Get Mystery Box with random crypto!

" छञपती श्री शिवाजी महाराज "

टेलीग्राम चैनल का लोगो chatrapat — " छञपती श्री शिवाजी महाराज "
टेलीग्राम चैनल का लोगो chatrapat — " छञपती श्री शिवाजी महाराज "
चैनल का पता: @chatrapat
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 3.58K

Ratings & Reviews

4.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

2

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 137

2021-08-21 17:29:44 आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

२१ ऑगस्ट इ.स.१६६१
सण १६६१ च्या एप्रिल महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी पालवणच्या जसवंतराव दळवी आणि त्याचा आश्रयादाता शृंगारपूरचा सूर्यराव सुर्वे यांचा बंदोबस्त केला. महाराजांच्यासोबत यावेळी १५ हजारांची पायदळ सेना होती.पुढे या सूर्यराव सुर्वेला आश्रय देणारे कुडाळकर लखम सावंतही महाराजाच्या भीतीने कुडाळ सोडून डोंगरात निघून गेले. तेथील व्यवस्था लावून महाराज महाडला आले. राजापूराच्या महाराजांच्या कैदेत असणारे परकीय कैद्यांच्या सुटकेसंदर्भात सुभेदार रावजी पंडित यांना सूचना देऊन महाराज शाहिस्तेखानाच्या हालचालीना पायबंद घालण्यासाठी कल्याणला आले.पण त्यांना त्यात अपयश आले. पावसाळ्याच्या पूर्वी महाराज राजगडावर आले आणि प्रशासकीय व्यवस्थेत बदल करत शामराज निळकंठ रांझेकर यांच्या जागी नरहरी आनंदराव यांना पेशवेपद दिले तर अनाजीपंताना वाकेनिस पद दिले. याबरोबरच सर्व मंत्र्यांना पालखीचा मान दिला. राजगडावर झालेल्या या बदलाची तारीख होती.


https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

२१ ऑगस्ट इ.स.१६८२
"किल्ले रामशेज" मराठ्यांकडून जिंकण्यासाठी मुघल सरदार "कासीमखान" याने कील्ल्याच्या बरोबरीने डेरे (मनोरा) उभे केले. पण मराठ्यांनी रात्रीतच ते नेस्तनाबूत केले.



२१ ऑगस्ट इ.स.१६८८
ठाणे जिल्ह्यात असणारा माहुली किल्ला शिवाजी महाराजांनी १६६१ मध्ये मुघलांकडून जिंकून घेतला होता, पुरंदरच्या तहात तो पुन्हा मोगलांकडे गेल्यावर १६७० मध्ये मोरोपंतांनी तो परत जिंकून घेतला. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शंभुराजेच्या काळात मराठ्यांचे किल्ले लढून जिंकता येत नसल्याने औरंगजेबाने ते फितुरीने जिंकून घेण्याचा प्रयत्न सुरू केला. किल्ला फितुरीने घेण्यासाठी मुघल सरदार मातबरखानाने माहुलीचा किल्लेदार द्वारकोजी याचे मन वळवण्यासाठी नरसु महाडिक याला मध्यस्थ नेमले. त्याच्या प्रयत्नाने किल्लेदार द्वारकोजी मुघल सरदार अब्दुल कादिर याला भेटला आणि म्हणाला की,'साल्हेरचा किल्लेदार आसोजीप्रमाणे मला मनसब दिली तर मी किल्ला खाली करीन,आणि ४० हजार रुपये,१० घोडे,खिलत,इनाम आणि राहण्यासाठी जुन्नरजवळची दोन गावे वतन दिली तर मी स्वतः दरबारात हजेरी देण्यासाठी येईन.'किल्लेदार द्वारकोजी अब्दुल कादिरला भेटला.



