Get Mystery Box with random crypto!

" छञपती श्री शिवाजी महाराज "

टेलीग्राम चैनल का लोगो chatrapat — " छञपती श्री शिवाजी महाराज "
टेलीग्राम चैनल का लोगो chatrapat — " छञपती श्री शिवाजी महाराज "
चैनल का पता: @chatrapat
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 3.58K

Ratings & Reviews

4.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

2

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 2

2023-04-26 13:10:57 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/



हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.
181 views10:10
ओपन / कमेंट
2023-04-26 13:10:57 आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

२६ एप्रिल इ.स.१६७५
मराठा फौजेने कारवारवर हल्ला केला. फोंडा काबीज होताच महाराजांनी त्वरेने हालचाल करून कारवार प्रांत जिंकून घेतला. ३ हजार मराठी घोडदळ व काही पायदळ एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात शिवेश्वर किल्ल्याला वेढा घालून बसले.


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link
https://youtube.com/shorts/kYim2jy-SAA?feature=share

२६ एप्रिल इ.स.१६८०
(वैशाख शुद्ध अष्टमी, शके १६०२, रौद्र संवत्सर, वार सोमवार)

संपूर्ण देश छत्रपती संभाजी महाराजांचा झाला.
छत्रपती संभाजी महाराजांनी संपूर्ण प्रदेशावर अंमल बसवून आपले सुभेदार रावजी पंडितांकरवी हुकूम जारी केला की, सर्वांनी किल्ले पन्हाळ्यास येऊनहिशेब द्यावेत. किल्ले रायगडावर जाण्याआधीचे राजकारण करण्यास व आपले बस्तान व्यवस्थित करण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलली.



२६ एप्रिल इ.स.१६८४
(वैशाख शुद्ध सप्तमी, शके १६०६, रक्ताक्ष संवत्सर, वार शनिवार)

छत्रपती संभाजी महाराज बिरवाडीच्या किल्ल्यावर मुक्कामी.
१६६१ मध्ये सिद्दीकडून दंडाराजापुरी जिंकल्यावर बिरवाडीचा किल्ला बांधला.
छत्रपती संभाजीराजे व इंग्रज यांच्यातील तहाच्या अटी ;-
केग्विन हा सातत्याने चार्लस राजाला संभाजी महाराजांच्या शक्तीची व आक्रमक धोरणाची कल्पना यासाठी देत होता की, जेणे करुन संभाजी महाराजांशी तह करुन सलोखा निर्माण व्हावा.
त्याप्रमाणे २६ एप्रिल १६८४ पूर्वी केग्विनने तहाच्या बोलणीसाठी कॅप्टन गॅरी, थाॅमस विल्किन्स, राम शेणवी यांना तहाच्या बोलणीसाठी संभाजी महाराजांकडे पाठवले.

