Get Mystery Box with random crypto!

मराठी बातम्या | Marathi News

टेलीग्राम चैनल का लोगो emarathinews — मराठी बातम्या | Marathi News
टेलीग्राम चैनल का लोगो emarathinews — मराठी बातम्या | Marathi News
चैनल का पता: @emarathinews
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 5.95K
चैनल से विवरण

महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील नवीनतम मराठी बातम्या मिळवा.
आजच्या बातम्या, मनोरंजन, राजकारण आणि इतर गोष्टींवरील बातम्यांचे वृत्त प्रदान करते.
@eMarathiNews

Ratings & Reviews

1.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

2


नवीनतम संदेश

2022-06-12 03:31:19
मुंबईत करोनाची चौथी लाट?; तज्ज्ञ म्हणतात...

या आठवड्यामध्ये सातत्याने रुग्णसंख्येमध्ये होत असलेली वाढ पाहता ही करोना संसर्गाची चौथी लाट आहे का, यासंदर्भात वैद्यकीय क्षेत्रामध्ये चर्चा सुरू झाली आहे. मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत असली तरीही करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या नियंत्रणात आहे.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
597 views00:31
ओपन / कमेंट
2022-06-12 03:18:00
राज्यसभेच्या निकालानंतर मुंबई काँग्रेसची धाकधूक वाढली; विधान परिषदेसाठी नेत्यांची धावपळ सुरू

राज्यसभा निवडणुकीसाठी चोख व्यवस्थापन करीत भाजपने महाविकास आघाडीची झोप उडविल्यानंतर आता मुंबई काँग्रेसची धाकधूक वाढली आहे.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
594 views00:18
ओपन / कमेंट
2022-06-11 23:32:59
पुण्यात पंजाब पोलिसांकडून सिद्धू मुसेवाला प्रकरणाची चौकशी; धक्कादायक माहिती उघड होणार?

सिद्धू मुसेवाला प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आज सकाळी पंजाब पोलिसांचे पथक पुणे ग्रामीण मुख्यालयात दाखल झाले होते. त्यांनी सौरभ महाकाल याची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. माहिती घेऊन पंजाब पोलीस नुकतेच पंजाबला रवाना झाले आहेत. सौरव महाकाल उर्फ सिद्धेश कांबळे हा लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या संपर्कात आहे का? या संदर्भातील तपास पंजाब पोलिसांकडून केला जात आहे.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
522 views20:32
ओपन / कमेंट
2022-06-11 22:53:19
धक्कादायक! पर्यटक असल्याची बतावणी करत रिक्षा चालकांना गुंगीचे औषध दिले, पुढे घडले ते...

रिक्षाचालक आशीष संजय किडये (वय २९, रा. धनजी नाका रत्नागिरी) हा स्वतःची रिक्षा घेऊन सकाळी आठच्या सुमारास श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे कोल्हापूर येथील तीन पर्यटकांना घेऊन गेला होता. दुपार पर्यंत तो परत आला नाही. त्याचे वडील त्याला फोन करत होते. पण तो फोन उचलत नव्हता. दुपारी आशीषला मारहाण व गुंगीचे औषध देऊन बेशुद्धावस्थेत रिक्षासह पटवणे येथे आणून सोडल्याचे समजतले.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
504 views19:53
ओपन / कमेंट
2022-06-11 21:45:19
मुंब्र्यातील धक्कादायक प्रकार; मालमत्तेच्या वादातून जाळून घेण्याचा प्रयत्न

मुंब्र्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून बाप आणि मुलांमध्ये एका दुकानाच्या मालमत्तेच्या वादातून भांडण सुरु होते. मुंब्रा येथे मुंब्रा पोलीस ठाण्याच्या समोर असलेल्या दुकान मालमत्तेवरून बाप अर्जुन चौरसिया आणि त्यांची दोन मुले मनोज चौरसिया आणि अशोक चौरसिया यांच्यात वाद सुरू आहे. सदरचा वाद हा सहाय्यक पोलीस आयुक्त व्यंकटेश आंधळे यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी कायदेशीर कार्यवाही करून प्रकरण दिवाणी न्यायलयात पाठविले होते.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
470 views18:45
ओपन / कमेंट
2022-06-11 21:05:39
श्रीक्षेत्र देहूचे मंदिर उद्यापासून दर्शनासाठी राहणार बंद; १४ जूनला शिळा मंदिराचे लोकार्पण

देहू संस्थांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू केली आहे. केंद्रीय सुरक्षा यंत्रणांकडून देहू संस्थान तशा सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मंदिर बंद ठेवण्यावर उद्याच अमंलबजावणी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. पहिल्यांदाच पंतप्रधान देहू नगरीत येत असल्याने देहूकरांसाठी हा आनंद वेगळा असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे पंतप्रधानाच्या आगमनाची देहूकर वाट पहात असल्याचे पहायला मिळत आहे.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
496 views18:05
ओपन / कमेंट
2022-06-11 20:52:41
नितीशकुमार राष्ट्रपती होणार? बिहारमध्ये तर्क वितर्कांना उधाण, अखेर जेडीयूचा वादावर पडदा

केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रपती पदासाठी निवडणूक प्रक्रिया जाहीर केली आहे. भाजप आणि विरोधी पक्षांच्या दृष्टीनं ही निवडणूक अतिशय महत्त्वाची झाली आहे.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
498 views17:52
ओपन / कमेंट
2022-06-11 19:58:22
भीषण अपघात : नियंत्रण सुटल्याने भरधाव क्रुझर रस्त्याच्या कडेला उलटली; तीन जण गंभीर जखमी

हिंगोली ते वाशिम मार्गावर बासंबा ढाब्याजवळ भरधाव क्रूझर उलटून झालेल्या अपघातात ३ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने जीप रस्त्याच्या खाली जाऊन उलटली. या अपघातात ३ जण गंभीर जखमी झाले आहेत.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
556 views16:58
ओपन / कमेंट
2022-06-11 19:58:21
राज्यसभा : गिरीश महाजनांच्या पीएने जिंकली एक लाखाची पैज; राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हरला

राज्यसभेत भाजपचे उमेदवार विजयी होतील यावर भाजप नेते गिरीश महाजन यांचे पीए अरविंद देशमुख यांनी एक लाख रुपयांची पैज लावण्याचे आव्हान दिले होते. देशमुख यांचे हे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते राहुल पाटील यांनी स्विकारले होते. आज राज्यसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यात भाजप उमेदवार विजयी झाले. त्यामुळे ठरल्यानुसार अरविंद देशमुख यांनी एक लाखांची पैज जिंकली.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
546 views16:58
ओपन / कमेंट
2022-06-11 19:46:19
१ किलो वजन घटवा, १००० कोटी निधी घ्या, गडकरींची ऑफर, खासदाराची हक्काने घसघशीत मागणी

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपच्या खासदाराला वजन कमी करण्याचं आवाहन केलं होतं. गडकरींनी त्याला १ किलो वजन घटवल्यास १ हजार कोटींची निधी देण्याचं कबूल केलं होतं.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
531 views16:46
ओपन / कमेंट