Get Mystery Box with random crypto!

" छञपती श्री शिवाजी महाराज "

टेलीग्राम चैनल का लोगो chatrapat — " छञपती श्री शिवाजी महाराज "
टेलीग्राम चैनल का लोगो chatrapat — " छञपती श्री शिवाजी महाराज "
चैनल का पता: @chatrapat
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 3.58K

Ratings & Reviews

4.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

2

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 3

2023-04-21 09:11:29
230 views06:11
ओपन / कमेंट
2023-04-21 09:10:24 घाबरा होऊन बुनगे, तोफखाना, फौज मागे टाकून सडा ३ हजार ते ४ हजार फौजेनिशी चिनाब नदी उतरून जीवन रक्षणासाठी पळाला. आपल्या फौजेने नदीपर्यंत पाठलाग करून फौज व तोफखाना लुटून घेतला. चिनाब नदीवर उपाय चालला नाही. म्हणून भगवंते रक्षीला. एरवी श्रीमंतांचा प्रताप विस्तार पावला. या प्रांती आपली सलाबत भारी पडली. दक्षीनी फौज पुर्वी दिल्लीपलीकडे आली नव्हती ते चिनाबपर्यंत पोहोचली.‌चिनाबेस पाणी थोडके असते तरी अटकेपर्यंत जाती. पुढे पुल बांधोन फौजा पाण्यास अडचण भारी पडेल. छावणी इकडे करावी लागेल. इतक्या दूर छावणी करिता नये.‌ त्यात लोकही कष्टी करून लाहोर प्रांताचा बंदोबस्त करून श्रीमंत मागे फिरणार. यादिवशी भगवत्सत्ता प्रमाण".



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/



हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.
201 views06:10
ओपन / कमेंट
2023-04-21 09:10:24 आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष

२१ एप्रिल इ.स.१६५६
वीर मुरारबाजी देशपांडे स्वराज्यात दाखल!
१६५६ मधे शिवरायांना जावळीच्या स्वारीतून मोर्‍यांच्या तुर्‍यातले एक अमूल्य रत्न मिळाले होते. या रत्नाचे नाव होते –मुरारबाजी देशपांडे महाड तालुक्यातील किंजळोली हे मुरारबाजी देशपांडेंचे मूळ गाव. मुरारबाजी देशपांडे हे सुरूवातीला जावळीच्या चंद्रराव मोर्‍यांकडे काम करायचे.शिवरायांच्या जावळीवरील छाप्याच्या वेळी मुरारबाजींनी महाराजांविरूद्ध तिखट तरवार चालवली. एक पाऊलही पूढे सरकू देईनात. महाराजांनी मुरारबाजींमधील कतृत्व जाणले आणि त्यांना गोड शब्दात बोलून आपलेसे केले. तेव्हा पासून मुरारबाजी देशपांडे शिवकार्यात सामील झाले. पुरंदरावरील घनघोर रणसंग्रामात त्यांना आपलेसे करण्यासाठी दिलेरखानाने मुरारबाजींना जहागिरीचे अमीश दाखवले पण मुरारबाजींनी त्या जहागिरीवर थुंकून शिवकार्यात आपल्या चरित्राची समीधा सोडून आत्मार्पण केले.


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link

https://youtube.com/shorts/wxKFHWyAvnU?feature=share

२१ एप्रिल इ.स.१६७२
बहामनी राज्याच्या पाच शाह्या झाल्यावर कुत्बशाहीची स्वतंत्र सल्तनत इ. स. १५१२त सुरू झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य संपादनास सुरूवात केली त्यावेळी अब्दुल्ला कुत्बशहा राज्य करीत होता. तो २१ एप्रिल १६७२ रोजी निवर्तला. त्याच्यानंतर अबुल हसन ऊर्फ तानाशहा कुत्बशहा झाला. त्याने इ. स. १६७५ च्या अखेरीस मुसाफरखानास दिवाण पदावरून दूर केले. त्यावेळी राज्याचा सर्व कारभार मादण्णाकडे आला. मादण्णा व त्याचा भाऊ आकण्णा यांनी कर्नाटकाची व्यवस्था लाविली. छत्रपती बशिवाजी महाराजांची भेट तानाशहाशी घडवून आणिली. हिंदू-मुसलमान धर्म भेदास गौणत्व देऊन जीवनात समरस झालेल्या सर्व दक्षिणियांस संघटित करण्याचे काम शिवाजी महाराज व तानाशहा यांनी घडवून आणिले. आदिलशाहीचा मोगल बळी घेऊ पाहताच छत्रपती संभाजी महाराजांनी शक्य ती मदत देऊन आदिलशाही मोगलांपासून वाचविण्याचा प्रयत्न केला.



