Get Mystery Box with random crypto!

" छञपती श्री शिवाजी महाराज "

टेलीग्राम चैनल का लोगो chatrapat — " छञपती श्री शिवाजी महाराज "
टेलीग्राम चैनल का लोगो chatrapat — " छञपती श्री शिवाजी महाराज "
चैनल का पता: @chatrapat
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 3.58K

Ratings & Reviews

4.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

2

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 144

2021-07-20 12:50:40
688 views09:50
ओपन / कमेंट
2021-07-20 12:50:29 १९६४ साली कसल्याश्या आजाराने त्रस्त हा क्रांतिवीर पाटण्याच्या सरकारी दवाखान्यात खितपत पडला होता,शेवटी त्यांचे आझाद नावाचे मित्र यांनी वर्तमानपत्रात लेख लिहून या उपेक्षेविरुद्ध आवाज उठावाला, तेव्हा कुठे सरकारला जाग आली,पण तोवर वेळ निघून गेली होती.त्यांना कर्करोग झाल्याचे निदान केले गेले, म्हणून दिल्लीच्या सफदरजंग इस्पितळात हलवण्यात आले, याही क्षणी “ज्या दिल्लीत मी बॉम्बस्फोट करून आवाज उठावाला त्या दिल्लीत पुन्हा स्ट्रेचर वरून असे आणले जावे” हि खंत त्यांनी बोलून दाखवली.
पण सरते शेवटी मृत्यूपश्चात आपले अंतिम संस्कार हे भगतसिंह, सुखदेव, राजगुरू या आपल्या मित्रांच्या शेजारी हुसैनीवाला येथेच करावेत हि इच्छा बटुकेश्वर दत्तांनी व्यक्त केली अन २० जुलै १९६५ साली त्यांनी आपले प्राण त्यागले.
ह्या महान क्रांतिकारकास विनम्र आदरांजली !!!!



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

facebook page
https://www.facebook.com/shivhindvi

Instagram
https://www.instagram.com/shivhindvi/

Whatsapp
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1



" हर हर महादेव जय श्रीराम "
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य"
709 views09:50
ओपन / कमेंट
2021-07-20 12:50:29 त्याचबरोबर निळकंठपंत महादजी उर्फ आबासाहेब पुरंदरे यांना मुतालकी आणि सखारामबापू बोकील यांना दिवाणगिरीची वस्त्रे देण्यात आली. यावेळेस माधवरावांचे वय अवघे सोळा वर्षांचे होते. हा सारा समारंभ होतानाच रघुनाथरावांच्या मनात मात्र तिरस्काराची एक झालर उठली होती.



२० जुलै इ.स.१८००
बाजीरावांना (दुसरे) पेशवेपद मिळाल्यापासून नाना फडणविसांच्या मृत्यूपर्यंत पेशवे घराण्यातही अनेक सुख-दुःखाच्या घटना घडल्या होत्या. दि. ५ डिसेंबर १७९६ या दिवशी बाजीरावांना पेशवेपद मिळाले. परंतु, यानंतर एक महिन्यातच, दि. ६ जानेवारी १७९७ रोजी बाजीरावांच्या द्वितीय पत्नी सरस्वतीबाई वारल्या. यानंतर दि. १६ फेब्रुवारी, माघ वद्य ६, शके १७१८ या दिवशी सेनापती हरिपंततात्या फडक्यांची नात, दाजीपंत फडक्यांच्या मुलीशी, राधाबाईंशी बाजीराव पेशव्यांचा विवाह झाला. या विवाहप्रसंगी फडक्यांनी आपली खास 'मोतीबाग' पेशव्यांना भेट म्हणून दिली. नाना फडणविसांना कैदेत टाकल्यानंतर बाजीरावांनी आपले ज्येष्ठ दत्तक बंधू अमृतराव यांना आपले कारभारी म्हणून नेमले. या कामाकरिताच त्यांच्या खासगत खर्चासाठी सहा महालही नेमून देण्यात आले. नानांच्या मृत्यूनंतर, दि. २३ एप्रिल १८०० या दिवशी बाजीरावांनी अमृतरावांना आपले 'दिवाण' म्हणून नेमले. परंतु, अमृतरावांना बाजीरावांचा एकहाती अन् विक्षिप्तपणाचा कारभार आवडत नसे. यामुळेच, एके दिवशी २० जुलै १८०० रोजी अमृतराव कारभार सोडून पुण्यातून जुन्नरला निघून गेले.



