Get Mystery Box with random crypto!

" छञपती श्री शिवाजी महाराज "

टेलीग्राम चैनल का लोगो chatrapat — " छञपती श्री शिवाजी महाराज "
टेलीग्राम चैनल का लोगो chatrapat — " छञपती श्री शिवाजी महाराज "
चैनल का पता: @chatrapat
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 3.58K

Ratings & Reviews

4.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

2

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 133

2021-09-01 12:35:01
98 views09:35
ओपन / कमेंट
2021-09-01 12:34:56 १ सप्टेंबर इ.स.१९३०
धुळय़ाचा पाठीराखा लळींग
लळिंगच्या डोंगरावर अनेक खुरटी झाडे आहेत. पावसाळय़ानंतर यामध्ये गवताळ कुरण तयार होते. या गवतातून अनेक रानफुलेही उमलतात, कोंबडतुरे डोकावू लागतात. लळींगच्या या गवतालाही खरेतर ऐतिहासिक संदर्भ! महात्मा गांधींनी ज्या वेळी 'मिठाचा सत्याग्रह'चे आंदोलन जाहीर केले, त्या वेळी त्याच्या समर्थनार्थ खान्देशातही चळवळ उभी राहिली. फक्त अडचण आली, ती इथे समुद्र-मीठ कुठून आणायचे? मग या भिल्ल, आदिवासी जनतेने ब्रिटिशांनी गवत कापण्याविरोधात केलेला कायदा मोडण्याचे ठरवले. १ सप्टेंबर १९३० रोजी ही सारी जनता इथे लळींग किल्ल्याच्या पायथ्याशी जमा झाली आणि गवताची कापणी करत त्यांनी सविनय कायदेभंग केला. लळींगच्या गवताला जणू दांडीच्या मिठाचे महत्त्व आले!



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

facebook page
https://www.facebook.com/shivhindvi

Instagram
https://www.instagram.com/shivhindvi/

Whatsapp
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1



" हर हर महादेव जय श्रीराम "
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य"
97 views09:34
ओपन / कमेंट
2021-09-01 12:34:56 आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

१ सप्टेंबर इ.स.१६६०
( भाद्रपद शुद्ध सप्तमी, शके १५८२, संवत्सर शार्वरी, शनिवार )

छत्रपती शिवाजी महाराजांनी चौल ते बांदा हा प्रदेश जिंकून घेतला.
“चौल” जगाच्या नकाशातील एके काळचे भरभराटीचे बंदर इजिप्त, ग्रीस, चीन आणि आखातातील देशांकडे याच बंदरातून व्यापार होत असे. त्याकाळी आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी उदयास आलेले हे बंदर पोर्तुगीजांचे महत्वाचे ठाणे, निजामशाही, आदिलशाही आणि मराठेशाही फार जवळून पाहणारे नगर होते. असे हे विस्मरणात गेलेले चौल ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहताना फारचं वेगळे भासले. चौल आज समुद्री पर्यटनासाठी ओळखले जाते. जगाच्या नकाशात त्याकाळी “दक्षिण काशी” अशी महत्वाची भूमिका बजावणारे चौल आज त्याच नकाशात शोधावे लागते, कालाय तस्मै नम:, म्हणतात ते हे असे इतिहासात फेरफटका मारताना या महत्वाच्या बंदराचा उल्लेख “पेरिप्लस ऑफ एरिथ्राईन सी” या दस्तावेजात आणि अगदी सुमारे २५०० वर्षांपासून आढळतो. रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या दक्षिणेस १८ किलोमीटरवर असलेल्या चौलमध्ये वाघजाईच्या डोंगरातील सातवाहन काळातील लेणी त्या काळाचे चौलशी असलेले नाते दाखवते. आक्षी-नागावप्रमाणे चौल-रेवदंडा हि देखील एक जोडगोळी आहे. मूळच्या चौलच्या दोन-तीन पाखाड्या स्वतंत्र करून रेवदंडा नगर उदयास आले म्हणूनच आजही या परिसरात चौलचा उल्लेख चौल-रेवदंडा असाच केला जातो. पुराणात गेलो तर चौलचे नाव “चंपावती” तर रेवदंड्याचे नाव “रेवती” असे आढळते पण चौल या नगरीचे पौराणिक नावांशिवाय चेमुल, तिमुल, सिमुल, सेमुल्ल, सिबोर, चिमोलो, सैमुर, जयमूर, चेमुली, चिवील, शिऊल, चिवल, खौल, चावोल, चौले आणि आता चौल अशा अन्य नावांनीही या स्थळाचा उल्लेख आलेला आहे. एखाद्या गावाला ही एवढी नावे कशी, असा प्रश्न मला पडला आणि त्याचे उत्तर ऐतिहासिक दस्तावेजांतून चौलच्या प्राचीन बंदरात दडलेले आढळले. इतिहासात चौल या नगरीचा प्रदीर्घ कालखंड आणि त्यातच हे प्रसिद्ध बंदर होते, साहजिकच संपर्कात आलेल्या अनेक देशी-विदेशी सत्ता, व्यापारी, प्रवासी या साऱ्यांनी या स्थळाचा आपापल्या भाषा-संस्कृती आणि उच्चारानुसार उल्लेख केला आणि त्यातूनच ही विविध नावे जन्माला आली.


