Get Mystery Box with random crypto!

" छञपती श्री शिवाजी महाराज "

टेलीग्राम चैनल का लोगो chatrapat — " छञपती श्री शिवाजी महाराज "
टेलीग्राम चैनल का लोगो chatrapat — " छञपती श्री शिवाजी महाराज "
चैनल का पता: @chatrapat
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 3.58K

Ratings & Reviews

4.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

2

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 8

2023-04-03 07:11:12
333 views04:11
ओपन / कमेंट
2023-04-03 07:11:06 ३ एप्रिल इ.स.१६७९
(वैशाख शुद्ध तृतीया, शके १६०१, संवत्सर सिद्धार्थी, गुरुवार)

शंभूराजे दिलेर खानासह भूपाळगडावर :-
दिलेरखानाने छत्रपती संभाजी महाराज त्यांच्याकडे आल्याचा फायदा घेऊन मराठी मुलखांतील प्रदेश जिंकण्यास सुरुवात केली. छत्रपती संभाजी महाराज दिलेरखानाकडे गेल्यावर दिलेरखान व छत्रपती संभाजी महाराज यांनी ३ एप्रिल १६७९ रोजी स्वराज्यातील भूपाळगड जिंकला. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला मांजऱ्यानजीकच्या पर्वतावर बांधून त्याचे भूपाळगड असे नाव ठेविले होते. या किल्ल्यावर सामान, सरंजाम आणि मालमत्ता ठेवण्यात येत असे. गडावर लढाऊ शिबंदी व शूर शिपायांचा पक्का बंदोबस्त केलेला होता. मोगलांची फौज येत आहे असा पुकारा होतांच किल्ल्यांच्या आसमतांतील गावचे लोक किल्ल्यांत आश्रयास जाऊन राहिले. दिलेरखानाने शंभुराजेंच्या मदतीने भूपाळगड किल्ला घेतला. या वेळा किल्ल्यांचे किल्लेदार फिरंगोजी नरसाळा हे होते. दिलेरखानाने भूपाळगडची तटबंदी पाडून टाकली. यानंतर दिलेरखान व शंभुराजे विजापूरवर चालून गेले.



३ एप्रिल इ.स.१७९१
धारवाड किल्ल्यावर मराठा भगवा
टिपू सुलतानच्या धारवाड किल्ल्यावर हल्ला करणाऱ्या मराठा-इंग्रज फौजेचे नेतृत्व परशुरामभाऊ पटवर्धन करीत होते. ३ एप्रिल १७९१ रोजी किल्लेदाराने किल्ला रिकामा करून मराठ्यांच्या स्वाधीन केला.

https://youtube.com/shorts/fT_ay52OtaQ?feature=share
३ एप्रिल इ.स.१९४८
अजेय असा हा जंजिरा, २० सिद्दी सत्ताधीशांनंतर आलेल्या सिद्दी मुहमंदखान हा शेवटचा सिद्दी असताना, व त्या राज्याच्या स्थापनेनंतर ३३० वर्षांनी, म्हणजे ३ एप्रिल १९४८ रोजी ते राज्य भारतीय संघराज्यात विलीन झाले.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/



हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.
303 views04:11
ओपन / कमेंट
2023-04-03 07:11:06 आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

३ एप्रिल इ.स.१६८०
(चैत्र वद्य द्वितीया, शके १६०३, संवत्सर सिद्धार्थी, वार सोमवार)