२० जुलै इ.स.१८१५
गायकवाड यांचे वकिल गंगाधरशास्त्री पटवर्धन यांचा खुन झाला. बडोद्यावरून इंग्रजांना अनुकूल असलेले गायकवाड यांचे वकिल गंगाधरशास्त्री पटवर्धन हे पेशव्यांशी बोलणी करण्याकरिता पंढरपूर येथे गेले असता त्यांचा खुन झाला. त्याचा आळ मात्र भामट्या इंग्रजांनी त्रिंबकजी डेंगळे यांच्यावर घातला. आणि त्यांस आपल्या ताब्यात देण्याबद्दल दुसरे बाजीराव यांच्याकडे निकड लावली. तेव्हा बाजीरावांनी त्यांस पकडून इंग्रजांच्या स्वाधीन केले. सुमारे १ वर्षानंतर ते इंग्रजांच्या तुरूंगातून निसटले आणि थोडे दिवस स्वस्थ राहून नंतर मात्र त्यांनी आपल्या हालचाली सुरू केल्या.



२० जुलै इ.स.१९४२
बाबासाहेबांना मजूर मंत्री करण्यात आले
१९३८ साली काँग्रेसने आद्योगिक कलहाचे विधायक मुंबई विधिमंडळात विचारासाठी मांडले. कामगारांच्या हक्कावर गदा येणारे विधायक मांडण्यात येणार होते. या विधायकात कामगारांचा संप बेकायदेशीर ठरविण्याच्या तरतुदी बरोबरच मालकांनी जर टाळेबंदी जाहीर केली आणि कारखाना बंद झाला तर मालकांवर काहीही कारवाई करता येणार नव्हती. हा कायदा कामगारांच्या हक्काच्या विरोधात असल्यामुळे बाबासाहेबांनी या कायद्यांवर कडाडून हल्ला चढविला. "हा कायदा काळा आहे" असे म्हणत बाबासाहेबांनी आणि जमनादास मेहता यांनी या कायद्याला विरोध केला. मात्र विधिमंडळात बहुमताच्या जोरावर हा कायदा संमत झाला. बाबासाहेबांच्या स्वतंत्र मजूर पक्षाने आणि गिरणी कामगार यांनी संयुक्तरित्या संपाचे हत्यार उपसले. संपूर्ण मुंबई प्रांत या संपात सहभागी झाला. या संपाचे पडसाद भारतभर उमटले व हा कायदा रदबद्दल करण्यात आला. या यशामुळे बाबासाहेबांवर सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आले. पुढे २० जुलै १९४२ साली बाबासाहेबांना मजूर मंत्री करण्यात आले. सर्व कामगार वर्गात आनंदाचे वातावरण पसरले होते. मजूर मंत्री झाल्यानंतर बाबासाहेबांनी एक खूप महत्त्वाचा निर्णय घेतला जो अतिशय दूरगामी ठरला. या निर्णयानुसार जे अनुभवी मात्र अर्धशिक्षित तंत्रज्ञ तयार होत होते त्यांना नोकरीसाठी भटकंती करावी लागू नये म्हणून बाबासाहेबांनी Employment Exchange स्थापन केले. त्यामुळे अनेक तरुण तरुणींना नोकरीसाठी अनेक ठिकाणांवरून बोलावणे येऊ लागले. त्यांच्या नोकरीचा प्रश्न सुकर झाला. मंत्रिपदाच्या काळात बाबासाहेबांनी काही क्रांतिकारक निर्णय घेतले ज्याच्या फायदा समाजातील सर्व जाती धर्माच्या लोकांना झाला.



