Get Mystery Box with random crypto!

" छञपती श्री शिवाजी महाराज "

टेलीग्राम चैनल का लोगो chatrapat — " छञपती श्री शिवाजी महाराज "
टेलीग्राम चैनल का लोगो chatrapat — " छञपती श्री शिवाजी महाराज "
चैनल का पता: @chatrapat
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 3.58K

Ratings & Reviews

4.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

2

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 141

2021-08-04 08:03:30 आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष

४ ऑगस्ट इ.स.१६६८
(श्रावण शुद्ध ७, सप्तमी, शके १५९०, संवत्सर किलक, वार मंगळवार)

शिवरायांनी कोकणातील जैतापूर जिंकले.
शिवरायांनी आग्रा येथून सुटका करून घेतल्यानंतर मोगलांशी तह केला व आपले लक्ष पोर्तुगीज राज्यावर केंद्रीत केले. धर्मांध पोर्तुगीजांना धडा शिकविण्यासाठी महाराजांनी आपली मोहिम‌ उघडली व त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूरवर हल्ला करून ते जिंकुन घेतले.


https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

४ ऑगस्ट इ.स.१६८१
दुटप्पी धोरणाने वागणाऱ्या इंग्रजांच्या सहकार्याने मुंबईत आणि लगतच्या उंदेरी किल्ल्यावर राहून मराठी मुलखात नासधुस व लुटालूट करत असे.उंदेरी किल्ला सिद्दीकडून घेतला आणि मुंबईतही त्याला थारा मिळाला नाही तर सिद्दीच्या हालचालींना पायबंद बसेल असे संभाजीराजेना वाटत होते. त्यामुळे सिद्दीकडून उंदेरी घ्यायचे असे राजांच्या मनात पूर्वीपासून घोळत होते.त्यादृष्टीने त्यांनी ऑगस्ट १६८० मध्ये तसा प्रयत्न केला होता पण तो फसला गेला.पण संभाजीराजेनी हार मानली नाही,त्यांच्या आदेशाने मराठ्यांनी पुन्हा एकदा उंदेरीवर हल्ला चढवला होता.याबाबत इंग्रजांची नोंद अशी होती,"मराठ्यांनी दि.१८ जुलै १६८१ ला पहाटे उंदेरीवर हल्ला चढवला. मराठे आणि सिद्दी सतत ४ तास एकमेकांवर हल्ले करत होते. त्यात काही माणसे मेली व पुष्कळ पकडली गेली.अखेर सिद्दीने हा हल्ला परतवून लावला."



४ ऑगस्ट इ.स.१६८७
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमाणेच शंभुराजेंना सुध्दा आपल्या लष्करात शिस्त असणे अपेक्षीत होते.आपल्या लष्करी अधिकाऱ्यांनी रयतेला किंवा देवस्थानांना त्रास दिलेला त्यांना खपत नसे.पुणे प्रांतातील मौजे चिंचवड हा गाव श्री देव यांच्याकडे चालत असे. महाराजांच्या लष्करातील सुभेदार,जुमलेदार,हवालदार, हशम यांच्याकडून या देवस्थानाला उपद्रव होत असे.मन मानेल तशी वसुली हे अधिकारी करत असत.त्यामुळे शंभुराजेंनी त्यांना आज्ञा केली की,"असे असता तुम्ही रहदारीस नाहक दरफ्ती करता,उपद्रव देऊन धामधूमही करता.रयतीकडून गैरसनदी मनास येईल ते मागत होता म्हणोन कळो आले.तरी हे ढंग स्वामिस कैसे मानो पाहतात?या उपरी ही बदराहा वर्तणूक केलीया तुमचा एकंदर मुलाहिजा होणार नाही.जो धामधूम करील त्यास स्वामी जिवेच मारतील. हे जाणून मौजे मजकुरास तसदी ना देणे.ताकीद असे."शंभुराजेंच्या या एकमेव पत्रात स्वामी जिवेच मारतील हा दम दिलेला आढळतो.



