Get Mystery Box with random crypto!

Mission MPSC - Science By Amol Kavade Patil❣❣

टेलीग्राम चैनल का लोगो missionmpscworld — Mission MPSC - Science By Amol Kavade Patil❣❣ M
टेलीग्राम चैनल का लोगो missionmpscworld — Mission MPSC - Science By Amol Kavade Patil❣❣
चैनल का पता: @missionmpscworld
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.86K
चैनल से विवरण

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग तसेच पीएसआय, व ईतर 2022 मधील स्पर्धा परिक्षेसाठी महत्वपूर्ण
Preparation For Psi & State service 2022 Exam
For Notes
Contact Admin: MPSC.PSI .STI. ASO_ TARGET...2021😘😘 ..
🌹🌹Amol kavade Patil.
WhatsApp number:9657479827

Ratings & Reviews

4.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

2

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 2

2022-08-30 13:27:46 विनॉक्सी श्वसनाच्या पायऱ्या (Steps Of Anaerobic Respiration) :


1) ग्लायकोलायसिस (Glycolysis) :


 सजीव पेशीद्रव्यात गुल्कोजच्या रेणूचे विघटन करून दोन पायरुव्हेटचे रेणू तयार होतात म्हणून त्यास ग्लायकोलायसिस असे म्हणतात.


 यामध्ये सहा कार्बन असलेल्या संयुगांचे रूपांतर तीन कार्बन असलेल्या संयुगांमध्ये होते.


विनॉक्सी श्वसनमध्ये पायरुव्हेट आणि कार्बन डायऑकसाइडचा उपयोग लॅक्टिक आम्ल, ऍसिटिक आम्ल किंवा अल्कोहोल या सारखी कार्बनी संयुंगे तयार करण्यासाठी होतो.


ग्लायकोलायसिस हि क्रिया दोन्हीही श्वसन पध्द्तीमध्ये आढळून येते.


2) ऊर्जा प्राप्ती (Release Of Energy) :


 
विनॉक्सी श्वसन पद्धतीमध्ये सजीव ग्लुकोजचे अंशतः ऑक्सिडीकरण करून ATP च्या स्वरूपात ऊर्जा प्राप्त करतात.



ज्या प्रकियेत ग्लुकोज आणि कार्बोनी पदार्थांच्या रेणूंचे अंशतः पाणी आणि कार्बन डायॉकसाईड वायूत रूपांतर होते, या प्रकियेला किण्वन प्रकिया (Fermentation) असे म्हणतात.


 हि प्रक्रिया सूक्ष्मजीवांमार्फत घडवून आणली जाते.


उदा:


१) दुधाचे दही होणे – लॅकटोबॅसिल्स जिवाणू.


२) जीवनसत्वे आणि प्रतिजैविके तयार करणे –  पेनिसिलिअम किणव.


199 viewsAmol Kavade Patil.., 10:27
ओपन / कमेंट
2022-08-30 13:23:17 प्राण्यांमधील श्वसन (Respiration In Human) :


श्वसनासाठी सजीव ऑक्सिजनचा वापर करतात किंवा नाही या आधारे श्वसनाचे विनोक्सि श्वसन (Anaerobic Respiration) आणि ऑक्सी श्वसन  (Aerobic Respiration) हे दोन प्रकार पडतात.


१) विनोक्सि / अनानील श्वसन (Anaerobic Respiration):


ज्या पध्द्तीमध्ये सजीव ऑक्सिजन शियाव ग्लुकोजचे अंशतः ऑक्सिडीकरण करून ऊर्जा प्राप्त करतात त्यास विनॉक्सी /अनानील श्वसन असे म्हणतात.


उदा: काही जिवाणू आणि कवक.


169 viewsAmol Kavade Patil.., 10:23
ओपन / कमेंट
2022-08-30 13:19:57 वनस्पतींमधील श्वसन (Respiration In Plants) :


वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रकियेत ऑक्सिजन वायू तयार करून स्वतः वापरतात व काही प्रमाणात (21%) वातावरणात सोडतात.