https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

१ स्पटेंबर इ.स.१६८२
दक्षिणेत येताच औरंगजेबाने स्वराज्यातील महत्वाचे किल्ले आणि मुलुख घेण्यासाठी आक्रमक हालचाली सुरू केल्या.यात त्यांनी १६८२ च्या सुरुवातीला सातारा परिसरात हल्ले चढवले.या मोहिमेसाठी बादशाहाने खानजहान बहादूरला पाठवले होते. त्याने मराठ्यांच्या ताब्यातील साताऱ्या जवळील रहिमतपूर आणि इतर गावे लुटली.यासह खानजहानने सातारागड,आदल,सुबदल,रहिमतपूर या भागातील जंगल ताब्यात घेतले आणि काही ठिकाणी आगी लावल्या.सरदार भीमराव आणि त्याची मुले त्याच्या हाती सापडली.त्यांच्याबरोबरच २५ हजार कैदीही सापडले.त्यात १० हजार मुसलमान होते.याबरोबरच ८ हजार जनावरेही त्याने पकडली.ही सर्व लूट पेडगाव येथे ठेऊन तो मराठी मुलाखत पुन्हा हल्ले करणार होता.



१ सप्टेंबर इ.स.१७६०
सदाशिवरावभाऊंनी नानासाहेबांना पत्र लिहिले, त्या पत्रात भाऊ म्हणतात,
"माझ्या छावणीत भूकमरी आहे, पैसे नाही आहेत,
कर्जही मिळत नाही व माझे शिपाई उपवास करत
आहेत, लवकरात लवकर मदत पाठवावी".
दिल्ली जिंकल्यामुळे, अब्दालीच्या छावणीत भीतिदायक वातावरण निर्माण झालं आणि अहमदशहाअब्दाली, नजीबखान व शुजाउद्दोला यांनी दिल्लीकडे कूच केलं. अब्दाली आपल्या सैन्यासह, यमुनेच्या एका बाजूस शहादऱ्याजवळ तळ ठोकून होता, तर मराठे यमुनेच्या दुसऱ्या बाजूस दिल्लीत होते.



