Get Mystery Box with random crypto!

" छञपती श्री शिवाजी महाराज "

टेलीग्राम चैनल का लोगो chatrapat — " छञपती श्री शिवाजी महाराज "
टेलीग्राम चैनल का लोगो chatrapat — " छञपती श्री शिवाजी महाराज "
चैनल का पता: @chatrapat
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 3.58K

Ratings & Reviews

4.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

2

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 135

2021-08-26 16:33:14 ह्या आपत्तीसही तिळमात्र न डगमगता महाराजांनी आपली सैन्ये मुघलांच्या व विजापूरकरांच्या अशा दोन्ही मुलुखात स्वैर संचाराकरिता व त्या त्या राज्यातील शहरे लुटून पैसा आणण्याकरिता रवाना केली. विजापूर मुघलांच्या हाती जाऊ नये म्हणून महाराजांनी दिनांक २६ ऑगस्ट १६७९ ला आपला वकील श्यामजी नाईक यांस तह करण्याकरिता पाठविले. तेव्हा उचल खाऊन मुघलांनी सप्टेंबरात मंगळवेढे घेतले आणि ऑक्टोबरात दिलेरखानाने विजापुरास जाऊन वेढा घातला व गोवळकोंडेकरांकडे जबरदस्त खंडणीची मागणी केली. मोगलांचे हे संकट समोर आलेले पाहून आदिलशाही दरबाराने अखेरीस निश्चय करून छत्रपती शिवाजी महाराजांशी प्रकट तह करण्याचा निर्णय घेतला. (इ. स. १६७९ ऑक्टोबर-नोव्हेंबर) तहानंतर विजापूर राज्यात पसरलेले मराठी सैन्य काढून घेऊन ते मुघलांवर रवाना केले. मुघलांच्या मुलूखात जबरदस्त उठावणी झाल्यामुळे मुघल सरदारांत अंतर्गत भांडणांना ऊत आला. त्यानंतर युवराज शंभुराजे पुन्हा स्वराज्यात आले.



२६ ऑगस्ट इ.स.१७००
मार्च १७०० ला सिंहगड मुक्कामी छत्रपती राजाराम महाराजांचा मृत्यू झाला. औरंगजेबाच्या कैदेत असणाऱ्या बाल शाहूराजेना ही बातमी समजताच त्यांना खूप दुःख झाले. औरंगजेबाची छावणी यावेळी खवासपूरला होती. छावणीत असलेली शाहूराजे छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूच्या बातमीने आजारी पडले.दरबारात आल्यावर शाहूराजेंचे अंग पिवळे पडल्याचे दिसताच बादशाहाने चौकशी करताना त्याला खोजा हाफिज अंबर कडून कारण समजले की शाहूराजे शिजवलेले डाळ,चपाती किंवा भात खात नाहीत. फक्त फळे खातात कारण नजरकैदेत असताना मराठ्यांनी शिजवलेले अन्न खाऊ नये असा नियम आहे. शाहूराजे स्वतःला मोगलांचे कैदी समजत असल्याने शिजवलेले अन्न खात नाहीत. यावर बादशाहाने त्यांना सांगितले की तुम्ही आमचे कैदी नसून घरचेच आहात. पण खरे कारण असे होते की राजाराम महाराजांच्या मृत्यूची बातमी समजल्याने ते अन्न खात नव्हते.



२६ ऑगस्ट इ.स.१७८७
गुलाम कादर दिल्लीत आला तो जाबेताखानाचा मुलगा आणि नजीबखान रोहील्याचा नातु होता बादशाहाने त्याची बक्षी- उल ममालिक या जागेवर नेमणूक केली आणि अमीर- उलउमरा , रोशन- उद्दौला, बहादूर अशा मानाच्या पदव्या दिल्या...



२६ ऑगस्ट इ.स.१७८०
रोजी गणेशपंत बेहेरे यांची इंग्रजांशी झटापट झाली. यात इंग्रजांनी
पारनेरा, युगनेरा आणि इंद्रगड हे किल्ले जिंकून घेतले. १७८० च्या पावसाळ्यात इंग्रजांनी गोहदच्या जाटांना शिंद्यांविरुद्ध भडकावून ग्वाल्हेरचा किल्ला हस्तगत केला, ग्वाल्हेर पडला, (१७८०). हे पाहताच महादजींनी उज्जैनीत आपली छावणी टाकली.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

facebook page
https://www.facebook.com/shivhindvi

Instagram
https://www.instagram.com/shivhindvi/

Whatsapp
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1



" हर हर महादेव जय श्रीराम "
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य"
332 views13:33
ओपन / कमेंट
2021-08-26 16:33:14 आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

