Get Mystery Box with random crypto!

VJS eStudy

टेलीग्राम चैनल का लोगो vjsestudy — VJS eStudy V
टेलीग्राम चैनल का लोगो vjsestudy — VJS eStudy
चैनल का पता: @vjsestudy
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1.69K
चैनल से विवरण

Small Initiative To Spread Knowledge Through Technical Aid for competitive & other exams.
YouTube👇
https://www.youtube.com/c/vjsestudy
Instagram👇
https://www.instagram.com/vjsestudy
Facebook👇
http://www.facebook.com/VJSeStudy11

Ratings & Reviews

2.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

2

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 2

2022-05-20 06:59:28राष्ट्रपती निवडणूक

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या पदाची मुदत २४ जुलै रोजी संपुष्टात येणार असून, जुलैच्या सुरुवातीला या पदासाठी निवडणूक होईल. सध्या सत्ताधारी भाजप आणि विरोधकांकडून चाचपणी सुरू झाली आहे. राज्यातील २८८ आमदारांना मतदानाचा अधिकार असतो. विधान परिषद आमदारांना मतदानाचा अधिकार नसतो. राज्यातील आमदारांच्या एका मताचे मूल्य हे १७५ असते. राज्यातील आमदारांची एकूण मते ही ५०,४०० एवढी आहेत. राज्यात सध्या महाविकास आघाडीचे बहुमत असल्याने महाविकास आघाडी पाठिंबा देईल त्या उमेदवाराला राज्यातून २८ हजारांच्या आसपास मते मि‌ळण्याची शक्यता आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एकूण मतदार किती?

- राष्ट्रपतीपदाकरिता खासदार आणि आमदार मतदान करतात.
- देशातील ७७६ खासदार (५४३ लोकसभा आणि २३३ राज्यसभा) आणि ४१२० आमदार अशा एकूण ४८९६ जणांना मतदानाचा अधिकार असतो.
- खासदारांच्या एका मताचे मूल्य हे ७०८ आहे. प्रत्येक राज्यातील १९७१च्या जनगणनेनुसार असलेल्या लोकसंख्येच्या आधारे आमदारांच्या मतांचे मूल्य हे वेगगेवळे असते.
- खासदारांची एकूण मते ही ५,४९,४०८ एवढी आहेत.
- आमदारांची एकूण मते ही ५,४९,४९५ एवढी होतात. या निवडणुकीत एकूण मतांचे मूल्य हे १०,९८,९०३ एवढे आहे.
- पाच लाखांपेक्षा अधिक मते मिळवणारा निवडून येतो.
- निवडून येण्यासाठी एकूण मताच्या 50% मते + 1 मत पडणे आवश्यक असते.

अन्य महत्त्वाच्या राज्यांमधील आमदारांच्या एका मताचे मूल्य किती आहे?

- राज्यातील आमदारांच्या एका मताचे मूल्य हे १७५ असते.
- उत्तर प्रदेशमधील आमदारांच्या मताचे मूल्य हे सर्वाधिक २०८ आहे. याशिवाय तमिळ‌नाडू १७६, ओडिशा १४९, बिहार १७३, झारखंड १७६, बिहार १७३, आंध्र प्रदेश १५९, कर्नाटक १३१, गुजरात १४७ असे मतमूल्य असते.

खासदारांच्या मतांचे मूल्य कमी होणार?

- लोकसभा व राज्यसभेच्या खासदारांचे मूल्य हे ७०८ आहे. हे मूल्य एकूण विधानसभा आमदारांची मते भागिले एकूण खासदारांची संख्या या आधारे निश्चित केले जाते.
- आमदारांची एकूण मते ही ५,४९,४९५ आहेत. या संख्येला लोकसभा व राज्यसभेचे एकूण खासदार ७७६ याने भागले जाते. त्यातून खासदारांच्या एका मताचे मूल्य ७०८ निश्चित करण्यात आले.
- जम्मू आणि कश्मीर हा केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आला. जम्मू आणि कश्मीरमध्ये अद्याप विधानसभेची निवडणूक झालेली नाही. सध्या जम्मू आणि कश्मीरमध्ये आमदार नाहीत. यामुळे एकूण आमदारांच्या मतांची संख्या कमी होईल. त्याचा परिणाम खासदारांच्या मतांच्या मूल्यावर होणार आहे.
- खासदारांच्या मतांचे मूल्य हे ७०८ वरून घटून ७०० होण्याची शक्यता वर्तविली जाते.