१ सप्टेंबर इ.स.१८१६
१९ सप्टेंबर इस. १८१५ रोजी त्रिंबकजी डेंगळ्यांना इंग्रज अधिकारी माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टनने कैदेत ठेवले...
त्रिंबकजी डेंगळे हे एक उत्तम कारभारी आणि प्रशासक होते. नाना फडणवीसांच्या मृत्यूनंतर गेल्या पंधरा वर्षात असा उत्तम कारभारी पेशव्यांना मिळालेले नव्हते. नानांची काम करण्याची पद्धत, त्यांची शिस्त, कडवेपणा आणि मुख्यतः दौलतीचे हीत हे सारे गुण जसेच्या तसे त्रिंबकजींत पुरेपूर उतरले होते. वसईच्या तहामुळे पेशव्यांची झालेली नामुष्की आणि या गोऱ्यांच्या अवलादीपासून दौलत वाचवायची असेल तर त्रिंबकजींच हवे हे बाजीरावही पक्के जाणून होतेच. बाजीरावांनी त्रिंबकजी डेंगळ्यांना इंग्रजांच्या तावडीतून सोडवण्याकरिता गुप्त हालचाली सुरू केल्या. अन् अखेर एक वर्षानंतर त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं. दि. १ सप्टेंबर १८१६ या दिवशी त्रिंबकजी डेंगळे इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन ठाण्याच्या त्या कडक बंदोबस्तातून अलगद निसटले.

78 views09:34
ओपन / कमेंट
2021-08-31 07:27:27
363 views04:27
ओपन / कमेंट
2021-08-31 07:27:26
393 views04:27
ओपन / कमेंट
2021-08-31 07:27:13 जेमतेम एक महिन्याचे असलेले सदाशिवपंत आईला पारखे झाले. सदाशिवपंतांना कसलाही त्रास होऊ नये म्हणून काशीबाई सर्वतोपरी काळजी घेत. राधाबाईंनाही सदाशिवपंतांची काळजी वाटत होती. त्यांच्या संगोपनावर राधाबाईंचीही करडी नजर असे.



३१ ऑगस्ट इ.स.१७४३
पेशवे-रघूजी झुंज झाल्याचे ऐकून शाहू महाराजास दुःख झाले. त्यांनी ह्या दोन्ही मातबर सरदारांस आपल्यापाशी बोलावून घेतले. रघूजींना समजून चुकले की, मराठे सरदारांमध्ये पेशवे प्रमुख असून त्यांस विरोध केल्यास आपण एकाकी पडतो त्यामुळे शत्रूचे फावते. बंगालमध्ये आपल्या चढाईचा कार्यक्रम यशस्वी करावयाचा असेल तर शत्रूस बाहेरून येणारी कुमक बंद केली पाहिजे हे त्यास पक्के कळून चुकले. याकरिता मनातील तेढ सोडून रघूजींनी पेशव्यांचे वर्चस्व कबूल केले. तेव्हा वादाचा मुख्य मुद्दाच निकालात निघाला. महाराजांनी दोघास जवळ बोलावून त्यांची कार्यक्षेत्रे आखून दिली. वऱ्हाडपासून कटक प्रांतापर्यंतचा सर्व मुलुख, बंगाल, बिहार व लखनौ एवढ्या भागात पेशव्यानी ढवळाढवळ करू नये व अजमीर, आग्रा, प्रयाग व माळवा हे प्रांत पेशव्यांचे म्हणून तारीख ३१ ऑगस्ट १७४३ ला ठरवून दिले. याप्रमाणे रघूजीनी बंगाल्यातील आपल्या उद्योगास पेशव्यांची संमति मिळविली आणि पुढील आठ वर्षात अलिवर्दीखानाशी निकराने युद्ध चालवून बंगालवर आपले हक्क लागू केले.
छत्रपति शाहू महाराजांनी हा समेट घडवून आणला. दोघा मातबर सरदारांचा समेट झाल्याप्रीत्यर्थं शाहू महाराजांनी त्यांना खाना दिला. खान्याचे समारंभ दोन्ही बाजूंनी यथापूर्वक पार पडले. शाहू छत्रपतीसही ह्या दोघा उमरावांनी मेजवानी दिली. त्यावेळी शाहू महाराजांनी त्या दोघाकडून एकोप्याच्या आणि एकदिलाने वागण्याच्या शपथा आपल्या पायावर हात लावून घेवविल्या. गढा आणि मांडला ह्या परगण्यांबद्दलचा वादही दोघांमध्ये एकवाक्यता घडवून आणून तोडला. अशा रीतीने दोघेही सरदार आपआपल्या कार्यास उद्युक्त झाले.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

facebook page
https://www.facebook.com/shivhindvi

Instagram
https://www.instagram.com/shivhindvi/

Whatsapp
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1



" हर हर महादेव जय श्रीराम "
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य"
371 views04:27
ओपन / कमेंट
2021-08-31 07:27:13 आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

