Get Mystery Box with random crypto!

" छञपती श्री शिवाजी महाराज "

टेलीग्राम चैनल का लोगो chatrapat — " छञपती श्री शिवाजी महाराज "
टेलीग्राम चैनल का लोगो chatrapat — " छञपती श्री शिवाजी महाराज "
चैनल का पता: @chatrapat
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 3.58K

Ratings & Reviews

4.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

2

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 138

2021-08-15 08:31:48 Instagram
https://www.instagram.com/shivhindvi/

Whatsapp
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1



" हर हर महादेव जय श्रीराम "
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य"
87 views05:31
ओपन / कमेंट
2021-08-15 08:31:48 आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

१५ ऑगस्ट इ.स.१६५६
छत्रपती शिवाजीराजांचा गायकवाड घराण्यातील कन्येशी विवाह ठरला ! छत्रपती शिवाजीराजांची ही सहावी सोयरीक. या धर्मपत्नीचे नाव होते सकवारबाई. हा विवाह प्रत्यक्षात १० जानेवारी १६५७ रोजी झाला.
छत्रपती शिवाजीराजांना सकवारबाईंपासुन कमलाबाई नावाची एक मुलगी होती. महाराजांना त्यांच्या थोरल्या पत्नी सईबाईंपासुन एक मुलगी होती तिलाही सकवारबाई किंवा सखूबाई असे म्हणत.गायकवाड घराण्यातील सकवारबाई या शिवाजीराजे व त्यांच्या इतर सात राण्यांच्या निधनानंतरही हयात होत्या. नोव्हेंबर १६८९ मधे मुघलांनी रायगड जिंकल्यानंतर राजपरिवारातील जी लोक कैद झाली त्यात सकवारबाईही होत्या. त्या पुढे तब्बल ३० वर्षे मुघलांच्या कैदेत होत्या.१७१९ मधे मराठ्यांनी जी दिल्लीवर स्वारी केली त्यादरम्यान सकवारबाईंची सुटका झाली.


https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

१५ ऑगस्ट इ.स.१६६०
दख्खनच्या सुभेदारीवर आलेल्या शाहीस्तेखानने आल्या आल्या चाकणच्या भुईकोट किल्ल्याला वेढा दिला होता. खानाच्या प्रचंड सैन्यबळामुळे किल्ल्याला कोणतीही रसद पुरवता येणे शक्य नव्हते.तरीही अवघ्या ५०० सैन्यानिशी किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांनी किल्ला महिना उलटून गेला तरी लढत ठेवला होता. हतबल झालेल्या खानाने १४ ऑगस्टला ईशान्येकडील बाजूने एक भुयार खणून त्यात दारूगोळा भरून त्याला बत्ती दिली,त्यासरशी प्रचंड स्फोट होऊन बुरुज उडाला, बुरुजावरील मराठे मारले गेले,पडलेल्या भगदाडातून आत शिरू पाहणाऱ्या २० हजार पेक्षा जास्त मोगली सैन्याला अवघ्या ५०० मावळ्यांनी १२ तासापेक्षा जास्त वेळ थोपवून धरले.दुसरा दिवस उजाडला,मुघलांनी निर्वाणीचा हल्ला केला,कडवा प्रतिकार करूनही बरेच मराठे सैनिक मारले गेले.तरीही त्यांनी २६८ मुघल सैन्य ठार केले तर ६०० च्या वर जखमी केले होते.अखेर ५५ दिवसांनी फिरंगोजीनी नुकसान टाळण्यासाठी भावसिंहाच्या मध्यस्तीने किल्ला खानाच्या हवाली केला.खानाने किल्ला ताब्यात घेऊन उझबेगखानाला किल्ल्याची जबाबदारी दिली.चाकणचा संग्रामदुर्ग मुघलांच्या हाती गेला ती तारीख होती १५ ऑगस्ट इस.१६६०