२६ ऑगस्ट इ.स.१३०३
अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडगड जिंकले
राणी पद्मावतीचा जोहर
शहाबुद्दीन घोरी निघून गेल्यावर सुमारे शंभर सव्वाशे वर्षे पर्यंत चितोडच्या राजांना बरीच विश्रांती मिळाली. गुलामवंशी सुलतानांनी त्यांना फारसा उपद्रव दिला नाही .परंतु अल्ला-उद्दीन खिलजी यांची सर्वव्यापी दृष्टी त्यांना फार दिवस चुकवता आली नाही. राणा लक्ष्मणसिंह चितोड येथे राज्य करीत होते. त्यांचे काका रतन सिंह यांनी रुपवती कन्या पद्मावती यांच्याशी विवाह केला होता.
पद्मावतीच्या सौंदर्याची किर्ती अल्लाऊदिन खिलजी याच्या कानावर पडली. पद्मावतीला मिळवण्यासाठी अल्लाऊदीन खिलजी याने चितोडवर स्वारी केली. लढाईत राजा रतनसिंह यांना वीर मरण आले. शेवटी इलाज चालत नाही असे पाहून, राणी पद्मावतीनेआपल्या शिलाचे रक्षण करण्यासाठी पेटत्या अग्नीकुंडात उड्या टाकून राणी पद्मावतीने १६०० स्रियासह अग्नीत प्रवेश केला तो दिवस होता २६ ऑगस्ट १३०३ पद्मावती जोहार करून अजरामर झाली, आणि अल्लाऊदिन खिलजी राखेचे ढीग तुडवीत किल्ल्यावर फिरत राहिला.


https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

२६ आगस्ट इ.स.१६६६
औरंगजेब बादशहाने राय ब्रिंदावनला समोर बोलावून फर्मावले. औरंगजेब बादशहाने फर्मावले शिवाजीराजाची हकिकत सांग' बावचळलेला ब्रिंदावन उत्तरला, "ह्या बंद्यास माहिती असती तर ती त्याने अगोदरच जाहीर केली असती.मिर्झाराजे जयसिंग यांच्याकडून दक्षिणेतून सलीम बेग गुर्जबर्दार औरंगजेब बादशहाकडे आला होता. त्यालाही औरंगजेब बादशहाने विचारले, "शिवाजीराजे बद्दल काही बातमी आणलीस का? त्याने सांगितले, "शिवाजीराजा अलिकडे नर्मदेवर आल्याची खबर समजली होती.पण शिवाजीराजे दिसले नाही." "त्यांच्या लोकांना वाटेत कैद केले जात आहे. औरंगजेब बादशहाने मुहम्मद आकील व रुस्तमबेग गुर्जबर्दार यांना हुकुम केला की, "तुम्ही शिवाजीराजाला ओळखता. नर्मदेपर्यंत जाऊन ठिकठिकाणी चौकशी करावी.औरंगजेब बादशहाच्या अस्वस्थ मनःस्थितीची कल्पना यावरून पुरेपूर येईल.



२६ ऑगस्ट इ.स.१६७७
दक्षिण मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामर्थ्याचा प्रत्यय स्थानिकांसोबतच परकीय सत्ताधाऱ्यांनाही आला होता. डच व्यापारीही त्याला अपवाद नव्हते, त्यांच्या तेगेनापट्टणमच्या फॅक्टरीचा प्रमुख हर्बट जागेर याने आपल्या वकिलामार्फत शिवरायांना अर्ज करून आपल्या व्यापारासाठी त्यांच्या कौलाची आवश्यकता असल्याचे व शिवरायांची सदिच्छा भेट घेण्याची इच्छा असल्याचे कळवले होते. त्यामुळे शिवरायांनी त्यांना भेटीस येण्याची व व्यापार करण्याची परावनगी दिली. त्याप्रमाणे डच अधिकाऱ्याची व महाराजांची ६ ऑगस्टच्या दरम्यान भेट झाली होती. भेटीत महाराजानी त्यांना कौल देण्याचे आश्वासन दिले होते. ठरल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी २६ ऑगस्टला डचाना पत्र देऊन शेरखानाच्यावेळी त्यांना मिळत असलेल्या सोयी चालू ठेवण्याचे आश्वासन दिले. फक्त महाराजांनी त्यात एक महत्वपूर्ण बदल केला तो म्हणजे गुलामांच्या व्यापाराला बंदी. ही माहिती जागेर व क्लेमेंट यांनी देवेनापट्टणमला पत्र पाठवून कळवली होती. या पत्राची तारीख होती २९ ऑगस्ट १६७७