महाप्रतापी स्वराज्य सुर्य अंधारला.
हिंदवी स्वराज्य संस्थापक (निर्माते) महाराजांना देवाज्ञा!
आपले स्वराज्य पोरके करून छत्रपती शिवाजी महाराजांचे महानिर्वाण झाले. रयत पोरकी झाली. मोहरीएवढ्या बिजातून एक अंकुर उमलावा व पाहता पाहता त्याचे वटव्रृक्षांत रुपांतर व्हावे. अफाट पसारा व्हावा असे हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवरायांच्या संकल्पनेतून साकारले होते. उण्यापुर्‍या ३५ वर्षांच्या कारकिर्दीत पुण्याच्या ३६ गावच्या पोटमोकासेदारीने पुणे जहागिरीतील आजुबाजूच्या सवंगड्यांच्या साथीने महाराजांनी हिंदवी स्वराज्याची सुरूवात आपल्या रक्ताभिषेकाने केली. पाहता पाहता महाराजांच्या मागे स्वराज्य उभे राहिले. संवगडी उभे राहिले. या सवंगड्यांच्या साथीने स्वराज्याचे हिंमतीचे पायदळ उभे राहिले अन् महाराज त्या पायदळाचे नेतृत्वकर्ते ठरून "नरपती" झाले. हळूहळू पायदळाबरोबर अश्वदल उभे राहिले. पागा सजल्या. पागेत घोडी फुरफुरू लागली अन् महाराज "हयपती" झाले. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून, गिरीकंदरातून राजांचे विजयी अश्व दौडू लागले. गजांतलक्ष्मी दारी येऊ लागली महाराज अन् "गजपती" झाले. रोहिडा, तोरणा घेऊन स्वराज्याचे तोरण बांधणारे राजे पुढे प्रतापगड, राजगड, रायगड, पुरंदर, सिंधुदुर्ग अशा अनेक किल्ल्यांवर स्वराज्याची तोरणे बांधली गेली. अन् महाराज "गडपती" झाले. याच बुलंद गडांनी परिसराची भुमी गडाच्या बलदंड आश्रयाने मुक्त होऊ लागली. आनंदवनभुवनी असल्याचा अनुभव जनतेला आला.
अन् महाराज "भुपती" झाले. खळाळल्या समुद्रावर तरांडी फिरून स्वराज्यांच्या भगव्याची पताका सागरावर डौलाने फडकू लागली. अन् महाराज "जलपती" झाले. आणि मग तमाम मराठी साम्राज्याची मान ताठ मानेने उंचावेल असे महाराज रायगडी सिंहासनाधीश्वर झाले अन् महाराज "छत्रपती" झाले. या साऱ्यांचा नुसता विचार जरी आपण केला तरी मन थक्क होऊन नतमस्तक व्हावे असा पसारा महाराजांनी मांडला. तमाम मराठी मनगटांत चैतन्य निर्माण करून ताठ मानेने हिंदु म्हणून जगण्याचा अधिकार छत्रपती शिवरायांनी रयतेला दिला. असे महाराज हे शिवयोगी जाण्याने ३ एप्रिल इ.स.१६८० रोजी स्वराज्य पोरके झाले. शिवभारत संपले अन् स्रृष्टी हिंदोळली.
शककर्ते छत्रपती शिवराय यांना त्यांच्या
महानिर्वाणदिनी त्रिवार मुजरा...


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link
https://youtube.com/shorts/fT_ay52OtaQ?feature=share

३ एप्रिल इ.स.१६६३
कोंढाणे जिंकण्यासाठी तानाजी मालुसरे यांची च का निवड केली?
३ एप्रिल १६६३ ला महाराजांनी पेशवे मोरोपंत पिंगळे व सोनदेव मुजुमदार यांना लिहिलेल्या पत्रात कोंढाणा किल्यावर फितुरी आहे. त्या साठी तान्हाजी मालुसरे यांना पाठवण्यात आले. या काळात तानाजी मालुसरे यांना गडाची खडा न खडा माहिती होती.



३ एप्रिल इ.स.१६६७
आग्र्याहून सुटका प्रकरणानंतर औरंगजेब व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात युद्धबंदीचा तह झाला. आग्र्याहून सुटका प्रकरणात सापडलेले रघुनाथ बल्लाळ कोरडे व त्र्यंबक सोनदेव डबीर यांना औरंगजेबाने सोडले. माहिती काढण्यासाठी यांचे अनन्वयीत हाल केले गेले पण या स्वामी निष्ठांनी तोंडही उघडले नाही.