वनस्पतींमध्ये मोठया आंतरपेशीय पोकळ्या असतात त्यामुळे पर्णरंध्रातुन (Stomata) आलेल्या हवेच्या संपर्कात सर्व पेशी असतात.


त्यामुळे वनस्पतींचे मूळ खोड, पाने यासारखे सर अवयव श्वसन करतात.


वनस्पतींमध्ये वायूंची देवाणघेवाण विसरण (Diffusion) क्रियेने होते.


दिवसा वनस्पती प्रकाश संश्लेषण आणि श्वसन या दोन्ही क्रिया एकाचवेळी पार पाडतात.


तेव्हा तयार झालेला कार्बन डायॉकसाईड प्रकाश संश्लेषणासाठी वापरला जातो.


वनस्पती दिवस मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मुक्त करतात परंतु रात्रीच्या वेळेस प्रकाश संश्लेषण क्रिया होत नसल्यामुळे फक्त श्वसनक्रिया चालू असते त्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑकसाईड बाहेर टाकला जातो. 


अपवाद –


वड, तुळस.



211 viewsAmol Kavade Patil.., 10:19
ओपन / कमेंट
2022-08-30 13:16:15 श्वसन संस्था (Respiratory System) :


198 viewsAmol Kavade Patil.., 10:16
ओपन / कमेंट
2022-08-28 16:01:26 श्वसन संस्था (Respiratory System) :


शरीराच्या परिसरातील हवेतून ऑक्सिजन वायूचे ग्रहण करणे आणि हवेत कार्बन डाय-ऑक्साइड वायूचे उत्सर्जन करणे या कार्यासाठी विकसित झालेल्या इंद्रिय प्रणालीस श्वसन तंत्र असे म्हणतात.



नाक व तोंडापासून सुरू होणारा श्वसनमार्ग, फुप्फुसे, छातीचा पिंजरा आणि श्वसनक्रियेवर नियंत्रण ठेवणारे मेंदूतील केंद्र यांचा समावेश श्वसन तंत्रात होतो.


श्वास आत घेणे आणि बाहेर सोडणे एवढ्यापुरतीच श्वसनाची क्रिया मर्यादित नसते.


जैवरासायनिक आणि कोशिकीय (पेशींच्या) पातळीवर श्वसन ही सर्व प्राण्यांमध्ये अत्यावश्यक अशी अनेक रासायनिक प्रक्रियांची साखळी असते.


कोशिकेच्या जीवनासाठी आवश्यक अशी ऊर्जा पोषक द्रव्यांच्या चयापचयातून (शरीरात सतत घडणाऱ्या रासायनिक व भौतिक घडामोडींतून) प्राप्त करून घेण्यासाठी (कार्बोहायड्रेटे, प्रथिने आणि वसा द्रव्ये यांच्या विघटनाच्या प्रक्रियेतून) ऑक्सिजनाचा वापर केला जातो.


सजीवांमध्ये सात्मीकरण झालेल्या अन्नपदार्थांतून ऊर्जा मुक्त होण्याच्या प्रक्रियेला श्वसन असे म्हणतात.


प्रौढ व्यक्तींमध्ये श्वसनाचा वेग प्रति मिनिटाला १४ वेळा एवढा असतो.


लहान मुलांत तो प्रति मिनिटाला ४५, मोठ्या मुलांमध्ये प्रति मिनिटाला २५ एवढा असतो.


ऐच्छिकरीत्या श्वसनाचा वेग नियंत्रित केला जातो, परंतु हा वेग ठरवणारा सर्वात महत्वाचा घटक रक्तातील कार्बनडायऑकसाईडचे प्रमाण होय.


रक्तातील कार्बनडायऑकसाइड चे प्रमाण जास्त असल्यास श्वसनाचा वेग वाढतो.



341 viewsAmol Kavade Patil.., 13:01
ओपन / कमेंट