२१ ऑगस्ट इ.स.१७११
चंद्रसेन जाधवरावांच्या ह्या उघड बंडाने महाराष्ट्रात सनसनाटी निर्माण केली. ताराबाईनी चंद्रसेन जाधवांचे सहर्ष स्वागत केले. छत्रपती शाहू राजांची बाजू यावेळी फारच कमकुवत होती. चंद्रसेन जाधवरावांच्या अगोदर सावंतवाडीचे सावंत, आंग्रे, खंडेराव दाभाडे अशी मातबर मंडळी ताराबाईना मिळाली होतीच. चंद्रसेन जाधवांनी हैबतराव निंबाळकरास चिथावून त्यास ताराबाईंच्या पक्षास आणण्याचा प्रयत्न सुरू केला. अशा वेळी परसोजी भोसले व चिमणाजी दामोदर हे दोन सरदार शाहू राजांच्या बाजूचे राहिले, पण ते खानदेशकडे होते. शाहू राजांचा पक्ष फारच कमकुवत झाला होता. मोठी दुरावस्था प्राप्त झाली होती. तरी शाहू महाराज राजे डगमगले नाहीत. त्यांनी चंद्रसेन जाधवांकडील सेनापतीपद काढून ते ता. १ ऑक्टोबर १७११ रोजी त्यांचे बंधू संताजी यास दिले बाळाजी विश्वनाथांनी यावेळी पुढे सरसावून शाहू राजांची बाजू सावरून धरली. बाळाजींनी पिलाजी जाधव, पुरंदरे यांच्या सहाय्याने सावकारांकडून कर्ज काढले. फौज उभी केली. हीच फौज पुढे “हुजूर फौज”, “हुजूर पागा” म्हणून प्रसिद्ध पावली. सावकारांच्या कर्जास तारण पाहिजे म्हणून शाहू राजांकडून बाळाजींनी पंचवीस लाखाचा सरंजाम करून घेतला (२१ ऑगस्ट १७११). याच सुमारास शाहू राजास बातमी समजली की, आपल्याकडील परशुरामपंत
प्रतिनिधीसुद्धा ताराबाईच्या पक्षास मिळण्याच्या बेतात आहे, तेव्हा प्रतिनिधींना कैद करून (२० नोव्हेंबर
१७११) त्यांचा सरंजाम, घर, जिंदगीसुद्धा जप्त केली. चंद्रसेन जाधवांचा फितवा हेच शाहू राजांवर आलेले सर्वात अरिष्ट होय. या अरिष्टाची उठावणी दाऊदखान पन्नीच्या कारवाईने सिद्ध झाली. ताराबाईंनी त्यांत भर घातली आणि शाहू राजांवर नाराज झालेले खटावकर, थोरात, चव्हाण इत्यादी सरदारांना उठाव करण्यास राणीनी प्रोत्साहन दिले, मोठा पेच उत्पन्न झाला. त्यास शाहू राजांनी धिमेपणानें तोंड देऊन सर्वाच्या बंडाचा उपशम वर्ष सहा महिन्यात केला.



२१ ऑगस्ट इ.स.१८५७
जोधपूर राज्यातील एरिनपूरा छावणीतील देशी सैनिकांनी विद्रोहाची ज्वाला प्रज्ज्वलित केली. त्या सैनिकात बहुसंख्य राजपूत सैनिक होते . "चलो दिल्ली - मारो फिरंगी" अशा घोषणा देत सैन्य दिल्लीकडे निघाले. त्यांचा पहिला पडाव मारवाडमधील आहुजा नगरीजवळ पडला. तेथिल ठाकूर कुशलासिंह चंपावत या राजाने त्या सैनिकांचे नेतृत्व स्विकारले. आसोप, गुलर आणि आलनियावास येथले ठाकूरही आपल्या सैन्यांसह त्यांना येऊन मिळाले. तेव्हा त्या सैनिकांची संख्या सहा हजारापर्यंत झाली होती.
156 views14:29
ओपन / कमेंट
2021-08-19 11:21:40
25 views08:21
ओपन / कमेंट
2021-08-19 11:21:36 आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

१९ ऑगस्ट इ.स.१६००
बुर्हाण निजामशहाच्या मृत्युनंतर मुघल सम्राट अकबर याने अहमदनगर पर्यंत सैन्य पाठवून दहशत निर्माण केली त्यावेळी चांदबिबीने पराक्रमाची शर्थ करून अहमदनगरचा बचाव केला तरीपण तिच्या मृत्युनंतर मुघलांनी पुन्हा आक्रमण करून आजच्या दिवशी अहमदनगरचा ताबा मिळवला.


https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

१९ ऑगस्ट इ.स.१६६६
(श्रावण वद्य १४, चतुर्दशी, शके १५८८, संवत्सर पराभव, वार रविवार)