३ एप्रिल इ.स.१६७४
इ.स.१६७४ मध्ये इंग्रजांची शिवाजी महाराजांसोबत तहाची बोलणी सुरू होती. यावेळी नारायण शेणवी सोबत मुख्य वकील म्हणून हेन्री ऑक्झेंडरची नेमणूक करण्यात आली. ३ एप्रिल रोजी दुपारी शेणवी आणि इंग्रज वकील शिवाजी महाराजांनी भेटला यावेळी राजापूरच्या वखारीची लुट केल्याने इंग्रजांचे जे नुकसान झाले होते त्याची भरपाई मिळावी याबद्दलची बोलणी झाली. शिवाजी महाराजांनी भरपाई देण्याचे मान्य केले. नुकसानीच्या रकमेबद्दल २५०० होन राजापूरच्या जकातीतून , २५०० होन १ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्यावर्षी व उरलेले ५००० होन पुढील दोन वर्षात द्यावे असे शिवाजी महाराजांनी मान्य केले.



३ एप्रिल इ.स.१६७४
"भीमजी पारख" मुद्रणयंत्राचा (प्रिंटिंग मशीन) पहिला भारतीय मालक...
"भीमजी पारख" हे इस्ट इंडिया कंपनीचे दलाल म्हणून काम करत असत. त्यांना (इंग्रजांच्या भाषेत) काही "ब्राह्मणी लिखाण छापण्यासाठी" (बहुदा देवनागरी असावे) मुद्रणयंत्र, मुद्रक व कागद हवे होते त्यासाठी त्यांनी जानेवारी १६७१ रोजी कंपनीकडे यांची मागणी केली होती. तब्बल तीन वर्षांनी म्हणजेच दिनांक ३ एप्रिल सन १६७४ रोजी भीमजी पारख यांना मुंबईत मुद्रणयंत्र (प्रिंटिंग मशीन), मुद्रक (छापणारा कारागीर) व कागद पाठविण्यात आले. मुद्रकाचा पगार दरसाल पन्नास पाऊंड ठरविण्यात आला होता.

257 views04:11
ओपन / कमेंट
2023-04-02 15:51:51
321 views12:51
ओपन / कमेंट
2023-04-02 15:51:48 पण मराठ्यांचे सैन्य अधिक होते म्हणून दिलेरखान हा तातडीने आपल्या सरदारांच्या मागोमाग पोहोचला आणि त्याने मराठ्यांचा मोड केला आणि तो परतला. मोगली आक्रमणात गडावरील सर्व माणसे कैद केली गेली. माणसांना सुखरूप जाऊ दिले जावे या युवराज शंभुराजेंच्या विनंतीनंतरही गडावरील ७००, सातशे माणसांना कैद करून त्यांचा एक हात कलम करून दिलेरखानाने आपल्या क्रृरतेचे दर्शन घडविले. दिलेरखानाने भुपाळगड चक्क जमीनदोस्त करून आपल्या नीच मानसिकतेचे दर्शन घडविले.



२ एप्रिल इ.स.१७२०
(शार्वरी नाम संवत्सरी, चैत्र शुद्ध षष्ठी, शके १६४२)
बाळाजीपंत कोल्हापूरची मोहीम झाल्यानंतर सातारला शाहूमहाराजांच्या भेटीकरिता आले. तेथून ते सासवडला परतले. एक-दोन दिवस गेले असतील तेच बाळाजीपंत अतिशय आजारी पडले. गेल्या दोन वर्षांतली सततची धावपळ, दिल्ली स्वारीनंतर लगेचच कोल्हापूरस्वारीची दगदग बाळाजीपंतांना मानवली नाही आणि शेवटी दि. २ एप्रिल १७२० रोजी शार्वरी नाम संवत्सरी, चैत्र शुद्ध षष्ठी, शके १६४२ ला क-हामाईच्या तीरावरच्या काळ्या वाड्यात बाळाजी विश्वनाथांचा मृत्यू झाला. शेवटपर्यंत शाहू छत्रपतींचे अन् स्वराज्याचे हित बघणारे अन् आता स्वराज्याने सुखाच्या गृहात पाऊल टाकताच कृतार्थ झालेले स्वराज्याचे एकनिष्ठ पाईक श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे काळाच्या पडद्याआड गेले.



