Get Mystery Box with random crypto!

" छञपती श्री शिवाजी महाराज "

टेलीग्राम चैनल का लोगो chatrapat — " छञपती श्री शिवाजी महाराज "
टेलीग्राम चैनल का लोगो chatrapat — " छञपती श्री शिवाजी महाराज "
चैनल का पता: @chatrapat
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 3.58K

Ratings & Reviews

4.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

2

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 6

2023-04-11 08:17:24 हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.
39 views05:17
ओपन / कमेंट
2023-04-11 08:17:24 आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष

१० एप्रिल इ.स.१६६०
(वैशाख शुद्ध दशमी, शके १५८२, संवत्सर शार्वरी, वार मंगळवार)

सिद्दी जौहरने वेढा आवळला!
सह्याद्रीचा सिंह कोंडला गेला होता. कारण बाहेरून सिद्दी जौहरने वेढा करकचून आवळला होता. त्यातच सोबतीला हेन्री रेव्हिंग्टन, मिशेल, गिफर्ड, वेलजी यांनी पन्हाळा गडास आल्या आल्या लांब पल्ल्याच्या तोफाही पन्हाळगडावर डागायला सुरूवातही केली. असाच एक गोळा पन्हाळ्यावर येऊन पडला असता गडपाहणी करत असताना महाराजांना हा इंग्रजांचा प्रताप समजला. इकडे सिद्दी जौहर खूश होता. कारण तोफेचे गोळे पन्हाळ्याच्या तटाला भिडत होते. त्यामुळे आज ना उद्या तरी यश येईलच या खुशीने त्याने हेन्री रेव्हिंग्टन बरोबर पावसाळ्यापर्यंत दारुगोळा पुरविण्याचा करारही करून टाकला. महाराजांना हेन्री रेव्हिंग्टनच्या हालचालींची बित्तंबातमी कळत होती. मात्र स्वराज्य संकटात सापडले. एकीकडून शाहिस्तेखान दुसरीकडून सिद्दी जौहर या दुहेरी आक्रमणात महाराज सापडले होते. सिद्दी जौहर वेढ्यात जराही ढिलाई करत नव्हता. जर ढिलाई झाली तर सर्वांसमक्ष त्या सैनिकांची गर्दन उडवत असे. तीही विनाचौकशी. त्यामुळे सैन्यसुद्धा दक्ष होते.


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link




१० एप्रिल इ.स.१६९३
१६८९ मध्ये राजधानी रायगड मुघलांच्या ताब्यात गेल्यावर मराठ्यांचे तिसरे छत्रपति राजाराम महाराज 'जिंजी' (सध्या तामिळनाडू मध्ये) येथे गेले होते.
तेथेच त्यांनी स्वतःला राजाभिषेक करवून घेतला आणि राज्याची सूत्र काही काळासाठी त्यांनी तिकडून पाहिली. ह्या दरम्यान १० एप्रिल १६९३ रोजी त्यांनी तंजावर गादीचे शहाजीराजे (दुसरे) यांची भेट घेतली.



१० एप्रिल इ.स.१६९८
छत्रपती राजाराम महाराज दक्षिण कोकणातील गड कोटांच्या मोहिमे वर गेले. ह्या मोहिमेचा उद्देश म्हणजे आगामी लढ्यची पूर्व तयारी म्हणून गडकोटांवरील फौज,रसद, शस्त्रास्त्रे-दारुगोळा ह्या बाबी मजबूत करून त्यांना सज्ज करणे.ही मोहीम आटपून महाराज प्रतापगड - विशाळगड-सज्जनगड करत साताऱ्यास जुलै १६९८ मध्ये आले.



१० एप्रिल इ.स.१७०३
सिंहगडचा रणसंग्राम
एप्रिलला सेनापती धनाजी जाधवांचा पुत्र शम्भूसिंह जाधवने म्हलर्जी व खंडोजी च्या सोबतीने ४ हजार घोडदळ सकट इराडत खानाच्या ठाण्यावर हल्ला केला. हे ठाणे बादशाही छावणीच्या रक्षणाच्या हेतूने छावणी पासून केवळ ४ कोस दूर होते व माघारी जाता जाता आखरपूर इथून छावणी कडे येणारी रसद ही १० एप्रिल ला लुटली.