१५ ऑगस्ट इ.स.१६६६
आग्रा कैदेत छत्रपती शिवाजी महाराजांना बादशहाच्या अंतस्थ गोटातून बातमी समजली की त्यांना विठ्ठलदासच्या हवेलीत नेऊन मारण्यात येणार आहे.बातमी समजताच महाराज कैदेतून निसटण्याची योजना तयार करू लागले.श्रावण जन्माष्टमी ची रात्र संपून वद्य नवमी उजाडली.महाराजांनी आपल्या योजनेप्रमाणे बादशहाची परवानगी घेऊन मिठाईचे पेटारे शहरातल्या प्रतिष्ठित लोक आणि दरबारातील वजिराकडे पाठवणे सुरू केले.सुरुवातीला पहारेकऱ्यांनी चौकशी केली पण नंतर ती गोष्ट त्यांच्या अंगवळणी पडली.या दरम्यानच महाराजांनी आपल्याजवळील किमती जडजवाहीर,मोती,सोन्याच्या मोहरा,होन या वस्तू मुलचंद सावकारामार्फत राजगडाकडे पाठवून दिले. आग्रा शहरात या घडामोडी घडत होत्या ती तारीख होती श्रावण वद्य नवमी म्हणजे बुधवार १५ ऑगस्ट १६६६



१५ आॅगस्ट इ.स.१९४७
#भारतीय_स्वातंत्र्य_दिन
१५१ वर्षे गुलामगिरीच्या पारतंत्र्यात खितपत पडलेला भारत देश असंख्य क्रांतीकारकांच्या बलिदानामुळे आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानामुळे स्वतंत्र झाला.



१५ ऑगस्ट इ.स.१७९७
तुकोजीराव होळकरांचे निधन
मल्हाररावांनी खंडेरावांचा मुलगा मालेराव यांस इंदूरच्या गादीवर बसविले. मालेराव राज्यप्राप्तीनंतर दहा महिन्यांत २७ मार्च इस १७६७ रोजी मरण पावल्याने राज्यकारभाराची सर्व जबाबदारी त्यांची आई अहिल्याबाई (कार. १७६७–९५) यांच्यावर पडली. त्यांनी स्वामिनिष्ठा, कर्तव्यतत्परता, धर्मशीलता इत्यादी गुणांच्या साह्याने संस्थानचे रक्षण करून मल्हाररावाचा मानसपुत्र तुकोजीराव यांस सेनापतिपद दिले. त्यांच्या कारकिर्दीत संस्थानची सर्वांगीण प्रगती झाली. तुकोजीरावांनी पेशव्यांना १७६९ च्या जाट व रोहिल्यांविरुद्ध, १७७८-७९ च्या इंग्रजांविरुद्ध, १७८६ च्या टिपूविरुद्ध, १७९५ च्या निजामाविरुद्ध, या मोहिमांत नुसती मदतच केली असे नाही, तर काही वेळा सेनानायक हे पदसुद्धा भूषविले. पेशवाईच्या उत्तरार्धात तर त्यांनी बारभाईंच्या कारस्थानात प्रत्यक्ष भाग घेऊन मराठी साम्राज्याची घडी पूर्ववत बसविण्याचे प्रयत्न केले. पुण्याजवळील वानवडी येथे १५ ऑगस्ट १७९७ रोजी ते मरण पावले.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

facebook page
https://www.facebook.com/shivhindvi
91 views05:31
ओपन / कमेंट
2021-08-14 10:55:26
256 views07:55
ओपन / कमेंट
2021-08-14 10:55:21 १४ ऑगस्ट इ.स.१६६६
शिवाजीराजांची 'मिठाई'
तिथीने त्या दिवशी श्रावण वद्य नवमी होती. श्रीकृष्णजन्मोत्सव चालुच होता. त्यानिमित्ताने शिवाजीराजांनी ते जिथे कैद होते तिथुनच मिठाईचे पेटारे पाठवण्यास सुरुवात केली. आग्र्यामधील प्रतिष्ठित लोकांना ही मिठाई जाऊ लागली. एवढेच काय तर बादशाही वजीरांनाही ही मिठाई जाऊ लागली. मात्र त्याआधी अर्थातच बादशहा औरंगजेबाची परवानगी मिळवावी लागली. बादशहाने पहार्यावरच्या दरोग्याला विचारले 'सीवा मिठाई कशाबद्दल वाटणार आहे?' त्यावर उत्तर मिळाले की,'सीवाचे पुर्वीपासुनच व्रत चालु आहे. अटकेत असला तरी तो ते व्रत पाळतो. बादशहांनी परवानगी दिली तर ठीक नाहीतर तो ते व्रत नाही पाळणार'