३१ ऑगस्ट इ.स.१२००
वयाच्या पस्तीसाव्या वर्षी महाराज जैतूगीदेव यांचे निधन झाले.
जैतूगीदेव हे महाराज चक्रवर्ती सिंघणदेव यांचे वडिल जैतूगीदेव होते. तर आजोबासाहेब भिल्लमदेव हे चालुक्यांचे सामंत होते. महाराज भिल्लमदेव यांनी ११८७ मध्ये स्वतःला स्वतंत्र घोषित करुन सेऊन साम्राज्याची स्थापना केली, त्यांनी ११८७ मध्ये देवगिरि येथे किल्ला बांधला आणि देवगिरिला आपली राजधानी बनवली, ११८८ मध्ये त्यांनी गझनीचा सुलतान घियथ अल-दीन मुहम्मदचा सेनापती महम्मद गोरी याला महाराष्ट्राच्या सीमेवरुन पिटाळून लावले होते. त्यांनी ११८७ - ११९१ पर्यंत महाराष्ट्रवर राज्य केले होते, ११८९ मध्ये त्यांनी सूरातूर येथे झालेल्या लढाईत होयसळ शासक बल्लालाचा पराभव केला होता, ११९१ मध्ये ते युद्धात बल्लाल सोबत लढता लढता विरगतित मरण पावले होते. त्यांच्या नंतर त्यांचे पुत्र महाराज जैतूगीदेव हे राजे झाले, त्यांनी ११९१-१२०० पर्यंत राज्य केले होते. तिथे दुसरी कडे उत्तर भारतात मोहम्मद गोरीने घियथ अल-दीन मुहम्मद याच्या साठी ११९२ मध्ये निर्णायकपणे अजमेरचे सम्राट पृथ्वीराज चौहान यांचा पराभव केला, मंग यानंतर त्याने कनैजचा राजा जयचंद याचा पराभव केला, असे करुन घुरीड वंशाचे वर्चस्व भारतात प्रस्थापित झाले, यानंतर ११९४ मध्ये गझनीचा सुलतान घियथ अल-दीन मुहम्मद याने मोहम्मद गोरीला महाराष्ट्राच्या स्वारीवर पाठवले, मोहम्मद गोरी याने माळवा आणि गुजरात हे दोन राज्य काबीज करत महाराष्ट्रावर आक्रमकण केले, तेव्हा महाराज जैतूगीदेव यांनी त्याला महाराष्ट्राच्या सीमेवरुन पिटाळून लावले.
यानंतर मोहम्मद गोरीने तीन वेळा महाराष्ट्रावर स्वारी केली, ११९५ मध्ये, ११९६ मध्ये आणि ११९७ मध्ये, त्याने जेव्हड्या वेळा महाराष्ट्रावर स्वारी केली तेव्हढ्याच वेळा महाराज जैतूगीदेव यांनी त्याला पिटाळून लावले होते. महाराज जैतूगीदेव वारंगळचा राजा महादेव याच्या सोबत युद्ध करण्यासाठी वारंगळला गेले, त्यांच्या सोबत युवराज सिंघणदेव सुध्दा गेले होते, तेव्हा ते १२ वर्षाचे होते, महाराज जैतूगीदेव यांनी वारंगळ येथे महादेव सोबत युद्ध केले, युद्धा मध्ये महाराज जैतूगीदेव सोबत युवराज सिंघणदेव शत्रूंशी धैर्याने लढत होते, या युद्धात महाराज जैतूगीदेव विजयी झाले, आंध्र हे राज्य आता सेऊन साम्राज्याच्या अधिपत्याखाली आले. यानंतर ३१ ऑगस्ट १२०० मध्ये वयाच्या पस्तीसाव्या वर्षी महाराज जैतूगीदेव यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर महाराज सिंघणदेव वयाच्या १५ व्या वर्षी सेऊन साम्राज्याचे चक्रवर्ती झाले