१० एप्रिल इ.स.१७५८
सरदार मानाजी पायगुडेंचा पराक्रम
सन १७५८ मध्ये मराठ्यांनी सरहिंद, लाहोर, जिंकले. अहमदशहा अब्दालीचा मुलगा तैमुर आणी सरदार जहानखान यांनी लाहोर सोडून पळ काढला. परंतु त्यांच्याजवळील अवजड तोफखाना व खजिना आणी दिल्ल्तीतील लुटीचा खाजींना त्यांनी तेथेच सोडून दिला. जाताना मात्र तैमुर ने आपला गुलाम तहमासखान यास गुलामगिरीतून मुक्त केले होते. तहमासखानाने मुक्त झाल्यामुळे लाहोरच्या वेशीचे दरवाजे उघडले. याच दरम्यान मराठा सरदार वीर मानाजी पायगुडे यांनी १० एप्रिल १७५८ रोजी लाहोरमध्ये पहिले पाउल टाकले. लाहोरमध्ये निधड्या छातीने पाउल टाकणारे ते पहिले मराठा शूर सरदार होते. तहमासखानाने आपल्या आत्मचरित्ररुपी तहमासनामा या ग्रंथात हि घटना स्पष्टपणे लिहून ठेवली आहे.





१० एप्रिल इ.स.१८१८
छत्रपती प्रतापसिंह महाराजांची साताऱ्याच्या गादीवर इंग्रजांकडून पुनःप्रतीष्ठापणा
१०-०४-१८१८ ला प्रतापसिंह यांची सातारा राज्याच्या गादीवर पुनःस्थापना झाली तरी त्यांचा ब्रिटिशांबरोबर तह २५ सप्टेंबर १८१९ मध्ये झाला. कारण तोपर्यंत बाजीराव इंग्रजांना शरण आला नव्हता व त्याचा पूर्ण बंदोबस्त केल्यावरच इंग्रज सातारच्या महाराजांकडे लक्ष देणार होते. कंपनी सरकारतर्फे जेम्स ग्रांट तर महाराजांतर्फे त्यांचा मुखत्यार-पॉवर ऑफ अटर्नी-विठ्ठल बल्लाळ फडणीस ने सह्या केल्या. जेम्स ग्रांट ने राज्यकारभाराच्या दृष्टीने परिपूर्ण सातारा राज्य ५ एप्रिल १८२२ महाराजांच्या हाती सोपविले. हे राज्य त्यानंतर सुमारे २६ वर्षे अस्तित्वात राहिले.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

63 views05:17
ओपन / कमेंट
2023-04-09 08:10:58
226 views05:10
ओपन / कमेंट
2023-04-09 08:10:50 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/



हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.
209 views05:10
ओपन / कमेंट
2023-04-09 08:10:50 आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

ৎ एप्रिल इ.स.१६३३
स्वतः शहाजी राजे यांचा सहभाग असलेल्या लढाईत मोघल बादशहा शाहजहानच्या फौजांनी निजामशाही विरुद्ध त्यांच्या देवगिरी किल्ल्यावर हल्ला चढवला. ९ एप्रिल ला मुघलांना किल्ल्याच्या तटबंदीच्या एका भागात स्फोट करून भगदाड पाडता आले पण त्यातून किल्ल्यात प्रवेश करता आला नाही, १७ एप्रिलला रणदुल्लाखान व शहाजी राजांनी किल्ल्याजवळ रसद पोहोचवायचा प्रयत्न केला पण मुघलांनी त्यांना अडविले व परतवून लावले. मुघलांच्या वाढत्या प्रभावाने व घटणाऱ्या रसदेमुळे किल्ल्यातले आदिलशाही सैन्य विवश झाले. त्यांनी मुघलांकडे अभयवचन मागितले व किल्ला देऊ केला. मालोजी भोसलेनी हा निरोप महाबतखानकडे नेला व त्यानी लगेच अभयदान दिले.


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link




ৎ एप्रिल इ.स.१६६९
काशी विश्वेश्वराचे देवालय जमीनदोस्त करण्याचा हुकुम बादशहाने दिला. औरंगजेब बादशहाने एक फतवा काढून हिंदुस्थानात सर्व हिंदुंना अतिशय पुज्य असलेल्या मोठमोठ्या देवालयांवर पडू लागली. सोमनाथचे दुसरे देवालय, काशीचे विख्यात विश्वेश्वराचे मंदिर आणि मथुरा येथील केशवराजाचे मंदिर ही हिंदुंची श्रद्धास्थाने औरंग्याला नजरेसमोर नकोशी वाटू लागली. सूर्यग्रहण आले. या सूर्यग्रहणाच्या मुहुर्तावरच काशी विश्वेश्वराचे देवालय जमीनदोस्त करण्याचा हुकुम औरंगजेब बादशहाने सोडला. या पाशवी हुकुमाने निसर्गही थरारला.