४ ऑगस्ट इ.स.१७३०
(भाद्रपद शुद्ध द्वितीया शालिवाहन शक १६५२, साधारणनाम संवत्सर)

भाऊसाहेब अर्थात सदाशिवरावांचा जन्म.
चिमाजीअप्पांना पहिलाच पुत्र झाला. शनिवारवाड्यावर चौघडा वाजू लागला. पुण्यात साखरा वाटल्या गेल्या. सदाशिवचा जन्म झाल्यानंतर त्यांची आई रखमाबाईंची तब्येत ढासळली. औषधोपचार चालु झाले मात्र त्याचा उपयोग न होऊन ३१ ऑगस्ट १७३० रोजी रखमाबाई निधन पावल्या. सदाशिवराव त्यावेळी केवळ २७ दिवसांचे होते.इ.स. १७४० मधे चुलत बंधु नानासाहेबांना पेशवाई मिळाल्यानंतर भाऊंचे सातार्याच्या दरबारात काही वर्षे वास्तव्य होते. या काळात त्यांना राजकारणाचा बराच अनुभव मिळाला. १७४६ मधील कर्नाटक मोहिम, १७४७ मधे तिथेच झालेली आजर्याची लढाई, बहादूरभेंड्याचा किल्ला जिंकणे, तुंगभद्रा किनारी जाऊन बंडखोर नवाब व देसायांना जरब बसवणे इत्यादी मोहिमा त्यांच्या नावावर होत्या. त्याचबरोबर सावनूरच्या नवाबांकडून भाऊंनी ३६ परगणे काबीज करून मराठा साम्राज्याला जोडले. १७५० मधे सांगोल्याला यमाजी शिवदेवाचे बंड मोडले. त्याच वर्षी छत्रपती राजारामांनी (दुसरे) त्यांना मराठा राज्याची कायमची मुखत्यारी दिली. तसेच नागपूरच्या भोसल्यांची दिवाणीही भाऊंना मिळाली होती. १७५० मधेच भाऊंनी कोल्हापूरमधील काही किल्ले व ५० हजार रूपयांची जहागिरी मिळवली.
हे वरील नमूद केलेले व इतर काही कामगिर्या भाऊंनी त्यांच्या आयुष्यात पार पाडल्या. भाऊसाहेबांचा स्वभाव करारी होता, शुद्ध आचरण, न्यायी व्रुत्ती, हिशेबी व्रुत्ती, दक्षता हे गुणही होते.

(मृत्यू: १४ जानेवारी १७६१)



४ ऑगस्ट इ.स.१७३३
कान्होजी आंग्रेंचे बाजीरावाला पत्र
प्रतिनिधी जोपर्यंत कोकणात आहेत तोपर्यंत काहीही होणार नाही हे सगळ्यांना कळून चुकलं होतं. खुद्द सरखेल सेखोजी आंग्रे ४ ऑगस्ट १७३३ रोजी बाजीरावांना कळवतात, “प्रतिनिधीचा विचार घालमेलीचा व शामलाचे (सिद्दी) ममतेचा पहिल्यापासून आहे तो आपणास अवगतच आहे. या कोकणच्या मानसुब्यास दोन्ही गोष्टी कार्याच्या नाहीत. आपणाजवळ (पेशव्यांजवळ) आम्ही (आंग्रे) स्वच्छंदे अथवा आपले आज्ञेने वर्तणूक करू. तैसी त्याजपासी होणे दुरापास्त. प्रतिनिधी उठोन जातील ते कळणार(ही) नाही, आपले बेत, गोद्विजांचा उच्छेद केल्याचे श्रय आपल्या पदरी पडेल.
317 views05:03
ओपन / कमेंट
2021-08-03 07:11:17
463 views04:11
ओपन / कमेंट
2021-08-03 07:11:12 आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