२ एप्रिल इ.स.१७२६
पुण्यात येताच थोडी विश्रांती घेऊन श्रीमंत बाजीराव साताऱ्याला छत्रपती शाहूमहाराजांची भेट घेऊन आले. पुण्याला परत येताच बाजीरावांनी जिवाजी गणेश खासगीवाले यांना बोलावून घेतले. इ. स. १७२६ (२ एप्रिल १७२६- पेशवे दफ्तर) मध्ये शाहूमहाराजांनी पेशव्यांना पुणेगाव वंशपरंपरागत इनाम म्हणून दिला होता. परंतु, तरीही पेशव्यांचा स्वतःचा असा पुण्यात वाडा नव्हता. म्हणून बाजीरावांनी खासगीवाले यांना श्रीमंत पेशवे यांच्या इभ्रतीला अन् पराक्रमाला शोभेल असा, झोकदार आणि मजबूत वाडा (शनिवारवाडा) उभारण्याची आज्ञा केली. दोन दिवसात वाड्याचा नकाशा तयार झाला. पण वाडा नेमका कुठे बांधावा याबद्दल एकविचार होत नव्हता. शेवटी लालमहालाच्या पश्चिमेस आणि मुठेच्या दक्षिण तीरावर उत्तम जागा सापडली. बाजीरावांनी जागा पाहिली. शेजारीच श्री कसबा गणपती आणि शिवछत्रपतींचा पवित्र लालमहाल होता. बाजीरावसाहेबांनी ताबडतोब बांधकाम सुरू करण्यास सांगितलं.



२ एप्रिल इ.स.१८९४
राजर्षी शाहू महाराज राज्याभिषेक
कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च, इ.स. १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व शाहू हे नाव ठेवले. २ एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/



हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.
300 views12:51
ओपन / कमेंट
2023-04-02 15:51:48 आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

२ एप्रिल इ.स.१६६०
पन्हाळा च्या वेढ्यात जौहरच्या तोफांचा मारा पन्हाळागडावर पोहोचेना म्हणून राजापूरच्या इंग्रज वखारवाल्याकडे एका लांब पल्ल्याची तोफ व दारूगोळा याची मागणी केली. जौहरचे बळ सारखे वाढत होते. शृंगारपूरकर सूर्यराव सुर्वे व पालवणीकर जसवंतराव दळवी हे सैन्य घेऊन जौहरला सामील झाले. इंग्रजांच्या राजापूर वखारीचा मुख्य हेन्री रिव्हींग्टन होता, याने जौहरची मागणी मंजूर केली आणि इंग्रज गोलंदाजांची एक तुकडी, लांबपल्ल्याची मोठी तोफ व दारूगोळ्याचे पेटारे घेऊन हेन्री साथीदार फिलिप गिफर्ड आणि मिंगहॅमसह राजापुराहून २ एप्रिल १६६० रोजी निघाला, तो पन्हाळ्याच्या पायथ्याशी १० एप्रिल १६६० च्या सुमारास दाखल झाला. त्याने आपल्या तोफांचे पन्हाळगडाला मोर्चे लाऊन थेट तोफेला बत्ती दिली, अन् नुसती बत्ती दिली नाही तर शेजारी ब्रिटिशांचे निशाणही फडकावले. याला म्हणतात स्वतःच्या शौर्याबद्दलचा 'अधिक आत्मविश्वास'! महाराजांना अर्थातच गडावरून हे सारे दिसले होतेच. महाराज भयंकर संतापले. काही दिवसांपूर्वीच या इंग्रजांना आपण सवलत दिली, तेच आपल्यावर इतक्या लवकर उलटून आले!