औरंगजेबाला काय वाटले कोण जाणे पण, त्याने ही परवानगी लगेच दिली. 'शुभश्च: शिघ्रम' लगेच पेटारे बाहेर जायला सुरूवात झाली. एक माणुस आत सहज बसु शकेल इतके ते पेटारे मोठे होते आणि ते उचलायला दोन माणसे असायची. पहिल्या दिवशी पेटारे बाहेर जाताना पहार्यावरच्या लोकांनी एक दोन पेटारे उघडुन पाहिले. त्यात खरच मिठाई होती म्हणून ते पुढे जाऊ दिले. १७ तारखेपर्यंत असे किती वेळा मिठाईचे पेटारे तिथुन बाहेर गेले हे नेमक समजत नाही पण, पहारेकरी फक्त पहिले एक दोनच पेटारे उघडून पहायचे. थोडक्यात पेटार्यांकडे मुघलांचे काहीसे दुर्लक्ष झाले होते. शिवाजीराजांचे मात्र या पेटार्यांकडे बारीक 'लक्ष' होते. ९ वर्षांचे संभाजीराजे रामसिंगसोबत रोज दरबारात जातच होते.
ही खाल्लेली मिठाई मुघलांना आत्ता जरी गोड लागत असली तरी, लवकरच ती त्यांना 'बाधणार' होती. काहींना तर ती न खाताच बाधणार होती.
याच सुमारास महाराजांनी त्यांच्याजवळ असलेले जडजवाहीर व मौल्यवान वस्तू आग्र्यामधीलच मूलचंद सावकाराच्या लोकांसोबत इकडे राजगडावर रवाना केले. त्याकाळी असे व्यवहार देशभर होयचे. तसेच, शिवाजीराजांनी कवींन्द्र परमानंद यांच्याबरोबर काही हत्ती, घोडे, पालख्या पाठवुन दिल्या. याच परमानंदांनी पुढे 'शिवभारत' हा ग्रंथ लिहिला ज्याच्यातुन आपल्याला शिवचरित्राची महत्वाची माहिती मिळते.
औरंगजेब हे सगळ होऊ देत होता कारण जितके महाराज व संभाजी एकटे पडतील तितके त्याच काम सोप होणार होत.
महाराजांची आता तयारी चालु झाली होती. 'मुहुर्तघटिका' जवळ आली होती. आता फक्त नियोजन कस करणार यावरच, शिवाजीराजे, संभााजीराजे व स्वराज्याचे भवितव्य अवलंबून होत.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

facebook page
https://www.facebook.com/shivhindvi

Instagram
https://www.instagram.com/shivhindvi/

Whatsapp
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1



" हर हर महादेव जय श्रीराम "
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य"
264 views07:55
ओपन / कमेंट
2021-08-14 10:55:21 आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष

१४ ऑगस्ट इ.स.१६४९
पुरंदरावर शिवरायांनी फत्तेखानाचा पराभव केला यावेळी आपल्या मुत्सद्दीने मोघल बादशाह शाहजहाँन यास दख्खनच्या सुभेदार, शहजादा मुरादबक्ष यांनी पत्र पाठवून शहाजीराजें सहित मोघलांच्या चाकरीत जायची इच्छा प्रकट केली....