३ ऑगस्ट इ.स.१३४७
दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलख याच्या कारकिर्दीत दक्षिणेत जाफरखान उर्फ अल्लाउद्दीन हसन याने बंड करून गुलबर्गा इथे ३ ऑगस्ट १३४७ ला बहामनी राज्याची स्थापना केली. या बहामनी राज्यात १३४७ ते १५३८ या काळात एकूण १८ सुलतान होऊन गेले. बहामनी राज्यातील १४ वा सुलतान शिहाबुद्दीन महमूद याच्या कारकिर्दीच्या दरम्यान बहामनी सत्तेचा कर्तबगार वजीर महंमद गवान याची हत्या झाल्यानंतर बहामनी सत्तेचे वेगवेगळे सुभेदार जसे युसुफ आदिलखान (आदिलशाही), फतहुल्लाह इमाद (इमादशाही), कुत्ब उल्मुख (कुतुबशाही), अमीर कासीम बरीद (बरीदशाही) व मलिक अहमद बहिरी (निजामशाही) यांनी बहामनी सत्तेतून बाहेर पडत आपली स्वतंत्र राज्ये स्थापन केली. यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेच्या कामी महत्वाचा अडसर राहिला तो विजापूरच्या आदिलशाहीचा.


https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

३ आगस्ट इ.स.१६६४
(श्रावण वद्य षष्ठी, शके १५८६, संवत्सर क्रोधी, वार बुधवार)

महाराजांच्या आरमाराने पोर्तुगीज व मोगली आरमाराचा समाचार घेण्यासाठी १० गलबतांचा ताफा रवाना !
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा आरमाराने हेरांनी आणलेल्या माहितीवरून पोर्तुगीज व मोगली आरमाराचा समाचार घेण्यासाठी १०, दहा गलबतांचा ताफा रवाना केला.



३ ऑगस्ट इ.स‌१६७७
छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणेत वृद्धाचलम् येथे मुक्कामी आले.
इथून महाराजांनी परतीचा प्रवास सुरु केला. वृद्धाचलम, कावेरीपट्टम, चिदंबरम तसेच शहाजीराजे यांच्या जुन्या जहागिरीचा प्रदेश बाळापुर, बंगरूळ, शिरें, होसकोट जिंकून घेतला. अरणीला वेढा घालून अरणी जिंकली, त्यासोबतच चिकबाळापूर, दोडडबाळापूर, देवरायानदुर्ग, तुमकुर, चित्रदुर्ग, कल्याणदुर्ग, रायदुर्ग, हंपी, कनकगिरी, कोप्पळ, लक्ष्मेश्वर, गदग हा भागही जिंकून घेतला. महाराजांना वेल्लोरशिवाय जास्त विरोध कुठेच झाला नाही व हे सर्व करत करत महाराज पन्हाळ्यावर परतले मार्च १६७८ साली. त्यानंतर लगेच वेल्लोर किल्ला मराठ्यांनी जिंकला ज्याचा वेढा तब्बल एक वर्ष सुरु होता. व्यंकोजी राजांनी महाराजांनी बळकावलेल्या प्रदेशावर हल्ला करून तो मिळवण्याचा प्रयत्न देखील केला पण त्यात त्यांचा पराभव झाला. अश्याप्रकारे तब्बल दीड वर्ष चाललेल्या कर्नाटक मोहिमेची यशस्वी सांगता झाली.



३ ऑगस्ट इ.स.१९००
स्वातंत्र्यपूर्व काळात पत्री सरकार म्हनजेच प्रतिसरकार स्थापन करून इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान असलेले ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म. महाराष्ट्रात (प्रामुख्याने सातारा, सांगली भागात) स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे, तसेच पत्री सरकार किंवा प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग राबवणारे लढवय्ये राजकीय कार्यकर्ते म्हणजे "क्रांतिसिंह नाना पाटील" होत. महाराष्ट्रातील एक देशभक्त, झुंझार नेते आणि क्रांतिसिंह म्हणून ते ओळखले जात. त्यांचा जन्म ३ आॅगस्ट १९०० रोजी सांगली जिल्ह्यातील येडे मचिंद्र या खेड्यात एका शेतकरी कुटुंबात झाला. नानांचे वडील रामचंद्र हे गावचे पाटील होते. नानांचे प्राथमिक शिक्षण गावी झाले आणि ते मुलकीपरीक्षा उत्तीर्ण झाले (१९१६) यानंतर त्यांना तलाठ्याची नोकरी मिळाली पुढे सत्यशोधक चळवळीकडे ते आकृष्ट झाले. त्यांनी ग्रामीण भागातून दौरे काढून तत्कालीन अंधश्रद्धा, हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथा व चालीरीती यांविरुद्ध लोकमत जागृत केले. अनेक अनिष्ट चालीरीतीविरुद्ध त्यांनी बंड पुकारले.
क्रांतीसूर्य नाना पाटील यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