शिवाजीराजे निसटल्याची बातमी संपूर्ण आग्रा शहरात!
"फौलादखानी" चौकशीत गुन्हेगाराचा साथीदार सापडला होता. पण शिवाजीराजे हजार शाही सैनिकांच्या डोळ्यादेखत काय हुन्नर करून निघून गेले हे गूढ मात्र औरंगजेब बादशहाला व त्यांच्या बुद्धिमान वजिरांना काही केल्या उलगडेना. महाराज निसटल्याची बातमी कळल्यापासून या रहस्याचाही शोध घेणे सुरुच होते. अखेर बरेच डोके खाजविल्यानंतर शाही आधिकारी अचूक निर्णयावर येऊन पोहोचले की, "शिवाजीराजेंच्या डेऱ्यातून जे मोठमोठे मिठाईचे पेटारे जात होते त्यातच बसूनच वार रविवार दि. १९ ऑगस्ट इ.स.१६६६ शिवाजीराजे पळून गेले. प्रत्येक जण आपापल्या परीने "काहीही बोलु लागले. होते.‌ "नेतोजी पालकर यांना पकडण्याचे फर्मान निघाले.



१९ ऑगस्ट इ.स.१६८९
मराठ्यांच्या दक्षिणेतील जिंजी भागाच्या कारभाराची प्रमुख जबाबदारी शंभुराजेंचे मेहुणे आणि पराक्रमी सेनानी हरजीराजे महाडिक यांच्यावर होती. मुघल फौजा कर्नाटकात जाणार हे ओळखून संभाजीराजेनी हरजीराजेच्या मदतीसाठी आपले विश्वासू केसो त्रिमल पिंगळे यांना १२००० फौज देऊन हरजीराजेच्या मदतीला पाठवले होते. या दोन्ही सरदारांच्या फौजांनी अर्काट,कांजीवरम,चित्तापेठ व कावेरीपाक ही ठिकाणे काबीज केली. पण १६८९ च्या मार्च महिन्यात औरंगजेबाने शंभुराजेंची क्रूर हत्या केली,या घटनेने मराठेशाहीत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. ऑगस्ट महिन्याच्या सुमारास कर्नाटकात एक अफवा पसरली की सुभेदार हरजीराजे मुघलांना सामील होणार आहेत. पण ही अफवा खोटी होती कारण मुघलांच्या संभाव्य हल्ल्याला तोंड देता यावे म्हणून त्यांनी आपली ठाणी व किल्ले मजबुत करण्यास सुरुवात केली. एव्हढ्यानेच न थांबता मराठ्यांची आघाडी भक्कम व्हावी म्हणून आपल्या कैदेत असणाऱ्या केसो त्रिमल व त्यांच्या सहकाऱ्यांना मुक्त केले. पडत्या काळात मराठेशाहीची धुरा सांभाळनाऱ्या हरजीराजे महाडिक यांनी केसो त्रिमल याना कैदेतुन मूक्त केले.



१९ ऑगस्ट इ.स.१७५३
नजीबखानाच्या आमंत्रणावरून अहमदशहा अब्दाली १७५१ च्या अखेरीस पंजाब पर्यंत आला,आणि पंजाब आणि सिंध हे दोन प्रांत त्याने बळकावले. तेवढ्यावर समाधान मानून उन्हाळा सुरू होण्यापूर्वी तो काबूलला परत गेला.अब्दालीशी मुकाबला करण्यासाठी मराठ्यांना घेऊन वजीर सफदरजंग दिल्लीला आला. पण अब्दाली परत गेल्याने मराठे परत दक्षिणेकडे फिरले. यानंतर दिल्ली दरबारात सफदरजंग व बादशहा यांच्यात तीव्र मतभेद सुरू झाले,युद्धजन्य परिस्थितीमुळे बादशहाने नानासाहेब पेशव्यांना पत्र पाठवून मराठ्यांची मदत मागितली. आणि त्या बदल्यात मराठ्यांना १ कोटी रुपये आणि अयोध्या व अलाहाबाद हे दोन प्रांत देण्याचे कबुल केले.त्यामुळे नानासाहेब पेशव्यांनी रघुनाथराव व शिंदे-होळकर या सरदारांना बादशहाच्या मदतीस पाठवले. रघुनाथराव पेशवे दिल्लीला रवाना झाले.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