२१ एप्रिल इ.स.१६८०
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राज्यकारभार कोणी पहावा हा प्रश्न साहजिकच उभा राहिला. अर्थात परंपरा आणि रितीनुसार ज्येष्ठ पुत्र संभाजीराजांना अभिषेक करणे उचित होते. परंतु, छत्रपती संभाजीराजांच्या स्वभावाची सर्वांनाच धास्त वाटत होती. नुकतंच हे दिलेरखान प्रकरण झाल्यामुळे तर त्यांना कारभार देणे हे बहुतेकांना धोक्याचं वाटत असावं. अशातच महाराणी सोयराबाईंच्या मदतीने शेवटी मोरोपंत पिंगळे पंतप्रधान आणि अण्णाजी दत्तोपंत सचिव यांनी वैशाख शु.३, दि. २१ एप्रिल १६८० रोजी राजारामांना मंचकावर बसवले (राज्याभिषेक केला नाही!). याचवेळी मोरोपंत पिंगळे आणि अण्णाजी यांनी छत्रपती संभाजीराजे पुन्हा बंड करू नये म्हणून त्यांना पकडण्यासाठी पन्हाळगडाकडे सैन्यासह कूच केले.



२१ एप्रिल इ.स.१७४३
सवाई जयसिंगानी आपले वचन बिनचूक पाळले. त्यांच्या सांगण्यावरून बादशहाने माळव्याच्या सुभेदारीच्या सनदा मराठ्यास देण्याचे ठरवून तारीख ७ सप्टेंबर १७४१ रोजी माळव्याचा संपूर्ण कारभार दिवाणी व फौजदारीसुद्धा पेशव्यांचे हवाली केल्याचे फर्मान बादशहाने काढिले. त्या फर्मानात बादशहाने माळव्याची सुभेदारी शहाजादा अहमद ह्याचे नांवे करून पेशव्यास त्याची नायब सुभेदारी देण्यात आली. ह्यासंबंधी बादशहा व पेशव्यांमध्ये जो करार झाला त्या करारास जामीन म्हणून राणोजी शिंदे, मल्हारराव
होळकर, यशवंतराव पवार व पिलाजी जाधव यांजकडून बादशहाने तारीख २१ एप्रिल १७४३ रोजी कबुलायत लिहून घेतली. मराठ्यांना हे फर्मान मिळाल्यावर माळवा, बुंदेलखंड यातील लहान मोठ्या सत्ताधिशांचे पूर्वीचे बादशहाशी असलेले संबंध तुटून त्याची पुनर्घटना पुण्यास होऊ लागली. खुद्द जयपूरवाले मराठ्यांच्या छायेत आले. उत्तर हिंदुस्तानात मराठ्यांची सत्ता स्थिरावण्यास माळव्याचा ताबा मराठ्यास मिळणे आवश्यक होते. ते मराठ्यांनी साधल्यामुळे इथून मराठ्यांना उत्तरेत हातपाय पसरणे सोपे गेले.


https://youtube.com/shorts/wxKFHWyAvnU?feature=share
२१ एप्रिल इ.स.१७५८
मराठा सरदार हरी रघुनाथ याने लिहीलेल्या पत्राची नोंद!
"मुक्काम ऐरावती (रावीतीर) नदीतीर, अब्दुस्समदखान सरहिंद होते, त्यांचे पारपत्य श्रीमंतांनी करून सरहिंद व दुआब दोनही तालुके आदिनाबेग मोगलांचे स्वाधीन खंडणी ठरवून केले. तद्नंतर जहानखान व अब्दालीचा पुत्र २० हजार फौजेनिशी लाहोरात होता. त्याजवर चालोन गेले. बिपाशा (व्यास) नदीतून सड्या फौजा मानाजी पायगुडे, गंगाधर बाजी भिवराव, गोपाळराव गणेश रवाना केले. त्यांनी जाऊन गाठ घातली.
164 views06:10
ओपन / कमेंट
2023-04-19 12:17:29
333 views09:17
ओपन / कमेंट
2023-04-19 12:17:20 तख्तापुढे सिंहासनाचा म्हणून स्वतंत्र चौघडा होता व तो ठराविक वेळीं गर्जत असे. तख्तापुढे दरवर्षी एक बकरे बळी म्हणून दिले जाई. सिंहासनाजवळ राजहुडा होता व तेथे स्वतंत्र पाहारा असे. सिंहासनाच्या चौथऱ्याची जपणूक एखाद्या दैवताप्रमाणे होत असे. अश्या प्रकारे एखाद्या जागृत व तेजस्वी देवस्थानाप्रमाणे रायगडावरील शिवछत्रपतींच्या राजसिंहासनाची व्यवस्था उत्तर पेशवाईत ठेवली गेली होती.


https://youtube.com/shorts/s5QibJUoqP8?feature=share
१९ एप्रिल इ.स.१९१०
क्रांतिवीर अनंत कान्हेरे, क्रांतिकारक कृष्णाजी गोपाळ कर्वे, क्रांतिकारक विनायक नारायण देशपांडे यांना नाशिकाचा कलेक्टर जॅक्सन याच्या हत्येसंदर्भात फाशी दिली गेली.