२० जुलै इ.स.१९६५
क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त ह्यांचा आज स्मृतिदिन !
बटुकेश्वर दत्त यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९१० मध्ये बंगाल मधील ओरी गावात झाला होता. कानपूरच्या पी.पी.एन. महाविद्यालयात शिकत असताना त्यांची ओळख भगतसिंहांशी झाली व त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन ते ‘हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन‘ या क्रांतिकारी संघटनेत कार्य करू लागले.याच दरम्यान त्यांनी बॉम्ब बनवण्याचे तंत्र शिकून घेतले व त्यांच्या पुढाकाराने आग्रा येथे एक गुप्त बॉम्ब बनवण्याचा कारखाना चालू केला होता.
509 views09:50
ओपन / कमेंट
2021-07-20 12:50:29 आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष

२० जुलै इ.स. १६७२
(श्रावण शुद्ध षष्ठी, शके १५९४, संवत्सर परिघावी, वार शनिवार)

मोरोपंतांनी श्री क्षेत्र नाशिक स्वराज्यात दाखल केले. मोरोपंतांनी श्री क्षेत्र नाशिक आपल्या अतुलनीय पराक्रमाने स्वराज्यात आणले.


https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

२० जुलै इ.स.१६८०
छत्रपती संभाजी महाराज यांचे मंचकारोहण ( ता.20 जुलै 1680 )
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे क्रियाकर्म साबाजी भोसले यांचे कडून करून घेण्यात आले होते .ही गोष्ट संभाजीराजांचे पासून लपून राहणे शक्य नव्हते. संभाजी राजांनी पन्हाळ्याचा बंदोबस्त करून रायगडाकडे कूच केले. सोयराबाई राणीसरकार अष्टप्रधान यांनी राजकारण करून संभाजी राजांना राज्य देण्याचे नाकारले होते. आपण स्वतः ज्येष्ठ पुत्र जिवंत असताना साबाजी भोसले यांचे कडून क्रियाकर्म केले याचे अतीव दुःख संभाजीराजांच्या मनात होते. राजाराम महाराजांना गादीवर बसवून राज्यकारभार हाती घेण्याचा प्रयत्न केला असला तरी सर्व सैन्य आणि प्रजा संभाजी राजांच्या बाजुने असल्यामुळे ,स्वराज्यावरील आपला हक्क मिळवण्यासाठी संभाजी राजांनी हालचाली सुरू केल्या. मोरोपंत आणि अण्णाजी दत्तो संभाजीराजांना पकडण्यासाठी निघाले असताना सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना पत्र लिहून आपल्या पक्षात सामील होण्यास संभाजी राजे यांनी सांगितले .राज्यावर माझा अधिकार असून राजारामा सारख्या दुबळ्या व लहान मुलाला गादीवर बसवले तर शत्रुपक्षाला महाराष्ट्र सहज जिंकून घेता येईल असे त्यांनी पत्रात लिहिले होते .
१९ एप्रिल इ.स.१६८० च्या सुमारास संभाजीराजे पन्हाळ्याला असताना असंख्य सैन्य त्यांना जाऊन मिळत होते. संभाजी राजांनी आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी योग्य ती पावले टाकण्यास सुरुवात केली होती. सरसेनापती हंबीरराव मोहिते हे सोयराबाईं राणीसाहेब यांचे बंधू होते, तरीही त्यांचे सहकार्य छत्रपती संभाजी राजांना होते .हे स्वराज्यासाठी पर्यायाने संभाजीराजांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण होते.
संपूर्ण कटाचा पूर्णपणे बंदोबस्त केल्यानंतर संभाजी राजांचे राजपद निर्वेध झाले.कटकारस्थानात सहभागी झालेल्या अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पिंगळे या प्रमुख मंत्र्यांना संभाजी राजांनी कैदेत टाकले, तर राजाराम महाराजांनाही नजरकैदेत ठेवले गेले. राजाराम महाराजांना नजरकैदेत ठेवले याचा हेतू पुन्हा त्यांना हाताशी धरून मंत्र्यांनी कारस्थाने करू नये हाच होता. अशा परिस्थितीत कोणताही शासनकर्ता जे करील तेच संभाजी राजांनी केले. संभाजीराजे रायगडावर येऊन आठ दिवस झाले नाहीत तोच दिनांक २७ मे इ.स.१६८० या दिवशी त्यांच्या सावत्र आई पुतळाबाई राणी साहेब सती गेल्या.
रायगडावरील परिस्थिती आटोक्यात आल्यावर आणि राज्यात स्थिरता प्राप्त झाल्यावर संभाजी राजांनी स्वतःला राजा झाल्याचे जाहीर केले. संभाजी राजांना सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्याप्रमाणेच महाराणी येसूबाई यांचे पिता पिलाजी राजेशिर्के यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे साथ दिली.पिलाजी राजेशिर्के त्यांनी 10 हजार मावळ्यांनिशी संभाजीराजे रायगडावर जाण्याआधीच रायगडाचा बंदोबस्त केला होता.सर्व चौक्या-पहारे उठवून त्यांच्या लोकांच्या मदतीने सर्व ठिकाणांची व्यवस्था केली.संभाजी राजांच्या सुरुवातीच्या काळात पिलाजी राजेशिर्के हयात असेपर्यंत राजेशिर्के घराणे संभाजी राजांच्या भक्कमपणे पाठीशी ऊभे होते. स्वराज्य प्राप्तीसाठी संभाजी महाराजांना पिलाजीराजे शिर्के यांनी पुरेपूर साथ दिली.
कटाचा पूर्णपणे बंदोबस्त केल्यानंतर २० जुलै इ.स.१६८० ला संभाजीराजांचा मंचकारोहन विधी पार पडला.