facebook page
https://www.facebook.com/shivhindvi

Instagram
https://www.instagram.com/shivhindvi/

Whatsapp
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1



" हर हर महादेव जय श्रीराम "
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य"
30 views08:21
ओपन / कमेंट
2021-08-18 10:08:35
267 views07:08
ओपन / कमेंट
2021-08-18 10:08:24 "The way Bajirao outgenerelled Nizam-Ul-Mulk at the Battle of Palkhed was the Masterpiece of Strategic Mobility ...."
इस १७२८ मधे बुंदेलखंडचे छत्रसाल बुंदेला यांच्या जैतापूरच्या राज्यावर मोहंमद बंगशने आक्रमण केले. सुरूवातीला छत्रसालांनी प्रतिकार केला मात्र नंतर बंगश वरचढ ठरू लागला तेव्हा छत्रसालांनी बाजीरावांकडे मदत मागितली. त्यासंदर्भात छत्रसाल काय म्हणाले याचा एक उल्लेख आहे 'जो गति ग्राह गजेंद्र की सो गति भई जानहु आज ।। बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज ।। '
बाजीरावांनी तिथेही मोठा पराक्रम गाजवत बंगशाला नामोहरण करत शरण यायला भाग पाडले. छत्रसालांचे राज्य वाचले व खुष होऊन त्यांनी बाजीरावांना मुलगा मानून त्यांच्या राज्याचा तिसरा हिस्सा देण्याचे जाहिर केले. त्याच वेळी छत्रसालांनी त्यांची एक दासीकन्या बाजीरावांना नजर केली. तिच पुढे बाजीरावांशी जन्मभर जोडली गेली व 'मस्तानी' या नावाने ओळखली गेली. इस १७२२ साली बाजीराव पेशव्यांनी स्वतः चा शिक्का तयार केला. त्यात शाहुराजांबद्दल आदरभाव व्यक्त होतो.
"श्री राजा शाहू नरपति हर्षनिधान, बाजीराव बल्लाळ मुख्य प्रधान।।"
आपल्या पराक्रमाने मुघल, पोर्तुगीज, इंग्रज, निजाम व काही आपल्याच फितुरांना नामोहरण करणार्या राऊंना इतिहास कायम लक्षात ठेवेल ही अपेक्षा!!



१८ आॅगस्ट इ.स.१७००
हणमंतराव निंबाळकर यांनी खटाव जिंकले



१८ ऑगस्ट इ.स.१९४५
सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू ?
नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते. हे नेताजी या नावाने ओळखले जातात. दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती. त्यांनी दिलेला जय हिन्दचा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

facebook page
https://www.facebook.com/shivhindvi

Instagram
https://www.instagram.com/shivhindvi/

Whatsapp
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1



" हर हर महादेव जय श्रीराम "
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य"
268 views07:08
ओपन / कमेंट
2021-08-18 10:08:24 आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

१८ ऑगस्ट इ.स.१६६६
आग्रा शहरात शनिवारचा दिवस उजाडला. दरबाराची वेळ झाली तरी महाराज अजून स्वस्थ झोपल्याचे पाहून रामसिंहाने नेमलेले पहारेकरी बलराम पुरोहित व त्याच्या सहकाऱ्यांना शंका आली. त्यांनी आत बिछान्याजावळ जाऊन पाहताच महाराज तिथे नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. महाराजांची पादत्राणे पलंगाखाली पडलेली होती तर त्यांचा मंदिल व एक आरसा बिछान्यावर होता.छावणीत फक्त ३ घोडे, २ पालख्या व एक तबेल्याचा नोकर एवढेच होते. हा हा म्हणता ही बातमी आग्रा शहरात पसरली. रामसिंह आणि फौलादखानाने ही बातमी औरंगजेबाच्या कानावर घातली. चिडलेल्या औरंगजेबाने रामसिंहाला महाराजांचा तपास करून त्यांना हजर करण्यास सांगितले. वाटेवरील फौजदारांना जागरूक राहण्यास सांगण्यात आले. महाराजांच्या पहाऱ्यावर असणाऱ्या रामसिंहाच्या बलराम पुरोहित, रामकीशन, जिवा जोशी आणि श्रीकिशन उपाध्याय यांना कैद करण्यात आले. दुपारच्या सुमारास परतीतराय हरकाऱ्याच्या घरात लपून बसलेले रघूनाथपंत, त्रंबकपंत व इतर दोन चाकर हेही फौलादखानाच्या हाती सापडले.औरंगजेबाने त्यांचा अनन्वित छळ सुरु केल.


