Get Mystery Box with random crypto!

MPSC Economics

टेलीग्राम चैनल का लोगो mpsceconomics — MPSC Economics M
टेलीग्राम चैनल का लोगो mpsceconomics — MPSC Economics
चैनल का पता: @mpsceconomics
श्रेणियाँ: अर्थशास्त्र
भाषा: हिंदी
ग्राहकों: 74.65K
चैनल से विवरण

Here u can get all useful info about economics for competitive exams.
Join us @MPSCEconomics

Ratings & Reviews

4.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

2

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 3

2023-06-12 15:00:00
अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCEconomics
1.4K views12:00
ओपन / कमेंट
2023-06-12 14:07:01 पूर्णपणे परिवर्तनीय :-

जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारावर व्यवहार करता येणार्‍या चलनावर किती कृत्रिमरित्या आंतरराष्ट्रीय व्यापारात चलनावर निश्चित मूल्य किंवा किमान मूल्य लादत नाही. अमेरिकन डॉलर ही मुख्य पूर्णपणे परिवर्तनीय चलनांपैकी एक आहे.

अर्धवट परिवर्तनीय :-

मध्यवर्ती बँका देशामध्ये आणि बाहेर वाहत असलेल्या आंतरराष्ट्रीय गुंतवणूकीवर नियंत्रण ठेवतात. बहुतेक देशांतर्गत व्यवहार कोणत्याही विशेष गरजांशिवाय हाताळले जातात, परंतु आंतरराष्ट्रीय गुंतवणूकीवर लक्षणीय निर्बंध आहेत आणि इतर चलनात रुपांतर करण्यासाठी अनेकदा विशेष मान्यता आवश्यक असते. भारतीय रुपया आणि रेन्मिन्बी ही अंशतः परिवर्तनीय चलनांची उदाहरणे आहेत.न बदललेलेएखादे सरकार आंतरराष्ट्रीय चलन बाजारामध्ये भाग घेत नाही किंवा व्यक्ती किंवा कंपन्यांद्वारे त्याचे चलन रूपांतरित करण्यास परवानगी देत ​​नाही. या चलने देखील ओळखले जातात अवरोधित , उदा उत्तर कोरियन वोन आणि क्यूबन पेसो .

1.7K views11:07
ओपन / कमेंट
2023-06-12 14:07:00  चलन 
सर्वात विशिष्ट अर्थाने आहे पैसे कोणत्याही स्वरूपात म्हणून वापर किंवा चलनात तेव्हा व्यवहाराचे माध्यम , विशेषत: प्रसारित banknotes आणि नाणी अधिक सामान्य व्याख्या अशी आहे की चलन म्हणजे सामान्य पैशाच्या पैशाची (आर्थिक युनिट्स) सामान्यतः वापरात असते.  या व्याख्येनुसार, अमेरिकन डॉलर (यूएस डॉलर), युरो , जपानी येन आणि पाउंड स्टर्लिंग ही चलनांची उदाहरणे आहेत. या विविध चलनांचे मूल्य स्टोअर्स म्हणून ओळखले जाते आणि परकीय चलन बाजारात राष्ट्रांमध्ये व्यापार केला जातो , जे वेगवेगळ्या चलनांच्या संबंधित मूल्ये ठरवतात.  या अर्थाने चलने सरकारांनी परिभाषित केल्या आहेत आणि प्रत्येक प्रकारच्या मान्यतेच्या मर्यादा आहेत.

 आर्थिक प्रणाली : अधिकृत मान्यता पैसा आणि कमोडिटी पैसा (मोठ्या वि सरकारने भौतिक मेटल साठा अर्थव्यवस्था) चलन मूल्य हमी काय अवलंबून. काही चलने काही राजकीय अधिकार क्षेत्रात कायदेशीर निविदा असतात . इतरांचा फक्त त्यांच्या आर्थिक मूल्यासाठी व्यापार केला जातो.