राज्यातील आमदारांच्या मतांचे मूल्य कसे ठरते?

- राज्यातील १९७१च्या जनगणनेनुसारची लोकसंख्या व त्याला एकूण विधानसभा सदस्यांच्या संख्येने भागले जाते. त्यातून येणारी संख्या ही एका मतांचे मूल्य मानले जाते.
- १९७१ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ५ कोटी चार लाख १२ हजार २३५ होती. या संख्येला २८८ ने भागले जाते. त्यातून एका मताचे मूल्य हे १७५ होते. एकूण २८८ आमदार गुणिले १७५ अशी पद्धतीने राज्यातील आमदारांची एकूण मते ही ५०,४०० होतात.

राष्ट्रपतीच्या निवडणूकीत मतदार कोण असतात ?

- राष्ट्रपती एका निर्वाचन गणाकडून निवडला जातो.
- यामध्ये संसदेचे (राज्यसभा आणि लोकसभा) फक्त निवडून आलेले लोकप्रतिनिधी (खासदार) आणि राज्यांच्या फक्त विधानसभेतील निवडून आलेले लोकप्रतिनिधी आमदार मतदान करतात.
- याशिवाय दिल्ली आणि पाॅडेचेरीचे निवडून आलेले आमदारही निवडूनकीत मतदान करतात.
- एखादा खासदार किंवा आमदार अनुपस्थित होता त्यामुळे निर्वाचन गण अपूर्ण होता या कारणास्तव निवडणूकवर अक्षेप घेता येत नाही.

संविधानिक तरतुदी

- कलम 52: भारताचा एक राष्ट्रपती असेल
- कलम 53: भारताच्या संघराज्याच्या कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीकडे असेल
- कलम 54: राष्ट्रपतीची निवडणूक
- कलम 55: निवडणुकीची पद्धत
- कलम 56: राष्ट्रपतींचा कार्यकाळ
- कलम 57: पुनर्निवडीसाठी पात्रता
- कलम 58: राष्ट्रपतीपदासाठी पात्रता

राष्ट्रपतीच्या निवडणूकीसंबंधी वाद

- राष्ट्रपतीच्या निवडणुकीसंबंधी निर्माण झालेल्या शंका व तक्रारींचे निरसन केवळ सर्वोच्च न्यायालयातच केलं जातं.
- सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक वैध ठरवली तरी राष्ट्रपतींनी या आधी केलेल्या कोणत्याही कृती रद्द होत नाहीत व पुढेही अमलात राहतात.

Input By: Vaibhav Shivade
Team @VJSeStudy
YouTube I Facebook I Instagram

अधिक माहितीसाठी आणि व्हिडिओ लेक्चर्स पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://www.youtube.com/c/vjsestudy
218 viewsedited  03:59
ओपन / कमेंट
2022-05-18 09:55:52 राज्यसेवा पूर्व परीक्षा अभ्यासक्रम
Updated : 17 मे 2022

Team @VJSeStudy
YouTube I Facebook I Instagram
155 viewsedited  06:55
ओपन / कमेंट
2022-05-17 08:56:42 अजिंठा लेणी

- एकसंध बेसाल्ट जातीच्या दगडापासून लेण्यांची निर्मिती केली आहे.
- हु यान त्सांगने लेण्याविषयी लिहून ठेवले आहे.
- एप्रिल 1819 साली स्मिथ या ब्रिटिशाने या लेण्यांचा शोध लावला.
- हिनयान आणि महायान अशा दोन्ही पंथाच्या लेण्या आहेत.
- एकूण 30 लेण्या: पैकी 4 चैत्यगृह बाकी 25 विहार आहेत.
- हिनयान पंथीय लेण्या क्रमांक: 8, 9, 10, 11 आणि 13 तर बाकी सर्व महायान पंथीय आहेत.