अनंत कान्हेरे हा गणेश(बाबाराव) दामोदर सावरकर आणि
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांच्या अभिनव भारत ह्या अंतराष्ट्रीय सशस्त्र क्रांतीकाराक संघटनेचा एक सदस्य होता. कलेक्टर जँक्सन बाबारावांच्या अटकेसाठी
जवाबदार होता. त्याची नाशिक मधून मुंबईत बदली होणार होती. त्याच्या निरोपासाठी नाशिकमधल्या विजयानंद थिएटरमध्ये शारदा ह्या नाटकाचा प्रयोग ठेवला होता . जँक्सन मराठी नाटकाचा चाहता होता म्हणून तो नाटक पाहण्यासाठी येणार होताच. नाटक सुरु होण्याची वेळ
झाली असता सर्वजण आपापल्या जागेवर स्थानपन्न
होत असताना अनंताने जँक्सनवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. जँक्सन जागीच ठार झाला. ती पिस्तुल स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लंडनमधून गुप्तरीतीने पुस्तकामध्ये ठेऊन पाठवलेल्या २२ ब्राऊनी बनावटीतील
पिस्तुलांपैकी एक होती. अनंताला कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे ह्या समवयस्कर साथीदारांची जोड मिळाली. जँक्सनचा वध केल्यानंतर अनंत आपल्या जागेवर शांतपणे उभा राहिला . त्याला अटक करण्यात आली . कान्हेरे , कर्वे , आणि देशपांडे ह्यांच्यावर खटला भरण्यात आला . २० मार्च १९१० रोजी त्यांना फाशी ठोठावण्यात आली . आणि १९ एप्रिल १९१० या दिवशी ठाण्याच्या तुरुंगात फाशी देण्यात आली .