२० जुलै इ.स.१६८५
औरंगजेब बादशहाने शहजादा अकबराचा उत्तरेकडील मार्ग रोखून धरण्याचा हुकुम कारतलबखानाला दिला. शहजादा अकबराची चहुंकडून नाकेबंदी करण्याचे हुकुम औरंगजेब बादशहाने दिले होते. आजच्या दिवशी कारतलबखानाला शहजादा अकबराचा उत्तरेकडील मार्ग रोखून धरण्याचा हुकुम दिला होता.



२० जुलै सन १७६१
(आषाढ वद्य तृतीया शके १६८३, वृषनाम संवत्सरी, सोमवार)

वयस्कर मुत्सद्दी असे म्हणावे तर महादजीपंतनाना पुरंदरे होते. त्यांच्या सल्ल्यानुसार नानासाहेब पेशव्यांचे दिवस वगैरे आटोपून ते माधवराव, रघुनाथराव, आपले पुत्र निळकंठराव पुरंदरे, नाना फडणवीस, सखाराम बापू बोकील वगैरे प्रभृतींसह साताऱ्यात आले. यावेळेपर्यंत राघोबादादांना 'आता आपल्यालाच पेशवाई मिळणार' असे वाटत होते. परंतु नानासाहेबांचे दोन पुत्र हयात असता त्यांच्यातील थोरल्या पुत्रासच पेशवाई मिळावी या हेतूने महादजीपंतांनी सातारकर राजाराम महाराजांकडून आषाढ वद्य तृतीया शके १६८३, वृषनाम संवत्सरी, सोमवारी म्हणजेच दि. २० जुलै सन १७६१ रोजी माधवरावांना पेशवाईची वस्त्रे देववली.
481 views09:50
ओपन / कमेंट
2021-07-19 07:40:19
656 views04:40
ओपन / कमेंट
2021-07-19 07:40:15 लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