शाहजहाँनने आदिलशहावर दबाव आणल्यामुळे शहाजीराजेंची सुटका झाली या बदल्यात शिवरायांनी सिंहगड किल्ला आदिलशहाला दिला....


https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

१४ आॅगस्ट इ.स.१६५७
"किल्ले जंजिरा" वर मराठ्यांचा पहिला हल्ला, पण हा प्रयत्न अयशस्वी झाला. या मोहीमेत "शामराव रांझेकर" आणि "बाजी घोलप" या मराठा सरदारांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण जंजिरा हाती लागला नाही.



१४ ऑगस्ट इ.स.१६६०
शास्ताखानाने किल्ले चाकणवर सुरुंगामार्फत हल्ला केला, किल्ल्याचा बुरुज ढासळला व लढाईस तोंड फुटले.

राजं तीकडं पन्हाळ्यावर अडकून पडल्याती, इकडे या खानाने रयतेत डुकरावाणी हैदोस घातलायती त्यामुळे रसद मिळत न्हाय किल्लेदार. बातमी घेऊन आलेल्या नाईकांच्या माणसाने फिरांगोजीना बातमी दिली. स्वराज्य दुहेरी संकटात सापडले होते विजापुरी सरदार सिद्दी जौहर. पन्हाळ्याला वेडा देऊन बसला होता, आणि औरंगजेबाचा मामा शास्ताखानाने चाकणच्या संग्रामदुर्गाला वेटोळे मारले होते. पुण्यापासून चाकण पावेतो सर्व भाग शास्ताखानाने व्यापला होता. त्यामुळे चाकण किल्ल्याला (किल्लेदार-फिरांगोजींना). मदत मिळत नव्हती. राजगडावर जिजाऊ साहेब चिंतेत होत्या. शास्ताखानास संग्रामदुर्गाला वेढा देऊन ५०चे वर दिवस झाले होते. पण किल्ला तो वश होत नव्हता. जमिनीवरील हा किल्ला, किल्ला किल्ला तो कसला ती एक गढीच. जास्तीत जास्त ४०० - ५०० मावळे राहू शकतील एवढे ते आवार, हा छोटेखानी एक दिवसात घेऊ याच ऐटीत २१ जून १६६० रोजी खानाने वेढे दिले पण किल्ल्यातील मराठ्यांनी मोगलांशी एकाकी झुंज मांडली होती. मराठ्यांचे धैर्य तिळमात्र ही कमी झाले नव्हते. किल्लेदार फिरंगोजी मोठ्या धीराचा माणूस. कुठलीही मदत न मिळता, हा माणूस इतके दिवस तग धरून होता. मोगल आणि मराठे यांच्यात सतत छोटीमोठी झुंबड होत असे. पण आता शास्ताखानाने कच खालली होती. अल्लाला दोष देण्याच्या कार्यक्रमाचा त्याचा सपाटाच चालू होता. "या अल्ला इतने दिन हो गये लेकिन ये छोटासा किला हासिल नही होता तो उस सिवाजी के पहाडी किले तो हमारी जान निकाल देंगे". एक दिवस त्याने आपल्या शामियान्यात प्रमुख सरदारांसमवेत एक गुप्त मसलत केली. बेत ठरला किल्ल्याच्या एका बुरुजापर्यंत गुप्त सुरंग खोदून त्यात दारू भरायची आणि बार उडवून टाकायचाअसा बेत ठरला. ठरल्याप्रमाणे ते काम मात्र मोगल सैनिकांनी अतिशय शिस्तीत केले. किल्ल्यातील मराठ्यांना याची काडीमात्र खबर नव्हती. मंगळवार दि. १४ ऑगस्ट १६६०. रोजी सुरुंगात दारूगोळा भरला आणि आणि दिली वात पेटवून सुरसुर करत ती वाताडी पेटत बुरुजाच्या दिशेने निघाली. आणि क्षणार्धात एकच धमाका उडाला. बुरुजावरील मराठे आकाशात उडाले. हे पाहून शास्तेखानाला स्फुरण चढले. त्याची फौज विजयाच्या आशेने किल्ल्याच्या दिशेने पळत सुटली एकच कल्लोळ उसळला किल्ल्याला खिंडार पडले जणु हे खिंडार फिरंगोजींच्या छातीलाच पडावे अशी अवस्था फिरांगोजींची झाली तरीही ते दोन्ही हातात तलवारी घेऊन खिंडाराकडे धावत निघाले जणु तिथे एक भिंतच तयार झाली. खिंडारावर मराठ्यांची फळी उभी झाली आणि जिद्दीने लढू लागली. खानच्या सैन्यास ते पुढे सरकू देत नव्हते. मारःयान्नाचा आवेश एवढा विलक्षण होता की, अशा विपरीत व प्रतिकूल स्थितीतही पुढे येण्याची हिंमत नव्हती. उण्यापुर्‍या ३०० ते ५०० मावळ्यांनी २०००० पेक्षा जास्त सैन्याला समोरासमोरच्या युद्धातही १२ तासांपेक्षा जास्त वेळ. थोपवून ठेवले. शमसुद्दीन खान व राव भावसिंह यांनी प्रयत्नांची शिकस्त केली पण मराठ्यांनी या दिवशी संग्रामदुर्ग हातातून जाऊन दिला नाही. पराक्रमाची शर्थ व प्रयत्नांची शिकस्त करूनही आता मराठा लढू शकत नव्हता अन् समोरून येणारा. लोंढा कमी होत नव्हता. राजे म्हणत,'आपण राखून गनीम घ्यावा. माणूस खराब होणार नाही याची काळजी घ्यावी' जणू हे शब्दच फिरांगोजींना आठविले असावेत. आणि म्हणूनच फिरंगोजी नरसाळा यांनी भावसिहांच्या मध्यस्तीने १५ ऑगस्ट १६६० रोजी किल्ला खानाच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला. सर्व फौजेला घेऊन ते थेट राजगडी आले. महाराज तोपर्यंत वेढ्यातून सुटून राजगडी पोचले होते. किल्ला हातचा गेला तरी राजे फिरांगोजींवर नाराज झाले नाहीच उलट आनंदाने, त्यांची पाठ थोपटून त्यांचे सांत्वन केले आणि भूपाळगडाची किल्लेदारी राजेंनी फिरांगोजीस बहाल केली.