३१ ऑगस्ट इ.स.१६६१
सन १६६१ च्या मे महिन्यात मोगलांनी प्रथम कल्याण जिंकून घेतले. पुढे महाड शहरही जिंकून घेतले. ते पुढे ९ वर्षांपर्यंत त्यांच्याकडे राहिले. मुस्लिम सैन्याधिकारी बुलाखी याने पेण परिसरातील देइरीच्या 【देईरी गड हा पेण तालुक्यातील एक डोंगरी किल्ला आहे】. किल्ल्याला वेढा घातला. परंतु त्या किल्ल्यांच्या सुटकेकरता कावजी, कोंढाळकरांच्या नेतृत्वाखाली आलेल्या मराठी सैन्याने बुलाखीला दूर पिटाळून लावले. बुलाखीच्या सैन्यातील पाचशे सैनिकांना ठार मारले या घटनेची तारीख होती ३१ ऑगस्ट १६६१



३१ ऑगस्ट इ.स.१६७७
( भाद्रपद शुद्ध चतुर्दशी, शके १५९९, संवत्सर पिंगळ, शुक्रवार )
स्वराज्याची हद्द गणदेवी पर्यंत :-
शिवरायांनी गणदेवी हा मोगलांच्या ताब्यात असलेला गुजराती प्रदेश स्वारी करून जिंकून घेतला व स्वराज्याची हद्द गणदेवी पर्यंत वाढवली.



३१ आगस्ट इ.स.१६८२
(भाद्रपद शुद्ध ९, नवमी, शके १६०४, रौद्र संवत्सर, वार गुरुवार)

शहजादा अकबराची बंडाची बातमी सर्वदूर झाली.
महाराजांच्या महानिर्वाणानंतर स्वराज्य बेचिराख करून आसेतु हिमाचल इस्लाममय प्रदेश करण्याची आकांक्षा मनी बाळगून आलेल्या औरंगजेब बादशहाला छत्रपती संभाजी महाराजांनी पहिल्या २ वर्षांतच जबरदस्त झुंजवला. त्यातच शहजादा अकबरसुद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या आश्रयास आला ही औरंगजेब बादशहासाठी अत्यंत नामुष्कीची गोष्ट होती. आपल्याच पित्याविरुद्ध मुलाने बंड केल्याची बातमी सर्वदूर झाली. औरंगजेब बादशहासाठी हा फार मोठा धक्का होता.



३१ ऑगस्ट इ.स.१७३०
चिमाजीआप्पांच्या पत्नी रखमाबाईंना ४ ऑगस्ट १७३० रोजी रखमाबाईंना पुत्र झाला. चिमाजीआप्पांचे हे पहिलेच पुत्ररत्न. पुण्यात साखऱ्या वाटण्यात आल्या. प्रथेप्रमाणे आजीने म्हणजेच राधाबाईंनी नाव ठेवले 'सदाशिव'. हेच ते पुढच्या काळातले प्रख्यात सदाशिवराव उर्फ भाऊसाहेब पेशवे. सदाशिवपंतांच्या जन्मानंतर आई रखमाबाईंची तब्येत दिवसेंदिवस ढासळत चालली होती. वैद्यांची औषधे, मात्रा चालू होत्या. परंतु शेवटी कसलाही परिणाम न होता दि. ३१ ऑगस्ट १७३०, सोमवारी रात्री रखमाबाई मृत्यू पावल्या.
283 views04:27
ओपन / कमेंट
2021-08-30 12:50:22
72 views09:50
ओपन / कमेंट
2021-08-30 12:50:12 त्यातच नारायणरावाच्या बेफिकीर वागण्याने दरबारातील बरेचसे सरदार दुखावले गेले.कैदेतील रघुनाथरावाने नारायणारावला धरण्याचे काम शनिवारवाड्याच्या बंदोबस्ताचे काम करणाऱ्या गारद्यांचे पुढारी सुमेरसिंग,खरकसिंग आणि महंमद इसफ याना दिले. या बदल्यात त्यांना ३ लाख रुपये देण्याचे ठरले. त्याप्रमाणे नारायणराव दुपारी जेवण करून झोपण्यासाठी जात असताना गारद्यानी नारायणरावावर हल्ला केला. जीव वाचवण्यासाठी तो पळत रघुनाथरावाच्या खोलीत जाऊन त्याच्या गळ्यात पडला. पण रघुनाथरावांच्या विरोधाला न जुमानता तुळया पवारने नारायणारावला बाजूला ओढताच गारद्यांनी वार करून त्यांची हत्या केली. या वेळी झालेल्या झटापटीत शनिवारवाड्यातील ६ ब्राम्हण,१ हुजऱ्या,१ नाईक,२ कुणबीनी आणि १ गाय मारली गेली. ऐन गणेशोत्सव काळात पेशवेपदाच्या सत्तास्पर्धेतुन शनिवारवाड्यात झाली.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