२६ ऑगस्ट इ.स.१६७९
मराठी मुलखात लूटमार करणाऱ्या सिद्दीला मदत करणाऱ्या इंगजाना धडा शिकवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुंबई बंदराजवळ खांदेरी उंदेरी बेटावर किल्ला बांधण्याचे ठरवले. त्यादृष्टीने त्यांनी चौलजवळ कारागीर आणि बांधकाम साहित्य जमवणे सुरू केले. मराठ्यांचे आरमार खांदेरी बेटावर राहिल्यास इंग्रजांच्या हालचालीवर नियंत्रण येणार होते त्यामुळे घाबरून त्यांनी खांदेरी व उंदेरी बेटे आपल्या मालकीची आहेत असा दावा केला. सातासमुद्रापार आलेल्या इंग्रजांना आपल्या बलदंड आरामरावर प्रचंड विश्वास होता त्यामुळे शिवाजी महाराजांना त्यांनी आव्हान दिले. शिवाजी महाराजांनीही न डगमगता इंग्रजांचे हे आव्हान स्वीकारले व मायनाक भंडारीला १५० माणसे व ४ तोफा देऊन खांदेरी बेटावर पाठवले. यावर इंग्रजानी मायनाक भंडारीना हे बेट सोडून जाण्यास सांगितले पण त्यांनी आपण महाराजांच्या हुकुमाशिवाय आपण जाणार नाही असे ठणकावून सांगितले.



२६ ऑगस्ट इ.स.१६७९
इ. स. १६७९ अखेरपर्यंत विजापूरच्या राज्याच्या उत्कर्षाच्या काळांत त्याचे आजच्या परिभाषेत बोलावयाचे तर चौवीस जिल्हे होते. महाराजांच्या महानिर्वाणाच्या पूर्वी यापैकी बारा जिल्हे मराठी राज्यांत समाविष्ट झाले होते. मुघलांचा एकच जिल्हा, बागलण हा मराठी राज्यात आला होता आणि तेथेच मुघल आणि मराठे यांची अटीतटीची झुंज चालू होती. अशा स्थितीत पुत्र छत्रपती संभाजीराजे मुघल सरदार दिलेरखानाकडे दि. १३ डिसेंबर १६७८ रोजी गेले. त्यामुळे दिलेरखानाचे पारडे जड झाले. आणि महाराजांपुढे फार मोठे संकट उभे राहिले.
270 views13:33
ओपन / कमेंट
2021-08-25 09:51:26
396 views06:51
ओपन / कमेंट
2021-08-25 09:51:19 २५ ऑगस्ट इ.स.१६९७
शाहूराजे कैदेत असताना राजाराम महाराज ज्येष्ठ व तद्नंतर महाराणी ताराबाईंनी राज्य सांभाळणे हे परिस्थितीनुसार अनिवार्य होते. पण आता शाहूराजांची सुटका झालीय. मराठ्यांच्या सिंहासनावरचा त्यांचा हक्क त्यांना मिळावयास हवा. परंतु, मराठी राज्य अत्यंत निर्वाणीचा पेच इथे निर्माण झाला. शाहूंची सुटका झाल्याचे ऐक जळफळाट झाला. कारण संभाजीराजांच्या मृत्यूनंतर राजारामांना मिळालेली गादी पुढे त्यांचेच वंशज चालवणार होते. पण शाहू राजे सुटल्यामुळे आता राज्याचा सारा कारभार आपल्याला सोडावा लागणार या एकाच विचाराने ताराबाईंना हैराण करून सोडले. इ. स. १६७९ मध्ये स्वराज्य सोडून मोंगल सरदार दिलेरखानाला मिळालेल्या व पुन्हा स्वराज्यात आलेल्या युवराज संभाजीराजांना थोरल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळ्यावर एकांती समजावले होते. त्यांच्यासमोर स्वराज्याच्या वाटणीचा प्रस्तावही मांडला होता. परंतु, त्यानंतर संभाजीराजांनी नम्रपणे उत्तर दिले की, "आपणांस साहेबांचे पायाची जोड आहे. साहेबांचे (शिवरायांचे) पायाशी इमान वाहून दूधभात खाऊन राहू." याचाच अर्थ संभाजीराजांना राजपदाची अभिलाषा नव्हती. पण याचबरोबर राजारामांची मनस्थिती तपासून पाहिली पाहिजे. दि. २५ ऑगस्ट १६९७ च्या एका पत्रात उल्लेख आहे की, "चिरंजीव शाहू कालेकरून तरी श्री देशी आणिल, तेव्हा संकटी जी माणसे उपयोगी पडली, त्यांच्या तसनसी आम्ही करविल्या, याचा चित्ती द्वेष यावा हे तरी अविचाराचे कलम. शाहू राज्यास अधिकारी, आम्ही करतो ते तरी त्यांचेसाठीच आहे. प्रसंगास सर्व लोकांस त्याज कडेच पाहणे आहे. हे कारण ईश्वरेच नेमिले असेल..." याचाच अर्थ असा आहे की, राजाराम महाराज हे स्वतःला शाहूंचाच प्रतिनिधी समजत होते व राज्यकारभार चालवत होते. परंतु हा उद्देश अथवा ही पोच ताराबाईंच्या मनात अजूनही रुजली नव्हती. हाती सत्ता आल्यावर अन् मराठ्यांच्या सर्वोच्चपदाचा मान मिळाल्यावर ताराबाईंना इतर काही सुचेनासे झाले. राजारामांच्या अकस्मात मृत्यूनंतर ताराबाईंनीच गादी चालवून मराठी राज्य सावरले ही गोष्ट जरी खरी असली तरी आता त्यांना आपल्यावर अन्याय (?) होतोय असे वाटू लागले होते.