202 views07:55
ओपन / कमेंट
2021-08-13 08:00:43
357 views05:00
ओपन / कमेंट
2021-08-13 08:00:37 https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

facebook page
https://www.facebook.com/shivhindvi

Instagram
https://www.instagram.com/shivhindvi/

Whatsapp
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1



" हर हर महादेव जय श्रीराम "
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य"
356 views05:00
ओपन / कमेंट
2021-08-13 08:00:36 आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

१३ ऑगस्ट इ.स.१६६६
आग्र्याला येऊन शिवाजी महाराजाना जवळजवळ २ महिने झाले होते.कैदेतून सुटकेच्या कामी मदत करण्यासाठी महाराजाना मुघल सरदारांच्यावर बराच खर्च करावा लागे. जवळचे पैसे संपल्यावर महाराजानी रामसिंहाकडून ६६ हजार रुपये कर्ज घेतले. हा पैसा मुगल सरदारांवर खर्च करत महाराजानी पुन्हा त्यांच्यामार्फत औरंगजेबाला पत्र लिहिणे सुरू केले. पण औरंगजेब अत्यंत कपटी आणि धूर्त होता. महाराजांच्या अर्जावर त्याने कोणताही विचार केला नाही. याच दरम्यान आग्र्यातील सामान्य जनतेत शिवाजी महाराजांच्या बद्दल सहानुभूती वाढत होती,या कारणाने औरंगजेब मनातून धास्तावला होता. महाराजांचा एकदाचा काय तो निकाल लावण्याचे ठरवून त्याने अतिशय गुप्तपणे हालचाली करण्यास प्रारंभ केला. त्यानुसार महाराजाना विठ्ठलदासाच्या हवेलीत नेऊन ठार करण्याचे त्याने निश्चित केले. आपला बेत अतिशय गुप्त रहावा या हेतूने औरंगजेबाने महाराजांच्या निवासस्थानभोवतीची गस्त अत्यंत कडक केली. पण महाराजांच्या सुदैवाने ही गुप्त बातमी महाराजांच्यापर्यंत पोहीचलीच. महाराजांच्या छावनीभोवतीची गस्त अतिशय कडक करण्यात आली


https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

१३ आऑगस्ट इ.स.१६८०
(श्रावण वद्य १४, चतुर्दशी, शके १६०२, रौद्र संवत्सर, वार शुक्रवार)

