Get Mystery Box with random crypto!

आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष १० एप्रिल इ.स.१६६० (वैश | " छञपती श्री शिवाजी महाराज "

आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष

१० एप्रिल इ.स.१६६०
(वैशाख शुद्ध दशमी, शके १५८२, संवत्सर शार्वरी, वार मंगळवार)

सिद्दी जौहरने वेढा आवळला!
सह्याद्रीचा सिंह कोंडला गेला होता. कारण बाहेरून सिद्दी जौहरने वेढा करकचून आवळला होता. त्यातच सोबतीला हेन्री रेव्हिंग्टन, मिशेल, गिफर्ड, वेलजी यांनी पन्हाळा गडास आल्या आल्या लांब पल्ल्याच्या तोफाही पन्हाळगडावर डागायला सुरूवातही केली. असाच एक गोळा पन्हाळ्यावर येऊन पडला असता गडपाहणी करत असताना महाराजांना हा इंग्रजांचा प्रताप समजला. इकडे सिद्दी जौहर खूश होता. कारण तोफेचे गोळे पन्हाळ्याच्या तटाला भिडत होते. त्यामुळे आज ना उद्या तरी यश येईलच या खुशीने त्याने हेन्री रेव्हिंग्टन बरोबर पावसाळ्यापर्यंत दारुगोळा पुरविण्याचा करारही करून टाकला. महाराजांना हेन्री रेव्हिंग्टनच्या हालचालींची बित्तंबातमी कळत होती. मात्र स्वराज्य संकटात सापडले. एकीकडून शाहिस्तेखान दुसरीकडून सिद्दी जौहर या दुहेरी आक्रमणात महाराज सापडले होते. सिद्दी जौहर वेढ्यात जराही ढिलाई करत नव्हता. जर ढिलाई झाली तर सर्वांसमक्ष त्या सैनिकांची गर्दन उडवत असे. तीही विनाचौकशी. त्यामुळे सैन्यसुद्धा दक्ष होते.


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link




१० एप्रिल इ.स.१६९३
१६८९ मध्ये राजधानी रायगड मुघलांच्या ताब्यात गेल्यावर मराठ्यांचे तिसरे छत्रपति राजाराम महाराज 'जिंजी' (सध्या तामिळनाडू मध्ये) येथे गेले होते.
तेथेच त्यांनी स्वतःला राजाभिषेक करवून घेतला आणि राज्याची सूत्र काही काळासाठी त्यांनी तिकडून पाहिली. ह्या दरम्यान १० एप्रिल १६९३ रोजी त्यांनी तंजावर गादीचे शहाजीराजे (दुसरे) यांची भेट घेतली.



१० एप्रिल इ.स.१६९८
छत्रपती राजाराम महाराज दक्षिण कोकणातील गड कोटांच्या मोहिमे वर गेले. ह्या मोहिमेचा उद्देश म्हणजे आगामी लढ्यची पूर्व तयारी म्हणून गडकोटांवरील फौज,रसद, शस्त्रास्त्रे-दारुगोळा ह्या बाबी मजबूत करून त्यांना सज्ज करणे.ही मोहीम आटपून महाराज प्रतापगड - विशाळगड-सज्जनगड करत साताऱ्यास जुलै १६९८ मध्ये आले.



१० एप्रिल इ.स.१७०३
सिंहगडचा रणसंग्राम
एप्रिलला सेनापती धनाजी जाधवांचा पुत्र शम्भूसिंह जाधवने म्हलर्जी व खंडोजी च्या सोबतीने ४ हजार घोडदळ सकट इराडत खानाच्या ठाण्यावर हल्ला केला. हे ठाणे बादशाही छावणीच्या रक्षणाच्या हेतूने छावणी पासून केवळ ४ कोस दूर होते व माघारी जाता जाता आखरपूर इथून छावणी कडे येणारी रसद ही १० एप्रिल ला लुटली.



१० एप्रिल इ.स.१७५८
सरदार मानाजी पायगुडेंचा पराक्रम
सन १७५८ मध्ये मराठ्यांनी सरहिंद, लाहोर, जिंकले. अहमदशहा अब्दालीचा मुलगा तैमुर आणी सरदार जहानखान यांनी लाहोर सोडून पळ काढला. परंतु त्यांच्याजवळील अवजड तोफखाना व खजिना आणी दिल्ल्तीतील लुटीचा खाजींना त्यांनी तेथेच सोडून दिला. जाताना मात्र तैमुर ने आपला गुलाम तहमासखान यास गुलामगिरीतून मुक्त केले होते. तहमासखानाने मुक्त झाल्यामुळे लाहोरच्या वेशीचे दरवाजे उघडले. याच दरम्यान मराठा सरदार वीर मानाजी पायगुडे यांनी १० एप्रिल १७५८ रोजी लाहोरमध्ये पहिले पाउल टाकले. लाहोरमध्ये निधड्या छातीने पाउल टाकणारे ते पहिले मराठा शूर सरदार होते. तहमासखानाने आपल्या आत्मचरित्ररुपी तहमासनामा या ग्रंथात हि घटना स्पष्टपणे लिहून ठेवली आहे.





१० एप्रिल इ.स.१८१८
छत्रपती प्रतापसिंह महाराजांची साताऱ्याच्या गादीवर इंग्रजांकडून पुनःप्रतीष्ठापणा
१०-०४-१८१८ ला प्रतापसिंह यांची सातारा राज्याच्या गादीवर पुनःस्थापना झाली तरी त्यांचा ब्रिटिशांबरोबर तह २५ सप्टेंबर १८१९ मध्ये झाला. कारण तोपर्यंत बाजीराव इंग्रजांना शरण आला नव्हता व त्याचा पूर्ण बंदोबस्त केल्यावरच इंग्रज सातारच्या महाराजांकडे लक्ष देणार होते. कंपनी सरकारतर्फे जेम्स ग्रांट तर महाराजांतर्फे त्यांचा मुखत्यार-पॉवर ऑफ अटर्नी-विठ्ठल बल्लाळ फडणीस ने सह्या केल्या. जेम्स ग्रांट ने राज्यकारभाराच्या दृष्टीने परिपूर्ण सातारा राज्य ५ एप्रिल १८२२ महाराजांच्या हाती सोपविले. हे राज्य त्यानंतर सुमारे २६ वर्षे अस्तित्वात राहिले.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/