facebook page
https://www.facebook.com/shivhindvi

Instagram
https://www.instagram.com/shivhindvi/

Whatsapp
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1



" हर हर महादेव जय श्रीराम "
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य"
71 views09:50
ओपन / कमेंट
2021-08-30 12:50:11 आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

३० ऑगस्ट इ.स.१६१५
बाजीप्रभूंचा जन्म ३० आॅगस्ट १६१५ रोजी शिंद, ता. भोर, जि. पुणे येथे झाला. बाजीप्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशकुलकर्णी होते. शिवाजीराजांना विरोध करणाऱ्या बांदलांचे बाजी सरनोबत होते. परंतु बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपलेसे करून घेतले. बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा शिवाजीराजांना समर्पिली. दोन्ही हातांनी दोन समशेरी व दांडपट्टे चालविण्यात ते तरबेज होते. शिवरायांच्या सैन्यात हा अमोल सेनानी होता. शिवरायांवर त्यांची अलोट भक्ती होती.


https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

३० ऑगस्ट इ.स.१६५८
शिवरायांनी आपले वकील "सोनोपंत डबीर" यांना दिल्लीच्या औरंगजेब बादशहाकडे काही प्रश्नांसहीत पत्र घेऊन पाठवले.
३० ऑगस्ट १६५८ ला सोनाजीपंत दिल्लीला जायला निघाले व तिथे पोहोचल्यावर औरंगजेबला शिवाजीराजेंच्याकडून अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. ह्यावेळी शिवाजी राजेंनी पाठवलेले पत्र आज उपलब्ध नाही पण त्यावर औरंगजेबचे उत्तर उपलब्ध आहे. शिवाजी राजेंनी त्याच्या पत्रात काही सवलती मागितल्या होत्या पण ते पत्र उपलब्ध नसल्याने नेमके काय मागितले होते ते कळत नाही. शिवाजी राजेंनीे मुघल साम्राज्याप्रती निष्ठा दाखवावी अशी औरंगजेबची मागणी होती. तसेच दख्खनचा मुघल सुभेदार शाहिस्तेखानच्या आदेशानुसार त्याला सहय्य करावे. ह्या पत्रात दारा शुकोहला भक्करच्या सीमेवर पकडण्यात आले याचा उल्लेखही आहे. हा सगळा पत्राचा खटाटोप उरकल्यावर सोनाजीपंत बरोबर औरंगजेबने शिवाजी महाराजांसाठी एक खास पोशाख पाठविला.