२५ ऑगस्ट इ.स.१८०५
१८०५ त समेटाची जागा संबळगड सोडून यशवंतराव मेवाड, मारवाड, दिल्ली, अशा ठिकाणी फिरत राहिले. पुष्कर, अजमेर हे त्यांचे या दिवसांत एक प्रकारे मुख्य ठाणे होते. येथे येऊन यशवंतराव इंग्रजांच्या लष्करी हालचालींच्या बातम्या काढीत होते. इंग्रजानाही भरतपूरच्या लढाईनंतर आपल्या फौजेची जुळवाजुळव करण्यास सवड हवी होती. पण त्यांना यशवंतरावांचा पिच्छा सोडावयाचा नव्हता. यशवंतराव त्यांचा सदर हेतू ओळखून होते. पंजाब हा त्यानी दौडीचा प्रदेश ठरवून पंजाबातील शीख व त्यांच्या पलिकडील अफगाण यांच्याशी त्यांचा पत्रव्यवहार सुरु होता. दिनांक २५ ऑगस्ट १८०५ रोजी यशवंतराव राजस्थानच्या बाजूस, दिल्लीच्या अलिकडे असलेल्या रेवाडी नांवाच्या गांवाहून निघाले. मीरखान तीन चार दिवस मागे राहिला होता. शिंद्यांना सामील करून घ्यावे या उद्देशाने तो रेवाडीहून हालला नाही. यशवंतरावानी शिखांशी संधान बांधून त्यांना अनुकूल करून घेतले होते. त्यांचे फ्रेंच व पोर्तुगिज गोवेकर यांची मदत मिळविण्याचे प्रयत्न चालले होते.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

facebook page
https://www.facebook.com/shivhindvi

Instagram
https://www.instagram.com/shivhindvi/

Whatsapp
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1



" हर हर महादेव जय श्रीराम "
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य"
373 views06:51
ओपन / कमेंट
2021-08-25 09:51:19 आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

२५ ऑगस्ट इ.स.१६२९
जाधवरावांसारखे मातबर सरदारांचा बंदोबस्त निजामशहाने करावा असा गुप्त सल्ला जाधवरावांच्या विरुद्ध असलेल्या सरदारांनी निजामशहास दिला. असे होऊ नये म्हणून निजामशहाने त्यांना पकडून अटकेत ठेवण्याचा विचार केला. जाधव मंडळीस त्याने दौलताबादचे किल्ल्यावर दिनांक २५ ऑगस्ट १६२९ रोजी भेटीस बोलाविले. त्यास पकडीत असता विलक्षण दंगल माजली, तीत खुद्द लखूजी जाधवराव, त्यांचे दोघे पुत्र अवलोजी आणि राघोजी व नातू यशवंतराव इतके पुरुष मारले गेले. लखूजीची बायको गिरजाबाई, भाऊ जगदेवराव व मुलगा बहादूरजी एवढे बचावून सिंदरखेडच्या गढींत आश्रयास गेले. बादशहा शहाजनास हा प्रकार कळल्यावर त्याने ह्या जाधव मंडळीस नोकरींत घेऊन मनसबी ठरवून दिल्या. आपल्या सासऱ्याचा दग्याने खून केलेला पाहून निजामशाहीत यापुढे राहणे धोक्याचे आहे तसेच आपल्याला निजामशाहीत परत आणण्याचा जो प्रयत्न झाला त्यांत काहीतरी कुटील कारस्थानाचा भाग असला पाहिजे असा शहाजीराजांचा समज झाला.