सिद्दी यांची लुट!
मध्यरात्री सिद्दीची ५ गलबते बंदरात शिरली आणि त्यांनी मराठ्यांचे १ भात भरलेले गलबत सिद्दीने पळविल्याचे कळून आले. त्यामुळे सिद्दीच्या लोकांचे चाबकाचे फटके वाचले. त्यांना तसेच हाकलण्यात आले.



१३ ऑगस्ट इ.स.१७९५
. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

चौंडी ता.जामखेड , जि.अहमदनगर
हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान . याच गावात ३१ मे १७२५ रोजी अहिल्यादेवींचा जन्म झाला .पुढे सुभेदार मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडोजीराव यांच्याशी वयाच्या ८व्या वर्षी त्यांचा विवाह झाला.अहिल्यादेवी बालपणापासूनच चाणाक्ष, तल्लख व कुशाग्र बुद्धीच्या होत्या.खंडेराव राज्यकारभारावर अजिबात लक्ष देत नव्हते. पण अहिल्याबाईनी कधीही तक्रार न करता सासरे मल्हारराव यांनी नेमून दिलेल्या कामात लक्ष घातले. कुशाग्र बुद्धीची देणगी लाभलेल्या सुनबाई यांचेवर सासरे मल्हारराव होळकर यांचा मोठा विश्वास होता.आणि खूप महत्त्वाचा पत्रव्यवहार ते अहिल्याबाई वर सोपवत असत.अहिल्याबाईंना वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी वैधव्याला सामोरे जावे लागले. कुंभेरीच्या लढाईत पती खंडेराव मरण पावले .त्यावेळी सासरे मल्हारराव म्हणाले " माझा खंडूजी गेला म्हणून काय झाले तुझ्या रुपाने माझा खंडुजी अजून जिवंत आहे तू सती जाऊ नकोस" अहिल्यादेवीने ते ऐकले.व मल्हाररावांनी अहिल्यादेवींच्या हाती सत्तेची सूत्रे दिली.
महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा वारसा घेऊन
आदर्श राज्यकारभार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे व्यक्तिमत्व प्रेरणादायी असेच होते. त्यांच्या प्रत्येक कामात दूरदृष्टी दिसून येत . व्यक्तिगत जीवनात अहिल्याबाईंनी अनेक संकटांना तोंड देत सुमारे २७वर्षे राज्यकारभार केला. पण या सगळ्या कारभारात अहिल्यादेवींनी स्वतःची अशी अर्थनीती व जलनीती ठरवली .महिला असूनही राजसत्तेचे नेतृत्व कसे असावे याचे उत्तम उदाहरण अहिल्याबाईंनी घालून दिले. राज्यातील शेतकरी कष्टकरी उपेक्षित वर्ग हा त्यांच्या विकासाचा केंद्रबिंदू होता .शिवाय कसण्यास दिलेल्या जमिनीत शेतकऱ्यांनी वीस फळझाडे लावावीत त्यातील 11 झाडे सरकारची आणि नऊ झाडे शेतकऱ्यांची असे सूत्र ठरवले होते. अहिल्यादेवींच्या जलनीती मध्येही अर्थनीती प्रमाणेच सर्वसमावेशकता होती. त्याकाळी फड पद्धतीने पाणी वाटपावर अहिल्यादेवींनी भरपूर पैसे खर्च केले. ज्यादा पैसे खर्च करून पाणी दिल्याने उत्पन्न वाढीचा वायदा त्यांनी शेतकऱ्यांशी केला पण शेतकऱ्यांकडून उत्पन्ना एवढाच सारा वसूल केला .शेतीच्या पाण्याचे महत्त्व त्यांनी जाणले होते, पण पिण्याच्या पाण्यासाठीही पुढे अनेक भागात विहिरी बारव ,आड ,घाट यासारख्या योजना त्यांनी त्यांच्या कल्पनेतून उभारल्या त्यापैकी बहुतांश विहिरी आजही सुस्थितीत आहेत.ग्राम व्यवस्थेची घडी त्यानी चांगली बसवली होती.गावोगावी न्याय देणारे पंचाधिकारी नेमले होते.राज्यकारभार करताना जुन्या रूढी-परंपरांना त्यांनी कायमच विरोध केला.पुरूषप्रधान व्यवस्थेत स्वच्छ आणि शिस्तबध्द कारभार करणार्या त्या रणरागिनी होत्या ,प्रचंड आत्मविश्वास, धाडस ,दूरदृष्टी, त्यागी वृत्ती असे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत. अहिल्याबाईंचा नंतर महेश्वर येथे १३ आॅगस्ट १७९५ ला वृद्धापकाळाने निधन झाले.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर
293 views05:00
ओपन / कमेंट
2021-08-12 09:25:53
400 views06:25
ओपन / कमेंट
2021-08-12 09:25:43 १२ ऑगस्ट इ.स‌.१६६६
(श्रावण वद्य ७, सप्तमी, शके १५८८, संवत्सर पराभव, वार रविवार)