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link

https://youtube.com/shorts/NG8Xf6fSv8Y?feature=share

२ एप्रिल इ.स.१६६३
(चैत्र वद्य अष्टमी, शके १५८५, शोभन, वार सोमवार)

महाराजांचे पत्र!
चिंताग्रस्त करणारी बातमी याच सुमारास किल्ले सिंहगडावरून आली होती. शाहिस्तेखानाने स्वराज्यात फंदफितुरीचे सत्र अवलंबले होते. तशातच किल्ले सिंहगडावर फितुरी करून भेदाने हा मोक्याचा गड आपल्या ताब्यात घेण्यासाठी भरपूर प्रयत्न सुरू केले होते. किल्ले सिंहगड मोगलांच्या घशात जाणे म्हणजे पुणे प्रांत हातातून जाण्यासारखे होते. त्यामुळे महाराजांनी अत्यंत तातडीने मोरोपंत पेशवे आणि निळोपंत मुजुमदार यांना पत्र पाठविले.



२ एप्रिल इ.स.१६७९
औरंगजेबाने जिझिया कर लादला
आलमगीर अर्थात औरंगजेबाने मोगल राजवटीतील मुस्लिमेतरांकडून जिझिया कर वसूल करण्यास पुनः चालू केले.
आता जिझिया म्हणजे काय? असा प्रश्न इथे सर्वांच्याच मनात आला असेल. कारण "अकबराने जिझिया कर बंद केला" इथपर्यंतच आपल्याला जिझियाबाबत माहिती आहे. पण हा जिझिया म्हणजे काय?
इस्लामच्या सुरुवातिच्या काळात मुस्लिम राजवटीत राहणार्‍या बिगर-मुस्लिमांसमोर केवळ दोनच पर्याय असत. एक तर धर्मांतर करून इस्लामचा स्वीकार करणे अथवा मृत्यू. मात्र पुढील काळात अपवाद म्हणून जिझिया कर देऊन "जिम्मी" म्हणजे दुय्यम नागरिक म्हणून जगण्याची परवानगी दिली गेली.
शेख हमदानीने लिहिलेल्या "जसीरात-ए-मुल्क" प्रमाणे जगण्यासाठी खलिफ़ा उमरने मुस्लिमेतरांना इस्लामी देशात पुढील अटी घातल्या.
१) त्यांनी नवीन मंदीर अथवा प्रार्थनास्थळ बनवू नये.
२) तोडलेल्या जुन्या इमारतीचे पुर्निर्माण करू नये.
३) मुस्लिम यात्रेकरूंना मुस्लिमेतरांच्या मंदीरात रहाण्यावर बंधन राहणार नाही.
४) कोणताही मुसलमान कोणत्याही बिगर मुस्लिम व्यक्तीच्या घरी ३ दिवस राहू शकेल. त्या काळात त्याने केलेले कोणतेही कृत्य गुन्हा मानला जाणार नाही.
५) जर मुस्लिमेतरांची सभा असेल त्या सभेत मुसलमानांना भाग घेण्यास प्रतिबंध न करणे.
६) मुस्लिमेतरांनी मुस्लिमांसारखी नावे ठेऊ नयेत.
७) त्यांनी मुस्लिमांसारखा पोषाख वापरू नये.
८) लगाम, खोगीर असलेला घोडा वापरू नये.
९) धनुष्य बाण व तलवार वापरू नये.
१०) अंगठी वापरू नये.
११) त्यांनी दारू विकू नये वा पिऊ नये.
१२) त्यांनी जुना पोषाख बदलू नये.
१३) आपले रितीरिवाज व धर्म यांचा प्रचार करू नये.
१४) आपल्या मृतांची शवे त्यांनी मुस्लिम कबस्तानाजवळ आणू नयेत.
१५) आपल्या मृत व्यक्तीबद्दल शोक व्यक्त करू नये.
१६) त्यांनी मुस्लिम नोकर ठेऊ नये.
१७) त्यांनी हेरगिरी करू नये वा हेरांना मदत करू नये.
यातील एखाद्या जरी अटीचा भंग झाला तर भंग करणार्‍याला मृत्यूदंड व त्याची मालमत्ता एखाद्या युद्धकैद्याप्रमाणे जप्त केली जाई.