https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

२५ ऑगस्ट इ.स.१६६५
व्यापाराच्या निमित्ताने भारतात आलेले इंग्रज छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत दुटप्पीपणे वागत होते.महाराजांच्या विरोधात ते सिद्दी, मोगल आणि अदिलशाहीला छुपी मदत करत असत.प्रगत इंग्रजांच्याकडे लांब पल्ल्याच्या तोफा व आधुनिक शस्त्रे होती. पण असे असले तरी महाराजांच्या पुढे त्यांची मात्रा चालत नसे. महाराजांच्या स्वारीवेळी त्यांना सुरक्षित आसरा शोधावा लागे. प्रसंग होता शिवाजी महाराजांच्या पहिल्या नौका रोहणाचा(८ फेब्रुवारी १६६५)आणि त्याद्वारे बसरूर आणि कारवार वर केलेल्या स्वारीचा.महाराज ५ ते ६ दिवसांचा समुद्रप्रवास करून १३ किंवा १४ फेब्रुवारी ला बसरूरला आले होते.महाराजांच्या स्वारीच्या भीतीने हुबळी आणि कारवारलाही घबराट पसरली होती. तेथील इंग्रजानी महाराजांच्या भीतीने शेरखानाकडे आश्रय मागितला होता. त्या परिस्थितीत कारवारच्या इंग्रजानी सुरतेला पत्र पाठवले होते,"अश्या परिस्थितीमुळे आम्ही बकांपुरचा सुभेदार शेरखान कडून परवानापत्र घेऊन ठेवले आहे,जेणेकरून वेळ पडली तर तेथे आम्हला जाता येईल,मालक बहलोलखान होता."



२५ ऑगस्ट इ.स.१६७४
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक समारंभानंतर अवघ्या काहीच दिवसात पाचाड मुक्कामी जिजाऊंच्या झालेल्या निधनाने फक्त महाराजच नव्हे तर अवघा मुलुख उदास झाला होता.असे असले तरी महाराज आपले दुःख बाजूला सारून स्वराज्याचाच विचार करत होते.याच काळात फोंडयाचा आदिलशाही सुभेदार महंमदखान स्वराज्याच्या हद्दीत येऊन कुरापती काढत होता.त्याने स्वराज्यातील गावातून एका श्रीमंत व्यापाऱ्याला कैद करून नेले होते. महाराजाना ही बातमी समजताच ते संतप्त झाले. महाराजांच्या रागावल्याची गोष्ट कळताच महमदखान घाबरला.महाराजांच्या स्वारीच्या धाकाने त्याने इंग्रजांकडून दारुगोळा व तोफा मागवल्या.पण महाराजांच्या भीतीने इंग्रजानी नकार दिला. चिडलेल्या महाराजांनी अण्णाजीपंताना सैन्य देऊन फोंडयावर रवाना केले.पण अनपेक्षितपणे ही बातमी खानाला समजली.तो सावध राहिल्याने अण्णाजीपंताना अपयश आले. आण्णाजीपंताना महाराजानी फोंडा किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी पाठवले होते ते ऑगस्ट च्या शेवटच्या आठवड्यात.



२५ ऑगस्ट इ.स.१६७६
सण १६७ च्या नारळी पौर्णिमेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिरा मोहीम हाती घेण्याचे ठरवले.त्यासाठी महाराजानी स्वराज्याचे पेशवे मोरोपंत यांना 10 हजार फौज देऊन जंजिऱ्यावर पाठवले.सिद्दी यावेळी सुरतेत होता.मोरोपंत निघाल्याचे कळताच तोही आपल्या सैन्यासह जंजिऱ्याकडे निघाला.मोरोपंतांनी बरेच प्रयत्न केले पण यश मिळत नव्हते.त्यांनी एक दिवस पद्मदुर्गावर असणाऱ्या सोनकोळी लोकांना बोलवून त्यांचा प्रमुख लाय पाटील यांना जंजिरा मोहिमेत मदत करण्यास सांगितले.लाय पाटलांनी होकार देताच त्यांना अंधाऱ्या रात्री जंजिऱ्याच्या तटाला शिड्या लावण्याची कामगिरी देण्यात आली.ठरलेल्या दिवशी लाय पाटलांनी आपली जबाबदारी पार पाडली पण पहाट होत आली तरी मोरोपंत आले नाहीत त्यामुळे लाय पाटील परत गेले.मोहीम अपयशी झाली.मोरोपंतांनी रायगडी जाताच लाय पाटलांचा पराक्रम महाराजाना सांगितला.महाराजानी त्यांना पराक्रमाबद्दल छत्री,निशाण आणि पालखी देऊ केली पण पाटलांनी ती नाकारल्याने त्यांना पालखी नावाचे गलबत बांधून दिले.त्याचबरोबर महाराजानी पद्मदुर्गाच्या हवालदार,सरनौबत यांचाही सन्मान केला.पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा.

