Get Mystery Box with random crypto!

आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक संस्था व परिषदा आंतरराष्ट्रीय व्या | MPSC Economics

आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक संस्था व परिषदा

आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक संस्था व परिषदा : मानवी जीवनाची विविध क्षेत्रे अधिक समृद्ध व्हावीत आणि आधुनिक जगातील तांत्रिक विकासाचा लाभ भूतलावरील सर्व मानवजातीस व्हावा, या उद्देशाने अनेक संस्था आंतरराष्ट्रीय पातळीवर स्थापन झाल्या आहेत. व्यापार, उद्योग, अर्थप्रबंध, वाहतूक व संदेशवहन, कृषी आणि अन्य आनुषंगिक क्षेत्रांतील खाजगी आंतरराष्ट्रीय संघटनांची वाढ एकोणिसाव्या शतकात झपाट्याने झाली आणि विसाव्या शतकात तर तिची गती अधिक वाढली. १९०७ मध्ये अशा संघटना १८५ होत्या, त्या १९६० मध्ये १,२५४ पर्यंत वाढल्या.