"वकिलाने तुमचा मनोदय सांगितला त्याच्या बरोबर आम्ही आमची मान्यता पाठवली.
तुमचा मनोदय तुम्ही तपशीलवार लिहून पाठवला त्या तहाच्या अटींना आम्ही संमती पाठवली आहे ती मिळेलच, तरी तुम्ही या अटींचे परिपालन करावे.
आम्हीही त्या पाळू आमच्या वचनावर विश्वास ठेवून वागावे, दिवसेदिवस आमच्या मैत्रीचे संबंध दृढ होत जातील असे करावे.
कॅप्टन गॅरीने सिद्दीशी तुमचे वितुष्ट आले आहे असे आम्हांला सांगितले त्याला काढून लावण्यासाठी आम्ही सहाय्य करावे अशी तुमची अपेक्षा आहे तरी सिद्दी आमचा शत्रू आणि तुम्ही आमचे मित्र म्हणून सर्वतोपरी सहाय्य करणे आम्हास आवश्यक आहे.
तुमचा मित्र तो आमचा मित्र, तुमचा शत्रू तो आमचा शत्रू हे जाणून तुमच्यापरीने तुम्ही सिद्दीचा नाश करण्याचा प्रयत्न करावा आम्हीही तसेच करत आहोत.
तुमच्या शत्रूचा नाश करणे तुम्हाला सोपे जावे म्हणून आम्ही तुम्हास सर्वतोपरीने मदत करु, आपली मैत्री वृध्दिंगत होवो, अधिक काय लिहणे."
यावेळी इंग्रज व संभाजी महाराज यांच्यात जो तह झाला त्यापैकी आरमाराविषयक कलम असे होते
वादळामुळे किंवा अन्य उत्पातामुळे जर एखादे जहाज गुराब, जहाज किंवा होडी माझ्या राज्यांतील बंदरात लागली तर ती जप्त करुन सरकार जमा होऊ नये हा रिवाज ख्रिश्चन लोकांच्या बाबतीत रुढ असेल तर ती सवलत इंग्रजांसही देण्यात येईल."
मराठ्यांच्या अधीपत्या खाली असलेल्या जिंजी आणि मद्रास या प्रदेशात वखार बांधण्याची परवानगी.
करार / तहातील प्रमुख अटी:
१) वखारीची उंची, लांबी आणि रुंदी हि नियोजित प्रमाणानुसारच असावी
२) गुलाम खरेदी आणि विक्री यावर बंदी.
३) बालकामगार
४) आयात व निर्यात यावर जकात.
५) धर्मांतर बंदी.



२६ एप्रिल इ.स.१६८५
अहमदनगरहून प्रयाण!
औरंगजेब बादशहाचे तंबू अहमदनगरहून हलविण्यात आले.



२६ एप्रिल इ.स.१७४०
२० एप्रिल रोजी श्रीमंत बाजीराव पेशव्यांची तब्येत अतिशय बिघडली. दि. २३ एप्रिलपासून रावेरखेडी व आसपास अनेक दाने व धर्मकृत्ये।करण्यास सुरुवात केली होती. दि. २६ एप्रिल रोजी काशिबाई (बाजीराव पेशव्यांच्या पत्नी) आपले पुत्र जनार्दन आणि महादजीपंत पुरंदांसोबत रावेरखेडीला पोहोचल्या. याच दिवशी पहाटे बाजीराव बेशुद्धावस्थेत गेले. काशिबाईंना तर आपल्या पराक्रमी पतीला असे अंथरूणावर पाहून बळच
गेल्यागत झाले. त्यांनी जवळच्याच रामेश्वराच्या मंदिरात ब्राह्मणांना मृत्युंजय जपासाठी बसायला सांगितले. अहोरात्र मृत्युंजयाचा घोष चालू होता. परंतु, त्याने बाजीरावांच्या प्रकृतीत काहीही फरक पडला नाही.


https://youtube.com/shorts/kYim2jy-SAA?feature=share
२६ एप्रिल इ.स.१७५१
छत्रपती राजाराम महाराजांच्या तृतीय पत्नी राजसबाइंचे निधन
राजाराम महाराजांना जानकीबाई,ताराबाई,राजसबाई व अहल्याबाई अशा चार भार्या होत्या.राजसबाई हि कागलकर घाटगे घराण्यातील असून छत्रपती संभाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावर इ.स.१६८७ साली तिचा आपले धाकटे बंधू राजाराम यांजबरोबर विवाह लावून दिला.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर
147 views10:10
ओपन / कमेंट
2023-04-26 13:10:33
109 views10:10
ओपन / कमेंट
2023-04-26 13:10:25 अक्षरशः भीक मागून आणि जवळ आहे ते सर्व विकून शेवटी अलीमर्दनखानाच्या लोकांनी पैसे गोळा केले आणि संताजी घोरपड्यांस आणून दिले. मगच संताजीने अलीमर्दनखानाची सुटका केली.