245 views06:51
ओपन / कमेंट
2021-08-24 20:24:05
38 views17:24
ओपन / कमेंट
2021-08-24 20:24:00 लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

facebook page
https://www.facebook.com/shivhindvi

Instagram
https://www.instagram.com/shivhindvi/

Whatsapp
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1



" हर हर महादेव जय श्रीराम "
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य"
38 views17:24
ओपन / कमेंट
2021-08-24 20:24:00 २४ ऑगस्ट इ.स.१६९९
औरंगजेबने बऱ्याच सरदारांना वेगवेगळ्या विभागाची जबाबदारी दिली व त्यांना निक्षून पुन्हा सांगितले की मराठ्यांना आपल्या हद्दीत राहू देऊ नये, तसेच त्यांना छावणी करू देऊ नये व २४ ऑगस्ट १६९९ रोजी औरंगजेबास समजले की सहा हजार मराठे स्वारांनी येरवळ व कंधार (नांदेड जिल्हा) येथे छावणी केली तेव्हा औरंगजेबने नांदेड सुभेदार व धारूर किल्लेदार यांना लिहून कळविले की त्यांचे पारिपत्य करणे. याचवेळी वऱ्हाडांत परसोजी भोसले मोगलांविरुद्ध हालचाली करत होता. आज्जमगड पुरंदर भागात मराठा सरदार परशुराम हा दोन हजार स्वार घेऊन दंगल करीत होता.



२४ ऑगस्ट इ.स.१९०८
स्वातंत्र्यवीर हुतात्मा राजगुरु यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन
राजगुरूंचा जन्म पुण्या़जवळ खेड येथे २४ आॅगस्ट १९०८ रोजी एका मराठी कुटुंबात झाला. त्यांना ‘रघुनाथ’ या नावानेही ओळखले जात असे. राजगुरू हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात फाशी गेलेले क्रांतिकारक होते. ते हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी या संघटनेच्या क्रांतिकार्यात सहभागी झाले होते. चंद्रशेखर आझाद, भगतसिंग आणि सुखदेव अशा क्रांतिकारकांच्या सहवासात राजगुरू आल्याने ते सशस्त्र उठाव करण्यास प्रेरित झाले. लहानपणी म्हणजे वयाच्या १४व्या वर्षी इंग्रजी विषयातील अपयशामुळे वडील भावाने आपल्या नवविवाहित वधूसमोर त्यांना इंग्रजी धडा वाचायची शिक्षा केली. हा अपमान राजगुरूंना सहन झाला नाही. अंगावरच्या कपड्यांनिशी, आईने तेल आणण्यासाठी दिलेले ९ पैसे व बहिणीने अंजिरांसाठी दिलेल्या २ पैशांसह त्यांनी आपले घर सोडले.आधी नाशिक आणि त्यानंतर थेट काशीलाच (शिक्षणासाठी) ते पोहचले. काशीतील त्यांचा बराचसा वेळ हा लोकमान्य टिळक ग्रंथालयात, महाराष्ट्र विद्या मंडळातील व्याख्याने - वादविवाद ऐकण्यात आणि भारतसेवा मंडळाच्या व्यायामशाळेत लाठी-काठी, दांडपट्टा यांच्या शिक्षणातच जात होता. त्या काळी कलकत्ता, पाटणा, कानपूर, लखनौ, झाशी, मीरत, दिल्ली, लाहोर ही गावे क्रांतिकारकांची माहेरघरे होती,आणि काशी येथील पं. मदनमोहन मालवीयांचे हिंदू विद्यापीठ हेच साऱ्यांचे आश्रयस्थान व गुप्त केंद्र होते.मध्यंतरीच्या काळात राजगुरूंनी अमरावतीच्या श्री.हनुमान आखाड्यात
व्यायाम विशारदाची पदवी मिळवली व हुबळीला डॉ. हर्डीकरांकडे सेवादलाचे शिक्षणही घेतले. त्यानंतर ते पुन्हा काशी येथे परतले. दरम्यान चंद्रशेखर आझाद यांचा राजगुरूंशी परिचय झाला ,आणि आझादांनी राजगुरूंना क्रांतिकारकांच्या गटात सामील करून घेतले. त्या क्रांतिमय वातावरणामधे वावरताना राजगुंरुमधील क्रांतिकारकं घडत गेला.कोणत्याही मोहिमेसाठी ते एका पायावर तयार असत. वेळ पडली तर या क्रांती संग्रामात बलिदान देण्याची देखील त्यांची तयारी होती. आझाद आणि राजगुरू काशीत एकत्र आले, पण थेट कार्यवाही करायची वेळ आली आणि तुझ्याजोगे काम निघाले, तर तुला पार्टीचे आमंत्रण मिळेल, असे सांगून आझाद निघून गेले. काही दिवसांनंतर राजगुरूं यांच्याजोगे काम निघाले. पार्टीतील एका फितुराचा वध करण्याच्या कामगिरीवर शिववर्मा यांच्यासोबत त्यांची निवड झाली. दोघेही दिल्लीत आले. पण पिस्तूल एकच असल्याने व गद्दार जिवाला घाबरून घराबाहेर क्वचितच पडत असल्याने त्यांची पंचाईत झाली. रात्री ७ ते ८ या वेळेत तो इसम ज्या ठिकाणी फिरायला जात असे, त्या ठिकाणी राजगुरूंनी त्याच्या मागावर राहावे, असे ठरवून दुसऱ्या पिस्तुलाची सोय करण्यासाठी वर्मा लाहोरला गेले आणि तीन दिवसांनंतर परतले ते पिस्तूल न घेताच. सायंकाळ असल्याने वर्मा प्रत्यक्ष मोक्याच्या जागीच पोहोचले,आणि त्या ठिकाणी पोलिसांच्या गाड्या, सर्चलाइट, गोळ्यांचे आवाज पाहून त्यांनी ओळखले की राजगुरूंनी मोहीम फत्ते केली होती. इकडे राजगुरूंनी एकाच गोळीत काम तमाम करून मथुरेकडील रेल्वेरुळांतून पळ काढला. पोलीस गोळ्या झाडू लागले, त्या वेळी त्यांनी रेल्वेरुळांखाली उडी टाकली आणि ते सरपटत एका शेतात घुसले. ते शेत पाण्याने तुडुंब भरलेले होते. एव्हाना पोलीस त्या ठिकाणी येऊन पोहोचले आणि चारी बाजूंनी प्रकाश टाकून गोळीबारही सुरू झाला. ही शोधमोहीम जवळजवळ २-३ तास सुरू होती. तोपर्यंत राजगुरू चिखल-पाण्यात, काट्याकुट्यात लपून राहू शकतील ही कल्पनादेखील पोलिसांना नव्हती.
राजगुरू यांची सहनशीलता दाखवणारे प्रसंग अनेक होते. २३ मार्च १९३१ या दिवशी लाहोरच्या मध्यवर्ती कारागृहात भगतसिंग, राजगुरु,आणि सुखदेव
यांना फाशी देण्यात आले. हसत हसत ते मृत्यूला सामोरे गेले.स्वातंत्र्यासाठी मृत्यूलाही आनंदाने कवटाळणारे हे थोर क्रांतिकारक होते.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