facebook page
https://www.facebook.com/shivhindvi

Instagram
https://www.instagram.com/shivhindvi/

Whatsapp
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1



" हर हर महादेव जय श्रीराम "
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य"
488 views04:11
ओपन / कमेंट
2021-08-02 07:28:35
461 views04:28
ओपन / कमेंट
2021-08-02 07:28:30 आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

२ ऑगस्ट इ.स.१६७७
आपल्या दक्षिण मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराज तिरुमल्लपाडीवरून २४ जुलै च्या दरम्यान वलीगंडापुराम ला आले.शेरखान पठाणाच्या या मुख्य ठाण्याचा भुईकोट किल्ला जिंकून महाराजानी तिथे यशवंतराव कदम यांना नामजाद केले.३०जुलैच्या पूर्वी मराठ्यांनी उटळूर चा कोटही जिंकला.या ठिकाणची हवालदारी नागोजी भोसले याना दिली गेली. तेथील सर्व व्यवस्था लावून महाराज वलीगंडापुरम सोडून तुंदुमगुर्ती ला आले.तिथून त्यांनी जवळच असणारे व्यंकोजीराजेंच्या एलवनसुर ह्या ठाण्याला जिंकण्यासाठी आपली एक सैन्य तुकडी पाठवून दिली.महाराज मात्र आपण स्वतः वृद्धाचलम च्या मंदिरात शिवदर्शन करण्यास गेले.मराठी सैन्याने व्यंकोजीराजेंचे वेलवान्सोर हे ठाणे घेतले ती तारीख होती २ ऑगस्ट १६७७


https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

२ ऑगस्ट इ.स.१६८०
दि.५ मे १६८० च्या दरम्यान संभाजीराजेनी रामजी नाईक ठाकूर या आपल्या वकिलांबरोबर गोव्याचा विजरई अंतोनियो पाईस द सांदे याला सलोख्याचे पत्र पाठवून आपल्या वडिलांच्या दुःखद निधनाची बातमी दिली आणि आपण सत्ताधारी झाल्याचे कळवले होते आणि मराठे आणि पोर्तुगीज यांच्यात तह करण्यास सुचवले होते.विजरईनेही संभाजीराजेना पत्र पाठवून महाराजांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले होते व तहाच्या सूचनेला मान्यता दिली होती. शिवाय कोकणात शांतता राखण्यासाठी गेलेल्या रायाजी पंडित याला भेटीच्या वेळी आपण साष्ट व कुडाळ येथील फिरंगी अधिकाऱ्यांना युद्धविषयक हालचाली थांबवण्याचे आदेश दिल्याचे सांगितले होते. त्याचबरोबर रायाजी पंडितकडे संभाजीराजेंना भेट म्हणून एक सोन्याचा मुलामा दिलेली बंदूक व चार कापडाचे नगही दिले होते. दोन्ही बाजूंनी अशी शांततेची बोलणी सुरू असताना मराठ्यांचा डिचोलीचा सुभेदार मोरो दादाजी हा पोर्तुगीजांशी पूर्वीच्याच धोरणाने वागत होता.त्याने पोर्तुगीजांच्या बारदेश मधील सिओलीम हे गाव लुटून तेथील तीन माणसांना पकडले होते.



२ ऑगस्ट इ.स.१६८०
मराठ्यांनी बारदेश मधील "सिओलीम" हे गाव लुटून ३ माणसांना पकडले.