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/



हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.
273 views09:17
ओपन / कमेंट
2023-04-19 12:17:20 शत्रूने स्वारी केल्यावर, त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी पेशव्यांची होती; पण कारभारी नेमणे, तालुक्याचे जमाखर्च पाहणे वगैरे गोष्टींबाबत पेशव्यांस अधिकार नव्हता. शाहू महाराजांनी या तालुक्याचा कारभार यशवंत महादेव यांकडे दिला होता.
छत्रपतींची राजधानी रायगडाहून हलल्यामुळे रायगडाचे राजकीय महत्व कमी झाले होते. मात्र तरीही रायगडाची व्यवस्था अत्यंत चांगल्या प्रकारे ठेवलेली होती. शिवकालीन दप्तरातील अनेक तत्कालीन कागदपत्रें याची पुष्टी देतात. ह्या कागदपत्रांत शिवछत्रपतींच्या सिंहासनाची जी व्यवस्था आढळतें ती कौतुकास्पद आणि जाणून घेण्यासारखीच आहे.
इ.स.१७७३ मध्यें पेशव्यांनी सिंहासनाबाबत काही गोष्टी आणि रिवाज कायमचे ठरवून टाकले. सिंहासनास चार खांब होते. सिंहासन गजनी, किनखाप, ताफता अश्या बहुमूल्य कापडाने आच्छादिले जात असे. १६ मार्च १७७३ रोजीचा सिंहासनाच्या कापडाच्या खर्चाचा हिशेब उपलब्ध आहे. एकूण १६०८ रुपयांचे कापड २२८ रु. गजनी, २२० रु. ताफता, ८१२ रु. किनखाप, १६ रु. खारवे आणि ३३२ रु.ची मखमल अशा प्रकारे खर्ची पडले. सिंहासनाच्या बैठकीचा भाग व तलाव्याचा भाग यांस कापडण्यासाठी हा खर्च पडला. खर्चास सरकारी मंजुरी मिळत असे. त्यानंतर बारा वर्षांनी हा सगळा वस्त्रसंभार जीर्ण झाल्यामुळे इ.स. १७८६-८७ मध्ये पुन्हा याच स्वरूपाचा खर्च झाला. नंतर १९ एप्रिल १७९७ रोजी पुन्हा सिंहासनाचा गलेफ तयार केला. यावेळी सिंहासनाच्या खांबास लाल मखमल वापरली होती. इ.स. १७९७ मध्ये सिंहासनास २७३८ रुपयांचे कापड खर्ची पडले. त्या कापडाचा तपशील असा, १३९८ रु.चे किनखाप, ५३८ रु. गजनी, २०८ रु. ताफता, २५ रु. खारवा व ५७० रु.ची मखमल. हे कापड किती लांबीरुंदीचे लागले हेही गजवार दिले असल्यामुळे त्यावरून सिंहासनाची लांबीरुंदी अजमावता येते आणि ती आज सिंहासन म्हणून असलेल्या स्थलाच्या मोजमापाशी जमते. कागदपत्रांत सिंहासनाच्या कापडाची लांबी ५ गज ४ तसू (अदमासे १५ फूट २ इंच) व रुंदी ४ गज ४ तसू (अदमासे १२ फूट) दिलेली आहे. प्रत्यक्षात सिंहासनाच्या चौथऱ्याची लांबी १३ फूट व रुंदी १२ फूट आहे. अर्थात कागदांतील कापड अधिक आहे. पण ते सिंहासनावर घालायचे कापड आहे त्यामुळे ते साहजिकच सिंहासनापेक्षा मोठेच असणार. यामुळे सिंहासनाच्या चौथऱ्याची स्थाननिश्चिती होते.
'सिंहासन' आणि 'तख्त' ह्या दोन वेगवेगळ्या संज्ञा होय. सिंहासन म्हणजे तेरा फूट लांब व बारा फूट रुंद असा ओटा, आणि तख्त म्हणजे त्या ओट्यावरील राजाने स्वतः बसावयाचे आसन. ह्या आसनावर शेला आणि गलेफ अशी दोन प्रकारची वस्त्रें घातली जायची. गलेफांतही दोन प्रकार होते. सिंहासनावर चौखांबी मंडप होता. ह्या मंडपाच्या खांबांना खारव्याचे अस्तर असलेल्या मखमलीचे वेष्टन असे व त्याचे माप नऊ गज म्हणजे २५ फूट होते. ह्या सिंहासनाच्या मंडपास छत म्हणजे झालर असलेला चांदवा लावलेला होता. हा चांदवा किनखापी तर झालर ताफत्याची असायची. ह्या किनखापी चांदव्यास गजनीचे अस्तर असे.
रोज संध्याकाळी सरकारी माणसे सिंहासनाजवळ जमून सिंहासनास मुजरा घालीत असत व तेथे दिवटी लावीत असत. येथे रात्री सतत दिवटी असे. गडावरच्या इतर काही ठिकाणांप्रमाणेच तख्ताजवळही रात्रभर दिवा जळत असावयाचा, असा शिरस्ताच (नियम) होता. तख्ताजवळ मशालेस पोत म्हणूनही खर्च पडला आहे. ह्या सिंहासनाची दररोज पूजा होत असे. त्याचा 'तख्त पुजारी' म्हणून 'महाराजांचे तख्ताचे पूजेस फरास' असा निर्देश आला आहे.
सिंहासनाच्या व्यवस्थेचा आणखी विशेष म्हणजे सिंहासनासमोर दरवर्षी कीर्तन होत असे. हें कीर्तन करण्याचे काम बिरवाडीच्या योगी घराण्याकडे वंशपरंपरागत होते. ह्या कीर्तनकारास जमीन इनाम दिली होती. हे कीर्तन प्रतिवर्षी निरनिराळ्या तिथींस होत असे. उदाहरणार्थ, जन्माष्टमीचा उत्सव सिंहासनाजवळ होई. इ.स. १७७८ मध्ये या उत्सवास १५ रु. खर्च आला. या उत्सवास गोरेगावकर हरिदास बोलावीत. त्यास ५ रु. बिदागी मिळे.
सिंहासनाजवळ केवळ सिंहासनाचाच म्हणून नगारखाना इ.स. १७९७ पासून नाना फडणीसांनी सुरू केला. ह्यासंबंधीचा उल्लेख - "रा. बालाजी जनार्दन फडणीस माहाडास आले, ते तेथून किल्ला पाहाण्यास आले ते समई शिवाजी महाराजांचे तख्ताजवळ नगारखाना ठेवावयाची परवानगी सांगितली त्यावरून सन सवा तिसैनापासून ठेविला." सन सवा तिसैन म्हणजे शके १७१८, इ.स. १७९७. ह्या नगारखान्याच्या खर्चाची वार्षिक नेमणूक १३०० रु. असे. नाना फडणीसांनी सिंहासनासमोर नगारखाना ठेवण्याची जी खास व कायमची व्यवस्था केली, तिचे स्वरूप पुढीलप्रमाणे - २ सुर्णाजी, १ तुतारजी, २ कर्णाजी, २ दमामजी, १ डफगर, १ झांजवाला, २ घड्याळजी, ३ नगारजी व पेलेदार, १ नगारे करणार इतकी माणसे कायम नेमली. इ.स. १८०७-०८ मध्ये त्यांचे वार्षिक वेतन १२०० रुपये इतकेे होते.
178 views09:17
ओपन / कमेंट
2023-04-19 12:17:20 आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

१९ एप्रिल इ.स.१६७३
छत्रपती शिवाजी महाराजांची हुबळीवर स्वारी
अली आदिलशहा २४ नोव्हेंवर १६७२ रोजी मरण पावला. त्याचा सात वर्षांचा मुलगा सिकंदर आदिलशहा गादीवर आला. तेव्हा विजापूरचा सरदार रुस्तुम जमान याने त्याच वर्षी बंड केले. विजापूरच्या अंतर्गत गोंधळाचा फायदा घेऊन महाराजांनी विजापूर राज्यावर १६७३ मध्ये आक्रमण केले.


