Get Mystery Box with random crypto!

१ ऑगस्ट इ.स.१७६० मराठा सेना पेशवे सदाशिवराव भाऊसाहेब यांच्या न | " छञपती श्री शिवाजी महाराज "

१ ऑगस्ट इ.स.१७६०
मराठा सेना पेशवे सदाशिवराव भाऊसाहेब यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत पोहोचली.
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा
अडीचशे वर्षांपूर्वी म्हणजे १ ऑगस्ट १७६० रोजी सदाशिवराव भाऊ यांनी दिल्लीचे तख्त पालटून टाकले. सुमारे ५०० वर्षे राज्य करणाऱ्या मुघलांना धूळ चारली आणि दिल्लीच्या तख्तावर मराठ्यांचे नाव काढले, त्या मर्द मरहट्ट्याला मानाचा मुजरा.
म्हणूनच म्हंटले जाते. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा.



१ आॅगस्ट इ.स.१९२०
लोकमान्य टिळक पुण्यतिथी
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. ज्या प्रमाणे चिखलात कमळ उगवते, त्या प्रमाणे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी २३ जुलै १८५६ रोजी झाला. टिळक हे बालपणापासूनच हुशार आणि स्वाभिमानी होते. टिळकांचे शिक्षण फर्गुसन कॉलेज मध्ये झाले पुढे टिळकांनी स्वताला देशकार्यास वाहून घेतले. त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल, हि शाळा स्थापन केली. लोकांमध्ये जागृती होण्यासाठी केसरी व मराठा ही दोन वर्तमानपत्रे सुरू केली. टिळकाच्या कार्याने धास्तावून इंग्रजांनी त्यांना अटक करून त्यांच्यावर खटला चालवला. न्यायालयात टिळकांनी "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच" अशी सिंहगर्जना केली. इंग्रजांनी टिळकांना ६ वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावून त्यांची रवानगी ब्रह्मदेशातल्या मंडाले तुरुंगात केली. तेथे टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. स्वातंत्र्यपूर्व काळात, लोकांची एकी व्हावी म्हणून टिळकांनी गणेश चतुर्थी आणि शिवजयंती हे दोन उत्सव सुरू केले. जनतेने त्यांना प्रेमाने लोकमान्य ही पदवी दिली. असं हे बहुमूल्य रत्न मधुमेह व्याधीच्या निमित्ताने १ ऑगस्ट १९२० रोजी काळाने आपल्यापासून हिरावून घेतले. त्यांना शतशः प्रणाम.
#जय_हिंद !
#जय_महाराष्ट्र !



१ आॅगस्ट इ.स.१९२०
मराठी साहीत्य क्षेत्रात सर्वोच्च योगदान असलेले आणि मराठी साहीत्य तसेच छत्रपती शिवरायांचे चरीत्र पोवाड्यातून सातासमुद्रापार पोचवणारे "लोकशाहीर आण्णा भाऊ साठे" यांची आज जयंती.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

facebook page
https://www.facebook.com/shivhindvi

Instagram
https://www.instagram.com/shivhindvi/

Whatsapp
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1



" हर हर महादेव जय श्रीराम "
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य"