९ एप्रिल इ.स.१६७४
इंग्रजांच्या नुकसान भरपाई मागणीस यश
ब्रिटिश सल्लागार मंडळाच्या सभेंत ठरले की, हेन्री ऑक्झेंडनने रायगडावर जाण्याची तयारी करावी. ऑक्झेंडन व उष्टीक यांनी विचार करून तहनाम्यांवर अधिक काही गोष्टी घालावयाच्या असल्यास सुचवाव्यात. ता. ९ एप्रिल रोजी मुंबईहून सुरतेस पत्र रवाना झाले; त्यात ३/४ हजार रुपयांची रत्ने खरेदी करण्याची जबाबदार अधिकाऱ्यांस विनंती करण्यात आली. मुंबईकरांचे पत्र सुरतेस पोहोचल्यावर तेथील कौन्सिलच्या सभासदांचे मत झालें की नारायण शेणवी यास अपेक्षेबाहेर यश आलें आहे; तेव्हा शिवाजीस प्रसन्न करण्यासाठी राज्याभिषेकाच्यावेळी भरीव नजराणा द्यावा, म्हणून ६ मोत्ये, ३ अंगठ्या, १ शिरपेच, २ सलकडी अशा सुमारे ३३१४ रुपये किंमतीच्या वस्तु खरेदी करून मुंबईस धाडण्यात आल्या.



ৎ एप्रिल इ.स.१६८२
मुघल सरदार शहाबुद्दीनचा 'किल्ले रामशेज' ला पुन्हा वेढा टाकण्याचा प्रयत्न. पण किल्लेदार माजी पवार व इतर मावळ्यांचा त्यांच्यावर जोरदार हल्ला.





ৎ एप्रिल इ.स.१६९५
शके १६१७ च्या वैशाख शु. ६ रोजी प्रसिद्ध पंडितकवि वामनपंडित यांनी भोगांव येथे समाधि घेतली.

वामनपंडित हे ऋग्वेदी, वसिष्ठ' गोत्री ब्राह्मण असून विजापूरचे राहणारे. विजापूरचा बादशहा आपणांस बाटविणार ही बातमी कळताच त्यांनी विजापूर सोडले व काशी येथे संस्कृत भाषेचा व तत्कालीन शास्त्रांचा अभ्यास केला. विद्वत्ता मिळाली तरी चित्तास समाधान लाभले नाही म्हणून त्यांनी ' मलया- चला 'वर तपश्चर्या केली. तेथे ध्यानमग्न असता कोणा यतीने जो उपदेश दिला तो वामनपंडितांनी निगमसार' ग्रंथात साठविला आहे. यानंतरहि ‘कर्मतत्त्व', 'समश्लोकी', 'सिद्धांतविजय', 'अनुभूतिलेश', इत्यादि लहान लहान अध्यात्म प्रकरण पंडितांनी लिहिली. परंतु, वामनपंडितांचे सर्व बुद्धिवैभव त्यांच्या 'यथार्थ दीपिके 'त दिसून येते. सामान्य जनांना वामनपंडित प्रिय वाटतात ते त्यांच्या आख्यानक कवितेमुळे. सुश्लोक वामनाचा' म्हणून यांची प्रसिद्धि आहे. ' गजेन्द्र- मोक्ष', 'सीतास्वयंवर', 'कात्यायनी व्रत', 'वनसुधा', 'वेणुसुधा', इत्यादि सुंदर प्रकरणे रसिकांना आजहि रिझवितात. कित्येक ठिकाणी बीभत्स व शृंगार रस हे आपली पायरी ओलांडून जातात हैहि खरेंच आहे. जगन्नाथ पंडितांची गंगालहरी' व भर्तृहरीची नीतिशतके' यांचा उत्कृष्ट मराठी अनुवाद वामनांनीं केला आहे. वामनपंडित हे कोरेगांव ( शिगांव ) येथून कृष्णाकाठाने तीर्थकषेत्र पाहत पाहत महाबळेश्वर येथे जात असतांना मार्गात गुन्हेघर येथे समाधिस्थ झाले. पण भोगांवच्या हद्दीत कृष्णेच्या काठी यांचे दहन झाले. बरोबर असलेल्या शिष्याने-महादेवाने तेथे त्यांची समाधि बांधली. “वामनपंडिताप्रमाणे भक्तीने ईश्वरपर्दी लीन होऊन अद्वैतविचारावर मोठमोठाले ग्रंथ लिहिणारा, अक्षर गणांच्या वृत्तांनी सोपी, मधुर व पुष्कळ कविता रचणारा आणि निःस्पृहतेने केवळ ईश्वरपर वर्णन करणारा ग्रंथकार, कवि आणि साधु त्याच्यामागे आज- पर्यंत झाला नाही. वामनपंडिताने महाराष्ट्र भाषेवर व लोकांवर फार उपकार केले आहेत.” असा अभिप्राय कै. बा. म. हंस यांनी दिला आहे.