https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

१८ ऑगस्ट इ.स.१६८३
मुघल आणि सिद्दी याच्याबरोबरच संभाजीराजेना पोर्तुगीजांचाही सामना करावा लागला. पोर्तुगीजांच्या कुरापतीचा बदला घेण्यासाठी शंभुराजेंनी ६ हजार पायदळ व २ हजार घोडदळ घेऊन जून १६८३ मध्ये चौलवर हल्ला केला.ही स्वारी जवळपास ६ महिने सुरू होती. या स्वारीत पुढे निळोपंत पेशव्यांनी दमण ते चौल पर्यंतचा मुलुख ताब्यात आणला. स्वतः शंभुराजेंनी चौलच्या ठाण्यास वेढा घालून तटबंदीवर तोफाचा मारा केला.पोर्तुगीज सैनिक सततच्या लढाईने थकून गेले. मराठ्यांनी माघार घ्यावी म्हणून पोर्तुगीजानी 'मेरी व्हर्जिन' व 'सेंट स्टीफन' यांची प्रार्थना करण्यास सुरुवात केली. ठाण्याच्या कॅप्टनने तर 'सेंट अँथनी' ची प्रार्थना करून त्याच्या पायाशी ६० आश्रफ्या ठेवल्या पण मराठे काही मागे हटले नाहीत.शंभुराजेंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी चौलच्या ठाण्यावर हल्ला केला.



१८ ऑगस्ट इ.स.१७००
महापराक्रमी महायोद्धा थोरले बाजीराव पेशवे अर्थात राऊसाहेबांचा जन्म..
शके १६२२, विक्रमनाम संवत्सर,भाद्रपद शुद्ध १५ या तिथीला बाजीरावांचा जन्म झाला. त्यांचे जन्मस्थान कोणते याबद्दल दुर्दैवाने नेमका पुरावा सापडत नाही. राऊंचे पाळण्यातले नाव विश्वनाथ उर्फ विश्वासराव होते. तसेच लहानपणी त्यांना विसाजी असेही हाक मारत. बाजीरावांची मुले त्यांना बाबासाहेब म्हणत. 'बाजीराव' हे नाव का ठेवले याबद्दल एक उल्लेख आहे. बाजीरावांच्या जन्माच्या वेळी त्यांचे वडील त्यांनी स्वतः लिहिलेली एक बखर वाचत होते. त्या बखरीत पुर्वी जे 'बाजी' नावाचे नावाचे पराक्रमी लोक होऊन गेले त्यांची माहिती होती. ही बखर वाचत असतानाच बाळाजींना मुलगा झाल्याची बातमी समजली म्हणून त्या मुलाचे नाव बाजीराव असे ठेवले. पुढे जाऊन हेच नाव जास्त प्रसिद्ध झाले. बाजीरावांचे हे भट आडनावाचे घरणे मुळ कोकणातील श्रीवर्धनचे होते. पुढे ते काही कारणाने देशावर आले. कालांतराने राजाराम, ताराबाई, शाहू या कालखंडात बाळाजी पराक्रम गाजवत १७१३ साली पेशवेपदावर पोचले. बाळाजींचा मुक्काम सासवडला होता. पुढे बाजीरावांच्या काळात तिथुन सातारा व नंतर पुण्यात शनिवारवाड्यात स्थलांतर केले. १७२० मधेच बाजीरावांची बाळाजींच्या जागेवर पेशवेपदावर नेमणूक झाली व पुढे अनेक पराक्रम गाजवत बाजीरावांनी हिंदवी साम्राज्य व्रुद्धिंगत केले.
१७२९ साली बाजीरावांच्या जीवनात मस्तानी आली. यावरुन पुढे काही वाद झाले. तसेच पुढे बाजीरावांचा दाभाडे सरदारांशी संघर्ष झाला. हे दोन अपवाद सोडले तर बाजीरावांची कारकीर्द पराक्रम व राजकारणाने भरली आहे.
१७१३ सालची पांडवगडाची चकमक,१७२० मधे निजामाचा केलेला पराभव, १७२१ मधे दाऊदखान पन्नीचा पराभव, १७२२ चा पोर्तुगीजांशी केलेला तह, १७२४ ला उज्जैनला दयाबहाद्दूराचा केलेला पराभव, १७२५ ते १७२७ दरम्यान चित्रदुर्ग व श्रीरंगपट्टणची यशस्वी मोहिम, १७३७ मधे दिल्लीवर मोहिम काढुन तिची केलेली दुर्दशा या आणि अनेक मोहिमांत बाजीरावांनी पराक्रम केला. १७२८ मधे बाजीरावांनी निजामाचा पालखेडच्या लढाईत पराभव केला. त्या लढाईतील बाजीरावांचे युद्धकौशल्य बर्नार्ड मॉन्टेगमरी या इंग्रज सेनानीला पुढे अनेक वर्षांनी इतके भावले की त्याने त्या गोष्टीचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. यावेळी भारत इंग्रजांच्या पारतंत्र्यात होता हे विशेष.
बर्नार्ड म्हणतो त्यातील काही वाक्ये:
222 views07:08
ओपन / कमेंट
2021-08-17 08:09:38
430 views05:09
ओपन / कमेंट
2021-08-17 08:09:30 १७ ऑगस्ट इ.स.१९०९
रोजी मदनलाल धिंग्रा यांना फासावर लटकवण्यात आले. हातात गीता आणि ओठात रामकृष्णाचे नाव घेऊन देशप्रेमाने भरलेला तो देशभक्त हसत हसत फाशी गेला.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

