Get Mystery Box with random crypto!

मराठी बातम्या | Marathi News

टेलीग्राम चैनल का लोगो emarathinews — मराठी बातम्या | Marathi News
टेलीग्राम चैनल का लोगो emarathinews — मराठी बातम्या | Marathi News
चैनल का पता: @emarathinews
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 5.95K
चैनल से विवरण

महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील नवीनतम मराठी बातम्या मिळवा.
आजच्या बातम्या, मनोरंजन, राजकारण आणि इतर गोष्टींवरील बातम्यांचे वृत्त प्रदान करते.
@eMarathiNews

Ratings & Reviews

1.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

2


नवीनतम संदेश 12

2022-05-30 22:06:49
आजपासून राज्यात 'पेट्रोल-डिझेल नो परचेस' आंदोलन; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या मोठ्या रांगा

औरंगाबाद शहरात पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. औरंगाबाद जिल्हयासह राज्यभरातील पंप चालकांनी ३१ मेपासून 'पेट्रोल-डिझेल नो परचेस' आंदोलन पुकारले आहे. पेट्रोलपंप चालक ऑईल कंपनीकडून आज ३१ मे पासून इंधन खरेदी करणार नाहीत. या आंदोलनाच्या घोषणेनंतर वाहनधारकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळेच आज वाहनधारकांनी पेट्रोलपंपांवर गर्दी करायला सुरुवात केली आहे.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
192 views19:06
ओपन / कमेंट
2022-05-30 21:13:47
काँग्रेस स्वत: सुधारणार नाही, आपल्यालाही बुडवेल : प्रशांत किशोर

Prashant Kishor on Congress राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी बिहारमधील एका कार्यक्रमात काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेससोबत यापुढं कधीही काम करायचं नाही हे ठरवलं असल्याचं ते म्हणाले.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
234 views18:13
ओपन / कमेंट
2022-05-30 20:49:09
केंद्रीय मंत्र्याचं तिकीट कापलं, महाराष्ट्राच्या सुपुत्राला उमेदवारी, नितीशकुमारांचा मास्टरस्ट्रोक

राज्यसभेच्या द्वीवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. देशभरात ५७ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. राज्यसभा निवडणुकीमुळं देशभरातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. बिहारच्या राजकारणात एक धक्कादायक घटना घडली आहे.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
280 views17:49
ओपन / कमेंट
2022-05-30 20:08:48
Breaking: आर्यन खान प्रकरणातील अधिकारी समीर वानखेडे यांची अखेर चेन्नईला बदली

मुंबई: कॉर्डेलिया क्रूझ पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खानला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने क्लिन चिट दिल्यानंतर अडचणीत आलेले एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचलाक समीर वानखेडे यांची अखेर चेन्नईतील डीजीटीएसममध्ये बदली करण्यात आली आहे. या प्रकरणी समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकाकडून चूक झाल्याची कबुली एनसीबीचे डीजी एस. एन. प्रधान यांनी दिली होती. त्यानंतर वानखेडे यांच्यावर कारवाई होणार असे स्पष्ट झाले होते. हाती आलेल्या वृत्तानुसार समीर वानखेडे यांची महसूल गुप्तचर संचालनालयात करदाता सेवा संचालनालयाचे महासंचालक म्हणून ‘नॉन सेंसिटिव्ह’ पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
358 views17:08
ओपन / कमेंट
2022-05-30 19:40:48
चौंडीत उद्या अहिल्यादेवी जयंती उत्सव; राम शिंदे म्हणाले, 'हा तर राष्ट्रवादीचा मेळावा'