२ ऑगस्ट इ.स.१६८१
(श्रावण वद्य १४, चतुर्दशी, शके १६०३, दुर्मती संवत्सर, वार मंगळवार)

सिद्दी संबळने जंजिऱ्याचा बंदोबस्त वाढविला.
सध्या सिद्दी व इंग्रजांचेही बिनसले होते. मात्र हे सिद्दी व इंग्रज दोघे सुद्धा सागरी सर्प आपल्या भक्षासाठी सदैव त्यांचा संचार सागरात अविरत सुरू असे अशातच सिद्दी संबळचा मुलगा सिद्दी मिस्त्री हा छत्रपती संभाजी महाराजांच्या आरमारात दाखल झाला. त्यामुळे मनातून हादरलेल्या सिद्दीने जंजिऱ्याचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढविला.



२ ऑगस्ट इ.स.१७६०
२ ऑगस्ट सन १७६० रोजी सदाशिवराव भाऊसाहेबांनी दिल्ली काबीज करून दिनांक १० ऑगस्ट सन १७६० रोजी परागंदा झालेल्या बादशहाच्या पुत्र शहजादा जवानबख्त याला वलीअहद म्हणजे युवराज बनवले.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

facebook page
https://www.facebook.com/shivhindvi

Instagram
https://www.instagram.com/shivhindvi/

Whatsapp
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1



" हर हर महादेव जय श्रीराम "
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य"
486 views04:28
ओपन / कमेंट
2021-08-01 14:32:37
422 views11:32
ओपन / कमेंट
2021-08-01 07:14:00 १ ऑगस्ट इ.स.१७६०
मराठा सेना पेशवे सदाशिवराव भाऊसाहेब यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत पोहोचली.
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा
अडीचशे वर्षांपूर्वी म्हणजे १ ऑगस्ट १७६० रोजी सदाशिवराव भाऊ यांनी दिल्लीचे तख्त पालटून टाकले. सुमारे ५०० वर्षे राज्य करणाऱ्या मुघलांना धूळ चारली आणि दिल्लीच्या तख्तावर मराठ्यांचे नाव काढले, त्या मर्द मरहट्ट्याला मानाचा मुजरा.
म्हणूनच म्हंटले जाते. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा.



१ आॅगस्ट इ.स.१९२०
लोकमान्य टिळक पुण्यतिथी
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. ज्या प्रमाणे चिखलात कमळ उगवते, त्या प्रमाणे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी २३ जुलै १८५६ रोजी झाला. टिळक हे बालपणापासूनच हुशार आणि स्वाभिमानी होते. टिळकांचे शिक्षण फर्गुसन कॉलेज मध्ये झाले पुढे टिळकांनी स्वताला देशकार्यास वाहून घेतले. त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल, हि शाळा स्थापन केली. लोकांमध्ये जागृती होण्यासाठी केसरी व मराठा ही दोन वर्तमानपत्रे सुरू केली. टिळकाच्या कार्याने धास्तावून इंग्रजांनी त्यांना अटक करून त्यांच्यावर खटला चालवला. न्यायालयात टिळकांनी "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच" अशी सिंहगर्जना केली. इंग्रजांनी टिळकांना ६ वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावून त्यांची रवानगी ब्रह्मदेशातल्या मंडाले तुरुंगात केली. तेथे टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. स्वातंत्र्यपूर्व काळात, लोकांची एकी व्हावी म्हणून टिळकांनी गणेश चतुर्थी आणि शिवजयंती हे दोन उत्सव सुरू केले. जनतेने त्यांना प्रेमाने लोकमान्य ही पदवी दिली. असं हे बहुमूल्य रत्न मधुमेह व्याधीच्या निमित्ताने १ ऑगस्ट १९२० रोजी काळाने आपल्यापासून हिरावून घेतले. त्यांना शतशः प्रणाम.
#जय_हिंद !
#जय_महाराष्ट्र !