https://youtube.com/shorts/WybtVr01svs?feature=share
२५ एप्रिल इ.स.१८०९
कुप्रसिद्ध “अमृतसर संधी”
१८०७ मध्ये त्यांनी सतलज पार केले. पंजाबमधील पतियाळा, लुधियाना ही महत्वाची शहरे देखील याच काळात जिंकून घेतली. रणजितसिंग यांची ही विजयपताका बाकीच्या लहान शीख संस्थानिकांना पाहवेना.
त्यांच्याबद्दल जबरदस्त दहशत निर्माण झाली आणि म्हणूनच सतलज पार करून तेथील गावे जिंकल्यानंतर तिथल्या स्थानिक शीख संस्थानिकांनी रणजितसिंग विरुद्ध इंग्रजांकडे मदत मागितली. त्यानुसार इंग्रजांनी रणजितसिंग यांच्याकडे संधी करण्याचा प्रस्ताव पाठवला होता.
महाराजाला हा प्रस्ताव अर्थात मान्य नव्हता मात्र इंग्रजांचा दबाव वाढत चालल्याने २५ एप्रिल १८०९ ची कुप्रसिद्ध “ अमृतसर संधी” झाली पण जरी संधी झाली तरी रणजितसिंग यांचा विजय वारू रोखण्यास त्यावेळी कोणीही समर्थ नव्हते. १८०९ साली जेव्हा “कांगडा” प्रांतावर अमरसिंह थापा या शीख संस्थानिकाने हल्ला केला तेव्हा तेथील शासक संसारचंद्र याने रणजितसिंग याची मदत घेतली.
परिणामस्वरूप कांगडा शत्रूमुक्त झाला आणि त्यावर रणजितसिंग याचं वर्चस्व देखील प्रस्थापित झालं.



२५ एप्रिल इ.स.१८१८
इंग्रजांनी २५ एप्रिल ते ६ मे १८१८ दरम्यान कर्नल प्रोथर, मेजर हॉल आणि मेजर बॉण्ड रायगडाच्या पश्चिमेस पोटल्याच्या डोंगरावरून वाघ दरवाजाच्या बाजुला डागले तोफगोळे.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/



हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.
132 views10:10
ओपन / कमेंट
2023-04-26 13:10:25 आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष

२५ एप्रिल इ.स.१६६५
दाऊदखानाची तुकडी किल्ले पुरंदरावरून निघाली. मिर्झाराजे जयसिंग यांनी दाऊदखानाच्या नेतृत्त्वाखाली सुमारे ७ हजार स्वार महाराजांचा मुलूख ताराज करण्यासाठी पाठवून देण्याचा निर्णय घेतला. या तुकडीत दाऊदखानाच्या मदतीला राजा रायसिंह, सर्झाखान, अमरसिंह चंद्रावर, मुहम्मद सालीहर्तखान, सय्यिद झैनुल आबीदीन बुखारी, अचलसिंह कछवाह व स्वतःचे चारशे स्वार मिर्झाराजे जयसिंग यांनी दिले. ही तुकडी रवाना करण्यात मिर्झाराजे जयसिंग यांचा "तिहेरी" उद्देश होता. पहिला , " उद्देश म्हणजे, आदिलशहा महाराजांना दाखवून द्यायचे होते की, मोगली सैन्य केवळ एकाच वेढ्यात गुंतून राहिलेले नसून इतरही मोहिमांसाठी सुसज्ज आहे". दुसरा" उद्देश म्हणजे, आजवर महाराजांची सैन्ये बादशाही मुलखात घुसून उच्छाद मांडीत असत. आता मोगली सैन्ये त्यांच्या प्रदेशात घुसून तो प्रदेश उद्ध्वस्त करतील हे महाराजांना दाखवून द्यायचे होते. असा प्रदेश उद्ध्वस्त केला म्हणजे ते सैन्याची जमवाजमव करू शकणार नाहीत हे उघड होते". "आणि तिसरा उद्देश म्हणजे, या निमित्ताने दाऊदखानाला वेगळी कामगिरी देऊन न दुखावता किल्ले पुरंदर वेढ्याबाहेर काढता येत होते". मिर्झाराजे जयसिंग यांचे हे तीनही उद्देश पुरेसे सफल झाले. दाऊदखानाची ही तुकडी किल्ले पुरंदरावरून निघाली,