facebook page
https://www.facebook.com/shivhindvi

Instagram
https://www.instagram.com/shivhindvi/

Whatsapp
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1



" हर हर महादेव जय श्रीराम "
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य"
641 views04:40
ओपन / कमेंट
2021-07-19 07:40:15 १९ जुलै इ.स.१७४५
शिंदे घराण्यांचे संस्थापक राणोजी शिंदेची पुण्यतिथी
मराठ्याच्या इतिहासात शिंदे घराणे पराक्रमी व एकनिष्ठ म्हणून प्रसिद्ध होते. साता-याजवळ २० कि.मी. अंतरावरचे कोरेगाव तालुक्यातील कण्हेर - खेड हे शिंदे पाटलांचे मूळ गाव होय. याच घराण्यातील राणोजी शिंदे हे पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांच्या पदरी नोकरी करीत होते. मात्र राणोजीचा उत्कर्ष हा थोरले बाजीराव पेशव्यांच्या काळात झाला. जुने जाणते लोक आपल्या गणितात बसणार नाही. त्यामुळे आपल्या बरोबर तरुण कर्तबगार शूर लोकांचा भरणा असावा. हा बाजीरावांचा विचार होता. त्यामुळे अगदी सामान्य कुटुंबातील शिंदे व होळकर यांना बाजीरावांनी आपल्या बरोबर घेतले. बाजीरावांची निवड सार्थ ठरवून शिंदे व होळकरांनी उत्तरेत अनेक पराक्रम गाजवले. त्यांतील शिंदे घराण्यातील राणोजींनी आपल्या पराक्रमाने उत्तरेतील माळव्याची सुभेदारी मिळवली. बाजीरावांशी राणोजी नेहमी एकनिष्ठ व प्रामाणिक राहिले. त्यांनी मध्यप्रदेशातील उज्जनी येथे आपले बस्तान बसवले. पुढे शिंदेनी ग्वाल्हेर हे आपले वास्तव्य स्थान मिळवले. थोरले बाजीरावाच्या कर्नाटक मोहिमेपासून राणोजी सदैव बरोबर असत. थोरल्या बाजीरावांनी १७३७ मध्ये निजामाचा भोपाळ येथे दारुण पराभव केला. त्या युद्धात राणोजी शिंदे यांनी अतुल पराक्रम गाजवला. माळव्यांची मोहिम तसेच राजपुतांनात चौथाई - सरदेशमुखी वसूल करण्याचे काम राणोजींनी मल्हारराव होळकरांबरोबर धडाडीने केले. १७३५ मुघल बादशहा महमंद रंगीला याने खानदुरान आणि वजीर कमरुद्दीन यांच्या नेतृत्वाखाली दोन लाख सैन्यानिशी दोन मोहिमा मराठ्यांविरुध्द पाठविल्या. त्याप्रसंगी मुघलांची रसद तोडण्याचे महत्त्वाचे काम राणोजींनी केले. त्यामुळे मुघलांच्या दोन्ही मोहिमा अयशस्वी ठरल्या . थोरले बाजीरावांच्या उत्तरेच्या राजकारणात राणोजी शिंदे यांनी नेहामी सहकार्य केले. एवढेच नव्हे चिमाजी आप्पा यांच्या वसईच्या मोहिमेत सुध्दा राणोंजी शिंदेनी पराक्रम गाजवला होता. २८ एप्रिल १७४० मध्ये थोरले बाजीरावांचे मध्यप्रदेशातील रावरखेडी येथे निधन झाले. त्यावेळी राणोजी शिंदे यांनी थोरले बाजीरावांची समाधी बांधण्याचे काम पेशवे नानासाहेब पेशव्यांच्या इच्छेनूसार हाती घेतले. रावरखेडी येथील बाजीरावांची खणखणीत समाधी राणोंजीनी आपलेपणाने केली. आज त्या समाधीनी अवस्था बिकट झाली आहे. त्यांची दुरुस्थी झाली पाहिजेत . मात्र त्यात पक्ष कोणताही असो त्यांची राजकीय इच्छा शक्ती कमी पडते. राणोंजी शिंदे यांनी अगदी कण्हेर खेडच्या पाटीलकीपासून उज्जनी व माळव्याचे अधिकारापर्यत आपला उत्कर्ष पराक्रम व प्रामाणिकपणामुळे केला. राणोजी हे शूर शिंदे घराण्यांचे संस्थापक होते. त्यांना जयप्पा, दत्ताजी, ज्योतिबा, तुकोजी व महादजी असे शूर पुत्र होते. त्यांनी आपल्या शौर्याने मराठ्यांच्या इतिहासात आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरले. अशा या पराक्रमी राणोजींचे निधन १९ जुलै १७४५ मध्ये झाले.