170 views05:10
ओपन / कमेंट
2023-04-08 09:39:26
215 views06:39
ओपन / कमेंट
2023-04-08 09:39:12 अन तिथून पळून न जाता स्वतःला अटक करून घेतली.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/



हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.
208 views06:39
ओपन / कमेंट
2023-04-08 09:39:12 आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

८ एप्रिल इ.स.१६६७
महाराजांनी आग्ऱ्यात कैदेत अडकलेल्या डबीर आणि कोरडे या आपल्या दोन वकीलांच्या सुटकेसाठी औरंगजेबास एक पत्र लिहिले आहे. त्याचा मराठी भाषेतील तजुर्मा सापडला आहे. संपूर्ण पत्रच वाचण्यासारखे आहे. ते मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा यात छापले आहे. आपण वाचा.
त्यातील मुख्य विषय असा की , ‘ मी आपली परवानगी न घेता आग्ऱ्याहून निघून आलो , याचे मला वाईट वाटते. मी पूवीर्प्रमाणेच आपल्याशी नम्र आहे. ‘
औरंगजेबानेही एकूण आपली परिस्थिती ओळखली होती. त्यानेही त्र्यंबक सोनदेव डबीर आणि रघुनाथ बल्लाळ कोरडे या दोन वकीलांची दि. ८ एप्रिल १६६७ रोजी सुटका केली. सुमारे नऊ महिने यमयातना सहन करून ते दोघे वकील सुटले आणि राजगडावर येऊन पोहोचले.


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link




८ एप्रिल इ.स.१६७४
महाराज चिपळूण येथे आले.
महाराज लष्कर पाहणीसाठी व नवे सरनौबत नियुक्त करण्यासाठी चिपळूणला आले. लष्कराची पाहणी करून थोर लष्करास व पायदळ लोकांस खजिना फोडून महाराजांनी वाटणी केली. याच वेळी चालू वर्षाचा खर्डा ठरवून लष्कराच्या छावण्या, नव्या नेमणुका करून टाकल्या. सरनौबतीची वस्त्रे हंसाजीराव मोहिते "हंबीरराव" यांना दिली. हंबीरराव हा मोहीते घराण्यास किताब होता. ममोहित्यांचे मूळ आडनाव चव्हाण असावे. असा कयास आहे. चिपळूणला महाराजांचा मुक्काम सुमारे महिनाभर होता.



८ एप्रिल इ.स.१६७६
मार्च अखेरीस मराठ्यांनी कोल्हापूर जिंकले. महाराज कुडाळहून फोंड्यास गेले आणि फोंड्याच्या किल्ल्यास वेढा घातला (८ एप्रिल). फोंड्याचा किल्लेदार महमदखान हा शर्तीने किल्ला लढवीत होता. त्याला जवळचे पोर्तुगीज गुप्तपणे मदत करीत होते. मराठ्यांनी ही मदत पकडली आणि पोर्तुगिजांस त्याबद्दल जाब विचारला, तेव्हा त्यांनी कानावर हात ठेवले. आमचा ह्या मालाशी संबंध नाही असा जबाब त्यांनी दिला. विजापुराहून बहलोलखान फोंड्याच्या मदतीस १५ हजार फौज घेऊन येत होता. तो मिरजेस आल्यावर त्याच्या वाटेत मोठमोठी झाडे पाडुन महाराजांनी त्यास मिरजेतच गप्प बसविले. मराठी फौजा कार्यरत राहिल्या. त्या फौंड्यांत घुसल्या. त्यांनी विजापूर फौजेची कत्तल केली. पुढे किल्लेदार महमदखान यास कैद करून फोंडा किल्ला ६ मे रोजी हिरवी स्वराज्यात सामील झाला.