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link
https://youtube.com/shorts/s5QibJUoqP8?feature=share

१९ एप्रिल इ.स.१६८०
(वैशाख शुद्ध प्रतिपदा, शके १६०२, संवत्सर रौद्र, वार सोमवार)

पन्हाळगडावर असंख्य सैन्याची छत्रपती संभाजी महाराजांकडे धाव!
महाराजांच्या निधनाची बातमी गुप्त ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला असला तरी इतकी संवेदनशील बातमी गुप्त राहणे शक्यच नव्हते? शंभुराजेंचेही हेर खाते प्रबळच होते. त्यामुळे कर्णोपकर्णी ही बातमी शंभुराजेंना समजली. इतकच नव्हे तर म्रुत्यूसमयी महाराजांच्या जवळ फारशी मातबर असामी नसून महाराजांचे अंतिम संस्कार साबाजी भोसले यांच्याकडून केल्याचेही कळले! महाराजांच्या महानिर्वाणाच्या बातमीनंतर शंभुराजेंना अतीव दुःख झाले याची कल्पना फक्त "तो काळ" करू शकतो! शंभुराजेंनी किल्ले पन्हाळ्यावरच महाराजांचे श्राद्ध आटोपले आणि शंभुराजेंना दुसरी बातमी समजली की, प्रधान मंडळातील काही जणांनी राजारामराजेंना गादीवर बसवून कारभार करण्याचा निर्णय घेतला आहे! मात्र प्रजेमध्ये आणि सैन्यामध्ये शंभुराजे प्रचंड लोकप्रिय असून निसर्ग न्यायानुसार महाराजांच्या नंतर राजगादीवर शंभुराजेंचाच हक्क असल्याने किल्ले पन्हाळ्यावरचे असंख्य सैन्य शंभुराजेंकडे धाव घेत होते. आता शंभुराजेंनी आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी योग्य ती पावले टाकली!



१९ एप्रिल इ.स.१७३६
मराठे सरदारांमध्ये एकोपा नसल्यामुळे जंजिऱ्याच्या सिद्दीचा पाडाव लांबणीवर पडला. त्यामुळे चिपळूण मधील ब्रह्मेद्रस्वामींचे हबशास जिंकण्याचे टुमणे छत्रपती शाहू महाराजांस सतत जाचू लागले. गोवळकोट आणि अंजनवेल काबीज केल्याशिवाय सिद्दी सात शरण येणार नाही व चिपळूणच्या परशुराम क्षेत्राची झालेली हानी भरून येणार नाही हे शाहू महाराजास ठाऊक होते. पण शाहू छत्रपतींच्या हुकूमाने संभाजी आंग्रे यांनी जंजिऱ्याची मोहिम तशीच चालू ठेविली. दरम्यान सिद्दी सातास
फितविण्याचाही उपक्रम शाहू छत्रपती व स्वामी यांनी आपआपल्यापरी चालविला. पण संभाजी व मानाजी आंग्रे या आंग्रे बंधूंच्या तंट्यामुळे जंजिऱ्यावरील मोहिमेचा परिणाम निष्फल होत होता. शाहू छत्रपतींनी उदाजी पवार व पिलाजी जाधव यांस कोंकणात पाठविले. पिलाजींनी बाणकोट फत्ते करून पुढे गोवळकोट व अंजनवेलवर चाल केली. या आक्रमणास आळा घालण्याचा सिद्दी सातने चंग बांधला. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी चिमाजी आप्पांस मुद्दाम शाहू छत्रपतींनी कोंकणात पाठविले. मानाजी आंग्र्यांनी चिमाजीस साथ दिली. चिमाजी २० मार्च १७३६ रोजी कोंकणात गेले. रेवास नजीक कामारले तर्फ श्रीगांव येथे सिद्दीची व मराठ्यांची लढाई झाली. तीत सिद्दीचे १,३०० व मराठ्यांकडील ८०० लोक पडले. सिद्दी सात स्वतः कामास आला. “राज्य घेईन, नाहीतर मरून जाईन" अशा निकराने सिद्दीसात लढला. त्यास पळून जाण्याची संधी दिली असता त्याने तसे न करता तो लढला व समरांगणी पडला (१९ एप्रिल १७३६). उंदेरीचा किल्लेदार सिद्दी याकूबही वरील लढाईत मारला गेला. या विजयाने मराठा मंडळास मोठा आनंद झाला. हबशांचे दोन प्रबळ सरदार पडल्यामुळे दुसऱ्या पक्षाचा प्रमुख सीद्दी रहमान याने पेशव्यांशी पूर्वीचा तह कायम करून युद्ध थांबविले. अंजनवेल व गोवलकोट ही स्थळें तूर्त हबशांकडे राहिली. पैकी अंजनवेल तुळाजी आंग्र्यांनी २३ जानेवारी १७४५ रोजी काबीज केली व लगेच गोवळकोटही घेतले. परशुराम क्षेत्राजवळचा हा किल्ला कबजात आलेला पहाण्याचे भाग्य ब्रह्मद्रस्वामीस लाभले.