१९ जुलै इ.स.१८१२
एलफिन्स्टनच्या अहवालाला कंपनी सरकारने हिरवा कंदिल दाखवला. मुळातच हा अहवाल पेशवे आणि सरदार यांच्यात मैत्रीचे संबंध प्रस्थापित करणारा नसून जास्तच फूट पाडणारा होता हे मात्र त्यावेळेस कोणाच्याही लक्षात आले नाही. यातही एलफिन्स्टनने एक धूर्तपणा असा केला की, जर हा करार सरदारांनी अमान्य केला तर पेशव्यांच्या मदतीने त्यांच्यावर कारवाई होणार होती. परंतु, 'पेशव्यांच्या मागण्या' सरदारांनी अमान्य केल्या आणि पेशव्यांनी कारवाई केली तर मात्र इंग्रज त्यांना अजिबात मदत करणार नव्हते. जुलै १८१२ मध्ये बाजीराव पेशवे 'आषाढीच्या वारी' निमित्त पंढरपूरला गेले. त्यांच्या पाठोपाठ माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टन पेशव्यांचे कारभारी सदाशिव माणकेश्वर आणि इतर प्रमुख सरदारांसह पंढरपुरात दाखल झाला. दि. १९ जुलै १८१२ या दिवशी उभय पक्षांनी एलफिन्स्टनच्या या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. हाच तो प्रसिद्ध 'पंढरपूरचा करार'. पंढरपूरच्या करारानंतर लगेचच बेळगाव प्रांतातील चिकोडी निपाणीच्या प्रदेशावरून कोल्हापूरकर आणि पेशव्यांमध्ये वाद सुरू झाला. सरदार पटवर्धन आणि बाजीरावांचे
कारभारी सदाशिवभाऊ माणकेश्वर हे आतून कोल्हापूरकरांना सामील होते. अखेरीस कोल्हापूरकरांनी निपाणी जिंकले आणि भाऊंच्या या फितुरीचा बाजीरावांना पत्ता लागला. बाजीरावांनी त्यांना तात्काळ कारभारी पदावरून दूर केले आणि त्यांच्या जागी एक जबरदस्त महत्त्वाकांक्षी असा माणूस कारभारी म्हणून नेमला- त्रिंबकजी डेंगळे पाटील!!



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

530 views04:40
ओपन / कमेंट
2021-07-19 07:40:14 आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

१९ जुलै इ.स‌.१६४७
महादभट मुद्गल पुरंदरे यांनी शिवाजीमहाराजांकडे येऊन सांगितले की, मला पर्वती, पिंपळे सौदागर आणि पिंपरी या प्रत्येक गावात एक एक चावर जमीन याप्रमाणे तीन चावर जमीन आणि पुणे परगण्याच्या जकातखात्यातून दिवाबत्तीकरिता रोज तीन रुके असे इनाम आहे. हे इनाम निजामशाही फर्माने, मलिकअंबराचे खुर्द्खत, वाजीरांनी दिलेली भोगवट्याची पत्रे आणि शहाजीराजांनी दिलेले खुर्दखत यांच्याप्रमाणे शुहूर सन १०४७ पर्यंत चालले आहे. यावर्षी सुभेदार दादाजी कोंडदेव यांना देवाज्ञा झाली म्हणून महालीचे कारकून नवीन खुर्दखत आणा असा आक्षेप घेतात. तरी कृपा करून हे इनाम चालू ठेवण्याची आज्ञा व्हावी.
हि सर्व विनंती शिवाजीमहाराजांना या पत्रात उद्धृत केली आहे आणि गतवर्षीपर्यंत ज्याप्रमाणे हे इनाम चालत आले आहे, त्याप्रमाणे पुढे हि चालू ठेवावे असा हुकुम केला आहे.


https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

१९ जुलै इ.स.१६५९
(श्रावण शुद्ध दशमी, शके १५८१, संवत्सर विकारी, वार मंगळवार)

महाराजांचे राजकारण!
औरंगजेबाने शिवरायांना पाठवलेले पत्र व पोशाख शिवरायांना प्राप्त झाला. विजापुरात मोहीमेच्या तयारीची लगबग सुरु झाली होती, अगणित संप्पत्ती अंदाजे चाळीस हजारांवर फौजफाटा अशा तयारीनिशी खान आपला मुलगा फाजलखानासह निघाला. "तेजस्वी ओजस्वी प्रखर सुर्याचं "शिवाजी महाराजांच" अस्तित्व मिटवायला". स्वराज्याच्या गुप्तहेरांनी विजापुरची खडानखडा माहिती महाराजांपर्यत पोहचवण्याची कामगिरी चोख पार पाडली होती.