27 views17:24
ओपन / कमेंट
2021-08-24 20:24:00 आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

२४ ऑगस्ट इ.स.१६५७
महमद आदिलशहा १६५६ त मरण पावल्यानंतर त्याच्या पत्नीने बेगम साहेबिणीने आपल्या पसंतीच्या तरण्या मुलाचे अली नाव ठेवून त्यास विजापूरच्या गादीवर बसविले. तो एकोणीस वर्षांचा होता. खरा कारभार त्याची आई साहेबीण पाहू लागली. मोऱ्यांचा निकाल छत्रपती शिवाजीराजांनी लावल्यापासून विजापूर दरबारावर संकटांची मालिका कोसळू लागली. औरंगजेबाने विजापूरवर आक्रमण करून त्यांना राज्य वाचविण्यासाठी मोगलांशी तह करण्यास भाग पाडले. त्याप्रमाणे २४ ऑगस्ट १६५७ रोजी आदिलशहाने औरंगजेबाशी तह केला. त्यात कल्याणी, परिंडा व त्याभोवतालचा भाग, निजामशाही कोकणातील किल्ले, वांगणी परगणा व खंडणीदाखल दीड कोटी रुपये द्यावेत अशा तहातील मुख्य अटी होत्या. दिल्लीला बादशहा शहाजहान आजारी पडल्याची बातमी औरंगजेबास समजली म्हणून औरंगजेबाने आपली दक्षिणेकडील मोहीम आटोपती घेतली व त्याने सरळ दिल्लीची वाट धरली. इकडे बड्या साहेबिणीने विजापूर दरबार भरविला आणि त्यांत छत्रपती शिवाजीराजांच्या पारिपत्याचा विचार केला. छत्रपती शिवाजी राजांना शासन करावे हे दरबारांत ठरले व ही कामगिरी धिप्पाड अफगाण सरदार अफझलखान याजवर सोपविण्यात आली.


https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

२४ ऑगस्ट इ.स.१६७५
ऑस्टीनबरोबर महाराजांस व त्यांच्या मंत्र्यास देण्यासाठी म्हणून सातशे चाळीस रुपये किमतीच्या भेटी होत्या. दिनांक २४ ऑगस्ट १६७५ रोजी त्याने मुंबई सोडली व दिनांक ६ सप्टेंबर रोजी तो रायगडावर दाखल झाला. त्याची महाराजांशी मुलाखत १५ तारखेला रात्री प्रल्हाद निराजींच्या मध्यस्थीने झाली. ऑस्टीनला सांगण्यात आले की धरणगावबाबत तुम्ही सांगत असलेल्या हकीगतीपैकी कोणतीही हकीगत महाराजांच्या कानी आलेली नाही. तेव्हा जी नुकसानभरपाई मागत आहात ती निरर्थक आहे. त्यानंतर ऑस्टीनने कंपनीच्या वखारीसाठी कौल (अभय) मागितला. त्यावर फार चिकित्सा होऊन महाराजांनी तो देण्यासाठी हुकुम दिला.