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link
https://youtube.com/shorts/WybtVr01svs?feature=share

२५ एप्रिल इ.स.१६७४
६ जून १६७४ रोजी होणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या राजाभिषेक सोहळ्यासाठी पोलादपुरचे रामजी दत्तो चित्रे या सोनाराने ३२ मण सोनं वापरून सुवर्णसिंहासन घडवले. सिंहासनावर अत्यंत मौल्यवान अगणित नवरत्ने जडवलेली होती.
आजच्या मितीला सिंहासनाचे वजन किलो मध्ये करावयाचे झाल्यास ते १४४ किलोचे भरेल.
त्यावेळचे वजनाचे कोष्टक खालीलप्रमाणे होते.
२४ तोळे म्हणजे १ शेर (जुना तोला ११.७५ ग्रामचा होता)
१६ शेर म्हणजे १ मण म्हणजेच १ शेराचे चे वजन : ११.७५ ग्राम x २४ तोले = २८२ ग्राम होते.
१ मण चे वजन : २८२ ग्राम x १६ शेर = ४५१२ ग्राम (४.५ किलो) होते.
असे ३२ मण म्हणजे ४५१२ x ३२ = १४४३८४ ग्राम (१४४ किलो).



२५ एप्रिल इ.स.१६८९
स्वराज्याचे दूसरे छत्रपती, छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केल्यानंतर छत्रपती राजाराम महाराज यांनाही त्याचप्रमाणे कैद करुन ठार करण्याचा औरंगजेबाचा मनसूबा होता. याचीच अंमलबजावणी म्हणुन बेळगावचा मोगल सुभेदार बहादुरखान याने हुकेरीचा देसाई अलगोडा यास अंमलबजावणीसाठी पाठविलेले पत्र. (दि.२५ एप्रिल १६८९)
खान बहादुर-हुकेरी परगण्याचा देसाई अलगोंदा-
या वेळी (बादशहाचा) हुकुम झाला आहे की छत्रपती रामराजा महाराज रायरी किल्ल्याहून बाहेर पडून प्रतापगड उर्फ जावळी किल्ल्यावर पोहचला आहे आणि (तेथून) पळून जाऊ इच्छित आहे. त्याला ठार मारणे अथवा कैद करणे जरुर आहे. तो ज्या बाजूने येईल तिथल्या जमीनदारांनी आपल्या हद्दीतील फौजेच्या सरदाराला त्वरीत खबर द्यावी. जर नाही दिली तर ते अपराधी होतील. म्हणुन इथून तुझी सरहद्द पन्हाळ्याला लागून असल्याने तू (रामराजाला) अडवावेस. हेर काढून राजारामाची बातमी सतत कळवीत असावे. जर तो आढळला तर त्वरित रातोरात खबर पोहचवावी म्हणजे हल्ला करुन त्याला कैद केले जाईल.
जर खबर पोहचविण्यात कुचराई करशील व शत्रु तुमच्या हद्दीतुन निघुन जाईल तर ते चांगले नाही. अपराधी व्हाल. या बाबतीत जराही निष्काळजीपणा करु नये व सक्त ताकिद जाणावी. अशा प्रकारे बातमी कळवणे यातच स्वतःची कर्तव्य परायणता जाण. (समासात) दिरंगाई करु नकोस.
तारीख १४ रजब, (जुलूस) सन ३२
स्वतःच्या वकीलाला त्वरित पाठवा.