१९ जूलै इ.स.१६५९
गोव्याच्या किल्ल्यातील दालनात वाचले गेलेले शिवाजी महाराजांचे पत्र-
शिवाजीराजांचे दंडयाच्या सिद्दी व त्या बंदरातील हबशी (सिद्दीची प्रजा) यांच्याशी वितुष्ट आहे. शिवाजीराजांनी आपल्या सरहद्दीवर (सिद्दी विरुद्ध) काही घोडेस्वार व प्यादे पाठवले होते. तेव्हा चौल व वसई येथील कॅप्टन सिद्दीला रसद पुरवीत होते आणि सर्व प्रकारची मदत करीत होत.
ह्या (गोवा पोर्तुगीज) राज्यासी असलेल्या शिवाजीराजांच्या मैत्रीला हि गोष्ट अत्यंत बाधक आहे.
चर्च नंतर सल्लागार मंडळातील सभासदांनी एकमताने निर्णय घेतला की, त्यांनी (चौल व वसई येथील कॅप्टन) दंडयाच्या हबस्याला मदत करू नये, परंतु गुप्त पणे व कोणालाही समजणार नाही आणि शिवाजीराजांना सुगावा लागणार नाही अश्या प्रकारे मदत केल्यास हरकत नाही, असे पत्र लिहावे.



१९ जुलै इ.स.१६९४
परंड्याचा किल्ला म्हणजे दारूगोळ्याचे भांडार
प्राचीन काळापासून परंडा किल्ला परगणा म्हणजे जिल्ह्याचे ठिकाण असून बहामनी काळात ख्वाजा जहान तर आदिलशाहीत गालीब खान हे किल्लेदार राहिले आहेत. पुढे १६५७ साली मोगलांनी परंडा जिंकून घेतल्यानंतर मीर महंमदखान आणि इज्जतखान हे किल्लेदार होते. पैकी १९ जुलै १६९४ च्या एका पत्रानुसार किल्लेदार इज्जतखानाने किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ इज्जतपुरा नावाने नवीच वस्ती वसविली होती. त्याच्याच काळात परंडा किल्ल्यात रोगाची साथ पसरल्याची नोंद आहे. मध्ययुगीन कालखंडात परंड्याप्रमाणे नळदुर्ग हा जिल्हा असला तरी नळदुर्गमधील किल्ल्यातल्या एका बुरुजाला परंडा बुरूज हे नाव आहे. परंड्याच्या किल्ल्यात भरपूर युद्धसामग्री साठवून ठेवलेली होती.



१९ जुलै इ.स.१७३९
वसईच्या पाडावानंतर पोर्तुगीज सैन्याला आणि त्यांच्या बायकामुलाना मराठ्यानी गोव्यास जाऊ दिले. परंतु गोव्यातील मराठा सैन्य अजून तिकडे रेंगाळत मागे राहिले होते. ते १७३९ सालच्या मे अखेर माघारा परतू लागले. व्यंकटराव घोरपडे यानी साष्टी प्रांतातून सैन्य २१ मेस काढून घेतले. तत्पूर्वी रायतूरचा वेढा त्यानी १२ मेस उठविला होता. साष्टी प्रांतातील मराठा सैन्य माघारा परतले, तरी व्यंकटराव घोरपडे त्या सैन्याबरोबर गेले नाहीत. ते सांगे येथे जाऊन राहिले. दाजीराव भावे नरगुंदकर कुकळ्ळीला ठाण मांडून राहिले होते. पोर्तुगीजांकडून ते आणखी काही उपटण्याची अपेक्षा करीत होते. ती रक्कम मिळाल्याखेरीज ते मडगावहून सैन्य हलविणार नाहीत ह्याची जाणीव होताच पोर्तुगीजानी त्यांच्या हातावर देऊ केलेली रक्कम ठेवून त्याना मडगावचा कोट खाली करावयास लावला. दि. १९ जुलै १७३९ या दिवशी पोर्तुगीजानी मडगावच्या कोटाचा ताबा घेतला. परंतु त्यानी तो लगेच पाडून जमीनदोस्त करून टाकला. कुकल्ली गाव, तेथील कोट आणि असोळणे गाव श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्याच्या आज्ञेवरून पुढे आणखी काही दिवस मराठ्यांच्या ताब्यात होते. बाजीराव आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये तहाच्या वाटाघाटी चालू असता इ. स. १७४० च्या मार्च महिन्यात फोंड्याच्या मराठा सुभेदाराने साष्टी प्रांताच्या महसुलापैकी चाळीस टक्के महसूल वसूल करण्यासाठी पाचशे घोडेस्वार आणि सहाशे पायदळ पाठवून तिकडे लुटालूट केली.

507 views04:40
ओपन / कमेंट
2021-07-18 12:58:25
562 views09:58
ओपन / कमेंट