Team @VJSeStudy
YouTube I Facebook I Instagram
192 views05:56
ओपन / कमेंट
2022-05-12 15:00:09राजीव कुमार (Rajiv Kumar)

- भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner of India) म्हणून राष्ट्रपतीकडून नियुक्ती.
- या अगोदर ते निवडणूक आयुक्त (Election Commissioner) म्हणून कार्यरत होते.


Team @VJSeStudy
197 viewsedited  12:00
ओपन / कमेंट
2022-05-12 09:39:53 चक्रीवादळ (Cyclone) संपूर्ण माहिती



248 viewsedited  06:39
ओपन / कमेंट
2022-05-12 09:35:04 भारतातलं 40 वे जागतिक वारसा स्थळ (40th World Heritage Site in India)



241 viewsedited  06:35
ओपन / कमेंट
2022-05-12 07:15:31 ● राज्यसेवा पूर्व फॉर्म भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरु...

राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२२ साठी अर्ज प्रक्रिया आज पासून १२ मे २०२२ रोजी २ वाजेच्या नंतर चालू होईल...
वेबसाईट: mpsconline.gov.in account log in करून..
आपले खाते बघून घ्या आणि जे पात्र कागदपत्रे असतील त्याची माहिती अद्यावत करा आणि जे कालावधी संपली असेल ती माहिती काढून टाका.. विशेषतः EWS आणि NCL प्रमाणपत्राची माहिती.
जाहिरात ज्या चालू वर्षात आली त्या आर्थिक वर्षीचे valid असणारे कागदपत्रे लागत असतात.( राज्यसेवा पूर्व 2022 जाहिरात साठी 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या वर्षातील valid कागदपत्रे लागतील.)
विशेष करून DY.SP ची तयारी करणारे मुले छाती चा criteria नीट भरा मुख्य परीक्षा ला पूर्व परीक्षा ची माहिती forward होत असते..
caste मध्ये असणारे तुमच्या caste साठी जागा सध्या नसतील तरीही तुम्ही original cast मधूनच फॉर्म भरा.. मुख्य परीक्षा होण्याच्या अगोदर आयोगाला जस मागणीपत्र प्राप्त होतील त्या प्रमाणे आयोग जागा वाढवील त्यामुळे तुमच्या original caste मधूनच फॉर्म भरा..
फॉर्म भरणे झाल्यावर payment status जरूर चेक करा. Paid आहे का ते.. Payment करताना शक्यतो debit card, online banking चा use करा.. फोन pay, गूगल पे शक्यतॊ नको..
फॉर्म भरताना काही अडचण येत असल्यास अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन सल्ला घ्या..

Team @VJSeStudy
YouTube I Facebook I Instagram
284 views04:15
ओपन / कमेंट
2022-05-11 10:36:51राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील गट अ तसेच गट ब संवर्गातील एकूण 161 पदांच्या भरतीकरिता राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 ची जाहिरात (क्रमांक 045/2022) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Team @VJSeStudy
475 viewsedited  07:36
ओपन / कमेंट
2022-05-11 07:19:05 भारतातलं 39 वे जागतिक वारसा स्थळ (39th World Heritage Site in India)



488 viewsedited  04:19
ओपन / कमेंट
2022-05-11 07:10:59
भावपूर्ण श्रद्धांजली
पंडित शिवकुमार शर्मा परिचय.

Team @VJSeStudy
YouTube I Facebook I Instagram
326 viewsedited  04:10
ओपन / कमेंट