२५ एप्रिल इ.स.१६९३
संताजीने अलीमर्दनखानाला कैद करून बदल्यात सुटकेसाठी खंडणीचे एक लाख होन गोळा करण्यासाठी त्याच्या माणसांना भीक मागत फिरायला लावले होते.
२५ एप्रिल १६९३ चे अलीमर्दनखानाच्या लोकांनी औरंगजेब बादशहाला दिलेले एक आर्जव पत्र उपलब्ध आहे. त्या आर्जव पत्रात म्हटलंय कि, " अलीमर्दनखानास मराठ्यांनी पकडून कैदेत टाकले आहे. एक लाख होन खंडणी भरल्याशिवाय मराठे अलीमर्दनखानास सोडायला तयार नाहीत. अलीमर्दनखानाची माणसे हैदराबादेत आलेली आहेत.
अलीमर्दनखानाचे हत्ती आणि इतर जिन्नस विकून खंडणीची भरपाई करण्याचा प्रयत्न त्याचे लोक करीत आहेत. परंतु हैदराबादचे अधिकारी वरील जिन्नस विकण्यास मनाई करत
आहेत."
ह्यावर औरंगजेब बादशहाने हैदराबादचा सुभेदार जानसिपार खान ह्यास लिहून कळविले कि, "अलीमर्दनखानाच्या लोकांस हत्ती आणि इतर जिन्नस विकण्यास आडकाठी करू नये."
171 views10:10
ओपन / कमेंट
2023-04-23 12:51:40
102 views09:51
ओपन / कमेंट
2023-04-23 12:51:37 सुरतकर इंग्रजांनी मुंबईकर इंग्रजांना प पत्राची नोंद!
"मोगल पातशहा अजून औरंगाबादेतच आहे. सुलतान अकबर व छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर पाठविलेली सेनादले काढून घेतली आहेत. हा निर्णय घेतल्यामुळे लोकांमध्ये तर्कवितर्क निर्माण झाले आहेत. छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेब बादशहाची फजिती अवघ्या काही वर्षांतच कशाप्रकारे केली होती याचे दर्शन होते. खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराज एका सिंहाचेच छावे कसे होते याचे यथार्थ दर्शन या सुरतकर इंग्रजांच्या पत्रातून होते. वरील पत्रावरून मराठे सैन्य औरंगजेब बादशहाशी किती निकराने सामना देत होते. आणि औरंगजेब बादशहास निर्विवाद विजय कसा प्राप्त होत नव्हता हे सिद्ध होते.



२३ एप्रिल इ.स.१६९४
छत्रपती राजाराम महाराजांनी राज श.२० वैशाख शुद्ध नवमीला इ.१६९४ एप्रिल २३ काढलेले एक अभयपत्र व एक आज्ञापत्र आहे. त्यांवरून असे दिसते की, तांब्राचा(मुघलांचा) ज्या ज्या वेळी पंढरपुरास त्रास होई तेव्हा विठ्ठलाची मूर्ती पंढरपूरच्या जवळ देगांव या खेड्यात लपवून ठेवीत, पण या खेड्यास मराठा लष्कराच्या वर्दळीच्यामुळे वारंवार उपद्रव होई. तेथे मूर्ती ठेविल्या असतांना उपद्रव झाला तर देगांवच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बरे नव्हे म्हणून ही पत्रे आहेत.



२३ एप्रिल इ.स.१७५२
मोगल बादशहा आलमगीर याचे मराठ्यांस प्रथम मुखत्यारपत्र
मराठे व दिल्लीकर बादशाह यांच्यात कनोज मुक्कामी बादशाहीचे अंतर्गत तसेच बाह्य शत्रूंपासून संरक्षण मराठ्यांनी करण्यासंबंधी अहदनामा ( करार ) झाला.
या "अहदनामा" नामक तहान्वये -
१) अब्दालीसारखा परकीय आक्रमक असो किंवा पठाण आणि रजपूत जाट असो, सर्व शत्रूपासून या डळमळीत साम्राज्याचं रक्षण करण्याच पेशव्यांनी मान्य केल आहे पेशवे बादशहाचा गेलेला मुलुख जिंकून त्याला परत करतील.
२) अब्दालीची हकालपट्टी करण्याकरता तीस लाख आणि इथल्या बंडखोरांच्या बदोबस्ताकरता वीस लाख असे एकूण पन्नास लाख रुपये पेशव्यांना मिळावेत.
३) पंजाब आणि सिंधची चौथाई (यात सियालकोट, पसरूर, गुजरात आणि अब्दालीला दिलेलं औरंगाबाद) तसंच हिसार, बदाऊं, संभळ आणि मुरादाबाद हे जिल्हे पेशव्यांना देण्याचं बादशहानं मान्य केलं आहे.
४) बादशहानं पेशव्यांची अजमेरची सुभेदारी (यात नारनौलची फौजदारी येते) आणिआग्र्याची सुभेदारी (यात मथुरेची फौजदारी येते) बहाल केली आहे. पेशव्यांनी तिथवसुली करून ह्या मुलुखातल्या असलेल्या हक्कांचा उपभोग घेणे आहे.
५) परंपरागत चालत असलेल्या चालीरीति आणि नियम सांभाळून ह्या मुलुखांचा कारभार पेशव्यांनी बघावा.
६) मोगल मनसबदारांप्रमाणे पेशव्यांच्या सरदारांनी दरबारात यावं आणि बादशहाच्या मोहिमांत भाग घ्यावा.