१ आॅगस्ट इ.स.१९२०
मराठी साहीत्य क्षेत्रात सर्वोच्च योगदान असलेले आणि मराठी साहीत्य तसेच छत्रपती शिवरायांचे चरीत्र पोवाड्यातून सातासमुद्रापार पोचवणारे "लोकशाहीर आण्णा भाऊ साठे" यांची आज जयंती.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

facebook page
https://www.facebook.com/shivhindvi

Instagram
https://www.instagram.com/shivhindvi/

Whatsapp
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1



" हर हर महादेव जय श्रीराम "
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य"
499 views04:14
ओपन / कमेंट
2021-08-01 07:14:00 आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष

१ ऑगस्ट इ.स.१६४४
आदिलशहाचे एक फर्मान!
"ज्याअर्थी राजे शहाजीराजे दरबारातून निर्वासित व अपमानित झाले व त्यांचा मुतालिक दादाजी कोंडदेव कोंडाण्याच्या बाजूस आहे (त्याअर्थी त्यांस) दफे करण्यासाठी व ती विलायत ताब्यात आणण्यासाठी खंडोजी व बाजी घोरपडे यांस तुमच्यासह नेमले आहे. तरी तुम्ही आपल्या हशमांसह मशारनिल्हे जवळ जाऊन त्यांच्या संमतीने दादाजी कोंडदेव व त्यांच्या संबंधिंना शिक्षा देऊन नेस्तनाबूत करा व ती विलायत ताब्यात आणा. ते तुमच्या उत्कर्षाचे कारण आहे.


https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

१ ऑगस्ट इ.स.१६७८
छत्रपती शिवरायांनी "पनवेल" प्रांत जिंकला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण, भिवंडी, पनवेल जिंकल्यावर कल्याणच्या खाडीत समुहुर्ताने आपल्या आरमाराची पहिली पठाने तरती केली, तसेच वसई व चौल कडील प्रदेश काबीज केला.



१ ऑगस्ट इ.स.१७३४
(श्रावण शुद्ध त्रयोदशी, आनंदनाम संवत्सरी श्री शालिवाहन शके १५५६ रोजी गुरुवार)

श्रीमंत बाजीराव (पहिले) पेशव्यांचे पहिले दोन पुत्र दीर्घकाळ जगू शकले नाही. यावेळेस काही अनुचित व अभद्र घडू नये म्हणून राधाबाईंनी(बाजीराव पेशव्यांच्या मातोश्री) सप्ताहास आणि अनुष्ठानास ब्राह्मण बसविले. पवित्रस्थानी अपत्य जन्मास यावे म्हणून काशिबाई साताऱ्यास माहुलीक्षेत्री राहायला आले. माहुलीला पेशव्यांचा एक लहानसा वाडा होता. आणि दि. १ ऑगस्ट १७३४, श्रावण शुद्ध त्रयोदशी, आनंदनाम संवत्सरी श्री शालिवाहन शके १५५६ रोजी गुरुवारी माहुलीच्या वाड्यात पुत्र जन्माला आला. बाळाचे बारसेही माहुलीलाच झाले. पेशव्यांच्या या नव्या पुत्राचे नाव ठेवण्यात आले 'रघुनाथ'. (हेच पुढे रघुनाथराव उर्फ राघोबादादा म्हणून प्रसिद्ध) साधारणतः त्याच सुमारास मस्तानीबाईंनाही पुत्रप्राप्ती झाली. या पुत्राचे नाव मस्तानीने 'कृष्णसिंह' ठेवले. रघुनाथपंतांच्या जन्मानंतर पुण्यात साखरा वाटण्याचा आणि चौघडा वाजविण्यासाठी चिमाजीआप्पांनी हुकूम सोडले. इकडे कृष्णसिंहाचा जन्म झाल्यानंतर त्या आनंदाप्रीत्यर्थ मस्तानीने खैरात वाटली. या दोन्ही पुत्रांच्या जन्माच्या वेळेस बाजीराव कुठे होते? बाजीराव होते कोकणात! छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून कोकणात पोर्तुगीज, इंग्रज, सिद्दी या परकीय सत्ता जम बसवत होत्या. महाराजांनी इंग्रज व पोर्तुगीजांना धाकात ठेवले होते. परंतु, सिद्दी मात्र उपद्रव देतच होता.



