2021-02-09 08:30:45
संगणकाच्या मदतीने रूबिक क्युबचे कोडे सोडवण्यात यश.
दिवसेंदिवस कृत्रिम बुद्धिमत्तेचे क्षेत्र विस्तारत असताना आता वैज्ञानिकांनी रूबिक क्युबचे तर्कावर आधारित कोडे सोडवण्यासाठी अलगॉरिथम विकसित केले आहे. सेकंदापेक्षाही कमी काळात हे कोडे संगणकाच्या मदतीने सोडवण्यात यश आले आहे.
तसेच माणसाकडून कुठलेही प्रशिक्षण नसताना यंत्राच्या मदतीने हे कोडे सोडवता येते हे स्पष्ट झाले आहे.
हंगेरीच्या स्थापत्यशास्त्रज्ञाने 1974 मध्ये रूबिक क्यूबचा शोध लावला होता. हे कोडे सोडवताना अनेकांना जड जाते. डीपक्युब ए या अलगॉरिथमच्या मदतीने हे कोडे सोडवण्यात यश आले असून कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी
अलगॉरिथम तयार केला आहे. सेकंदापेक्षाही कमी काळात हे कोडे त्याच्या मदतीने सोडवण्यात आले.
स्पर्धा परीक्षा चळवळ, पुणे
Economics Online Academy
Admin = रितेश धांडे & सुजय माळी
1.5K views05:30