https://youtube.com/shorts/-Ifk-YVwvl4?feature=share
२३ एप्रिल इ.स‌.१८१८
दोनशे युरोपियन व दोनशे एतद्देशीय शिपायांसह इंग्रज अधिकारी मेजर हॉल यास कर्नल प्रॉयर याने रायगड किल्ल्याची टेहळणी करण्यास पाठविले.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/



हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.
108 views09:51
ओपन / कमेंट
2023-04-23 12:51:37 आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष

२३ एप्रिल इ.स.१६५७
महाराजांची स्वराज्याच्या उभारणीच्या सुरुवात
आदिलशाहाच्या ताब्यातील एकेक प्रदेश अतिशय झापाट्याने काबिज करून घेतला पण महाराजांनी आणखी एक डाव टाकला तो म्हणजे,
आदिलशाहीच्या जिंकलेल्या मुलुखाला मान्यता मिळवण्यासाठी आपल्या वकीलाला, सोनोपंत डबीर या शहाजीराजांच्या विश्वासातल्या अत्यंत मुत्सद्दी वकीलाला औरंगजेबाकडे वकील म्हणून पाठवले. औरंगजेबालाही आश्चर्यच वाटले, कारण महाराजांनी मुलुख तर जिंकला होता आदिलशाहाचा, आणि ते परवानगी मात्र मागत होते औरंगजेबाची !
बिचार्याच औरंगजेबाला वाटले, शिवाजीराजे आपल्याशी लढण्याआधीच आपल्याला वचकून राहतायेत, त्याने सोनोपंतांसोबत महाराजांना एक पत्र पाठवून दिले,
“… सांप्रत विजापूरकरांकडील जे किल्ले, जो मुलुख तुम्हांकडे आहे, त्यास आमची मंजुरी आहे. तूमच्यावर आमचा पूर्ण लोभ आहे…”
हे पत्र होते दि.२३ एप्रिल १६५७ चे पण औरंगजेबाला हे माहीत नव्हते की, आपल्याकडे जो माणूस वकील म्हणून आला आहे तो किती उचापती आहे.
सोनोपंतांनी औरंगजेबाला गोड बोलून झाडावर चढवून ठेवले आणि हळूच त्याच्या सैन्यात फेरफटका मारून त्याच्या सैनिकांकरवी मोंगलांच्या ‘आतल्या’ बातम्या काढून आणल्या आणि बरोबर एका आठवड्यानंतर दि. ३० एप्रिल १६५७ रोजी महाराजांनी आपल्यासोबत पाच-सहाशे मावळ्यांना घेऊन मोंगलांचे एक अतिशय महत्त्वाचे ठाणे, पेठ जुन्नर इथे छापा टाकला व लाखो रुपयांनी भरलेल्या जुन्नरच्या तिजोऱ्या रिकाम्या झाल्या.