https://youtube.com/shorts/NG8Xf6fSv8Y?feature=share
२ एप्रिल इ. स. १६७९
(वैशाख शुद्ध द्वितीया, शके १६०१, संवत्सर सिद्धार्थी, वार बुधवार)

युवराज शंभुराजेंना घेऊन दिलेरखानाचा किल्ले भुपाळगडावर हल्ला!
दिलेरखान आणि युवराज शंभुराजे किल्ल्याला भिडले.
चाकण येथील संग्रामदुर्गावर ५६, छपन्न दिवस शाहिस्तेखाना बरोबर झुंज देणारे व त्याला आपल्या अतुल पराक्रमाने चकित करणारे फिरंगोजी नरसाळा हे या किल्ल्याचे किल्लेदार होते. त्यांच्या बरोबर त्यांचा सहकारी म्हणून विठ्ठल भालेराव हे सबनीस होते. दिलेरखानाने मराठ्यांच्या विरुद्ध इखलासखान, राजा जसवंतसिंह बुंदेला, रशीद अली रोशनाई ऊर्फ इल्हामुल्लाहाखान यांना रवाना केले.
253 views12:51
ओपन / कमेंट
2023-04-01 09:17:46
129 views06:17
ओपन / कमेंट
2023-04-01 09:17:41 https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/



हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.
131 views06:17
ओपन / कमेंट
2023-04-01 09:17:41 आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष

१ एप्रिल इ.स.१६४७
(चैत्र शुद्ध सप्तमी, शके १५६९, संवत्सर सर्वजित, वार गुरुवार)

महाराज पुणे मुक्कामी!*
महाराज माँसाहेब जिजाऊसाहेब यांच्यासह खेडेबारे मुक्कामी. तीथुनच सुरूवातीला महाराजांनी माँसाहेब जिजाऊसाहेब यांच्यासमवेत स्वराज्याचा कारभार चालविला.


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link
https://youtube.com/shorts/AXNlVBEEphY?feature=share

१ एप्रिल इ.स.१६६५
दि. १ एप्रिल रोजी दिलेरखान वेगाने १५ कि. मी.वर असलेल्या सोनोरीवरुन पुरंदरच्या पायथ्याशी जाऊन पोहोचला. खानाने लगेच मोचेर्बंदी सुरू केली. स्वत: खान जातीने नेतृत्त्व करीत होता. मिर्झाराजे या वेढ्यापासून दीड कि. मी. असलेल्या नारायणगावापाशी आपली छावणी ठोकून राहिले.



१ एप्रिल इ.स.१६६९
औरंगजेबाने हिंदुंचे पवित्र क्षेत्र काशी विश्वेश्वराचे देऊळ पाडण्याचा हुकूम दिला. औरंगजेबाने मुअज्जमला परत बोलावले आणि त्या जागी बहादुरखान आला. सूर्यग्रहण होते, त्या मुहूर्तावर काशीविश्वेश्वराचे देऊळ पाडण्याचा हुकूम बादशहाने दिला. हिंदुंचे पवित्र क्षेत्र काशी आणि सार्‍या हिंदुजनांचे विश्वेश्वर हे आराध्य दैवत, जमीनदोस्त झाले. मथुरेचे केशवराजाचे मंदिर साफ केले आणि मथुरेचे "इस्लामाबाद" हे नामांतर झाले.