८ एप्रिल इ.स.१७०३
सिंहगडाच्या तटबंदीवर तोफांची मारगिरी मोगलांनी केली. पण किल्ला तोफांच्या मारगिरीने हस्तगत होईल असे मोगलांना वाटत नव्हते. तेव्हा तरबियतखानाने मराठा शिबंदीशी वाटाघाटी केल्या. भली मोठी रक्कम किल्लेदारास दिल्यावर किल्ला ८ एप्रिल १७०३ रोजी मोगलांचे ताब्यात आला. त्या किल्ल्याचे नाव बाख्शीदाबखा (ईश्वरदत्त) असे ठेविले.





८ एप्रिल इ.स.१७२८
ऊत्तर पोर्तुगालच्या सल्लागार मंडळाच्या सचिवाने व्हिसेरेईला पाठविलेल्या पत्राची नोंद!
"डिचोलीचा किल्ला पाडून टाकावा अशी आज्ञा महाराजांनी केली आहे". वसईच्या युद्धात वाडीकर सावंत यांनी तटस्थतेचे धोरण पत्करले असावे. कारण, पेशव्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. त्यातच कुलाबेकर आंग्रे यांच्याशी त्यांच्या कटकटी चालू होत्या.



८ एप्रिल इ.स.१८५७
क्रांतिकारी मंगल पांडे यांस फासावर चढविण्यात आले. अशा प्रकारे १८५७ च्या उठावातील पहिला क्रांतिकारक व पहिला हुतात्मा होण्याचा बहुमान मंगल पांडे यांस जातो. हा १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा प्रारंभ मानला जातो. त्यांच्या नावाचा ब्रिटिशांवर इतका जबर्दस्त प्रभाव पडला होता की, या क्रांतियुद्धातील सर्व सैनिकांना इंग्रज `पांडे’ याच नावाने संबोधू लागले होते.
बराकपूरच्या लष्करी छावणीमध्ये मंगल पांडे यांस फाशी देण्यात आले.





८ एप्रिल इ.स.१९२९
भगतसिंह आणि बटुकेश्वर दत्त यांनी संसदेत बाँब फेकले
बटुकेश्वर दत्त यांना मुख्यत्वे ओळखलं जातं ते म्हणजे ब्रिटीशांच्या केंद्रीय विधानसभेत (आजच्या संसदेत) त्यांनी भगतसिंहांना सोबत केलेल्या बॉम्बस्फोटामुळे. तत्कालीन ब्रिटीश सरकारने ‘पब्लिक सेफ्टी बिल और ट्रेड डिस्प्यूट बिल‘ नावाने दोन बिलं संसदेत मंडळी होती ज्यामुळे मजुरांच्या उपोषण करण्यावर सरकार निर्बंध घालून आणि क्रांतिकारकांच्या विरुद्ध पोलिसांना अनावश्यक अधिकार मिळवून द्यायचा प्रयत्न सरकार करत होतं. याचा निषेध म्हणून भगतसिंह आणि बटुकेश्वर दत्त यांनी ८ एप्रिल १९२९ रोजी कुणालाही हानी होणार नाही अशा पद्धतीने संसदेच्या प्रेक्षक दिर्घेतून बॉम्ब फेकून गोंधळ उडवला. या गोंधळात आपल्या विचारांची पत्रके उधळून त्यांनी बॉम्बस्फोटाचा उद्देश सर्वाना कळवण्याचा प्रयत्न केला.
195 views06:39
ओपन / कमेंट
2023-04-07 05:33:46
164 views02:33
ओपन / कमेंट
2023-04-07 05:33:39 आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

७ एप्रिल इ.स.१६५७ :-
( वैशाख शुद्ध चतुर्थी, शके १५७९, संवत्सर हेमलंबी, मंगळवार )

शिवरायांचा काशीबाई आईसाहेबांशी विवाह :-
शिवरायांनी मातब्बर घराण्यांशी तत्कालीन रुढीनुसार सोयरीक संबंध करून त्यांचीही स्वराज्याशी बांधिलकी तयार केली.
आजच्या दिवशी जाधवरावांच्या घराण्यातील काशीबाई आईसाहेबांचा शिवरायांशी विवाह झाला आणि आणखी एक घराणे स्वराज्याशी जोडले गेले.