संगणक आणि इंटरनेटच्या लोकप्रियतेमुळे डिजिटल चलन निर्माण झाले आहे . डिजिटल नोट्स आणि नाणी यशस्वीरित्या विकसित केल्या जातील की नाही याबद्दल शंका आहे.  क्रिप्टोकरन्सीजसारख्या विकेंद्रीकृत डिजिटल चलने कायदेशीर चलन नसतात, काटेकोरपणे बोलतांना, कारण ती सरकारी नावे प्राधिकरणाद्वारे जारी केली जात नाहीत आणि कायदेशीर निविदा नाहीत. विविध देशांकडून जारी करण्यात आलेल्या बर्‍याच चेतावणींमध्ये मनी लाँडरिंग आणि दहशतवाद यासारख्या बेकायदेशीर कृतींसाठी क्रिप्टो करन्सी तयार करण्याच्या संधींची दखलही घेतली जाते . मध्ये, युनायटेड स्टेट्स आयआरएसने स्टेटमेंट जारी केले की स्पष्टीकरण दिले की आभासी चलन फेडरलच्या मालमत्तेसारखे मानले जातेआयकर उद्दीष्टे आणि प्रॉपर्टीचा समावेश असलेल्या व्यवहारावर लागू असलेल्या दीर्घकालीन कर तत्त्वांची उदाहरणे प्रदान करणे व्हर्च्युअल चलनावर लागू होते. 

1.1K views11:07
ओपन / कमेंट
2023-06-12 14:06:59 अर्थसंकल्प :-

आयव्ययाचे अंदाजपत्रक. विशिष्ट आर्थिक परिस्थितीने लादलेल्या आर्थिक मर्यादांनुसार जमाखर्चाची तोंडमिळवणी करण्याची कला म्हणजे अर्थसंकल्प. प्रत्येक व्यक्तीला आणि संघटनेला अर्थसंकल्प आखावा लागतो. त्यानुसार आपले खर्चाचे आणि उत्पादनाचे कार्यक्रम योजावे लागतात. मर्यादित प्रमाणात असलेल्या साधनसामग्रीचे कार्यक्षमपणे वाटप करण्याची कसरत शासनालाही करावी लागते. अर्थसंकल्प सामान्यतः एका वर्षापुरता असला, तरी त्यापेक्षा कमी किंवा अधिक कालखंडाकरिता तो तयार केला जातो. बजेट हा इंग्रजी शब्द मूळ फ्रेंच Bougette (लहानशी थैली) ह्या शब्दावरून आला आहे. अर्थसंकल्प मांडताना ब्रिटिश अर्थमंत्री छोट्या थैलीतून आगामी वर्षांची आयव्ययविषयक कागदपत्रे बाहेर काढून संसदेपुढे ठेवत असत.

अर्थसंकल्पाची क्रिया तीन भागांत स्पष्ट करता येईल :

(१) शासनाने करावयाची निरनिराळ्या उद्दिष्टांची निश्चिती; उदा., शिक्षण, संरक्षण, दळणवळण, शांतता व सुरक्षा, न्यायव्यवस्था, लोककल्याण-योजना इ.,

(२) ठरविलेल्या उद्दिष्टांची पूर्ती करण्यासाठी लागणाऱ्‍या खर्चाचा अंदाज आणि

(३) शासनाने निश्चित केलेल्या कार्यक्रमांसाठी जरूर तेवढा पैसा उभा करण्याची जनतेची इच्छा आणि शक्ती यांचे मूल्यमापन.

855 views11:06
ओपन / कमेंट
2023-06-12 14:06:58 औद्योगिकीकरण

कारखानापद्धतीच्या मोठ्या व भांडवलप्रधान उद्योगांचा विकास, अशी औद्योगिकीकरणाची स्थूलमानाने व्याख्या करता येईल. भांडवलप्रधान उद्योगांचे आधिक्य, हे औद्योगिकीकरण झालेल्या अर्थव्यवस्थेचे एक वैशिष्ट्य असते. त्याचबरोबर लघुउद्योग, कुटीरोद्योग व हस्तव्यवसाय ह्यांचे स्थान व त्यांचा एकूण उत्पादनातील सहभाग अशा अर्थव्यवस्थेत अत्यंत गौण असतो.

818 views11:06
ओपन / कमेंट
2023-06-12 14:06:58 उत्पादन संघटना

उत्पादन संघटना :-
नैसर्गिक साधनसामग्रीवर प्रक्रिया करून उपभोग्य वस्तूंचे किंवा त्यांच्या निर्मितीस उपयुक्त अशा मालाचे उत्पादन, ही आधुनिक अर्थव्यवस्थेतील एक अत्यंत महत्त्वाची क्रिया आहे; कारण सर्व आर्थिक व्यवहारांचे अंतिम उद्दिष्ट- ग्राहकांच्या गरजा भागविणे-कितपत साध्य होऊ शकेल, हे उत्पादनावरच अवलंबून असते. आवश्यक ते उत्पादक घटक इष्ट प्रमाणात वापरून ग्राहकांच्या गरजा भागविणाऱ्या वस्तूंची किंवा सेवांची निर्मिती उत्पादनसंस्था करीत असतात. त्या अनेक प्रकारच्या असतात; काही लहान, काही मध्यम तर काही प्रचंड प्रमाणावर उत्पादन करतात. प्रत्येक संस्थेमध्ये अनेक व्यक्ती एकत्र येऊन काम करीत असल्यामुळे अशा संस्थांना संघटनेची गरज असते. प्रत्येक उत्पादनसंस्थेस आपली उद्दिष्टे कमीतकमी वेळ व पैसा खर्च करून साधणारी उत्पादन संघटना निर्माण करून ती कार्यवाहीत आणावी लागते.

821 views11:06
ओपन / कमेंट
2023-06-12 14:06:57 आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक संस्था व परिषदा

आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक संस्था व परिषदा : मानवी जीवनाची विविध क्षेत्रे अधिक समृद्ध व्हावीत आणि आधुनिक जगातील तांत्रिक विकासाचा लाभ भूतलावरील सर्व मानवजातीस व्हावा, या उद्देशाने अनेक संस्था आंतरराष्ट्रीय पातळीवर स्थापन झाल्या आहेत. व्यापार, उद्योग, अर्थप्रबंध, वाहतूक व संदेशवहन, कृषी आणि अन्य आनुषंगिक क्षेत्रांतील खाजगी आंतरराष्ट्रीय संघटनांची वाढ एकोणिसाव्या शतकात झपाट्याने झाली आणि विसाव्या शतकात तर तिची गती अधिक वाढली. १९०७ मध्ये अशा संघटना १८५ होत्या, त्या १९६० मध्ये १,२५४ पर्यंत वाढल्या.

819 views11:06
ओपन / कमेंट
2023-06-12 14:06:56 आंतरराष्ट्रीय चलन निधी :-

(इंटरनॅशनल मॉनेटरी फंड. आय्. एम्. एफ्.). ही आंतरराष्ट्रीय चलन-विनिमय-दरांत स्थैर्य आणण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेली संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संलग्न संस्था आहे. आंतरराष्ट्रीय चलन निधी आणि आंतरराष्ट्रीय पुनर्रचना व विकास बँक ह्या दोहोंची स्थापना करण्याच्या करारावर जुलै १९४४ मध्ये न्यू हँपशरमधील ब्रेटन वूड्स परिषदेत सह्या झाल्या. निधीचे कार्यालय वॉशिंग्टन येथे आहे. मार्च १९४७ पासून निधीच्या प्रत्यक्ष कार्यास प्रारंभ झाला.

832 views11:06
ओपन / कमेंट
2023-06-12 14:06:55 पैशाची कार्ये

विनिमयाचे माध्यम म्हणून पैशाचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. पैसा सर्वग्राह्य असल्याने वस्तूंची आणि सेवांची खरेदीविक्री पैशाच्या माध्यमाद्वारे सुलभपणे होते. मूल्यमापनाचे साधन हे पैशाचे दुसरे महत्त्वाचे कार्य होय. दैनंदिन व्यवहारांतील शेकडो वस्तूंच्या व विविध सेवांच्या किंमती ठरविण्याचे साधन म्हणून पैशाचा उपयोग होतो. पैसा विलंबित देणी देण्याचे साधन म्हणून कार्य करतो. रोखीचे व्यवहारच नव्हे, तर पूर्वी केलेले व्यवहार पुरे करण्यासाठी किंवा वर्तमानकाळात केलेले व्यवहार भविष्यकाळात पुरे करण्यासाठी पैशाचा उपयोग होतो. पैशाच्या या गुणामुळे दीर्घमुदतीचे व्यवहार करणे शक्य आणि सुलभ होते. संपत्तीचा साठा करण्याचे साधन म्हणून पैशाचा उपयोग होतो. पैशामध्ये खरेदीशक्ती असते. तीमुळे वस्तू व सेवा पैशाच्या साहाय्याने खरेदी करून त्यांचा साठा करण्यापेक्षा पैशाच्या स्वरूपातच संपत्ती ठेवली, तर त्या शक्तीचा केव्हाही उपयोग करता येतो. संपत्तीचे हस्तांतर करणे पैशामुळे सोपे होते.

871 views11:06
ओपन / कमेंट
2023-06-12 14:06:54 पैसा : -

विनिमयाचे माध्यम म्हणून स्वीकारण्यात येणारी सर्वमान्य वस्तू म्हणजे पैसा .

871 views11:06
ओपन / कमेंट