१ एप्रिल इ.स.१६७३
(चैत्र वद्य दशमी, शके १५९५, संवत्सर प्रमादी, वार मंगळवार)

मराठ्यांनी सातारा जवळचा "परळीचा किल्ला (सज्जनगड)" जिंकला.
सज्जनगडाच्या पायथ्याला परळी नावाचे गाव आहे.
या गावावरूनच किल्ल्याचे नाव परळी असे पडले. या गावात २ अतिशय जीर्ण अशी मंदीरे आहेत. सुरेख पण औरंगजेबाच्या हल्ल्यात त्या मंदीरांना उपद्रव झालेला आहे. मुंडी छाटलेला नंदी अजूनही मंदीरा समोर उभा आहे. पुर्वी अश्वलायन ऋषींनी या डोंगरावर तपश्चर्या केलेली होती म्हणून डोंगराचे नाव पडले अश्वलायन दुर्ग मग या परळी गावावरून डोंगराचे नाव पडले परळीचा किल्ला. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी नाव ठेवले सज्जनगड औरंगजेबाने जेंव्हा किल्ला जिंकला तेंव्हा त्याने नाव ठेवले 'नवरसतारा' पुन्हा मराठ्यांनी हा किल्ला जिंकून किल्ल्याचा 'सज्जनगड' म्हणून नामकरण विधी केला.



१ एप्रिल इ.स.१७३१
छत्रपती शाहूमहाराजांनी श्रीमंत बाजीरावांना गुजराथेत उतरण्याची परवानगी दिली. (१७३१) पेशवे गुजराथेत जात आहेत ही बातमी कळल्यावर त्र्यंबकरावही आपली फौज घेऊन श्रीमंत बाजीरावांच्या पाठलागावर गेले. पण शेवटी व्हायचे तेच झाले. त्र्यंबकराव दाभाडे आपल्या पिलाजी गायकवाड या सरदारानिशी बाजीरावांवर चालून आले. बाजीराव पेशवेही हुशार होतेच. दि. १ एप्रिल १७३१ रोजी गुजराथेतील डभईनजीक भिलापूरच्या मैदानात सेनापती दाभाडे आणि बाजीराव पेशवे यांच्यात लढाई जुंपली. पेशवे स्वतः घोड्यावर बसून लढत होते. त्र्यंबकराव मात्र हत्तीवर अंबारीत बसून सैन्याला सूचना देत होते. एकाएकी कसे झाले, कोणाच्या हातून झाले ते माहीत नाही. परंतु, त्र्यंबकरावांना बंदुकीच्या गोळीचा (जंबुरियाचा) जबरदस्त फटका बसला आणि गोळी वर्मी लागून त्र्यंबकराव दाभाडे पडले. त्र्यंबकराव पडले ही बातमी ऐकताच दाभाड्यांचे सैन्य चोहोदिशांना पळत सुटले. पिलाजी गायकवाडही पसार झाले. ते थेट तळेगावच्या दिशेने. कितीही झाले तरी त्र्यंबकराव हे स्वराज्याचे सेनापती होते. त्यांच्या वडिलांनी, आजोबांनी छत्रपतींकरिता स्वतःचे रक्त सांडले होते. युद्ध संपले, वैर सरले. बाजीरावाने मोठ्या मनाने त्र्यंबकरावांचे अंत्यसंस्कार केले.


https://youtube.com/shorts/AXNlVBEEphY?feature=share
१ एप्रिल इ.स.१८१७
पेशव्याने सुद्धा इंग्रजांशी लढाई करण्याकरिता गुप्तपणे तयारी चालविली होती. त्याने आपल्याकडील जडजवाहर व खजिना रायगड किल्ल्यात सुरक्षिततेसाठी पाठवून दिला. दिनांक १ एप्रिल १८१७ रोजी एल्फिन्स्टनने बाजीरावास एक कडक पत्र लिहून कळविले की त्रिंबकजीचा पाठलाग जर झाला नाही तर इंग्रज सरकारला आपल्याशी जाहीररीत्या युद्ध पुकारावे लागेल व त्याच्या बऱ्या वाइटाचे धनी तुम्हीच व्हाल. दिनांक ६ एप्रिलला बाजीरावाने एल्फिन्स्टनला भेटीस बोलाविले व नेहमीच्या पद्धतीने त्याने लाचारी दाखवून लाघवी बोलून डेंगळेच्या बाबतीत आपण निरपराधी आहोत अशी बतावणी केली.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
137 views06:17
ओपन / कमेंट
2023-03-31 10:19:25
202 views07:19
ओपन / कमेंट