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link




६ व ७ एप्रिल इ.स.१६६३
जसवंतसिंहाने कोंढाण्यास वेढा घातला.
शाहिस्तेखानावर पडलेला आकस्मिक छापा औरंगजेबालाही वाटला नसेल इतका दु:खदायक काही राजपूत सरदारांना वाटला. लाल महालातील हा फजितीदायक छापा घडल्यानंतर (इ. १६६३ एप्रिल ६ ) या जसवंतसिंहाने पुण्या शेजारच्या कोंढाणा किल्ल्यावर हल्ला चढविला. त्याच्याबरोबर त्याचा मेहुणा भावसिंह हाडा (बुंदीमहाराजा) हाही होता. जसवन्तसिंहांना सिंहगड अजिबात मिळाला नाही, त्यांनी गडाला वेढा घातला.



७ एप्रिल इ.स.१६८७
(वैशाख शुद्ध ५, पंचमी, शके १६०९, प्रभव संवत्सर, वार गुरुवार)

स्वराज्याचे पेशवे नीळकंठ मोरेश्वर यांची राजाज्ञा!
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वराज्याचे पेशवे नीळकंठ मोरेश्वर यांनी पुरंदरचे किल्लेदार बाजी घोलप यांना राजाज्ञा केली की किल्ले पुरंदरावरील पुरंदरेश्वर व केदारेश्वर यांचा अभिषेक अनुक्रमे नारायण भट व शिव भट करतील या कामी इतर कोणाची ढवळाढवळ न करणे. या कामी स्वामिंची सनद लवकरच पाठविली जाईल या आशयाची आज्ञा केली.



७ एप्रिल इ.स.१७३७
वसईच्या मोहिमे वेळी ७ एप्रिल १७३७ साली मराठ्यांचे सरदार शंकराजी केशव फडके हे चिमाजी अप्पांना लिहितात, "शहरात सिरते समयी आम्ही लोकास ताकीद केली की, रयेतीचे काडीस येकंदर हाथ न लावणे."
अशी असंख्य उदाहरण आपल्याला भेटतील की, कोणत्याही प्रकारे रयतेस तोशीस पोहचू नये, याची काळजी मराठ्यांचे राज्यकर्ते कसे घेत होते. हाच शिवछत्रपतींनी शिकवलेला 'महाराष्ट्रधर्म' होता !



७ एप्रिल इ.स.१८१७
त्रिंबकजी डेंगळेला इकडे पकडायला सैन्य पाठवावे तर भलतीकडेच त्रिंबकजीचे सैन्य छापा मारून जायचे. ह्यावर काय उपाय करावा हे इंग्रजांना अजिबात सुचत नव्हते. पण ते त्रिंबकजींना पकडायचे पूर्णपणे प्रयत्न करत आहेत असे रिपोर्ट्स मात्र ते वेळोवेळी कंपनीच्या डायरेक्टरांना कळवायचे. उदाहरणार्थ हा रिपोर्ट म्हणतो की त्रिंबकजी धारवाडकडे पळून गेलाय पण तरीही त्याच्या फौजा विजापूर - पंढरपूर भागात आहेत - त्याचबरोबर खान्देशात पण त्याच्या फौजा वाढतच चालल्या आहेत!





७ एप्रिल इ.स.१८१८
दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात ७ एप्रिलला देवगड विनासायास इंग्रजांच्या ताब्यात गेला. प्राचीन कालखंडापासून देवगड हे महत्वाचे बंदर म्हणून ओळखले जाते. किल्ल्याच्या बांधकामाच्या कालखंडाविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. छत्रपती शिवरायांनी गडाजवळच्या खाडीमध्ये तारवे बांधल्याचा पुरावा उपलब्ध आहे. किल्ल्यावरील तटबंदी आणि बुरुज आजही मजबूत अवस्थेत उभे आहेत. तटबंदीवरून आजूबाजूच्या समुद्राचे विहंगम दृश्य दिसते. किल्ल्यावर पुरातन वाड्यांचे अवशेष आणि सुस्थितीत असलेला दरवाजा तसेच पुरातन गणपती मंदिर आहे.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/



हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.
172 views02:33
ओपन / कमेंट