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link
https://youtube.com/shorts/-Ifk-YVwvl4?feature=share

२३ एप्रिल इ.स.१६५७
(वैशाख वद्य षष्ठी, शके १५७९, संवत्सर हेमलंबी, वार गुरुवार)

महाराजांचे नगरचा मोगली सुभेदार मुल्तफखानास पत्र !
औरंगजेबाचे शिवाजीराजांना मेहेरबानीचे पत्र
शिर्षक वाचुन कदाचित आश्चर्य वाटले असेल परंतु, असे खरेच झाले होते. मात्र त्यामागची पार्श्वभूमी व त्यानंतर काय घडले हे लक्षात घेणे अगत्याचे ठरेल.
अगदी लहान वयातच शिवाजीराजांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले व त्याद्रुष्टीने पाऊले टाकायला सुरुवात केली. हळुहळु काही प्रदेश तसेच किल्ले त्यांनी जिंकुन घेतले. इस १६३६ मधे मुघल व आदिलशहात एक महत्वाचा तह झाला होता. त्या तहानुसार जिंकलेल्या निजामशाहीतील बालाघाट प्रदेशातील बरेचसे किल्ले मुघलांकडे तर, कोकणातील किल्ले आदिलशहाकडे राहणार होते. मात्र मधल्या काही वर्षात शिवाजीराजांनी जे किल्ले कधी भेद करून तर कधी लढुन जिंकले त्यातले बरेचसे किल्ले हे त्या १६३६ च्या तहानुसार मुघलांकडे असायला हवे होते. पण प्रत्यक्षात ते आदिलशहाकडे होते व शिवाजीराजांनी ते स्वराज्यात आणले याचे कारण नेमके समजत नाही पण बादशहा शहाजहानचे दख्खनकडे झालेले दुर्लक्ष व आदिलशहाने तह न पाळणे या दोन गोष्टी संभवतात. इस १६५२-५३ मधे शहाजहानने शाहजादा औरंगजेबाला दुसर्यांदा दख्खनचा सुभेदार म्हणुन पाठवले. नोव्हेंबर १६५६ मधे विजापुरचा मोहंमद आदिलशहा वारला त्यावेळी आदिलशाहीत अंतर्गत कलह चालु होता. सत्तेवर कोणाला बसवायचा यावरून मारामारी सुरु होती. औरंगजेबचे लक्ष आदिलशाहीकडे वळाले. त्यानुसार त्याने शहाजहानच्या परवानगीने युद्ध आरंभले व आदिलशहाच्या ताब्यातील बीदरचा किल्ला जिंकला.
त्याच सुमारास शिवाजीराजांनी नगरचा मुघल अधिकारी मुल्तफतखान याला पत्र लिहिले की, 'माझ्या मागण्या मान्य होत असतील तर मी शाही फौजेत (मुघलांच्या) दाखल होयला तयार आहे'
त्याच्याकडून अनुकूल उत्तर आल्यावर शिवाजीराजांनी औरंजेबाकडे आपले वकील सोनोपंत डबीर पाठवले व आपलै म्हणणे मांडले ते असे "विजापुरकरांकडील जो मुलुख व किल्ले माझ्याकडे आहेत ते मलाच मिळावेत व नुकताच उत्तर कोकणचा दाभोळ बंदरावरील जो भाग मी जिंकून घेतला आहे त्यालाही औरंगजेबाने मान्यता द्यावी"
या वेळेपर्यंत 'शिवाजी' म्हणजे काय पाणी आहे हे औरंगजेबाला बहुदा नीटसे माहीत नव्हते. म्हणुनच त्याने ही वरची महाराजांची 'मागणी' मान्य केली व तसे मान्यतादर्शक व मेहेरबानीचे पत्र २३ एप्रिल १६५७ रोजी महाराजांना पाठवले त्यात तो लिहितो "......सांप्रत जे किल्ले व मुलुख (आदिलशहाचा) तुमचे हाती होते ते पेशजीप्रमाणे होऊन तुमचे मनोगतान्वये बंदर दाभोळ व त्याजखालील मुलुखाचा महसूल तुम्हास दिला असे." म्हणजे बघा, मुलुख कोणाचा तर आदिलशहाच्या ताब्यातील , जिंकला कोणी तर शिवाजीराजांनी आणि त्याची मान्यता घेतली औरंगजेबाकडून म्हणजेच मुघलांकडुन.



२३ एप्रिल इ.स.१६८३
(वैशाख शुद्ध सप्तमी, शके १६०५, रुधिरोद्रारी संवत्सर, वार सोमवार)
96 views09:51
ओपन / कमेंट
2023-04-22 09:21:09
174 views06:21
ओपन / कमेंट
2023-04-22 09:20:31 आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष

२२ एप्रिल इ.स.१६६७
महाराज आग्र्याहून अकस्मातपणे पळून गेल्यामुळे औरंजेबाची नाच्चकी झाली, संशयापोटी त्याने मिर्झा राजांना दक्षिणेतून परत बोलवण्याचा हुकुम सोडला आणि औरंगाबादेस शहजादा मुअज्जम याला सुभेदार म्हणून नियुक्त केले, याच संधीचा फायदा घायचे छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवले आणि नरमाईचे धोरण स्वीकारून मुअज्जम सोबत बोलणी सुरु केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबास २२ एप्रिल १६६७ रोजी एक पत्र लिहिले
“हा बंदा गुलाम आपली नोकरी करून हुकुम पाळण्यात मोठे भूषण मनात आहे हिंदुस्तानच्या बादशहाची फौज मजवर चालून येत आहे त्यास टक्कर देण्याचे सामर्थ्य कोणात तरी आहे काय ? म्हणून माझी विनंती आहे कि माझा मुलगा संभाजी यास ४ हजाराची मनसब मिळावी माझ्याकडे जे किल्ले होते ते मी अगोदरच बादशाहाला दिले आहेत आणि माझी सर्व जिंदगी आपल्या सेवेस अर्पण आहे”
हे पत्र वाचून औरंगजेबाने महाराजांच्या वकिलास बोलावले आणि म्हणाला - “तुझ्या मालकास जाऊन त्यास कळव कि तुझे अपराध आम्ही माफ केले आहेत, आणि तुझ्या मुलास चाकर ठेवून घेतले आहे जो विजापुरी मुलुख तू काबीज करशील तो तुला देऊ, स्वताच्या मुलखातच कायम रहावे, तुझ्याकडे असलेला प्रत्येक महाल शहजाद्याकडे रुजू कर”
अश्या प्रकारे छत्रपती संभाजी राजे पुन्हा मुगली मनसबदार झाले. औरंगजेबाने पुन्हा मनसबदारी बहाल केल्या नंतर छत्रपती संभाजी राजे कार्तिक वद्य द्वीतियेला ९ ऑक्टो १६६७ रोजी औरंगाबादेस शहजादा मुअज्जम यास भेटावयास गेले.


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link
https://youtube.com/shorts/JqikxGzTqcg?feature=share

२२ एप्रिल इ.स.१६७५
(वैशाख शुद्ध सप्तमी, शके १५९७, संवत्सर राक्षस, वार गुरुवार)

भागानगरची लुट !
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याने गोवळकोंडा हद्दीतील भागानगर जवळील २, दोन संपन्न शहरे लुटून पुष्कळ संपत्ती मिळवली. त्याचबरोबर काही सावकारदेखील पकडून त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर उभे करण्यात आले.



२२ एप्रिल इ.स.१७३७
मराठ्यांनी बेलापूरचा किल्ला जिंकला
पोर्तुगिजांनी किल्ला बांधला त्यावेळी किल्ल्याला ५ बुरुज व भक्कम तटबंदी होती. गडाचा बालेकिल्ला ७५ फूट उंचीवर होता. गडावर २० तोफा होत्या. ३१ मार्च १७३७ रोजी नारायण जोशी यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला व २२ एप्रिल १७३७ रोजी हा गड मराठ्यांच्या ताब्यात आला.



२२ एप्रिल इ.स.१८१८
कर्नल मॅक्डोवेल याला त्र्यंबकगड घेण्यात अपयश आले.


YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/



हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.
170 views06:20
ओपन / कमेंट