Get Mystery Box with random crypto!

चौंडीत उद्या अहिल्यादेवी जयंती उत्सव; राम शिंदे म्हणाले, 'हा त | मराठी बातम्या | Marathi News

चौंडीत उद्या अहिल्यादेवी जयंती उत्सव; राम शिंदे म्हणाले, 'हा तर राष्ट्रवादीचा मेळावा'

मुंबईतच घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप नेते राम शिंदे यांनी अहमदनगरमधील चौंडीत होणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती उत्सव कार्यक्रमावर टीका केली आहे. चौंडीतील हा उत्सव समितीचा सर्वसमावेशक कार्यक्रम नव्हे तर राष्ट्रवादीचा मेळावा आहे. एवढ्या वर्षांनंतर पवारांना प्रथमच कशी चौंडीची आठवण झाली, अशी टीका शिंदे यांनी केली. करोनाचे निर्बंध हटविल्यानंतर प्रथमच आलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती चौंडी (ता. जामखेड) येथे उत्साहात साजरी केली जाणार आहे.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा