Get Mystery Box with random crypto!

CrackedSoft

टेलीग्राम चैनल का लोगो computer_mpsc — CrackedSoft C
टेलीग्राम चैनल का लोगो computer_mpsc — CrackedSoft
चैनल का पता: @computer_mpsc
श्रेणियाँ: प्रौद्योगिकियों
भाषा: हिंदी
ग्राहकों: 274
चैनल से विवरण

Cracked software and app

Ratings & Reviews

1.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

2


नवीनतम संदेश 49

2021-04-18 14:32:45 विस्डन क्रिकेट पुरस्कार - २०२०

आघाडीचा पुरुष क्रिकेटपटू : बेन स्ट्रोक्स

आघाडीची महिला क्रिकेटपटू : बेथ मुनी

सर्वोत्कृष्ट टी-२० खेळाडू : किरेन पोलार्ड

२०२० वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू

झॅक क्रॉली : इंग्लंड
डोम सिब्ली : इंग्लंड
मोहम्मद रिझवान : पाकिस्तान
जेसन होल्डर : वेस्ट इंडिज
डॅरेन स्टीवन्स : इंग्लंड

दशकातील सर्वोत्कृष्ट खेळाडू (वनडे)

१९७० : विव रीचर्ड्स
१९८० : कपिल देव
१९९० : सचिन तेंडुलकर
२००० : मुथैय्या मुरलीधरन
२०१० : विराट कोहली .
@,
1.3K views11:32
ओपन / कमेंट
2021-04-18 05:40:45
*राज्यसेवा Integrated स्कॉलरशिप टेस्ट*

आपण MPSC व्दारे घेण्यात येणारी राज्यसेवा परीक्षा देऊन Class-1 सरकारी अधिकारी बनू इच्छिता? MPSC व्दारे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परिक्षांची पातळी जाणून घेण्यासाठी Unacademy व्दारे घेण्यात येत असलेली "राज्यसेवा Integrated स्कॉलरशिप टेस्ट" द्या आणि सोबत मिळावा Unacademy वरील Special Batches च्या Subscriptions वर सूट/सवलत मिळवण्याची संधी.
आपण Live Test घेतल्यास आपल्याला रँकिंग (Ranking) प्रदान केले जाईल आणि त्याआधारे खालीलप्रमाणे स्कॉलरशिप मिळविण्याची संधी प्राप्त होईल.
[Rank 1-3 = 100% Scholarship on 3 month's subscription;
Rank 4-13 = 75% Scholarship on 3 month's subscription;
Rank 14-20 = 50% Scholarship on 3 month's subscription]

Link - https://unacademy.com/test-series/snjukt-b-integrated-sklrip-es-600/ELCX822W

Use code 'MPSCLIVE' to unlock the free contet!
1.2K views02:40
ओपन / कमेंट
2021-04-17 14:40:29मरकझ’ला परवानगी नाही

रमझानच्या काळात निझामुद्दीन मरकझमध्ये भाविकांना प्रवेश देण्याबाबत सहमती दर्शवणाऱ्या केंद्र सरकारने दुसऱ्याच दिवशी घूमजाव करीत मशिदीमध्ये कोणालाही कोणत्याही कार्यक्रमास मुभा दिली जाऊ शकत नाही, असे मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयापुढे स्पष्ट केले.

नमाज अदा करण्यावर घालण्यात आलेले निर्बंध शिथिल करून भाविकांना ‘मरकझ’मध्ये प्रवेश मिळावा, अशी मागणी करणाऱ्या दिल्ली वक्फ मंडळाच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

राजधानीत ‘दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा’च्या (डीडीएमए) मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व धार्मिक कार्यक्रमांवर १० एप्रिलपासून बंदी घालण्यात आल्याने रमझान महिन्यात निझामुद्दीन मरकझमध्ये अशा प्रकारच्या कोणत्याही कार्यक्रमास परवानगी देता येणार नाही, असे केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांनी दिल्ली उच्च न्यायालयास सांगितले. त्यावर न्यायालयाने तसे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले.

न्यायमूर्ती मुक्ता गुप्ता यांनी केंद्र सरकारच्या वकिलांचा जबाब नोंदवून घेतला. त्यानुसार गेल्या वर्षापासून मशिदीत नमाज अदा करणाऱ्या पाच जणांना पुढील सुनावणीपर्यंत तसे करण्यास परवानगी असेल.
1.3K views11:40
ओपन / कमेंट
2021-04-17 14:40:28 भारत कोणत्याही दबावापुढे झुकत नाही हे सिद्ध

देशाच्या उत्तरेकडील सीमेवरील सद्य:स्थिती बदलण्याचे प्रयत्न करण्यात आले त्याविरुद्ध भारत खंबीरपणे उभा राहिला आणि भारत कोणत्याही दबावाखाली झुकणार नाही हे देशाने सिद्ध केले, असे संरक्षण दलांचे प्रमुख जन. बिपीन रावत यांनी गुरुवारी येथे स्पष्ट केले. पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनचे सैनिक एकमेकांसमोर उभे ठाकले होते त्या संदर्भाने रावत बोलत होते.

रायसिन चर्चासत्रामध्ये सहभागी होताना रावत पुढे म्हणाले की, चीनकडे वरच्या दर्जाचे सशस्त्र दल आहे त्यामुळे आपण अनेक देशांना झुकवू शकतो असा त्यांचा समज होता, परंतु भारताने खंबीर भूमिका घेत देश कोणत्याही दबावापुढे झुकणार नाही हे सिद्ध केले, असे रावत म्हणाले.

भारताने खंबीर भूमिका घेतली आणि त्याला आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठिंबा मिळाला, भारत दबावापुढे झुकेल असे त्यांना वाटले, मात्र तसे घडले नाही, असेही ते म्हणाले. भारत आणि चीनचे सैनिक पूर्व लडाखमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकले होते आणि त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले होते.

मात्र लष्करी आणि राजनैतिक स्तरावर चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आणि दोन्ही देशांनी फेब्रुवारी महिन्यात पांगॉँग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिणेकडील तीरांवरून आपले सैनिक आणि शस्त्रे मागे घेतली. आता संघर्षाची जी ठिकाणे राहिली आहेत तेथूनही सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे, असेही ते म्हणाले.
1.1K views11:40
ओपन / कमेंट
2021-04-17 14:40:28 आशियाई कुस्ती स्पर्धा - सरिताला सुवर्णपदक

भारताची कुस्तीपटू सरिता मोर हिने जोमाने पुनरागमन करत मोंगोलियाच्या शूवदोर बातारजाव हिचे आव्हान परतवून लावत सलग दुुसऱ्यांदा आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. सीमा बिस्ला (५० किलो) आणि पूजा (७६ किलो) यांना कांस्यपदक मिळाले.

अंतिम फेरीची लढत संपायला दोन मिनिटे शिल्लक असताना सरिता १-७ अशी पिछाडीवर पडली होती. पण ५९ किलो वजनी गटात पंचांकडे दाद मागण्याचा भारताचा निर्णय फसल्यानंतर बातारजावला चार गुणांची बढत मिळाली. त्यातच सरिताने स्वत:वरील नियंत्रण सुटल्यामुळे बातारजावला आणखी एक गुण मिळवता आला. बातारजावने ७-१ अशी आघाडी घेतल्यानंतर सरिताने पुनरागमन केले.

बातारजावविरुद्ध चाल रचत सरिताने चार गुणांची कमाई केली. त्यानंतर बातारजावला रिंगणाच्या बाहेर ढकलत सरिताने ७-७ अशी बरोबरी साधली. अवघ्या २० सेकंदांचा खेळ शिल्लक असताना सरिताने आणखी एक डावपेच आखत गुण वसूल केले. अखेरीस १०-७ अशा फरकाच्या आधारे सरिताने या स्पर्धेतील सलग दुसरे सुवर्णपदक प्राप्त केले.

प्रतिस्पर्धी २०१८ सालची जागतिक कांस्यपदक विजेती असल्याने हा सामना माझ्यासाठी खडतर होता. पण मी माझ्यापरीने सामन्याची तयारी केली होती. पहिल्याच सामन्यात तिच्याकडून हरल्यानंतर अंतिम फेरीत मी रणनीतीची योग्य अंमलबजावणी केली.
1.1K views11:40
ओपन / कमेंट
2021-04-17 11:10:56 ISS कडे ‘सोयुझ एमएस-18’ अंतराळयान पाठविण्यात आले.

9 एप्रिल 2021 रोजी कझाकस्तानमधील स्पेसपोर्ट येथून ‘सोयुझ एमएस-18’ अंतराळयान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) याकडे पाठविण्यात आले.

ठळक बाबी

अंतराळयानाद्वारे 3 जणांना याकडे पाठविण्यात आले आहे. त्यात रशियाचे दोन व्यक्ती आणि अमेरिकेच्या NASA संस्थेचा एक अभियंता यांचा समावेश होता.

हे यान आता 180 दिवसांनी म्हणजेच 13 ऑक्टोबर 2021 रोजी पृथ्वीवर परतणार आहे.

‘सोयुझ एमएस-18’ अंतराळयानाचे संचालन रशियाच्या रोसकॉसमॉस या अंतराळ संस्थेकडून केले जात आहे.
व्यक्तींना घेऊन उडणाऱ्या सोयुझ अंतराळयानाचे हे 146 वे उड्डाण आहे.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS)

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) हे पृथ्वीच्या खालच्या अंतराळ कक्षेत 400 किलोमीटर दूर आकाशात तरंगणारे एक अंतराळ स्थानक आहे. या कृत्रिम उपग्रहावर मानवाचा अधिवास शक्य झाला आहे. 1998 साली या बहू-राष्ट्रीय प्रकल्पाचा पहिला भाग अंतराळात पाठवण्यात आला. आज ISS वर अमेरिका, रशिया, कॅनडा आणि जपान या देशांचे अंतराळवीर कार्यरत आहेत.
1.2K views08:10
ओपन / कमेंट
2021-02-17 18:36:22 राज्यसेवा संयुक्त गट ब व गट क परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वोत्तम Telegram चॅनेल्स
✿┅═══❁● ●❁═══┅✿

संगणक व माहिती तंत्रज्ञान
@Computer_MPSC

मला अधिकारी व्हायचंय
@Dream_Adhikari

शासकीय परीक्षाभिमुख योजना
@GovernmentSCHEME

रिलायबल अकॅडमी
@Reliableacademy_1

पोलीस भरती २०२१
@MAHAPOLICE_2021

स्पर्धायुग PDF NOTES
@MPSCPDFS

के सागर फोकस
@ksagarfocus

नितीन अहिरराव सर
@MPSC_UPSC_Katta

शॉर्ट ट्रिक्स MPSC ट्रिक्स
@Tricks_Mpsc_Tricks

चालुघडामोडी + सामान्य ज्ञान
@ChaluGhadamodiMPSC

मेगाभरती
@MPSC_VISION

MPSC संपूर्ण मार्गदर्शन
@Mpsc_Diary

इतिहास:- सचिन गुळीग
@History4all

राज्यसेवा मुख्य सामान्य अध्ययन
@MPSC_LIVE

लक्ष्यवेध चालू घडामोडी
@Lakshyvedh

अभ्यास ते अधिकारी
@Study_Officer707

अनिल कोलते सर
@AnilkolteMPSC

दिपस्तंभ फाउंडेशन
@Deepstambh

✿┅═══❁● ●❁═══┅✿

वरील काही चॅनल्स् चे ॲडमीन हे महाराष्ट्रातील (पुण्यातील) दर्जेदार
शिक्षक आहेत शिवाय नामवंत लेखक आहेत.

घरी रहा, सुरक्षित रहा
602 views15:36
ओपन / कमेंट
2021-02-17 17:18:52 Free and Open for All - आज रात्रि 9 वाजता CSAT Comprehension यावर भूषण धूत सर यांचे मोफत लेक्चर

9 pm - Comprehension Free and Open to all Lecture - How to solve Philosophical Passages ( सगळ्यांसाठी मोफत )

Enroll now -
https://unacademy.com/course/csat-comprehension-philosophical-passages/JQAM05UP

Use code BHUSHANLIVE for access of Free Lecture
Payment Link -
https://unacademy.com/goal/maharashtra-public-service-commission/GNFFE/subscribe?referral_code=BHUSHANLIVE&duration=24
630 views14:18
ओपन / कमेंट
2021-02-17 15:44:39 स्टेट बोर्ड ची पुस्तके Underlined आणि Highlight केलेली बुक्स डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. जे क्लिक केले तेच ओपन होईल.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
विज्ञान 5 वी ते 10 वी
click here ➥  Download
---------------------------------------------------
भूगोल 5 वी ते 12 वी
click here ➥  Download
---------------------------------------------------
इतिहास 5 वी ते 10 वी
click here ➥  Download
---------------------------------------------------
राज्यघटना 5 वी ते 12 वी
click here ➥  Download
---------------------------------------------------
अर्थव्यवस्था 8 वी ते 12 वी
click here ➥  Download
---------------------------------------------------
---------------------------------------------------
PSI-STI-ASO पूर्वपरीक्षा
आयोगाच्या प्रश्नपत्रिका 2011-2019
click here ➥  Download
---------------------------------------------------
ASO मुख्यपरीक्षा पेपर I आयोगाच्या प्रश्नपत्रिका 2011-2019
click here ➥  Download
---------------------------------------------------
ASO मुख्यपरीक्षा पेपर IIआयोगाच्या प्रश्नपत्रिका 2011-2019
click here ➥  Download
---------------------------------------------------
STI मुख्यपरीक्षा पेपर Iआयोगाच्या प्रश्नपत्रिका 2011-2019
click here ➥  Download
---------------------------------------------------
STI मुख्यपरीक्षा पेपर II आयोगाच्या प्रश्नपत्रिका 2011-2019
click here ➥  Download
---------------------------------------------------
PSI मुख्यपरीक्षा पेपर I आयोगाच्या प्रश्नपत्रिका 2010-2019
click here ➥  Download
---------------------------------------------------
PSI मुख्यपरीक्षा पेपर II आयोगाच्या प्रश्नपत्रिका 2010-2019
click here ➥  Download
---------------------------------------------------

वरील कोणत्याही लिंक वर क्लिक करून Pin केलेले PDF पहा..
733 views12:44
ओपन / कमेंट