१९ एप्रिल इ.स.१७९७
रायगडावरील शिवछत्रपतींच्या सिंहासनाचा गलेफ तयार केला
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही रायगडच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची आणि गौरवशाली घटना आणि शिवछत्रपतींच्या तख्ताची म्हणजे सिंहासनाची जागा ही रायगडावरील सर्वात महत्त्वाची आणि पूजनीय जागा. दिनांक ६ जून १६७४ रोजी रायगडावर महाराज सिंहासनाधिश्वर झालें. पुढें इ.स. १६८९ मध्यें रायगड मोगलांच्या ताब्यात गेला. नंतर १७३३ मध्यें रायगड श्रीपतराव पंतप्रतिनिधींच्या करवीं छत्रपती शाहू महाराजांकडे आला. तेव्हा पासून रायगडावरील सिंहासनाची व्यवस्था चालू झाली. इ.स. १७३५ पासून १७७२ पर्यंत रायगड तालुका हुजूरचा प्रदेश होता.
172 views09:17
ओपन / कमेंट
2023-04-18 13:20:11
249 views10:20
ओपन / कमेंट
2023-04-18 13:20:07



१८ एप्रिल इ.स.१८५९
तात्या टोपे यांना फाशी दिली गेली
इंग्रजांविरुद्ध मुकाबला करणारा १८५७ च्या उठावातील एक प्रसिद्ध सेनानी. संपूर्ण नाव रामचंद्र पांडुरंग भट (येवलेकर). टोपे या त्याच्या उपनावाबद्दल तज्ञांत एकमत नाही. तथापि तत्संबधी दोन भिन्न मते आहेत :

(१) बाजीराव पेशव्याने त्यास मूल्यवान अशी टोपी दिली व ती तो अत्यंत जपत असे.

(२) काही दिवस त्याने ईस्ट इंडिया कंपनीच्या तोफखान्यावर काम केले.

त्यावेळेपासून हे नाव रूढ झाले असावे. प्रथम तो पेशव्यांकडे तोफखान्यावर नोकरीस होता. सु. ३० वर्षे त्याने मध्य भारतात अनेक संस्थानिकांकडे तोफखान्यावर काम केले. पुढे तो ब्रह्मवर्त येथे नानासाहेब पेशव्यांकडे नोकरीस होता.

त्याने १८५७ मध्ये सैन्याची जमवाजमव करून नानासाहेब, लक्ष्मीबाई वगैरेंच्या मदतीने इंग्रजांशी अनेक ठिकाणी मुकाबला केला, काही महत्त्वाची स्थळे जिंकली आणि ग्वाल्हेर येथे नानासाहेबांची पेशवे म्हणून द्वाही फिरवली. १८५७ चा उठाव मीरत, दिल्ली, लाहोर, आग्रा, झांशी, ग्वाल्हेर इ. ठिकाणी पसरला.

उठावात तात्याने नानासाहेब पेशव्यांना संपूर्ण सहकार्य देऊन नानासाहेबांबरोबर वाराणसी, अलाहाबाद इ. ठिकाणी दौरे काढले. जून १८५७ मध्ये जनरल हॅवलॉकने कानपूरला वेढा दिला, त्या वेळी तात्याने महत्त्वाची कामगिरी बजावली; परंतु तात्या, रावसाहेब, ज्वालाप्रसाद यांचा १६ जुलै १८५७ रोजी पराभव होताच, तात्या व इतर मंडळी अयोध्येला गेली. त्यांनी कानपूरवर हल्ला करण्यासाठी विठूरला मुक्काम ठोकला; परंतु तेवढ्यात १६ ऑगस्ट १८५७ रोजी हॅवलॉक विठूरवर चालून गेला. तात्या व त्याचे सहकारी शौर्याने लढूनही इंग्रजांचाच जय झाला.

शिंद्यांचे सैन्य आपल्या बाजूला वळवून घेण्यासाठी तात्या व रावसाहेब ग्वाल्हेरला गेले. तेथून पुढे जाऊन त्यांनी काल्पी येथे छावणी केली. १८५७ च्या नोव्हेंबरमध्ये तात्याने कानपूरवर चढाई करून जनरल विनडॅमचा पराभव केला आणि कानपूर शहर ताब्यात घेतले; परंतु थोड्याच दिवसांत सर कोलिन कँबेलने अचानकपणे हल्ला करून तात्याचा पराभव केला. कानपूर जिंकण्याचा तात्याचा प्रयत्न फसला, तरी इंग्रजांना हैराण करण्याची त्याची जिद्द कमी झाली नाही.