आग्रा येथे नजरकैदेत असताना महाराजांचा आजार बळावला!
महाराजांचा आजार बळावला होता. तशातच महाराजांनी काही दिवसांपूर्वीच आपली माणसेही स्वदेशात पाठविली होती, त्यामुळे औरंगजेब बादशहा महाराजांना मारण्याविषयी निश्चिंत होता. विठ्ठलदासाच्या हवेलीत अगदी ३/४ दिवसांत महाराजांना हलविण्याची तयारी करण्याच्या सूचनाही त्याने फुलादखानाला दिल्या. इकडे महाराजांच्या प्रकृतीत काहीही फरक पडत नव्हता. आजुबाजूची माणसे चिंताक्रांत होती.



१२ ऑगस्ट इ.स.१६८३
अंजदिव बेटाच्या मालकीवरून पोर्तुगीज आणि मराठे संबंध बिघडत गेले होते.
औरंगजेबानेही अकबर प्रकरणावरून पोर्तुगीजाना संभाजीराजेंच्या विरोधात चिथावणी दिली होती. संभाजीराजेंनी आपण डिचोलीला जाणार असल्याचे सांगून आपले सैन्य चेऊलला वेढा देण्यासाठी पाठवले होते. त्यामुळे पोर्तुगीज मराठे युद्धाला सुरुवात झाली होती. या पार्श्वभूमीवर पोर्तुगीज विजरईलाही संभाजीराजेंना जिवंत पकडण्याची इच्छा झाली. गोव्याजवळील भतग्रामातील नारवे येथे पंचगंगा नदीवर गोकुळाष्टमी ला यात्रा भरत असे. नदीच्या उत्तर किनाऱ्यावरील नारवे संभाजीराजेंच्या ताब्यात तर दक्षिण किनाऱ्यावरील दिवाडी बेट पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. या यात्रेदरम्यान हजारो लोक नदीत स्नान करण्यासाठी येत असत. संभाजीराजे सुद्धा या नदीत स्नान करण्यासाठी येणार आहेत अशी बातमी विजरईला मिळाली. त्यानुसार अचानक छापा घालून त्यांना पकडण्याचा विचार विजरईचा होता. पण बहुधा संभाजीराजेंनी हा बेत रद्द केला त्यामुळे पोर्तुगीजांचा हा बेत फसला गेला.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

facebook page
https://www.facebook.com/shivhindvi

Instagram
https://www.instagram.com/shivhindvi/

Whatsapp
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1



" हर हर महादेव जय श्रीराम "
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य"
405 views06:25
ओपन / कमेंट