Get Mystery Box with random crypto!

ह्या आपत्तीसही तिळमात्र न डगमगता महाराजांनी आपली सैन्ये मुघलां | " छञपती श्री शिवाजी महाराज "

ह्या आपत्तीसही तिळमात्र न डगमगता महाराजांनी आपली सैन्ये मुघलांच्या व विजापूरकरांच्या अशा दोन्ही मुलुखात स्वैर संचाराकरिता व त्या त्या राज्यातील शहरे लुटून पैसा आणण्याकरिता रवाना केली. विजापूर मुघलांच्या हाती जाऊ नये म्हणून महाराजांनी दिनांक २६ ऑगस्ट १६७९ ला आपला वकील श्यामजी नाईक यांस तह करण्याकरिता पाठविले. तेव्हा उचल खाऊन मुघलांनी सप्टेंबरात मंगळवेढे घेतले आणि ऑक्टोबरात दिलेरखानाने विजापुरास जाऊन वेढा घातला व गोवळकोंडेकरांकडे जबरदस्त खंडणीची मागणी केली. मोगलांचे हे संकट समोर आलेले पाहून आदिलशाही दरबाराने अखेरीस निश्चय करून छत्रपती शिवाजी महाराजांशी प्रकट तह करण्याचा निर्णय घेतला. (इ. स. १६७९ ऑक्टोबर-नोव्हेंबर) तहानंतर विजापूर राज्यात पसरलेले मराठी सैन्य काढून घेऊन ते मुघलांवर रवाना केले. मुघलांच्या मुलूखात जबरदस्त उठावणी झाल्यामुळे मुघल सरदारांत अंतर्गत भांडणांना ऊत आला. त्यानंतर युवराज शंभुराजे पुन्हा स्वराज्यात आले.



२६ ऑगस्ट इ.स.१७००
मार्च १७०० ला सिंहगड मुक्कामी छत्रपती राजाराम महाराजांचा मृत्यू झाला. औरंगजेबाच्या कैदेत असणाऱ्या बाल शाहूराजेना ही बातमी समजताच त्यांना खूप दुःख झाले. औरंगजेबाची छावणी यावेळी खवासपूरला होती. छावणीत असलेली शाहूराजे छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूच्या बातमीने आजारी पडले.दरबारात आल्यावर शाहूराजेंचे अंग पिवळे पडल्याचे दिसताच बादशाहाने चौकशी करताना त्याला खोजा हाफिज अंबर कडून कारण समजले की शाहूराजे शिजवलेले डाळ,चपाती किंवा भात खात नाहीत. फक्त फळे खातात कारण नजरकैदेत असताना मराठ्यांनी शिजवलेले अन्न खाऊ नये असा नियम आहे. शाहूराजे स्वतःला मोगलांचे कैदी समजत असल्याने शिजवलेले अन्न खात नाहीत. यावर बादशाहाने त्यांना सांगितले की तुम्ही आमचे कैदी नसून घरचेच आहात. पण खरे कारण असे होते की राजाराम महाराजांच्या मृत्यूची बातमी समजल्याने ते अन्न खात नव्हते.



२६ ऑगस्ट इ.स.१७८७
गुलाम कादर दिल्लीत आला तो जाबेताखानाचा मुलगा आणि नजीबखान रोहील्याचा नातु होता बादशाहाने त्याची बक्षी- उल ममालिक या जागेवर नेमणूक केली आणि अमीर- उलउमरा , रोशन- उद्दौला, बहादूर अशा मानाच्या पदव्या दिल्या...



२६ ऑगस्ट इ.स.१७८०
रोजी गणेशपंत बेहेरे यांची इंग्रजांशी झटापट झाली. यात इंग्रजांनी
पारनेरा, युगनेरा आणि इंद्रगड हे किल्ले जिंकून घेतले. १७८० च्या पावसाळ्यात इंग्रजांनी गोहदच्या जाटांना शिंद्यांविरुद्ध भडकावून ग्वाल्हेरचा किल्ला हस्तगत केला, ग्वाल्हेर पडला, (१७८०). हे पाहताच महादजींनी उज्जैनीत आपली छावणी टाकली.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

facebook page
https://www.facebook.com/shivhindvi

Instagram
https://www.instagram.com/shivhindvi/

Whatsapp
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1



" हर हर महादेव जय श्रीराम "
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य"