याच सुमारास सर ह्यू रोझच्या नेतृत्वाखाली इंग्रजांनी झांशीला २२ मार्च १८५८ रोजी वेढा दिला. तात्या झांशीच्या लक्ष्मीबाईच्या मदतीस धावून गेला; परंतु ह्यू रोझ पुढे त्याचा निभाव लागला नाही. त्यांना माघार घ्यावी लागली. पुढे ते सर्व ग्वाल्हेरला गेले. तात्या, लक्ष्मीबाई व रावसाहेब यांनी एकत्र होऊन ग्वाल्हेरवर हल्ला केला. ग्वाल्हेर काबीज केले; पण सर ह्यू रोझने ते पचू दिले नाही. या युद्धात लक्ष्मीबाई मरण पावली. तात्याने यापुढे गनिमी काव्याने इंग्रजांना हैराण करण्याचे ठरविले. त्याला पकडण्यासाठी इंग्रजांनी त्याचा एक वर्षभर पाठलाग केला. या पळापळीत २१ जून १८५८ ते ९ ऑक्टोबर १८५८ पर्यंत जावरा, अलीपूर, राजगढ, इसागढ, चंदेरी, मंग्रौली इ. ठिकाणी तात्याने लढाया जिंकल्या.

१० ऑक्टोबर १८५८ रोजी मंग्रौली गावी तात्याचा पराभव झाल्यावर ललितपूर येथे त्याची व रावसाहेबाची गाठ पडली. इंग्रज त्याच्या पाठलागावर असताना त्या दोघांनी महाराष्ट्रात शिरण्याचा प्रयत्न केला. नागपूर, मंदसोर, झिरापूरवरून ते कोटा संस्थानात नाहरगढला गेले.

इंद्रगढला त्यांनी १३ जानेवारी १८५९ रोजी फिरोजशाहाची भेट घेतली. फिरोजशाह व तात्या देवास येथे थांबले. तेथे इंग्रजांनी छापा घातला. फिरोजशाहाने तात्याला सोडल्यामुळे, तात्या दोन स्वयंपाकी ब्राम्हण व एक मोतदार यांच्यासह शिंद्यांचा सरदार मानसिंग याच्या आश्रयास गेला; परंतु मानसिंगाच्या विश्वासघातामुळे जनरल मीडने तात्याला कैद केले. त्याला प्रथम सीप्री येथे नेण्यात आले. त्याची धैर्य व गंभीर वृत्ती शेवटपर्यंत ढळली नाही. सतत पराभव होऊनही तो शेवटपर्यंत डगमगला नाही. १८ एप्रिल १८५९ रोजी तात्याला फाशी देण्यात आले. तात्याबरोबरच १८५७ चा उठावही समाप्त झाला.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/



हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.
212 views10:20
ओपन / कमेंट
2023-04-18 13:20:07 आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

१८ एप्रिल इ.स.१६६०
"अमिर-उल-उमराव नवाबबहादूर मिर्झा अबू तालिब" उर्फ शायिस्ताखान, नात्याने औरंगजेबाचा मामा २८ जानेवारी १६६० या दिवशी खान औरंगाबादहून आपल्या सैन्या निशी दख्खनेत निघाला. मजल दरमजल करीत खान नगरला ११ फेब्रुवारी १६६० या दिवशी आला. २५
फेब्रुवारीला त्याने नगर सोडले. त्यानंतर खान दौंडनजीक सोनवडीस ३ मार्च १६६० पोहोचला. तिथून खान बारामतीस निघाला, खानची पुण्याच्या दिशेने मजल दरमजल पोहोचत होती. १८ एप्रिल १६६० रोजी खान शिरवळास आला. खान आता राजगड, पुरंदर, सिंहगड यापासून थोड्या अंतरावर होता. मराठे अधूनमधून खानावर छापा घालतच होते. महाराज या वेळी पन्हाळ्यावर अडकले होते.