facebook page
https://www.facebook.com/shivhindvi

Instagram
https://www.instagram.com/shivhindvi/

Whatsapp
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1



" हर हर महादेव जय श्रीराम "
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य"
433 views05:09
ओपन / कमेंट
2021-08-17 08:09:30 आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

१७ ऑगस्ट इ.स.१६५३
चाकणचे सिद्धेश्वर भट ब्रम्हे यांना महाराजांनी वर्षासन नेमून दिले. चाकणचे सिद्धेश्वर भट ब्रम्हे हे दुसरे सत्पुरुष "त्यांच्या अनुष्ठानबळे आपण राज्यास आधिकारी झालो व सकल मनोरथ चिंतिले ते पावलो" अशी महाराजांची धारणा होती. महाराजांना औरंगजेब बादशहाचा कावा समजला आणि महाराजांनी भराभर पावले उचलायला सुरुवात केली.


https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

१७ ऑगस्ट इ.स.१६६२
जेधे शकावलीतील नोंदीनुसार भाद्रपदशुक्ल द्वादशी शके १५८४ म्हणजे १६ ऑगस्ट १६६२ रोजी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अण्णाजीपंतास सूरनिसी दिली. सुरनीस या फारसी शब्दाचा अर्थ “सुद सुद बार“ असा शेरा मारणारा . सनदा , हुकूमनामे , राजपत्र , महत्वाच्या निर्णयांची शासकीय कागदपत्रे तपासणे, त्यातील त्रुटि शोधून त्यातील चुकीचा मजकूर दुरुस्त करणे . महाल , परगणे यांचे हिशोब जमाखर्च तपासणारा कारकून . वित्त व लेखा अधिकारी . प्रसंगी युद्धात नेतृत्व करणे.

शेतजमिनीची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी अण्णाजी दत्तो यांच्याकडे होती त्यामुळे महसुलाच्या व्यवस्थेवरही लक्ष ठेवावे लागे. जमनीची मोजणी , सारा वसुली यात त्यांचे योगदान आढळून येते. चिटणीस बखरीनुसार धारा निशित करण्याचा प्रयत्न अण्णाजी दत्तो यांनी केला. “ अण्णाजीपंतांचा धारा “ हा शब्द प्रयोग पेशवाईतहि रूढ होता. इ.स. १६७८ साली रोहीडेखोरे परगण्याच्या वतनदाराना कौलनामा दिला त्यावरून याविषयीची माहिती मिळते. अण्णाजी दत्तो यांनी नियम तयार केले त्यानुसार देशमुख ,देशपांडे , पाटील आणि गावातील चार प्रमुख व्यक्ती यांनी गाव फिरावे . अव्वल , दुव्वल , सीम अशी जमिनीची प्रतवारी करून पिकाचा अंदाज घ्यावा. खरीप आणि रब्बी पिकांची वर्गवारी करून सारा गोळा करावा. अण्णाजी दत्तो स्वतः गावांमध्ये जात असत आणि डोंगरकाठाची जमीन , खाचर तळ्याची जमीन, काळी जमीनिची पाहणी करून शेतसाऱ्याचा दर ठरवीत.



