमेंट
2022-06-11 05:12:37
अपक्ष फुटले, छोट्या पक्षाचे आमदार फुटले, फडणवीसांनी काय केलं? संजय राऊतांनी सगळं सांगितलं!

मतदानानंतर ८ तास लागून राहिलेली निकालाची उत्सुकता, मध्यरात्रीचा हायव्होल्टेज ड्रामा, आक्षेपांमध्ये अडकलेली मतं, महाविकास आघाडीची वाढलेली धाकधूक अशा वातावरणात पहाटे पावणे चारच्या आसपास महाराष्ट्रातील ६ जागांचा निकाल जाहीर झाला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला धूळ चारुन तिन्ही जाागंवर भाजपचे उमेदवार निवडून आणले. फडणवीसांनी साम दाम दंड भेद वापरुन तसेच अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांच्या साहाय्याने महाविकास आघाडीला दणका दिला.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
173 views02:12
ओपन / कमेंट
2022-06-11 04:59:38
संजय राऊत अडचणीत?, वक्तव्ये सकृतदर्शनी मानहानीकारक; न्यायालयाचे निरीक्षण

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. किरीट सोमय्यांची पत्नी मेधा सोमय्या यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून न्यायालायने निरीक्षण नोंदवले आहे.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
202 views01:59
ओपन / कमेंट
2022-06-11 04:35:17
Rajyasabha: चाणक्य रिडिफाईनड! भाजपच्या विजयानंतर नितेश राणेंकडून फडणवीसांचं कौतुक

Rajyasabha Election 2022 | राज्यसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीने ट्रायडंट हॉटेलमध्ये अपक्ष आमदारांना सोबत घेऊन मोठे शक्तीप्रदर्शन केले होते. या कार्यक्रमाला जवळपास १२ अपक्ष आमदार उपस्थित होते. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीत यापैकी काही आमदारांची मतं भाजपच्या बाजूने वळाल्याचे स्पष्ट होत आहे. अपक्ष आमदार रवी राणा यांनीही असाच दावा केला होता. अपक्ष आमदार शरीराने महाविकास आघाडीसोबत असले तरी मनाने ते देवेंद्र फडणवीस आणि भाजपसोबत आहेत, असे रवी राणा यांनी म्हटले होते.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
234 views01:35
ओपन / कमेंट
2022-06-11 04:35:17
मुंबईतील करोना रुग्णसंख्येत झपाट्याने होणाऱ्या वाढीने काळजीत भर, अशी आहे सद्यस्थिती

मुंबईत करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने चिंता वाढत चालली आहे. मुंबईत शुक्रवारीही जवळपास २ हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. जवळपास शंभर रुग्णांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
217 views01:35
ओपन / कमेंट
2022-06-11 04:19:57
सेनेचं मत बाद करायला लावलं, निवडणूक आयोगावर दबाव टाकून कसला आलाय विजय? : राऊत

"भारतीय जनता पक्षाने नक्कीच जागा जिंकली, पण मी त्यांचा विजय मानायला तयार नाही. पहिल्या पसंतीची सर्वाधिक ३३ मतं संजय पवारांना आहेत तर भाजपचे विजयी उमेदवार धनंजय महाडिक यांना पहिल्या क्रमाकांची २७ मतं आहेत. दुसऱ्या पसंतीच्या आकडेमोडीवर धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे, हे मान्य आहे. पण भाजपचा दणदणीत विजय झाला, हे चित्र साफ झूट आहे. माझं मत बाद करायला लावलं, निवडणूक आयोगावर दबाव टाकून कसला आलाय विजय?", असं संजय राऊत म्हणाले.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
224 views01:19
ओपन / कमेंट
2022-06-11 04:19:57
यूपीचा तरुण, लोकप्रिय शायर, काँग्रेस नेत्यांची तगडी फिल्डिंग, इम्रान प्रतापगढी राज्यसभेवर

उर्दू भाषिक कवी इम्रान प्रतापगढी हे उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे तरुण नेते आहेत. त्यांना काँग्रेसने महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काँग्रेसने अंतर्गत नाराजी झुगारुन त्यांना उमेदवारी दिली. त्यासाठी काँग्रेसने तगडी फिल्डिंग लावली होती. त्याचं फळ मिळालं आणि प्रतापगढी हे पहिल्याच फेरीत विजयी झाले

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
213 views01:19
ओपन / कमेंट
2022-06-11 04:19:57
राज्यसभा निवडणुकीतील घोळाने मुख्यमंत्री संतप्त, राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बैठक घेणार!

राज्यसभा निवडणुकीत जोरादर आरोप प्रत्यारोप झाले. महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या. या निवडणुकीत काय-काय घडलं आणि कसं रंगलं राजकारण? पाहा...

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
208 views01:19
ओपन / कमेंट
2022-06-11 03:40:57
गुड न्यूज! सोमवार पावसाचा?, मान्सून पुढील दोन दिवसांत मुंबईत दाखल होण्याचा अंदाज

मान्सूनच्या प्रतीक्षा आता संपत आली आहे. लवकच मान्यून मुंबईत दाखल होणार आहे. येत्या दोन दिवसांत मान्सून मुंबईत दाखल होईल, असा अंदाज आहे. यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
248 views00:40
ओपन / कमेंट