२४ ऑगस्ट इ.स.१६७७
मुंबईकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना पाठविलेल्या पत्राची नोंद!
आपली दक्षिण दिग्विजय मोहीमेत शिवाजी महाराजांनी विजापुरकरांचा बराचसा मुलुख आणि कावेरी नदीच्या उत्तर भागातील असा मिळून १९ हजार चौरस मैलांचा अतिशय सुपीक भाग जिंकला. त्याचा वार्षिक महसूल २० लाख होनापेक्षाही जास्त होता. महाराज यानंतर उत्तर कर्नाटकात आले.त्याबद्दलची इंग्रजांची नोंद,"शिवाजी सध्या ऊर्ध्व कर्नाटकात,जेथे जिंजी,तंजावर,पिलकुंडा हे मजबूत व अन्य अनेक किल्ले त्याने घेतले असून मुसलमानांचा लज्जास्पद पराभव त्याने केला आहे आणि त्याने श्रीरंगपट्टण लुटले आहे असे मानले जाते. तेथून त्याने प्रचंड संपत्ती सोबत नेली असे म्हणतात. परतताना ब्रिदरूर घेण्याचे व त्याद्वारे कॅनरा प्रांत नव्याने जिंकलेल्या त्याच्या राज्याला जोडण्याचे त्याचे नियोजन आहे.



२४ ऑगस्ट इ.स.१६८०
(भाद्रपद शुद्ध १०, दशमी, शके १६०२, रौद्र संवत्सर, वार मंगळवार)

संभाजीराजांचे दानपत्र!
संभाजीराजांनी कुडाळ येथील रहिवासी बाकरेशास्त्री यांना प्रतिवर्षी दहा हजार होनांचे दानपत्र करून दिले. हे दानपत्र संस्कृतमधे असुन त्यातील अक्षर सुंदर आहे तसेच, सुरूवातीला शंकरादी देवांना वंदन करून पुढच्या दोन ओळी स्वतः संभाजीराजांच्या हस्ताक्षरातील आहेत त्या पुढीलप्रमाणे:
।। मतं मे श्रीशिवराजपुत्रस्य श्री शंभुराज।।
।।छत्रपते: यदत्रोपरिलेखितं।।

अर्थ: यापुढे मी जे लिहिले आहे ते शिवाजीराजांचा राजपुत्र असलेल्या मला (संभाजीराजांना) संमत आहे.

या वेळेपर्यंत अजुन संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला नव्हता. तो त्यांनी पुढे पाच महिन्यांनी करवून घेतला. शिवाजीराजे साधुसंतांना इनाम करून देत असत त्याप्रमाणेच हे दानपत्र संभाजीराजांनी कुडाळच्या बाकरेशास्त्री या मांत्रिकाला दिले. हे दानपत्र खुप मोठे आहे. त्यात काही ठिकाणी संभाजीराजांनी काही लोकांचे उल्लेख केले आहेत ते महत्त्वाचे आहेत. ते पुढीलप्रमाणे-

*शिवाजीराजांच्या पराक्रमाचे केलेले वर्णन
*शिवाजीराजांनी अफजलखानाला मारताना बिचवा हे शस्त्र वापरले
*सोयराबाईंचे मन हे स्फटिकमण्याप्रमाणे स्वच्छ आहे मात्र प्रबळ व दुष्ट मंत्र्यांच्या सल्ल्यामुळे सोयराबाईंच्या मनात सापत्नभाव तयार झाला आहे आणि त्यामुळे शिवाजीराजेही त्यांच्या पित्रुकर्तव्याला चुकले आहेत.
*औरंगजेबाच्या सेनापतीने (दिलेरखान) भुपाळगड जिंकुन देण्यासाठी संभाजीराजांपुढे हात टेकले

हे वरील उल्लेखांबरोबरच संभाजीराजांनी स्वतःच्या व शिवाजीराजांचे पराक्रम, तसेच देवांची स्तुती अलंकारित भाषेत वर्णिली आहे.

या दानपत्रातुन संभाजीराजांच्या मनात स्वतः विषयी व शिवाजीराजे, सोयराबाई, मंत्रीगण, औरंगजेब व इतर शत्रूंबद्दलचे विचार व्यक्त होतात.
24 views17:24
ओपन / कमेंट
2021-08-23 06:47:08
295 views03:47
ओपन / कमेंट