१७ ऑगस्ट इ.स.१६६६
(श्रावण वद्य द्वादशी, शके १५८८, संवत्सर पराभव, वार शुक्रवार)

छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्राच्या कैदेतून सुटका करून घेतली!
छत्रपती शिवाजी महाराज ९ वर्षांच्या युवराज शंभूराजांच्या चाणाक्ष बुद्धी आणि आई भवानीचे आशीर्वाद यामुळे आग्र्यातून पेटाऱ्यातून पसार झाले. आग्रा शहरात शुक्रवारची नमाज असल्याने बादशाही दरबाराला सुट्टी होती. या गोष्टीचा फायदा घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी नियोजित योजनेनुसार मथुरेच्या ब्राह्मणांना आणि फकीराना मिठाईचे पेटारे पाठवण्याचे ठरवले होते. त्याप्रमाणे दुपारी चारच्या सुमारास पेटारे भरण्याचे काम सुरू झाले.याचवेळी महाराजांचे डोके दुखण्यास प्रारंभ झाला त्यामुळे त्यांच्या डेऱ्यात शंभूराजे,हिरोजी फर्जंद एवढेच मंडळी थांबली. डेऱ्यात शांतता राहावी म्हणूनइतर सहकारी आपआपल्या छावणीत परतले. सायंकाळी मिठाईचे पेटारे महाराजांच्या डे-यातून बाहेर पडले पहारेकर्‍यांनी एक-दोन पेटारे उघडून बघितले आणि जाऊ दिले. रामसिंहाने नेमलेले बलराम पुरोहित व त्याचे इतर सहकारी अधून मधुन डेऱ्यात डोकावून पाहत होते. पण शिवाजी महाराज मात्र औरंगजेबाच्या हातावर मिठाई ठेऊन केंव्हाच पसार झाले होते. जगाच्या इतिहासात शत्रूला मिठाई चारून आपली सुटका करून घेणारे एकमेव राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज आग्रा कैदेतून निसटले.



१७ ऑगष्ट इ.स.१६९६
खेम सावंताने कुडाळचा किल्ला घेतल्याचे व्हिसेरेइला कळले, तेव्हा त्याने दि. १७ ऑगष्ट १६९६ रोजी पत्र घालून त्याचे अभिनंदन केले. स. १६९६ साली खेम सावंताने मोगलांच्या ताब्यात असलेल्या धारगडच्या किल्ल्यावर हल्ला केला. त्याचा उल्लेख फोंड्याचा मोगल सुभेदार रफीखान याने गोव्याच्या व्हिसेरेइला पाठविलेल्या पत्रात आढळतो. रफीखानाने प्रस्तुतच्या पत्रात आपण सावंताविरुद्ध लष्करी मोहीम सुरु करणार असल्याचे म्हटले आहे व पोर्तुगीजानी दारूची पिंपे आणि तोफांचे गोळे पाठविल्याबद्दल आभार मानले आहेत. खेम सावंताने मोगलांच्या ताब्यात असलेले साखळी आणि डिचोली हे दोन किल्ले घेतले व फोंड्याच्या किल्ल्यास वेढा घातला. फोंड्याच्या नबाबाने पोर्तुगीजांकडे दारुगोळ्याची मदत मागितली व त्या मदतीबद्दल त्याना बार्देशच्या हद्दीवरील काही मुलुख देण्याचे कबूल केले. आपल्या राज्याच्या हद्दीला लागून असलेले सत्ताधारी आपल्याहून वरचढ होऊ द्यायचे नाहीत, हे पोर्तुगीजांचे धोरण असल्याने खेम सावंताविरुद्ध त्यानी फोंड्याच्या नबाबास दारू गोळ्याची मदत केली.



१७ ऑगस्ट इ.स.१७११
चंद्रसेन जाधवरावांचे छत्रपती शाहू महाराज यांचे विरूद्ध बंड ,ताराराणी गटात सामील

362 views05:09
ओपन / कमेंट
2021-08-15 08:31:59
86 views05:31
ओपन / कमेंट