३० ऑगस्ट इ.स.१६८१
छत्रपती संभाजी महाराजानी रायगडावर जाऊन सर्व सत्ता आपल्या हाती घेतली.कारस्थाने करणाऱ्या मंत्र्याना राजेंनी माफ केले. पण मे १६८१ मध्ये औरंगजेबाचा मुलगा राजपुत्र अकबर संभाजीराजेच्या आश्रयाला आला. या गोष्टीचा फायदा घेत या मंत्र्यांनी पुन्हा राजेंच्या विरोधात कारस्थान करायला सुरुवात केली. याचाच एक भाग असलेल्या एका घटनेचा उल्लेख इंग्रजानी नोंदवून ठेवला आहे. तो असा,"संभाजीराजा मोठ्या प्राणांतिक संकटात सापडला होता. त्याच्या जेवणातील मत्स्यान्नाचे पोटी घातलेल्या विषाने तो मरायचाच,परंतु त्याच्या अल्पावयी नोकराने त्याला ते सेवण्यापासून थांबवले.तेंव्हा त्यातील थोडा भाग नोकरांपैकी एकाला व कुत्र्याला घालविला.दोघेही थोड्याच वेळात मेले. संभाजीच्या विरोधात ज्यांनी हा कट केला त्यात अन्नजीपंडित,केसो पंडित,प्रल्हाद पंडित वगैरे होते. त्या सर्वांना शृंखला ठोकविल्या.



३० ऑगस्ट इ.स.१७४८
नानासाहेब पेशवांची गणपतीवर विशेष श्रद्धा होती. त्यामुळे मोहिमेतील मिळालेल्या यशाच्या आनंदाप्रीतीर्थ नानासाहेबांनी दान करायचे ठरवले. तुलादान हे सर्वात मोठे महादान आहे. दि. ३० ऑगस्ट इ.स. १७४८ या दिवशी अंगारक चतुर्थी येत असल्याने तो मुहूर्त साधून नानासाहेबांनी थेऊरला सुवर्णतुला करण्यात आली हे सुवर्ण दान गरिबांना वाटण्यात आले.



३० ऑगस्ट इ.स.१७५५
समशेर बहाद्दर यांचे दुसरे नाव कृष्णसिंह होते. ऐतिहासिक कागदात समशेर बहाद्दर कृष्णसिंह असे उल्लेख आढळतात वयाच्या ६ व्या वर्षी मातृपितृविहीन झाल्यावर थोरल्या नानासाहेबानी प्रेमाने, आपुलकीने, योग्य इतमामानी यांचा सांभाळ केला बाजीराव मस्तानी हयात असताना जे वादळ उठले होते, त्याचे समशेर बहाद्दर यांच्या पालनपोषणाच्या बाबतीत थोडे देखील सावट पडले नाही हे विशेष आहे. सदाशिवराव भाऊसाहेबांचा यांच्या वर खूप प्रभाव होता. सदाशिवराव भाऊच्या हाताखाली वागून हे कारभारी व दरबारी, लष्करी कामात हुशार बनले होते. समशेर बहाद्दरानी मोठ्या लष्करी मोहिमेत भाग घेतल्याचा पहिला उल्लेख सन १७५३ मध्ये मिळतो. रघुनाथरावनबरोबर उत्तर भारताच्या मोहिमेत सहभागी होते. ३० ऑगस्ट सन १७५५ मधे कोकणात लष्करी मोहिमेत अडचणी निर्माण झाल्या मुळे समशेरबहाद्दराना उत्तरेकडची मोहीम इतरांवर सोपवून महाराष्ट्रात परत यावे लागले. या नंतर त्यांना दिनकर महादेव बरोबर कोकणच्या लष्करी मोहिमेवर रत्नागिरी जिल्ह्यात रवाना व्हावे लागले. तुळाजी आंग्र्यांविरुद्धच्या या मोहिमेत त्यांनी सन १७५६ ला रत्नागिरीचा किल्ला सर केला.



३० ऑगस्ट इ.स.१७७३
नानासाहेब पेशवे यांचे धाकटे पुत्र नारायणराव हे माधवराव पेशव्यांच्या अकस्मित निधनानंतर मराठी सत्तेचे मुख्य प्रधान झाले. चुलते रघुनाथराव आपल्या विरोधात कट रचत असल्याचे कळताच त्यांनी त्यांना पत्नी आनंदीबाईसह कैदेत टाकले.
58 views09:50
ओपन / कमेंट