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link




१८ एप्रिल इ.स.१६७७
त्र्यंबक सोनदेव डबीर यांचे निधन.
आग्र्यामध्ये रघुनाथ बल्लाळ कोरडे व त्र्यंबक सोनदेव डबीर हे शिवाजी महाराजांचे अत्यंत जवळचे साथीदार, सोमवार २० ऑगस्ट १६६६ रोजी फुलौतखान कोतवालाने केलेल्या झाडाझडतीत सापडले सापडले. शिवाजी राजांचे आग्र्याहून सुटकेचे गुढ उकलवून घेण्यासाठी त्यांचे जे हाल झाले ते पाहून प्रत्यक्ष यमराजही कळवळले असतील. पण त्या स्वामिनिष्ठांच्या मुखातून 'ब्र' ही निघाला नाही. जर बोलले असते तर छत्रपती संभाजी राजे मथुरेतून खासच पकडले गेले असते व दोघांनाही औरंगजेबाने मालामाल केले असते.
या दोघांना लाकडी खोड्यात करकचून आवळण्यात आले. हे सर्व हाल छत्रपती शिवाजी महाराज कसे गेले, कुठे गेले, कोणत्या मार्गांनी गेले याचा शोध घेण्यासाठी फुलादखानाने चालवले होते. या दोन्ही वकिलांच्या नाकांच्या पाळ्या चिमट्यात धरून त्यांची डोकी वर करण्यात आली. मीठ कालविलेल्या गरम पाण्याच्या पिचकाऱ्या नाकपुड्यांत घालण्यात आल्या आणि त्या पिचकाऱ्यांतील पाणी जोराने त्यांच्या नाकात मारण्यात येत होतं आणि इतर प्रकारे तर अनेक हाल, छळवणूक. या दोघांची सुटका कशी करता येईल, याची चिंता महाराज करीत होते.
महाराजांनी आग्ऱ्यात कैदेत अडकलेल्या डबीर आणि कोरडे या आपल्या दोन वकीलांच्या सुटकेसाठी औरंगजेबास एक पत्र लिहिले आहे. त्याचा मराठी भाषेतील तजुर्मा सापडला आहे. संपूर्ण पत्रच वाचण्यासारखे आहे. ते मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा यात छापले आहे. त्यातील मुख्य विषय असा की, 'मी आपली परवानगी न घेता आग्ऱ्याहून निघून आलो , याचे मला वाईट वाटते. मी पूवीर्प्रमाणेच आपल्याशी नम्र आहे.'
औरंगजेबानेही एकूण आपली परिस्थिती ओळखली होती. त्याने त्र्यंबक सोनदेव डबीर आणि रघुनाथ बल्लाळ कोरडे या दोन वकीलांची दि. ८ एप्रिल १६६७ रोजी सुटका केली.
सुमारे नऊ महिने यमयातना सहन करून ते दोघे वकील सुटले आणि राजगडावर येऊन पोहोचले. त्यांच्या भेटीने महाराजांना आणि महाराजांच्या भेटीने त्यांना काय वाटले असेल? येथे शब्द थबकतात. प्रेम ना ये बोलता, ना सांगता, ना दाविता, अनुभव चित्ता चित्त जाणे! १८ एप्रिल १६७७ रोजी त्र्यंबक सोनदेव डबीर यांचे निधन झाले.



१८ एप्रिल इ.स.१६९९
१८ एप्रिलला औरंग्यास समजले की मराठ्यांचे सहा हजार स्वार गुलबर्याच्या जवळ येऊन त्यांनी कित्येक खेडी लुटून जाळपोळ केली. हीरापेठ लुटली. बादशहाने त्याचे पारिपत्य करण्यासाठी तरबियतचा भाऊ कामयाब यास रवाना केले.



१८ एप्रिल इ.स.१७२०
शार्वरीनाम संवत्सर शके १६४२, चैत्र वद्य सप्तमी, दि. १८ एप्रिल १७२० ह्या दिवशी छत्रपती शाहू राजांच्या दरबारात छत्रपतींचा नवनियुक्त बाजीराव पेशवा महाराजांना स्वराज्याशी एकनिष्ठ राहण्याचं वचन आत्मविश्वासाने दिले.



१८ एप्रिल इ.स. १७७४
वैशाख शु. ७ शके १७९६ जयनाम संवत्सरी बुधवारी म्हणजेच दि. १८ एप्रिल सन १७७४ रोजी गंगाबाईच्या पोटी पुरंदरगडावर सवाई माधवरावांचा जन्म झाला आणि अवघ्या चाळीस दिवसांतच त्यांना पेशवाईची वस्त्रे मिळाली. इतक्या लहान वयात राज्यकारभाराच्या उच्चस्थानी बसलेली ही जगातील एकमेव व्यक्ती होती. त्यांचे वडील नारायणराव पेशवे यांचा खून होऊन बापाच्या मृत्यूनंतर जन्मलेले हे बाळ. लहान पेशवे हे मराठी राष्ट्राचे आशेचे केन्द्रस्थान होते. त्यांना चुलते माधवराव पेशवे यांचे अवतार असे मानले जाई. बापाच्या पश्चात जन्मलेल्या ह्या बाळाला मातृसुखही फार काळ लाभले नाही. ते तीन वर्षाचे असतानाच आई गेली. त्यामुळे पुढे नानांनी त्यांच्यापुढे सर्व प्रकारची सुखे दत्त म्हणून उभी केली. काही कमतरता भासू दिली नाही. नाना हे त्यांचे पूर्ण आधारस्तंभ बनले होते.
163 views10:20
ओपन / कमेंट