१ ऑगस्ट इ.स.१७५६
दि. १३ फेब्रुवारी रोजी कॅप्टन फोर्ड (फोर्ब्स?) हा साठ माणसांसह जमिनीवर उतरला. पण पेशव्यांची फौजही किल्ल्यात शिरायला तयार आहे, असे पाहून इंग्रजी आरमाराने मुद्दाम किल्ल्यावर तोफांचा मारा सुरूच ठेवला. संध्याकाळी फोर्ड गुपचूप किल्ल्यात शिरला आणि त्याने निशाण लावले. परंतु, त्याआधीच तुळाजी आंग्रे खंडोजी माणकरांच्या स्वाधीन झाले होते. तुळाजी अत्यंत शूर होते, यात शंकाच नाही. क्लाईव्ह आणि वॉटसनला ग. बर्शियरने स्पष्ट बजावले होते, "तुळाजी आंग्रे सापडल्यास मुंबईस आणावा. पेशव्यांचे हाती देऊ नये. कारण ते कदाचित त्यास पुनरपि मोकळा सोडतील आणि तो पुन्हा पहिल्यासारखा आपणास त्रास देऊ लागेल." बर्शियरच्या उपदेशावरूनच कल्पना येते. शिवाय विजयदुर्ग घेण्याचा त्यांचा मनसुबा होताच. त्यामुळे तुळाजी पेशव्यांच्या स्वाधीन झाले हे पाहताच पेशव्यांचे सैन्य विजयदुर्गात शिरण्याआधीच इंग्रजांनी शिताफीने किल्ल्याचा ताबा घेतला. इंग्रजांचे सैन्य प्रथम मराठे आणि किल्ल्याच्या मध्ये उतरले आणि बाहेरून इंग्रजी तोफांचा भडिमार सुरू असल्याने किल्ल्यातील उरलेल्या माणसांनी किल्ला इंग्रजांच्या स्वाधीन केला. दुसऱ्या दिवशी रामाजीपंत अॅडेमिरल वॉटसनच्या भेटीला गेले असता, वॉटसनने विजयदुर्गच्या हस्तांतरणासाठी गव्हर्नरच्या परवानगीची गरज असून त्याबदल्यात पेशव्यांनी तुळाजीला इंग्रजांच्या हाती सोपवावे, ही अट घातली. तहनाम्यात ठरल्याप्रमाणे पेशव्यांच्या संमतीने कलमे ठरविण्यात येण्याचे ठरले असल्याने रामाजीपंतांना अचानक विजयदुर्गच्या बदल्यात तुळाजींना हस्तांतरित करता येईना. रामाजीपंत स्पष्टपणे पेशव्यांना तसे कलवितात, “कजिया करावा तरी पातशाही सरदार... दरम्यान जनरल व तहनामा आहे म्हणोन उतावळी न करता आहो..." अखेरीस विजयदुर्गसाठी वॉटसनने अडवून धरले तसेच रामाजीपंतांनीही तुळाजींचा ताबा शेवटपर्यंत इंग्रजांना दिला नाही. पेशव्यांनी दि. २० जुलै रोजी पुण्यात आल्यानंतर मुंबईचा गव्हर्नर बर्शियरला अत्यंत कडक शब्दात 'आज्ञापत्र' पाठविले आणि विजयदुर्ग पुन्हा मागितला. यावर १ ऑगस्ट रोजी बर्शियरने अत्यंत नरमाईचे धोरण स्वीकारून पावसाळा संपताच विजयदुर्ग पुन्हा देण्याचे मान्य केले आणि आपले दोन वकील (टॉमस वायफिल्ड आणि जॉन स्पेन्सर) पुणे दरबारात पाठविले.

395 views04:14
ओपन / कमेंट
2021-07-31 07:26:13
135 views04:26
ओपन / कमेंट