Get Mystery Box with random crypto!

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष २६ ऑगस्ट इ.स.१३०३ अल्लाउ | " छञपती श्री शिवाजी महाराज "

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

२६ ऑगस्ट इ.स.१३०३
अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडगड जिंकले
राणी पद्मावतीचा जोहर
शहाबुद्दीन घोरी निघून गेल्यावर सुमारे शंभर सव्वाशे वर्षे पर्यंत चितोडच्या राजांना बरीच विश्रांती मिळाली. गुलामवंशी सुलतानांनी त्यांना फारसा उपद्रव दिला नाही .परंतु अल्ला-उद्दीन खिलजी यांची सर्वव्यापी दृष्टी त्यांना फार दिवस चुकवता आली नाही. राणा लक्ष्मणसिंह चितोड येथे राज्य करीत होते. त्यांचे काका रतन सिंह यांनी रुपवती कन्या पद्मावती यांच्याशी विवाह केला होता.
पद्मावतीच्या सौंदर्याची किर्ती अल्लाऊदिन खिलजी याच्या कानावर पडली. पद्मावतीला मिळवण्यासाठी अल्लाऊदीन खिलजी याने चितोडवर स्वारी केली. लढाईत राजा रतनसिंह यांना वीर मरण आले. शेवटी इलाज चालत नाही असे पाहून, राणी पद्मावतीनेआपल्या शिलाचे रक्षण करण्यासाठी पेटत्या अग्नीकुंडात उड्या टाकून राणी पद्मावतीने १६०० स्रियासह अग्नीत प्रवेश केला तो दिवस होता २६ ऑगस्ट १३०३ पद्मावती जोहार करून अजरामर झाली, आणि अल्लाऊदिन खिलजी राखेचे ढीग तुडवीत किल्ल्यावर फिरत राहिला.


https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

२६ आगस्ट इ.स.१६६६
औरंगजेब बादशहाने राय ब्रिंदावनला समोर बोलावून फर्मावले. औरंगजेब बादशहाने फर्मावले शिवाजीराजाची हकिकत सांग' बावचळलेला ब्रिंदावन उत्तरला, "ह्या बंद्यास माहिती असती तर ती त्याने अगोदरच जाहीर केली असती.मिर्झाराजे जयसिंग यांच्याकडून दक्षिणेतून सलीम बेग गुर्जबर्दार औरंगजेब बादशहाकडे आला होता. त्यालाही औरंगजेब बादशहाने विचारले, "शिवाजीराजे बद्दल काही बातमी आणलीस का? त्याने सांगितले, "शिवाजीराजा अलिकडे नर्मदेवर आल्याची खबर समजली होती.पण शिवाजीराजे दिसले नाही." "त्यांच्या लोकांना वाटेत कैद केले जात आहे. औरंगजेब बादशहाने मुहम्मद आकील व रुस्तमबेग गुर्जबर्दार यांना हुकुम केला की, "तुम्ही शिवाजीराजाला ओळखता. नर्मदेपर्यंत जाऊन ठिकठिकाणी चौकशी करावी.औरंगजेब बादशहाच्या अस्वस्थ मनःस्थितीची कल्पना यावरून पुरेपूर येईल.



२६ ऑगस्ट इ.स.१६७७
दक्षिण मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामर्थ्याचा प्रत्यय स्थानिकांसोबतच परकीय सत्ताधाऱ्यांनाही आला होता. डच व्यापारीही त्याला अपवाद नव्हते, त्यांच्या तेगेनापट्टणमच्या फॅक्टरीचा प्रमुख हर्बट जागेर याने आपल्या वकिलामार्फत शिवरायांना अर्ज करून आपल्या व्यापारासाठी त्यांच्या कौलाची आवश्यकता असल्याचे व शिवरायांची सदिच्छा भेट घेण्याची इच्छा असल्याचे कळवले होते. त्यामुळे शिवरायांनी त्यांना भेटीस येण्याची व व्यापार करण्याची परावनगी दिली. त्याप्रमाणे डच अधिकाऱ्याची व महाराजांची ६ ऑगस्टच्या दरम्यान भेट झाली होती. भेटीत महाराजानी त्यांना कौल देण्याचे आश्वासन दिले होते. ठरल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी २६ ऑगस्टला डचाना पत्र देऊन शेरखानाच्यावेळी त्यांना मिळत असलेल्या सोयी चालू ठेवण्याचे आश्वासन दिले. फक्त महाराजांनी त्यात एक महत्वपूर्ण बदल केला तो म्हणजे गुलामांच्या व्यापाराला बंदी. ही माहिती जागेर व क्लेमेंट यांनी देवेनापट्टणमला पत्र पाठवून कळवली होती. या पत्राची तारीख होती २९ ऑगस्ट १६७७



२६ ऑगस्ट इ.स.१६७९
मराठी मुलखात लूटमार करणाऱ्या सिद्दीला मदत करणाऱ्या इंगजाना धडा शिकवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुंबई बंदराजवळ खांदेरी उंदेरी बेटावर किल्ला बांधण्याचे ठरवले. त्यादृष्टीने त्यांनी चौलजवळ कारागीर आणि बांधकाम साहित्य जमवणे सुरू केले. मराठ्यांचे आरमार खांदेरी बेटावर राहिल्यास इंग्रजांच्या हालचालीवर नियंत्रण येणार होते त्यामुळे घाबरून त्यांनी खांदेरी व उंदेरी बेटे आपल्या मालकीची आहेत असा दावा केला. सातासमुद्रापार आलेल्या इंग्रजांना आपल्या बलदंड आरामरावर प्रचंड विश्वास होता त्यामुळे शिवाजी महाराजांना त्यांनी आव्हान दिले. शिवाजी महाराजांनीही न डगमगता इंग्रजांचे हे आव्हान स्वीकारले व मायनाक भंडारीला १५० माणसे व ४ तोफा देऊन खांदेरी बेटावर पाठवले. यावर इंग्रजानी मायनाक भंडारीना हे बेट सोडून जाण्यास सांगितले पण त्यांनी आपण महाराजांच्या हुकुमाशिवाय आपण जाणार नाही असे ठणकावून सांगितले.



२६ ऑगस्ट इ.स.१६७९
इ. स. १६७९ अखेरपर्यंत विजापूरच्या राज्याच्या उत्कर्षाच्या काळांत त्याचे आजच्या परिभाषेत बोलावयाचे तर चौवीस जिल्हे होते. महाराजांच्या महानिर्वाणाच्या पूर्वी यापैकी बारा जिल्हे मराठी राज्यांत समाविष्ट झाले होते. मुघलांचा एकच जिल्हा, बागलण हा मराठी राज्यात आला होता आणि तेथेच मुघल आणि मराठे यांची अटीतटीची झुंज चालू होती. अशा स्थितीत पुत्र छत्रपती संभाजीराजे मुघल सरदार दिलेरखानाकडे दि. १३ डिसेंबर १६७८ रोजी गेले. त्यामुळे दिलेरखानाचे पारडे जड झाले. आणि महाराजांपुढे फार मोठे संकट उभे राहिले.