मुंबईतच घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप नेते राम शिंदे यांनी अहमदनगरमधील चौंडीत होणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती उत्सव कार्यक्रमावर टीका केली आहे. चौंडीतील हा उत्सव समितीचा सर्वसमावेशक कार्यक्रम नव्हे तर राष्ट्रवादीचा मेळावा आहे. एवढ्या वर्षांनंतर पवारांना प्रथमच कशी चौंडीची आठवण झाली, अशी टीका शिंदे यांनी केली. करोनाचे निर्बंध हटविल्यानंतर प्रथमच आलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती चौंडी (ता. जामखेड) येथे उत्साहात साजरी केली जाणार आहे.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
351 views16:40
ओपन / कमेंट
2022-05-30 19:40:48
महिलेने ६ मुलांना विहिरीत फेकलं, सगळ्या मुलांचा करुण अंत, मन हेलावणारी घटना

रायगड जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर येतीये. ढालकाठी बिरवाडी गावातील महिलेने सहा मुलांना विहिरीत फेकले आहे. विहिरीत फेकलेल्या सहाही मुलांचा करुण अंत झाला आहे. हृदय हेलावणारी ही घटना आहे. धक्कादायक घटनेने जिल्ह्यात सन्नाटा पसरला आहे. मात्र महिलेने हे कृत्य का केले?, याचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
327 views16:40
ओपन / कमेंट
2022-05-30 19:27:48
...नाहीतर विधवा महिलांवर बलात्कार करु, नीलम गोऱ्हे यांना धमकी

विधवा महिलांच्या निर्णयाची अंमलबजावणी झाली तर विधवा महिलांवर बलात्कार करण्याची विकृत धमकी या पत्रातून नीलम गोऱ्हे यांना देण्यात आली आहे. "शासनकर्ते, पोलिस, सामाजिक कार्यकर्ते महिलांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहेत. मात्र त्याचवेळी समाजातील काही विकृत माणसं स्त्रियांच्या अधिकारांचं हणन करत आहेत. धमकीचा फोन आल्यानंतर आम्ही नगर पोलिसांकडे तक्रार केली आहे", असं नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं आहे.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
342 views16:27
ओपन / कमेंट
2022-05-30 19:15:09
टाइम्स शील्ड : कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलने पटकावले जेतेपद

कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलच्या संघाला २० षटकांमध्ये ७ बाद १३७ अशी धावसंख्या उभारता आली. ​यावेळी महिंद्राच्या संघाकडून कुणाल गावंडने १८ धावांत दोन बळी मिळवले, तर ​सिद्धेश मोरेने ३० धावांत दोन बळी मिळवले. या आव्हानाचा पाठलाग करताना महिंद्राच्या संघाला २० षटकांमध्ये ८ बाद १३२ धावा अशी मजल मारता आली आणि त्यांना पाच धावांनी पराभव पत्करावा लागला.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
342 views16:15
ओपन / कमेंट
2022-05-30 19:15:07
स्वप्न विसरल्याची जाणीव झाली अन् फॉरेन बँकेतील नोकरी सोडली; UPSC मध्ये राज्यात पहिली

प्रियंवदा म्हाडदळकर यूपीएससी परीक्षेत देशात तेरावी आली. राज्यात ती पहिली आहे. लहानपणापासूनच तिनं अधिकारी होण्याचं स्वप्न बाळगलं. बहुराष्ट्रीय बँकेत नोकरी मिळाल्यानं ते स्वप्न काहीसं मागे पडलं. पण सहा वर्षांनी नोकरी सोडून प्रियंवदानं परीक्षेची तयारी केली.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
324 views16:15
ओपन / कमेंट
2022-05-30 19:15:07
UPSC Result 2022 मध्ये महिलांची आघाडी, महाराष्ट्रातील 60 हून अधिक यशवंतांची यादी

केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी 2021 मध्ये परीक्षा घेण्यात आली. जानेवारी 2022 मध्ये मुख्य लेखी परीक्षा घेण्यात आली असून एप्रिल-मे 2022 महिन्यात मुलाखती घेण्यात आल्या. या परीक्षेच्या निकालातील उत्तीर्ण 685 उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
301 views16:15
ओपन / कमेंट